मुख्य सामग्रीवर वगळा

लोणावळ्यातील पर्यटन स्थळे | Lonavala Tourism information in Marathi

लोणावळा पर्यटन स्थळे | Lonavala Tourism information in Marathi

      लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असून याठिकाणी मुंबई पुण्याबरोबरच देशातून मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. लोणावळा हे पुणे जिल्ह्यात असून प्रमुख हिल स्टेशन आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची ६२० मिटर असून सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे. मुंबई-पुण्यात पासून जवळ असल्याने विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणी पैकी आहे. या ठिकाणी उंच डोंगर रांगा दऱ्या धबधबे विपुल वनसंपदा किल्ले लेणी थंड हवा यासारख्या नैसर्गिक साधन संपत्ती बरोबरच मनोरंजन पार्क थीम पार्क कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटी मुळे पर्यटकांमध्ये प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे.
       लोणावळा पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळविण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात.

लोणावळा
लोणावळा
हे ही वाचा: रत्नागिरी पर्यटन स्थळे

लोणावळ्याचा इतिहास | Lonavala History in Marathi

       लोणावळा हे बोर घाटातून चालणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर येत असल्याने या ठिकाणी वाट सरुंच्या 
राहण्यसाठी डोंगरांमध्ये लेणी निर्माण केल्या आहेत. याच परिसरात बौद्ध भिक्षू द्वारा निर्माण केलेल्या लेण्या व चैत्यगृह वरून या ठिकाणचा संबंध इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात येत असावा. लोणावळा हे यादवांच्या राजवटीत त्यांच्या अमलात येत होते, त्यानंतर च्या कालखंडामध्ये मोगलांच्या अधिपत्याखाली आले. शेवटी सतराव्या शतकात या ठिकाणी पवन मावळ या बरोबरच लोणावळा ही मराठ्यांच्या आधिपत्याखाली होते. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्ध पर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता.
        १८७१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा लॉर्ड एल्फिन्स्टन मुंबई प्रांताचा गव्हर्नर असताना लोणावळा व खंडाळा विकसित करून या ठिकाणी मुक्कामी येत असेल. ब्रिटिश अधिकाऱ्यांना मुंबईतील उष्ण हवामान सोसत नसल्याने ते उन्हाळ्यात ते लोणावळ्याला वास्तव्यास येत असत.

लोणावळा मध्ये पाहण्यासारखी ठिकाणे |Best places to visit Lonavala in Marathi

       लोणावळया मध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आल्यानंतर येथील पर्यटन स्थळांना भेटी देणे सोपे व्हावे या दृष्टीने या लेखामध्ये लोणावळ्यातील मुख्य पर्यटन स्थळांची माहिती आपण पाहणार आहोत.

१.भुशी डॅम:

        भुशी डॅम वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांचे एक हक्काचे ठिकाण आहे. या डॅमच्या सांडव्यातून पायऱ्या वरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये मनसोक्त चिंब घेण्यासाठी हजारो पर्यटक पावसात येत असतात. इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर हा धबधबा आहे. याठिकाणी पर्यटक धबधब्यात भिजण्याचा व पोहण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. भुशी डॅम लोणावळा पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. 
        या ठिकाणी प्रवेश निशुल्क असला तरी सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत या ठिकाणी प्रवेश दिला जातो.
भुशी डॅम लोणावळा
भुशी डॅम लोणावळा
हे ही वाचा महाबळेश्वर पर्यटन माहीती

२.कार्ला लेणी:

        कारला हे ठिकाण लोणावळा पासून १२ किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये खडक खोदून निर्माण केलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी लेण्याचे सत्याग्रह व एकवीरा देवीचे मंदिर आहे. या लेण्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण केलेल्या आहेत. अतिकठीण असा बेसाल्ट खडक फोडून अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले करताना आश्चर्याचा धक्का बसतो. चैत्यगृहाच्या बाहेर अखंड दगडात कोरला विजयस्तंभ ही आहे तर चैत्य राज्याबाहेरील भिंतीवर हत्ती स्त्री-पुरुषांची मूर्ती भिंतीवरील नक्षीकाम पाहताना मन प्रसन्न होते. या लेण्यांची चैत्यगृह व बौद्ध भिक्षूंच्या राहण्यासाठी खोल्या अशी एकंदरीत रचना आहे.

प्रवेश फी: भारतीय पर्यटक तीस रुपये
                परदेशी पर्यटक तीनशे रुपये
वेळ.       सकाळी 9 ते सायं पाच वाजेपर्यंत
कार्ला लेणी
कार्ला लेणी

३.भाजे लेणी:

       भाजे लेणी लोणावळ्या जवळील मळवली रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला भाजे स्थित डोंगरात प्राचीन बौद्ध लेणी आहेत. या ठिकाणी एक चैत्यगृह व १२ विहार आहेत. या लेण्या राष्ट्रीय संरक्षक स्मारक म्हणून १९०९ मध्ये घोषित केले आहेत. या लेण्यांमध्ये सूर्यनारायण व इंद्र देवाची मूर्ती स्थापित आहे. येथील सूर्य लेणी प्रसिद्ध असून या ठिकाणची कलाकुसर पाहून मनमोहन जाते. या लेण्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत. भाजे लेणी पाहण्यासाठी वर्षभरात केव्हाही जाऊ शकता.

४.राजमाची पॉइंट:

        राजमाची पॉइंट लोणावळा पासून जवळच खंडाळा च्या घाटामध्ये आहे. ठिकाण मुंबई पुणे जुना हायवे वर आहे. राजमाची लोणावळा येथील मुख्य टुरिस्ट आरक्षण आहे. राजमाची या ऐतिहासिक किल्ल्यावरून याला राजमाची पॉईंट असे नाव मिळाले. या ठिकाणावरून मावळातील राजमाची किल्ला. सह्याद्री पर्वत रांगा पावसाळ्यातील धबधबे, हिरवे डोंगर डोळ्याचे पाणी पडतात. या ठिकाणावरून लँडस्केप फोटोग्राफी उत्कृष्ट करता येते. राजमाची पॉइंटवर एक गार्डन असून त्या ठिकाणी पर्यटक निसर्ग निहाळत आपला वेळ घालू शकतात.

५.लायन्स पॉईंट:

         लोणावळ्यातील लायन्स पॉईंट लोणावळा पासून १२ किलोमीटर दूर भुशी डॅम आणि व्हॅली च्या मध्ये आहे. लायन्स पॉईंट वरुन दिसणारा नजारा मंत्रमुग्ध करून जातो. पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे छोटे छोटे धबधबे, खळखळ वाहणारी नाले या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटकांनी हमखास या ठिकाणी जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा.

६.टायगर पॉईंट किंवा टायगर लीप:

          लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर लिप ॲम्बी व्हॅली कडे जाणाऱ्या वाटेवर असणाऱ्या कुरवडे गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक असते. ढगांना भेदणारे डोंगर सुळके जाताना अवाक होऊन जाते. याठिकाणी टायगर लीप नावाचा डोंगर सुळका असून जंगलाने पूर्णपणे वेडा असल्याने तेथील हिरवळ पाहून मन प्रसन्न होते. पावसाळ्यात या ठिकाणी वाहणारे धबधबे पाण्यासाठी पर्यटक लाखोंच्या संख्येने येत असतात टायगर लिफ्ट लोणावळा पासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.

७.सूनील वॅक्स म्युझियम:

         लोणावळ्यातील सुनिल्स सेलीब्रेटी वॅक्स म्युझियमचे पर्यटकांमध्ये खास आकर्षण आहे. म्युझियम लोणावळा शहरामध्ये आहे. या म्युझियम मध्ये जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू, अभिनेते, राजकारणी यांचे हुबेहूब मेणाचे पुतळे उघड झाले आहेत.
        या म्युझियम मध्ये प्रतिव्यक्ती दीडशे रुपये प्रवेश फी असून सकाळी नऊ ते सायंकाळी दहा पर्यंत चालू असते.

८.लोहगड किल्ला:

         लोणावळ्यापासून जवळच असणाऱ्या लोहगड किल्ल्याला मराठा साम्राज्य मध्ये साधारण महत्व आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुरुवातीच्या काळात खंडांमध्ये १६४८ मध्ये स्वराज्य सामील करून घेतला. याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचे दरवाजे विशेष आहेत. आल्यावर दरवाजे गुरु तोफा पाण्याची टाकी पाहण्यासारखी आहेत. जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या किल्ल्यावरून पवन मावळातील सबंध परिसर न्याहाळता येतो हा किल्ला डोळ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रतिव्यक्ती पंचवीस रुपये फी आकारण्यात येते.
     लोहगड बरोबर विसापूर किल्लाही एका दिवसात पाहता येतो.
लोहगड किल्ला
लोहगड किल्ला


९.तिकोना किल्ला:

          पवन मावळातील तिकोना किल्ला लोणावळ्या पासून जवळच पवना धरणाच्या सानिध्यात त्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले असावे. ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांनी तिकोना ला अवश्य भेट द्यावी. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची३४८० फूट एवढी आहे. किल्ल्यावर असणारे दरवाजे बुरुज पाण्याची टाकी महादेव मंदिर पाहण्यासारखे आहेत. या किल्ल्यावर ट्रेकिंग जाणाऱ्या पर्यटकांनी सेफ्टी गिअर्स अवश्य वापरावे.
        तिकोना बरोबर पर्यटक तुंग किल्ल्याचा  ट्रेक करू शकतात.
तिकोना किल्ला
तिकोना किल्ला


१०.इमॅजिका थीम पार्क:

          लोणावळा पासून 27 किलोमीटर अंतरावर असणारे इमॅजिका थीम पार्क बच्चे कंपनी बरोबरच प्रौढांना आपली भर घालत असते. इमॅजिका हे महाराष्ट्रातील प्रमुख थीम पार्कमध्ये येते. या ठिकाणी असणारे वाटर पार्क स्नो पार्क आणि थीम पार्क असे तीन वेगळे प्रकार असून त्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेऊ शकतात. येथील वॉटर ॲक्टिविटी विशेष आहे. या ठिकाणी प्रत्येक ९०० व्यक्ती प्रवेश फी आहे.

११.कामशेत पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग:

        साहसी खेळाची आवड असणाऱ्या पर्यटकांनी निराश होऊ नये कारण लोणावळा मध्ये वेगवेगळे साहसी खेळ उपलब्ध आहेत ज्यामध्ये पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग गोकार्ट ड्रेसिंग चा समावेश होतो.
        पॅराग्लायडिंग ची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी लोणावळा मध्ये पॅराग्लायडिंग करता येते त्याची फी प्रतिव्यक्ती २५०० ते ५००० पर्यंत आहे.
        लोणावळा मध्ये बंजी जंपिंग तुम्ही करू शकता बंजी जंपिंग की खोली साधारण १५० फूट एवढी आहे.

१२.पवना लेक कॅम्पिंग:

           धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळवण्यासाठी जाऊ शकता या ठिकाणी लेक कॅम्पिंग त्याच बरोबर संगीत डान्स याचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी टेंट फॅसिलिटी उपलब्ध आहे. मस्त संध्याकाळच्या वेळी धरणाच्या कडेला बसून आनंद घेऊ शकता. या ठिकाणी टेंट चा एका रात्रीचा चार्ज साधारण १००० रुपये असून त्यामध्ये जेवण व नाष्टा दिला जातो.

१३.कुणे धबधबा | kune waterfall Lonavla

     लोणावळ्यात पावसाळ्यात सभोवताली नजर फिरवली असता डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे नजरेस पडतात.उंच कड्यावरून पडणारे पाणी पाहताना विलक्षण आनंद होतो.असाच कुणे धबधबा आपल्या उंची मुळे पर्यटकांना आकर्षित करत असतो.कुणे धबधबा भारतातील १४ नंबर चा सर्वात उंच धबधबा असून त्याची उंची १०० मीटर आहे.कुणे धबधब्याचे पाणी तिनं टप्यात वाहत असते.कुणे धबधबा उल्हास नदीवर आहे.धबधबा अतिशय सुंदर असून पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करत असतो. हा धबधबा खंडाळ्या जवळील कुणे गावांमध्ये आहे. हा धबधबा मुंबई पुणे महामार्गा लगत असून लोणावळ्या पासून ८ किमी अंतरावर आहे

लोणावळ्याला फिरायला कधी जावे |best time to visit Lonavala in Marathi

         लोणावळा मध्ये फिरायला जाण्याची सगळ्यात चांगली वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत मानतात कारण पावसाळा होऊन गेलेला असतो व सगळीकडे हिरवळ थंड हवा असते, बरोबर पावसाळ्यामध्ये लोणावळा मधील थोडी अधिक प्रमाणात हॉटेल्स बंद असतात.अलीकडच्या काळामध्ये वर्षा सहलीकडे पर्यटकांची ओढ अधिक असल्याने तुम्ही पावसाळी जाऊ शकता. या ठिकाणचे बरेचसे टुरिस्ट पॉईंट पावसाळ्यात पाहण्यासारखे आहेत जसे की भुशी डॅम, पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहतात, छोटे छोटे धबधबे वाहू लागतात त्याचा आनंद आनंद पर्यटक घेऊ शकतात.

लोणावळ्यातील खानपान | best local foods of Lonavala in Marathi

        लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ केंद्र असल्याने त्याठिकाणी खाण्याची भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. वडापाव चहा भजी तसेच पावसाळ्यात भाजलेले कणीस ती खाऊ शकतात. जेवणामध्ये महाराष्ट्रीयन थाळी पंजाबी थाळी साउथ इंडियन विशेषतः आस्वाद घेऊ शकता.
      लोणावळा फिरायला गेल्यानंतर मात्र लोणावळा चिक्की घ्यायला विसरायचं नाही.

लोणावळ्याला जायचे कसे | How to reach Lonavala in Marathi

        लोणावळा हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही रेल्वेमार्गे रस्ते मागे किंवा हवाईमार्गे लोणार ते जाऊ शकता त्याची माहिती खालील प्रमाणे

 रस्ते मार्ग |How to reach Lonavala by road in Marathi

         लोणावळा हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही रस्ते मार्गाचा उपयोग करू शकता मुंबई किंवा पुण्यावरून  येणारे साठी पुणे तळेगाव खंडाळा कर्जत मार्गे लोणावळा येऊ शकतात.
     सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर मुंबई-पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या निम आराम, आराम, शिवशाही व शिवनेरी बसेस चालू आहेत
     

रेल्वे मार्ग |How to reach Lonavala by train in Marathi

         लोणावळा शहरांमध्ये रेल्वे स्थानक असून मुंबई-पुणे या रेल्वेमार्गाशी जोडले गेले असल्याने देशातून कोठूनही लोणावळा येऊ शकतो. त्याच बरोबर मुंबई पुण्यातून लोकल रेल्वे सेवा ही सुरू आहे.

मुंबई-पुणे मार्गावर व्हिस्टाडोम कोच

     मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष ट्रेनमधील नवीन व्हिस्टाडोम कोच. लोणावळा खंडाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी खास पारदर्शक डबे जोडण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे आसन व्यवस्था ही जागतीक दर्जाची देण्यात आली आहे.लोणावळ्यातील सौंदर्याने नटलेला प्रदेश, डोंगर,दऱ्या,धबधबे, विपूल वनराई चा आनंद आता पर्यटक मुंबई पुणे प्रवासात ही घेऊ शकतात.


हवाईमार्गे | How to reach Lonavala by flight in Marathi

        लोणावळ्या पासून ७० किलोमीटर अंतरावर असणारे पुणे अन्तर्राष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. पुण्यामध्ये देश-विदेशातून विमानसेवा सुरू असते.

      


         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण