मुख्य सामग्रीवर वगळा

महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Top 15 tourist attractions in Mahabaleshwar

Mahabaleshwar tourist places in Marathi | महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे 

 महाबळेश्वर पर्यटन या शब्दांमुळे संपूर्ण लेखाचा अंदाज आलाच असेल तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या पर्यटन स्थळा बद्दल माहिती पाहणार आहोत. महाबळेश्वर हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.  महाबळेश्वर हे हिल स्टेशन सह्याद्री पर्वत शिखरावर आहे. येथिल थंड हवामान, विपूल पर्जन्य, पर्यटनाच्या दृष्टीने सुख सुविधा, उच्च दर्जाचे हॉटेल्स यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुंबई पुण्या सारख्या महानगरां पासून काही तासाच्या अंतरावर असल्याने याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर हनिमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध असून नवविवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी येथे येणे पसंत करतात. उंच कडे ,खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर, हवेतील गारवा, खरेदीची उत्तम सोय, स्ट्रॉबेरी, पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते तर जाणून घेऊया भेट देण्यासारखे महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे व त्याची माहिती. 
महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे
प्रतापगड किल्ला


महाबळेश्वर कोठ आहे

      महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी गिरीस्थान नगर परिषद आहे. महाबळेश्वर मुंबई पासून 285 किमी तर पुण्यापासून 122 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर सह्याद्री पर्वत रांगेत असून महाराष्ट्रातील चौथे सर्वात उंच शिखर आहे.

महाबळेश्वर चे हवामान

       महाबळेश्वर सह्याद्री पर्वत शिखरावर बसले असून त्याची समुद्रसपाटी पासून ची उंची १४०० मित्र एवढे आहे. एक थंड हवेचे ठिकाण असून याचे वार्षिक सरासरी  तापमान २४ अंश सेल्सिअस एवढे असते. उन्हाळ्यामध्ये अंशतः कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस एवढे जाते तर हिवाळ्यामध्ये अंशतः किमान तापमान 0 अंश सेल्सिअस एवढे खाली येत असते. पर्जन्यमानाचा विचार केल्यास महाबळेश्वर मध्ये वार्षिक सरासरी ६५० सेंमी एवढ्या पावसाची नोंद होत असते.

महाबळेश्वर चा इतिहास

      महाबळेश्वरचा इतिहास पाहिला तर तसा तो प्राचीन आहे परंतु लिखित स्वरूपात इतिहास बाराव्या शतकात देवगिरीच्या राजांनी महाबळेश्वरला महादेवाचे मंदिर व जलकुंडाची निर्मिती केल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. सोळाव्या शतकात जावळीच्या मोरे घराण्याकडे जावळी खोऱ्याचे स्वामित्व असताना त्यांनी महाबळेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली व त्याचबरोबर गोमुखी कुंडाची निर्मिती केली. त्यानंतरच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जावळी खोरे स्वराज्यात सामील करून घेतल्यानंतर १६५८ मध्ये प्रतापगड किल्ला बांधून घेतला व जावळी वर नियंत्रण मिळवले. याच कालखंडामध्ये शिवरायांनी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिशा अधिकाऱ्यांना दख्खनच्या पठारावरील उन्हाळा सोसवत नसल्याने ते उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील थंड हवे त्या ठिकाणी आपला मुक्काम हलवत असत त्यामुळे कालांतराने या अधिकाऱ्यांनी आपली उन्हाळी कार्यालय महाबळेश्वर येथे थाटली. सातारा राजगादीच्या दरबारी असताना स्थानिक अधिकारी कर्नल लॉडविक याचा मुक्काम महाबळेश्वर येथेच असे त्याने येथील बऱ्याच पर्यटन स्थळांचा शोध लावला. तो ज्या ठिकाणी नित्य नियमाने जात असे त्या ठिकाणा ला लॉडविक पॉईंट  असे म्हणतात.
महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे
कृष्णामाई मंदिर


महाबळेश्वर मधील पाहण्यासारखी ठिकाणे | What are the best places to visit in Mahabaleshwar

     सुरुवातीला आपण महाबळेश्वरचे हवामान इतिहास भौगोलिक परिस्थिती थोडक्यात परिचय करून घेतला आता आपण महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळाची सखोल माहिती घेऊ

ऑर्थर सीट पॉईंट |महाबळेश्वर पर्यटन

     महाबळेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते असेल तर ते अर्थ सीट पॉईंट आहे.हे पर्यटन स्थळ महाबळेश्वर बस स्थानकापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. या पर्यटन स्थळावरून सह्याद्रीची भव्यता अनुभवता येते दात दाढी धुके त्याचबरोबर या झाडीतून वाहणारी सावित्री नदी पाहता येते. उंचकडे खोल दर्या विस्तीर्ण पठार थंड वारा यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. ब्रिटिशा अधिकारी सर आर्थर मालेट हा अधिकारी आपल्या कुटुंबासमवेत या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी येत असे एका दुर्घटनेमध्ये याच ठिकाणी पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या आठवत वेळ घालवण्यासाठी त्याने या ठिकाणी घर बांधून वास्तव्य करू लागला त्यामुळे याला ऑर्थर सीट पॉईंट म्हणतात. या ठिकाणी पर्यटक उंच डोंगर रांगा सावित्री नदी खोल दर्या व प्रचंड वाऱ्याचा दबाव याचा आनंद घेऊ शकतात

एलिफंट्स हेड पॉईंट 

      नावाप्रमाणेच हत्तीचे डोके आणि सोंडेचा नैसर्गिक आकार असलेला डोंगर कडा म्हणजेच एलिफंट हेड पॉईंट होय. याला दुसरे नाव नीडल होल पॉईंट असेही म्हणतात. डोंगरकड्याला नैसर्गिक रित्या हत्तीच्या तोंडा सारखी रचना तयार झाले आहे. येथील लँडस्केप दृश्य पर्यटकांना कसे करतात. पर्यटक या ठिकाणावरून हत्तीचे मुख सोंड व पायाचा आकार स्पष्ट पाहू शकतात. या ठिकाणी खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. या ठिकाणी मोठे पठार असून पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत निवांत वेळ घालवू शकतात.

विल्सन पॉईंट

       विल्सन पॉईंट हे महाबळेश्वर मधील प्रमुख पर्यटन स्थळ असून ब्रिटिश कालखंडामधील मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेसली विल्सन यांच्या नावावरून याला विल्सन पॉईंट असे म्हणतात.महाबळेश्वर बस स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर मेढा मार्गावर आहे मुंबई प्रांताच्या गव्हर्नर उन्हाळ्यातील कार्यालय महाबळेश्वर मध्ये होते त्यावेळी देखील या ठिकाणी वास्तव्यास असत.

प्रतापगड किल्ला

      भारतीय इतिहासातील प्रसिद्ध प्रतापगड किल्ला महाबळेश्वर पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची निर्मिती 1658 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. मराठा इतिहासातील सर्वात मोठी . महत्वाची लढाई दहा नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यात झाली. प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजलखानाचा वध करून आदिलशाही सेनेचा दारुण पराभव केला. किल्ल्यावर पाण्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत यामध्ये वस्तुसंग्रहालय हस्तकला केंद्र शिवरायांचा अश्वारूढ पुतळा पाण्याचे टाके चिलखती बुरुज सुंदर असे तुळजाभवानी मंदिर व मंदिरातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार पाण्यात मिळते. किल्ल्यावरून जावळीचे मनोगत दृश्य उंच डोंगर, अभयारण्य डोंगररांगा लक्ष वेधून घेतात. महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांनी आवश्यक प्रतापगडला भेट द्यावी .

सनसेट पॉईंट.

      सनसेट पॉईंट हे महाबळेश्वर मधील प्रसिद्ध सर्वात जुने पर्यटन स्थळ आहे. यालाच बॉम्बे फोंडा असे म्हणतात सायंकाळच्या वेळी मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी रॅम्प ची सोय केली आहे. दिवसभर महाबळेश्वर मधील अन्य पर्यटन स्थळे पाहून सनसेट पॉईंटवर दिवसाचा शेवट करणे अतिशय रोमांचकारी ठरते. करणे इथून दिसणारा सूर्यास्त काही निर्यात असतो. डोंगरकड्यांच्या मधून खोलदरीत मावळणारा सूर्य जनू एकाद्या सौंदर्यवतीच्या कपाळावरील लाल टिकली सारखा भासतो.. शितल वारे व हवेतील गारवा दिवस घरातील थकवा दूर करण्यासाठी या ठिकाणी आवश्यक आहे. पावसाळ्यात या ठिकाणावरून दरीतून वाहत येणारे ढग अंगावर आल्यासारखे भासतात. यामुळे सनसेट पॉईंट ला पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी असे वाटते.
महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे
सुर्यास्त सनसेट पॉईंट


मेप्रो गार्डन

      महाबळेश्वर पासून 12 किलोमीटर अंतरावर पाचगणी रोडला गुरेघर गावामध्ये विप्रो गार्डन आहे. मेप्रो गार्डन स्ट्रॉबेरी अन्य खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मेप्रो गार्डन गार्डनला प्रवेश विनामूल्य असून या ठिकाणी पर्यटक स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेऊ शकतात, त्याचबरोबर लहान मुलांसाठी उद्यान असून या ठिकाणी मुलांच्या खेळाचे साहित्य आहे. मेप्रो गार्डनमध्ये रेस्टॉरंट आहे त्याचबरोबर स्ट्रॉबेरी पासून बनवलेले विविध पदार्थ जसे की जाम, कॅंडी, स्ट्रॉबेरी शेक, आईस्क्रीम , सलाड, सरबत इत्यादी  मेप्रो चे उत्पादने पर्यटक खरेदी करू शकतात. या ठिकाणी पर्यटक स्थानिक मसाले, लोणची, मुरब्बा, याची खरेदी करू शकतात. एप्रिल महिन्यामध्ये   मेप्रो गार्डन येथे स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित केला जातो, त्यावेळी विविध पदार्थांचे स्टॉल्स पर्यटकांसाठी लावली जातात त्यामध्ये, स्ट्रॉबेरी भेळ, जाम कल्प सॅंडविच, आईस्क्रीम अशा पदार्थाचा समावेश होतो
महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे
स्ट्रॉबेरी शेती



महाबळेश्वर मंदिर

       मुख्य बस स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर प्राचीन असे महाबळेश्वर मंदिर आहे. याला महाबली मंदिर असे ही म्हणतात. जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांनी या मंदिराची स्थापना सोळाव्या शतकात केली. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून मंदिरासमोर आयताकृती तलाव व त्यामध्ये गोमुखातून वाहणारे पाणी आहे. मंदिरात अतिशय सुंदर मंदिरामध्ये शिवलिंग डमरू त्रिशूल नंदी आहेत. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
       सह्याद्री पर्वतरांगेच्या घाट माथ्यावर बसले असल्याने या ठिकाणी वर्षभर हिरवीगार झाडी असल्याने परिसर अतिशय शांत व थंड असतो. या ठिकाणी अजून दोन पुरातन मंदिर आहेत.

वेंण्णा लेक

     महाबळेश्वर ला येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणजे वेण्णा लेक,या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. वेण्णा लेक मानव निर्मित असून याची निर्मिती सातारा राजगादीचे छत्रपती आप्पासाहेब महाराज यांनी १९४२ मध्ये केली आहे. वेण्णा लेक दहा किलोमीटर परिघा मध्ये पसरलेला आहे. या तलावाच्या काठावर प्रताप सिंह उद्यान आहे जिथे पर्यटक आपला वेळ घालवू शकतात त्या शिवाय तलावा मध्ये बोटींग चा आनंद घेऊ शकतात. चौथरफा हिरवीगार झाडी तांबडी माती स्वच्छ हवा शहरातल्या गोंगाटा पासून दूर हे एक रमनीय ठिकाण आहे. या ठिकाणी खाद्य पदार्थांची रेलचेल पहायला मिळते त्यामुळे महाबळेश्वर ला येणाऱ्या पर्यटकांनी वेण्णा लेक ला आवश्य भेट द्यावी.

पंचगंगा मंदिर

         महाबळेश्वर मध्ये कृष्णा वेण्णा सावित्री कोयना आणि गायत्री या नद्यांचा उगम होतो. या नद्यांच्या उगम स्थानावर पवित्र असे पण चांगला मंदिर असून याला अध्यात्मिक महत्त्व आहे. पंचगंगा मंदिराची निर्मिती अकरावी शतकात देवगिरीच्या यादव घराण्याचे सिंघनदेव याने केली. मंदिराचा जिर्णोद्धार मराठा कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्यामार्फत करून घेतला. या ठिकाणचे जुने मंदिर अति प्राचीन असून ते साधारण चार हजार वर्षे पूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. पंचगंगा मंदिराचा परिसर शांत आध्यात्मिक असून मंदिरामध्ये अतिशय थंड वातावरण असते. मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या हस्तकला व विविध वस्तू खरेदीसाठी पाहायला मिळतात अशा या सुंदर पंचगंगा मंदिराला आवश्यक भेट द्यावी

भिलार धबधबा

      महाबळेश्वर पासून जवळच पाचगणी रोडवर भिलार गावा लगत पुढारी नदीवर अतिशय सुंदर धबधबा असून त्याला भिलार धबधबा असे म्हणतात. पुस्तकांचे गाव म्हणून उपस्थित असणाऱ्या भिलार येथे हा धबधबा आहे. धबधबा सुंदर असून अल्पपरिचित असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ कमी जाणवते त्यामुळे आपण या ठिकाणी मन चुकता आंदोलन करू शकता. येथील निरव शांतता खडका वरून पडणारे पाणी दाट वनराई पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करत असते

धोबी धबधबा

     महाबळेश्वर ला शक्यतो पर्यटन उन्हाळ्यामध्ये असतात परंतु वर्षा सहलीला येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्य वेगळीच अनुभूती देते दर्या खोऱ्यातून वाहणारे धबधबे दाट धुकयामध्ये हरवलेले रस्ते दुतर्फा हिरवीगार झाडी यामुळे पर्यटन वर्षासाठी महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात असतात अशा पर्यटकांसाठी धोबी धबधबा हक्काचे ठिकाण आहे. महाबळेश्वर मधील लॉर्ड वीक पॉईंट च्या जवळ फादर देव आहे. पावसाचे तुषार अंगावर घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. पावसामध्ये भिजण्यासाठी व पाण्यामध्ये मनसोक्त खेळण्यासाठी हे हक्काचे ठिकाण आहे.

महाबळेश्र्वर मध्ये फिरण्याची साधने |How can travel around Mahabaleshwar

महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे  फिरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  लोकल बस, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि घोडे हे सर्वात जास्त प्रचलित आहेत.  हिल स्टेशनवर घोडेस्वारी अतिशय प्रचलित आहे. त्याच बरोबर लोकल टॅक्सी ही आपन माफक दरामध्ये भेटतात.

महाबळेश्वर मधील खानपान | best local foods of mahabaleshwar in Marathi

     महाबळेश्वर  मध्ये पर्यटक शाकाहारी,मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात.  झणझणीत मिसळ, वडापाव, भजी, इडली सांबर, याचा ही पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. नाशिक मध्ये महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती पंजाबी साउथ इंडियन अशी अनेक रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेसाठी आहेत.

महाबळेश्वरला भेट देण्याची उत्तम वेळ | Best time to visit Mahabaleshwar in Marathi |
What is best time to visit Mahabaleshwar


        महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील मुख्य पर्यटन स्थळ असल्याने पर्यटक या ठिकाणी वर्षभर मोठ्या संख्येने भेट देत असतात. महाबळेश्वर हे हिल स्टेशन असून थंड हवेचे ठिकाण आहे, त्यामुळे पर्यटक उन्हाळ्यामध्ये याला मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात.परंतु पावसाळ्यात ही येथील सृष्टी सौंदर्य काही औरच असते आजकाल येथील लँडस्केप धबधबे हिरवेगार डोंगर यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक वर्षा सहलीसाठी महाबळेश्वरला प्रथम पसंती देतात. त्यामुळे तुम्ही वर्षातील कोणत्याही ऋतू मध्ये महाबळेश्वर ला जाऊ शकता.


महाबळेश्वर मध्ये राहण्याची सोय | Hotels in Mahabaleshwar

     सोलो ट्रॅव्हलर्स असो किंवा फॅमिली ट्रॅव्हलर्स प्रत्येकाच्या बजेटमध्ये अनेक मुक्कामासाठी हॉटेल आहेत. बजेट ट्रॅव्हलर साठी अनेक हॉस्टेल्स आहेत. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल आहेत. त्याच बरोबर होम स्टे, किंवा ग्रुप असेल तर विला ही बुक करू शकता. 

महाबळेश्वर मधील शॉपिंग

      महाबळेश्वर मध्ये पर्यटक अनेक प्रकारचे जेली कॅंडी, जॅम, मध, स्ट्रॉबेरी, तसेच कपडे ,हस्तकलेच्या वस्तू, खरेदी करू शकतात


महाबळेश्वर ला जायचे कसे |how to reach Nashik in Marathi

   महाबळेश्वर बद्दल आपण बरीच माहिती पाहिले आता आपण जायचे कसे हे पाहू ,रस्ते मार्गे रेल्वे मार्ग व हवाई मार्गे कसे तुम्ही महाबळेश्वरला पोहोचू शकता हे खाली पाहू

रस्ते मार्गे महाबळेश्वर| how to reach mahabaleshwar by road in Marathi

         महाबळेश्वरला येणारे पर्यटक कोकणातून महाड पोलादपूर मार्गे किंवा घाटमाथ्यावरून वाई पाचगणी घाट किंवा सातारा मेढा  मार्ग येऊ शकतात. महाबळेश्वर राज्य महामार्गा द्वारे इतर शहरांशी जोडले गेले आहे. महाबळेश्वर हे महत्वाचे पर्यटन स्थळ असल्याने राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ने जाता येते. तसेच मुंबई पुण्यातून खाजगी वाहनाने आपण महाबळेश्वरला जाऊ शकता.

रेल्वे मार्गे महाबळेश्वर | how to reach mahabaleshwar by train in Marathi 

    वाठार स्टेशन हे जवळचे रेल्वे स्थानक असून महाबळेश्वर पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे.कोयना एक्सप्रेस महालक्ष्मी एक्सप्रेस या सातारा मार्गावरील प्रसिद्ध रेल्वे गाड्या आहेत.तिथून पुढे बस किंवा खाजगी वाहनाने महाबळेश्वर ला जावे लागते

हवाई मार्गे महाबळेश्वर | how to reach Mahabaleshwar by flight in Marathi

     सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे जे महाबळेश्वर पासून 130 कि.मी. अंतरावर आहे. पुढल्या पासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ने किंवा खाजगी वाहनाने ही तुम्ही महाबळेश्वरला पोहोचू शकता.

 आपल्याला आमचा लेख Mahabaleshwar tourist places in Marathi | महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट च्या माध्यमातून कळवा त्याच बरोबर काही सुचेना असतील तर त्याही नक्की कळवा आम्ही त्यांची योग्य ती दखल घेऊ आमच्या पेज ला फॉलो करायला विसरू नका तुम्ही जर महाबळेश्वरला फिरायला गेला असाल तर त्याचा अनुभव ही आमच्या बरोबर शेअर करू शकता
  धन्यवाद
 
    




       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण