माथेरान हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळा पैकी एक असल्याने या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात मुंबई व पुण्यापासून समान अंतरावर असल्याने शनिवार रविवार तसेच सूट्टीच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ जास्त जाणवते. उन्हाळ्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वर नंतर माथेरान हे हक्काचे ठिकाण आहे
माथेरान कुठे आहे:
माथेरान महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असून मुंबईपासून ११० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या उपरांगेतील डोंगरमाथ्यावर वसलेले असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८०३ मिटर म्हणजेच २६०० कुठे एवढी आहे. माथेरानच्या बाहेरच प्रशस्त असे वाहत तळ असून या ठिकाणी वाहन लावून प्रवेश करावा लागतो, माथेरान मध्ये सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी असून याठिकाणी वाहतुकीसाठी पायी, घोडा, व प्रवासी सायकल टांगा यांचा वापर माथेरानमध्ये फिरण्यासाठी करावा लागते. याचे सर्व नियोजन माथेरान गिरिस्थान नगर परिषदे मार्फत केली जाते.
ब्रिटिश अधिकारी ह्यूज मॅलेट याने १८५० मध्ये ट्रेकिंग करत असताना या ठिकाणाला भेट दिली त्यानंतर ब्रिटिश लोक उन्हाळ्यात राहायला येत असत. भटकंती करत असताना त्यांनी येथील ठिकाणांना नावे दिली असल्याने सर्व पॉईंट ची नावे इंग्लिशमध्ये असून ती जवळपास 30 च्या आसपास आहेत. विपुल वनसंपदा शुद्ध व थंड हवा तसेच दऱ्याखोऱ्यातून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य यामुळे माथेरानची वेगळी ओळख निर्माण झाली आहे
घाटातून गाडीने आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सशुल्क वाहनतळा मध्ये गाडी पार्क करून प्रवेशद्वारावर प्रवेश फी भरून माथेरान मध्ये प्रवेश करावा लागतो येथील प्रवेश फी प्रतिव्यक्ती ३० रुपये आकारण्यात येते.
हे ही वाचा लोणावळा पर्यटन स्थळे
प्रेक्षणीय स्थळे पॉईंट्स
माथेरान मधील बहुतेक प्रेक्षणीय पॉईंट ची नावे इंग्रजी मधून आहेत हे सर्व प्रेक्षणीय ठिकाणे फिरण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी पुरेसा आहे. त्यातील काही महत्त्वाच्या पॉईंट माहिती पुढीलप्रमाणे
शार्लेट लेक
माथेरान च्या मध्यावर असलेल्या मार्केट पासून साधारण १ ते १.५ किलोमीटर अंतरावर हा तलाव असून येथील परिसर रमणीय आहे तलावाच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर असून मंदिरा मधील वातावरण थंड व आल्हाददायकआहे.तलावाच्या दुतर्फा घनदाट जंगल असून येथे तासंतास बसून राहावेसे वाटते
लॉर्ड पॉईंट:
तलावापासून जवळच पठाराच्या शेवटच्या टोकाला लॉर्ड पॉइंट आहे या पॉईंटवरून समोर दिसणारे सह्याद्रीचे रूप डोळ्यांत साठवून ठेवावे असे वाटते . कड्याच्या शेवटच्या टोकाला खोल दरी असल्याने खाली पाहताना डोळे चक्रवत
पावसाळ्यात या ठिकाणावरून पाण्याचा मोठा धबधबा पाहायला मिळतो
सनसेट पॉईंट :
माथेरान च्या पश्चिम टोकाला असून मार्केट पासून याचे अंतर साधारण चार किलोमीटर आहे. या ठिकाणाहून सायंकाळी मावळतीच्या सूर्याचे दर्शन करणे एक वेगळी अनुभूती आहे. येथून समोरच कलावंतीन प्रबळगड दिसतात. माथेरान ट्रेक करण्यासाठी वाघाची वाडी चिंचवाडी या मार्गाचा वापर करून सनसेट पॉईंटवरून मात्र मध्ये प्रवेश करता येतो
पॅनोरमा पॉईंट:
हा पॉईंट माथेरान च्या उत्तरेकडे असून पठाराच्या शेवटच्या टोकाचे पूर्व पश्चिम दिशाचे कडे ताशीव ९० अंश कोनात आहेत. या ठिकाणावरून गाडेश्वर तलाव चंदेरी व पेब हे किल्ले दिसतात तसेच उत्तरेस पनवेल पर्यंतचा सारा मुलुख नजरेस पडतो
पॉईंट पॉईंट :
माथेरान च्या एका टोकाला गार्बेट पॉईंट असून या ठिकाणी जाण्यासाठी जंगलातून वाट आहे याच्या एका बाजूला जंगल तर दुसर्या बाजूला दरी आहे दरीतून येणारा थंड वारा मन प्रसन्न करून जातो. जंगलातून येताना विविध प्रकारचे पक्षी व त्यांचा किलबिलाट सहज पाहायला मिळतो
वन ट्री हिल पॉईंट:
आपण माथेरान च्या दक्षिण टोकाला असून या ठिकाणावरून समोर मोरबे धरण व धरणाला लागून असलेला इर्षाळगड सहज लक्ष वेधून घेतात या ठिकाणावरून खोपोली तुंग किल्ल्या पर्यंत चा सारा प्रदेश नजरेस पडतो
चौक पॉईंट:
या ठिकाणाहून खाली मोरबे धरणाच्या पलीकडे असणारे चौक गाव दिसत असल्याने या ठिकाणाला चौक गाव असे नाव देण्यात आले
त्याच प्रमाणे असे अनेक पॉइंट माथेरान मध्ये असून त्यांची नावे पुढील प्रमाणे
अलेक्झांडर पॉईंट, लिटिल चौक, डेंजर चौक बिग चौक बेल्वैदरे , लेक व्यू , किंग जॉर्ज, लुईस, मलंग, कोरोनेशन, रुस्तमजी पॉईंट, मालडुंगा, मंकी, हार्ट पॉईंट अशी त्यांची नावे आहेत.
खरेदी:
माथेरान मधील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी अनेक छोटी मोठी दुकाने असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत यातील हस्तकलेच्या वस्तू व कपड्यांना थंड मागणी आहे तसेच सांबराच्या कातड्याच्या पासून बनवलेले बूट व किंवा चपला विशेष प्रसिद्ध आहेत पर्यटक हे बूट व चपला आवडीने खरेदी करत असतात.
वनसंपदा:
संपूर्ण माथेरान च्या परिसरामध्ये घनदाट जंगल असून त्या मध्ये विविध प्रकारचे वृक्ष पशू पक्षी पहायला मिळतात. त्यामध्ये आंबा,धावडा, जांभळ,बेहडा, खैर,सागवान,यादी प्रकारचे वृक्ष विपूल प्रमाणात पहायला मिळतात.त्याचप्रमाने विविध प्रकारचे पक्षी फुलपाखरे आपन पाहु शकतो.
राहणे खाणे:
माथेरान फिरायला जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना परवडतील अशी हॉटेल्स व होस्टेल या ठिकाणी आहेत.त्यामध्ये २०० रुपये पासून ते ३००० रूपये पर्यंत येथील हॉटेल मध्ये राहण्याची सोय होऊ शकते.त्याच प्रेमाने या ठिकाणी माफक दरात घरगुती जेवणाची व राहण्याची व्यवस्था होते त्यासाठी बाजारपेठेत किंवा घोडे वाले यांच्याकडे चौकशी केली तर ते माहीत देतात.त्याचप्रमाने प्रवेशद्वाराच्या बाजूला असणारे MTDC चे गेष्ट हाऊस ही चांगला पर्याय ठरू शकते
जायचे कसे
माथेरान मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्ग लगत असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.लोकल ट्रेन ने येताना नेरळ स्थानकावर उतरून खाजगी वाहनाने माथेरान पर्यंत जाता येते.तसेच पुणै किंवा मुंबई वरून स्वताचा गाडीने येणार असतील तर जुन्या राष्ट्रीय महामार्ग वर असणाऱ्या कर्जत नेरळ मार्गे जाऊ शकतात.माथेरान ला मिनी ट्रेन असून ती नेरळ ते माथेरान या मार्गावरून धावते.
तर मग कधी जाताय सुट्टी चा आनंद घेण्यासाठी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे