कलावंतीण दुर्ग | प्रबळगड संपूर्ण माहिती

 कलावंतीण दुर्ग माहिती:


   महाराष्ट्रातील गडकिल्ले खास वैशिष्ट्य पुर्ण आहेत भौगोलिक परिस्थिती व बांधनी मध्ये कमालीची विविधता जाणवते, त्यापैकी एक किल्ला म्हणजे प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग . हा किल्ला भारतातील सर्वात अवघड म्हणुन परिचीत आहे किल्ला जितका अवघड तितकाच सर करण्यासाठी रोमांचकारी आहे . गिर्यारोहण करणार्यांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू,आणि हक्काचे ठिकाण.गड चढताना बरेच जण मृत्युमुखी पडले असे गावकरी सांगतात. किल्लाची उंची साधारण २३०० फुट आहे. पुणे मुंबई जुना महामार्गावर पनवेल पासून १५कि.मी. अंतरावर आहे.


कलावंतीण  गडावर काय पहावे:

     ठाकूरवाडी गावातून पायवाटेने चालत जाताना समोरच  पावसाळ्यात गडावरुन पडणारे छोटे छोटे धबधबे आहाहा मन मोहून टाकतात.  वाटेत साथ संगत करण्यासाठी गर्द हिरवी झाडी, खळखळ वाहणारे पाणी बस आज मी स्वर्ग पाहीला अनुभव, साधारण दिड दोन तास चालल्या नंतर प्रबळगड माचीवर पोहचतो. माचीवर विश्रांती घेऊन  चालायला सुरुवात केली की पुढे छोटे गाव दिसते त्या गावातून पायवाटेने कलावंतीण सुळक्या चा दिशेने झाडीतून चालत गेल्यावर कलावंतीण व प्रबळगडा च्या मध्ये पोहोचतो. तिथेच बाजूला खडक कोरुन बनवलेली गुहा आहे. गुहा दोन बाय दोन फुट असुन लांबी पंचवीस फुट असून आत मध्ये छोटी खोली आहे.प्रबळगड आणि कलावंतीण सुळक्या चा कडा एकदम खडा व ताशिव आहे. कलावंतीण सुळक्या च्या पायऱ्यां खडकात खोदलेल्या आहेत. पायऱ्यांचा अती अवघड टप्पा चढून गेल्यावर तिथुनच पुढे दोन टप्पा मध्ये सुळक्याच्या टोकावर पोहोचता येते. गडावरुन उंच डोंगर खोल दरी घनदाट झाडी पाहताना मन मोहित होते. माथेरान चा सनसेट पॉईंट, इर्षालगड, कर्नाळा किल्ला, पेब, चंदेरी किल्ला तसेच पनवेल नवी मुंबई चा काही भाग पाहू शकतो.


 कलावंतीण गडाचा इतिहास:

        कलावंतीण दुर्ग कधी बांधला हे जरी सांगता येत नसले तरीही तिथे असलेल्या गुफा वरून तो बोध्द कालीन असावा. या किल्ल्याचे पुर्वि चे नाव मुरंजन गड होते.शिलाहार यादव शासन काळात या किल्ल्याचा उपयोग केला असावा, बहामनी व निजामशाही काळात त्या त्या शासकांचा अधिपत्याखाली हा किल्ला होता.शहाजी राजे जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी काही काळ या किल्ल्यावर वास्तव्यास होते. नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला व किल्ला वर मोगली अंमल सुरू झाला. त्यानंतर १६५६ मध्ये छञपती शिवाजी महाराजांनी सरदार आबाजी महादेव यांना कल्याण भिवंडी ची मोहीम सोपविली तेव्हा कल्याण भिवंडी पासून रायरीपर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात आला.तेव्हा मुरंजन गड ही स्वराज्यात आला,मुरंजन गडाचे नाव प्रबळगड असे करण्यात आले. पुढे पुरंदर तहा नुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्लां मध्ये प्रबळगड व कलावंतीण दुर्ग  हे ही किल्ले होते. त्यानंतर तह मोडून किल्ले परत घेत असताना केशरसिंग हाडा या किल्लेदाराचा पराभव करून मराठा सैन्याने प्रबळगड परत स्वराज्यात आणला.

 कलावंतीण दुर्ग पहायला जायचे कसे: 

     पुणे मुंबई जुण्या राष्ट्रीय महामार्गावर शेंडुन फाट्या पासून गडाकडे जाण्याचा मार्ग आहे. दुसरा पर्याय म्हणजे पनवेल ठाकुर वाडी बस सेवा सुरु आहे त्या बसने ठाकुर वाडीत यावे व तिथुन पायी गडावर जाऊ शकता. तसेच पनवेल मधुन सहा आसनी रिक्षा ने ठाकुर वाडीला येऊ शकता परंतु रिक्षावाले भाडे जास्त घेतात.  ‌


कलावंतीण गड ला जाताना काय काळजी घ्यावी:                         कलावंतीण दुर्ग हा सर करण्यासाठी खुप अवघड आहे.त्यामुळे अनुभवी व्यक्ती बरोबर जाणे उत्तम पावसाळ्यात या गडावर जाणे टाळावे. सप्टेंबर ते मे महीना या काळात जावे. पाणी भरपूर बरोबर असावे. वाट चुकण्याची भिती असल्यामुळे अंधार पडायच्या आत गड उतार व्हावे.

  जवळची प्रसिद्ध ठिकाणे:

   माथेरान, कर्नाळा किल्ला, पेब इर्षालगड, चंदेरी किल्ला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort