मुख्य सामग्रीवर वगळा

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ: 

    महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात.


हेही वाचा प्रतापगढ किल्ला


तिकोना किल्ल्याची माहिती:  

    पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे.



समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याचा सोबती भासतो.

तिकोना किल्ल्यावर काय पहावे:

     तिकिल्ला दूरवरून आपल्याला खुणावतो पण जसं जसे गडाचा जवळ जातो सशी मनात धडकी भरायला लागते. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.


  

काशिंग,घेवन, आणि तिकोना पेठ  तिकोना पेठ ही सात आठ घरांची गडाचा पायथ्याशी असलेली छोटी वस्ती या पेठेतून गडावर दोन वाटा जातात पहिली वाट सरळ चढन असणारी जी पालथा दरवाजातून माचीवर पोहचतो तर दुसरी लांबची जी गडाच्या दक्षिणेकडील डोंगराचा नाकाडी वरुन जी खिंडीचा जवळून माचीवर पोहचतो. तर वेताळ दरवाजा मार्ग ही एक वाट माचीवर पोहचते. माचीवर व सूरवातीला शेंदुर फासलेली मारूतीची मुर्ति दिसते.या मुर्तीचा पायामध्ये एक स्ञी ची मुर्ती दिसते . तिथून थोडे पुढे आल्यावर उभ्या कड्यामध्ये खोदलेले  तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत या लेणी पाच खोल्लात विभागली आहेत.तसेच मंदिराचा खाली तळ आहे. हे पाहून किल्ल्याकडे जाताना चुन्याचा घाणा दिसतो पुर्वीचा काळी बांधकामासाठी चुण्याचा घाणा वापरत.


 बालेकिल्लावर जाताना सरळ चढनीचा पायरी मार्ग दिसतो या पायऱ्या खडकात खोदलेल्या आहेत.या पायऱ्या चढून वर आल्यावर पहीला दरवाजा लागतो,यातून आत आल्यावर बाजूलाच पाण्याचे टाके आहे या टाक्यातील पाणी इतके थंड की किती प्यावे आशी आवस्था होते.  पहिल्या दरवाजातून दुसऱ्या दरवाजा पर्यंतची वाट तर उभ्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांची इतकी अरुंद की एका वेळी एक जाऊ शकतो, दोन्ही बाजूला खडकांच्या ऊंच नैसर्गिक भिंती, गड निर्माणाचा वेळी नैसर्गिक साधनसंपत्ती चा पुरेपुर वापर केलेला प्रकर्षाने जाणवतो. ऊभा पायरी मार्ग चढताना मनात धाकधूक होतेच .पायरी मार्ग चढताना दुसऱ्या दरवाजाचा आखीव रेखीव बुरुज नजरेस पडतो.  गडाचा दुसरा बुरुज पहील्या पेक्षा मोठा सूस्थीतीत आहे या दरवाजाच्या डाव्या बाजूला सुरक्षीतेचा दृष्टीने ढाल काठी बुरुज आहे तर उजव्या बाजूला खोदिव पाण्याचे चार टाके आहेत,तसेच बुरुजावर बसण्यासाठी वट्टा बांधला आहे. तिसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर मोकळे पटांगण व टेहळणी बुरुज आहे या ठिकाणी पायरी चढून गेल्यावर पडझड झालेला तिसरा दरवाजा लागतो.या दरवाजाचा पुढे ञ्यंबकेश्वरराचे छोटे मंदिर आहे. दोन चार खोदिव टाक्या , मोठा तलाव ,धान्याची कोठारे,व बांधकामांचे अवशेष आहेत.हे पासुन झाले किल्ला नजर फिरते आजूबाजूच्या डोंगर दऱ्या पवनेचा जलाशय. तुंग किल्ला, लोहगड, विसापूर,यांना नजर शोधू लागते कोरीगड , बेडसे लेणी नजरेस पडतात.


तिकोना बद्दल थोडक्यात:

     बाले किल्ल्याचा घेर कमी असला तरी किल्ला सुस्थितीत आहे.किल्ला तिनं टप्प्यात सर होतो.गडा पाहण्यासाठी काही नसले तरी गडावर प्रेम करणाऱ्यांसाठी व दगडांत इतिहास शोधनाऱ्यांसाठी हा किल्ला परवणी ठरतो.

तिकोना किल्ल्याचा इतिहास:

   तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे.बहामनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यां वरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे.कार्ला लेणी व बेडसे लेण्यांच्या काळातील लेण्या असाव्यात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मीतीचा काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्ला ही होता. शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले.  पुढे पुरंदर चा तहात राजा जयसिंगला जे तेविस किल्ले दिले त्यात तिकोना ही होता. पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला जिंकला व `अमनगड' असे नाव ठेवले.मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला.शाहु महाराज व ताराबाई यांच्यामधे मराठी राज्याचा वारस कोण यावरून तणाव निर्माण झाला होता. कान्होजी आंग्रे हे कोकणात आपले जवळ जवळ स्वतंत्र राज्य राखून होते. मराठी राज्याच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजे सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीज या तिंघाविरूद्ध लढून त्यांनी राज्य टिकवलं होतं. ताराबाईंनी कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांवर हल्ला करायला उद्युक्त केलं. आताचे अलीबाग व तेव्हाचे कुलाबा येथून आंग्रे जे निघाले ते सपाट्याने प्रदेश व किल्ले जिंकत पुढे आले. लोहगड, विसापूर, तुंग वगैरे किल्ले घेतले तेव्हा तिकोना हा किल्लासुद्धा जिंकून घेतला. पुढे, बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे बनवून शाहू महाराजांनी आंग्रेंचा सामना करायला पाठवले. बाळाजींनी न लढतां मुत्सद्दीपणाने कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळवून घेतलं व एक तह केला. या तहानुसार, आंग्रेंनी इतर गडांबरोबर तिकोना हा किल्ला परत केला व शाहू महाराजांना मराठी राज्याचे छत्रपती म्हणून मान्यता दिली. तो पुढे १८१८ साला पर्यंत मराठा साम्राज्यात राहीला.इंग्रज मराठा लढाईत तो ब्रिटीश अधिपत्या खाली आला.



तिकोना किल्ल्याला जायचे कसे:      

      कामशेत वरुन पवनानगर काळे काॅलनी पर्यंत एस टी बस सेवा आहे.पुण्यातील स्वारगेट वरून  जवन काशिग बस सेवा आहे.,बस पौड मार्ग जाते. तळेगाव वरुन ही या मार्गावर बस सेवा चालू आहे. तसेच आपन खाजगी वाहनाने तिकोना किल्लाला जाऊ शकता.



 काय काळजी घ्यावी:

    तिकोना किल्ला पहायला जाताना जेवन किंवा फळ बरोबर घ्यावीत. सार्वजनिक वाहतूक वापरून जाणार असाल तर गाडीची माहिती आधीच घ्यावी. किल्लाची चढाई सरळ असलेला कारणानं व उन्हाचा ञास होऊ नये म्हणून ट्रेकिंग गियर्स वापरावेत.

जवळची प्रेक्षणीय स्थळे:

सिंहगड किल्ला, विसापूर, तुंग, बेडसे लेणी कार्ला लेणी






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण