मुख्य सामग्रीवर वगळा

विसापूर किल्ला माहिती| visapur fort information in marathi

विसापूर किल्ला

नाव:        विसापूर/इसापूर
प्रकार:       गिरिदुर्ग
उंची:         ३०३८
ठिकाण:     लोणावळा/ मळवली
जिल्हा:       पुणे
डोंगररांग:    लोणावळा
किल्ल्याची चढाई: सोपी
सद्यस्थिती:   बरी
विसापूर-किल्ला-माहिती
विसापूर किल्ला तट

अधिक लेख 

विसापूर किल्ला माहिती:

      पवन मावळातील निसर्गसंपन्न अशा प्रदेशात लोहगड विसापूर ही दुर्गजोडी असून हे किल्ले बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात आले. लोहगड जसा प्रसिद्ध व परिचित आहे त्या मानाने विसापूर थोडा दुर्लक्षितच वाटतो, किंवा त्याचे महत्त्व झाकोळले जाते.परंतु याच्या इतिहासामध्ये डोकावले असता याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याची जाणीव होते.
        महाराष्ट्रात अनेक दुर्ग जोड्या पाहायला मिळतात त्यामध्ये लोहगड विसापूर किल्ल्यांचा ही समावेश होतो.
गिरिदुर्ग बांधत असताना शेजारी कोणती ही टेकडी किंवा पर्वत नसावा असा प्रघात आहे, कारण यामुळे मुळ किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर शेजारी पर्वत असेल तर त्याला फोडून नष्ट करावे किंवा टेकडीवर बांधकाम करून ती जागा सुरक्षित करून घ्यावी जेणेकरून मुळ किल्ल्याला यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही. पर्वतावरील दुर्ग जोड्यात महाराष्ट्रात चंदन वंदन, पुरंदर-वज्रगड,  राजमाची-श्रीवर्धन आदी ठिकाणी आपल्याला दिसून येतात.

विसापूर किल्ला कुठे आहे:

     पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्या पासून जवळच विसापूर किल्ला आहे पुण्यापासून याचे अंतर साधारण ६० कि.मी तर मुंबईपासून ११० किमी आहे. किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याची समुद्र सपाटीपासुन उंची ३०३८ फूट एवढी असून गड ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो. प्राचीन व्यापारी मार्ग असलेला बोरघाट व पवण मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तुंग तिकोना लोहगड व विसापूर हे किल्ले ओळखले जातात. या दुर्ग चौकडीमध्ये आकार व उंची च्या मानाने विसापूर मोठा आहे. विसापूरला चारी बाजूने उंच नैसर्गिक कातळकडा असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत आहे.

विसापूर किल्ला ट्रेक:

     विसापूर किल्ल्यावर ट्रेक ला येणाऱ्यांसाठी मुख्यत्वे- करून तीन मार्ग आहेत. उत्तरेकडील पाटण मार्ग, दुसरा भाजे लेनी मार्ग, तिसरा गणेश खिंड मार्ग (लोहगड) यातील गणेश खिंड मार्ग रहदारीचा वाटतो.

पाटण मार्ग:

     पाटण गावातून गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट धरावी लागते, ही दाट  झाडीतून जाणारी वाट दिल्ली दरवाजा तून गडावर जाते. वाटेत कातळात कोरलेली मारूतीची मुर्ती व खडकातील खोदीव खोल्या पहायला मिळतात.आत बाहेर अशी वैशिष्ट्य पूर्ण रचना केली आहे.या मध्ये पावसाळ्या व्यतिरिक्त मुक्कामाची सोय होऊ शकते. मारुती मुर्ती पासूनच पायरी मार्ग सुरू होतो. खडकात खोदलेल्या पायऱ्या व उजव्या बाजूला ताशीव खडक खूप आकर्षक दृश्य दिसते. पावसाळ्यात या पायऱ्यां वरून वाहणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करते.
     गडमाथ्यावर गेल्यावर डाव्या उजव्या बाजूला विस्तीर्ण पठार व समोरच टेकडी वजा बालेकिल्ला नजरेस पडतो.
तसे पहायला गेले तर बालेकिल्याला स्वतंत्र अशी सुरक्षा व्यवस्था पहायला मिळत नाही.
विसापूर-किल्ला-माहिती
विसापूर किल्ल्यावरील तोफ


       दरवाजाच्या समोरच डाव्या बाजूला राजसदर व तोफ असून सुमारे दहा फूट लांबीची आहे. या तोफेवर राज् चिन्ह असलेले गुलाबाचे फुल मुकुट आणि इंग्लिश मध्ये ER ही अक्षरे कोरलेली आढळतात.१८१८ मध्ये खिळे ठोकून ब्रिटिशांनी ही तोफ निकामी केली आहे. 
        गडला संपूर्ण मजबूत अशी तटबंदी असून महाराष्ट्रातील पूर्ण भक्कम चिरेबंदी तटबंदी असल्या किल्ल्यामध्ये विसापूर चा समावेश होतो. या तटामध्ये जागोजागी टेहळणी बुरुज, जागोजागी ठेवलेल्या जंग्या, झरोके, तटावरून फिरण्यासाठी दोन अडीच फूट रुंदीचा रस्ता जागोजागी जिने, दारुगोळा कोठारे, शिबंदीची घरे, तटा मध्ये कोरलेली विविध शिल्पे पाण्याच्या टाक्या, तटा मध्ये असलेले वैशिष्टपूर्ण शौचकूप, तटावरून प्रदक्षिणा मारत असताना नजरेस पडतात.
      तोफे पासून समोर असणारे महादेवाचे मंदिर सतत खुणावत असते. मंदिराकडे जात असताना वाटेत वाड्याचा चौथरा व गणपतीचे छोटे मंदिर लागते. महादेवाचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून मंदिराच्या समोर दोन नंदी व दीपमाळ पाहायला मिळते. दीपमाळेवर गणपती व मारुती ची मूर्ती पाहायला मिळते. मंदिरातील शिवलिंग अतिशय सुंदर असून त्याच्या दोन्ही बाजूला कमळ फुलांची नक्षी काढलेली असून मंदिरातील वातावरण अतिशय आल्हाददायक आहे. इथून पुढे बालेकिल्ल्या वरील झाडीमध्ये असणाऱ्या राजवाड्याकडे वाट जाते या वाटे मध्ये छोटे मंदिर लागते. या घनदाट झाडी मधील राजवाडा व इतर वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. वाडा भव्य असून त्याची पडझड झालेली आहे त्याच्या भिंती भव्यतेची साक्ष देत आजही उभ्या आहेत. या ठिकाणी मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या टेकडीवरून गडाचा विस्तृत संपूर्ण सपाट प्रदेश दिसतो.
विसापूर-किल्ला-माहिती
पाण्याच्या टाक्या वरील मारुतीची मूर्ती


      गडाच्या मध्यावर भव्य असे पाच सात खोदीव पाण्याचे टाके आहेत, यातील एका टाकीवर मारुतीची सुंदर मूर्ती असून तिच्याभोवती नक्षीदार कमान बनलेली पाहायला मिळते. पूर्ण गडावर सहा-सात मारुतीच्या मूर्ती असून त्या कातळात कोरलेले आहेत.
      उत्तर तटावरून चालत असताना वाटेत विशिष्ट आकृत्या पाहायला मिळतात, या आकृत्या कशाच्या आहेत हे जरा सांगणे कठीणच. गडाच्या एका बुरुजावर तोफे साठी एक वर्तुळाकार यंत्र केले पाहायला मिळते, याने बहुतेक तोफेची दिशा व अंतर निश्चित करता येत असावे. याच्याच बाजूला अर्धवर्तुळाकार टेहळणी बुरुज पाहायला मिळतो. त्याच प्रमाणे चूना घोटण्यासाठी चुन्याचा घाणा व भलेमोठे जाते  पाहायला मिळते, जाते पहात असताना याला फिरवणारे हात किती मजबूत असावेत असा प्रश्न पडतो. बाजूलाच दोन तोफा पडलेल्या पाहायला मिळतात यातील एक तो पूर्ण असून दुसरी तोफ तुटलेल्या अवस्थेत आहे.
      गडावर दोन वास्तू ही आहेत या वस्तू बहुतेक दारूगोळा कोठारे असावीत. गडावर तट बुरुजाच्या बांधकामासाठी वापरलेला दगड गडावरच मिळवल्यामुळे जागोजागी अनेक पाण्याची टाकी निर्माण झालेली पाहायला मिळतात. अशी एकूण ५७ टाके काठावर आहेत. या टाक्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते.
विसापूर-किल्ला-माहिती
महादेव मंदिर


कोकण दरवाजा मार्गे:

      लोहगडा कडून किंवा गायमुख खिंडीतून गडावर जाणारा मार्ग कोकण दरवाजा मध्ये येऊन पोहोचतो. गडाच्या दक्षिण पायथ्याला असणाऱ्या विसावा हॉटेल पासून किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. या वाटेवर रस्त्याला फाटा फुटतो त्यातील एक मार्ग गडाच्या मुख्य दरवाज्यातून तर जवळचा मार्ग तट ढासळलेला आहे तिथून गडावर जातो.या जवळच्या मार्गाने जात असताना वाटेत पाण्याचे एक टाके लागते मी या टाक्या शेजारी छोटी पिंड पाहायला मिळते.रस्ता अतिशय ओबडधोबड असून वाटेत भलेमोठे दगड पडलेले आहेत. ढासळलेल्या तटावरुन गेल्यानंतर खडकात खोदलेले खांब टाके दिसून येते, हे टाके प्रशस्त असले तरी गाळाने माखलेले आहे.

भाजे लेणी मार्गे:

    भाजे लेणी पासून गडावर जाण्यासाठी जंगलातील वाटेने जावे लागते. ही वाट तशी दुर्लक्षित व अवघड आहे वाटाड्या किंवा माहितगार असल्याशिवाय या वाटेने जाणे टाळावे.

विसापूर किल्ल्याचा इतिहास:

      विसापूर किल्ला इतिहासात तसा दुर्लक्षित आहे किंवा लोहगडाच्या इतिहासामध्ये झाकोळला गेला आहे. गडाचा इतिहास शोधायचा च म्हटले तर तो थेट पहिल्या शतकात जातो. या किल्ल्याच्या पोटात असणाऱ्या लेणी व गुफा वरून हा किल्ला भाजे लेण्यांच्या निर्मिती वेळी बांधला गेला असावा. विसापूर किल्ल्याचा मराठ्यांच्या इतिहासातील उल्लेख सतराव्या शतकाच्या मध्या मध्ये आढळतो. स्वराज्यनिर्मीतीच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये इस १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पवन मावळातील इतर किल्ल्यां बरोबर विसापूर हे स्वराज्यात सामील करून घेतला. त्या काळामध्ये यालाही इसागड असे म्हणत.
      ११ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार मोगलांना जे २३ किल्ले द्यावे लागले त्यामध्ये विसापूर होता. तहानुसार कुतुब खान व हलाल खानाने या प्रांतातील सारे किल्ले आपल्या ताब्यात घेतले.
विसापूर-किल्ला-माहिती
जाते


      आग्र्याहून महाराज सुटून आल्यानंतर व स्वराज्याची पुन्हा व्यवस्थित घडी बसवल्या नंतर,१६७० मध्ये मोगलां- कडे गेले सारे किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले.
      १६८२ मध्ये या परिसरात मराठे व मोगल यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री चालू होती.याच दरम्यान मराठे मावळात असताना चाकण मध्ये असणाऱ्या शहाबुद्दीन ला ही बातमी समजताच तो लोहगडाच्या पायथ्याशी आला या ठिकाणी झालेल्या धुमश्चक्रीत मराठ्यांचे थोडे अधिक नुकसान झाले.मराठे तेथून कुसापूर गावात गेले व त्यांनी विसापूर काबीज केला.
      इ.स.१७१३ मध्ये ताराबाईंनी कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांवर हल्ला करण्यास भाग पाडले असता आंग्रे कुलाबा येथून जे निघाले ते सपाट्याने अनेक किल्ले व प्रदेश काबीज करत मावळात येऊन दाखल झाले.मावळात त्यांनी तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, किल्ले काबीज केले.आंग्रेंचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मावळात पाठवले.पेशव्यांनी मुसद्दी पणाने आंग्रेंना शाहूंच्या पक्षात वळवून घेतले व तह घडवून आणला. तहानुसार जिंकलेले सारे किल्ले शाहूंना परत केले. याच काळात बाळाजी विश्वनाथांनी विसापूर किल्ल्याचे पुन्हा बांधकाम करून तो मजबूत करून घेतला. आजचे दिसणारी मजबूत तटबंदी म्हणजेच मराठ्यांनी केलेले किल्ल्याचे बांधकाम. पेशवाईच्या काळामध्ये या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून करण्याचा होता.
      ४ मार्च १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथर ने किल्ल्यावर हल्ला करून जिंकून घेतला . विसापूर किल्ला पडल्याचे समजताच मराठ्यांनी लोहगड ही सोडला. इंग्रजांनी तोफा लावून किल्ल्याचा मार्ग उद्ध्वस्त करून टाकला.

विसापूरला जायचे कसे:

     विसापूर ला जाण्यासाठी मुंबई पुणे वरून ट्रेन ने मळवली रेल्वे स्थानकावर उतरून दक्षिण दिशेला असलेल्या भाजे लेण्या मार्गे गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीतून डावीकडे जाणारी विसापूर तर उजवीकडे जाणारी वाट लोहगडाकडे जाते. खासगी वाहनाने येणार असाल तर पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील मळवली गावातून दक्षिण दिशेला असणाऱ्या भाजे गावातून गायमुख खिंड मार्गे जाता येते

पाटण मार्गे: 

      मळवली तून हायवे पार केल्यानंतर डावीकडे जाणार्‍या पाटण विसापूर रोड ने पाटण गावात मध्ये जावे लागते. पाटण मध्ये गाडी पार्क करून पुढे झाडीतून चालत गड सर करावा लागतो. पाटण मधून विसापूर ला चालत जाण्यासाठी दोन तास लागतात.

काय काळजी घ्यावी:

      विसापूरला वर्षभरात केव्हाही जाऊ शकतात. मात्र उत्तर दरवाजातील पायऱ्या मधून पावसात वाहणारे अतिशय मनमोहक पाणी पर्यटकांना आकर्षित करत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर गाड्यांचे वेळापत्रक माहिती करून घेणे. खाजगी गाडी करून विसापूर पाण्याचे नियोजन करावे म्हणजे लोहगड विसापूर ट्रॅक एका दिवसात पूर्ण होईल.
गडावर पाण्याची सोय आहे.
पावसाळा सोडून इतर वेळी गडावर मुक्कामाची सोय होऊ शकते. जेवण व नाश्त्याची सोय गडाच्या पायथ्याला होते.

            🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩
      
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण