मुख्य सामग्रीवर वगळा

वासोटा किल्ला माहिती | vasota fort information in Marathi

वासोटा किल्ला माहिती

नाव:              वासोटा, व्याघ्रगड
प्रकार:.           वनदुर्ग, गिरिदुर्ग
ठिकाण:‌          कुसापुर चोरवणे
जिल्हा:.          सातारा
डोंगर रांग:       महाबळेश्वर कोयना
किल्ला चढाई: मध्यम स्वरूपाची

वासोटा किल्ला कुठे आहे:

      वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आहे. याचे अंतर सातारा पासुन सुमारे 40 किलोमीटर एवढे आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1175 मीटर आहे. सह्याद्री पर्वत रांगेला समांतर अश्या महाबळेश्वर कोयना डोंगररांगेवर वासोटा किल्ला असून ही रांग पुढे दाते गडापर्यंत जाते. वासोट्याचा पूर्ण परिसर कोयना अभयारण्यात मोडत असून किल्ल्याच्या पूर्वेला अथांग शिवसागर जलाशय तर पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीतील खोल दऱ्या पाहायला मिळतात. कोयनेच्या जलाशयाने लोकांचा या परिसराशी संपर्क तुटलेला आहे. निर्मनुष्य व घनदाट जंगल दुर्गम प्रदेश यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.
      साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या गिरिप्रेमी व दुर्गप्रेमी पर्यटकांसाठी वासोटा एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी अनुभवता येणाऱ्या बोटिंग जंगल ट्रेक अभयारण्य कॅम्पिंग यामुळे पर्यटनाचे केंद्र बिंदू झाले आहे.


वासोटा किल्ल्याचा प्रवास:

      वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या मेट इंदवली या गावापर्यंत जाण्यासाठी बामनोली येथून लॉन्च सोय आहे. पंधरा किलोमीटरचा बोटीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 40 45 मिनिटे लागतात. बेटी नंदनी हे गाव कोयना धरण बाजू असल्याने फार पूर्वीच उठून गेलेले असून याठिकाणी घरांचे काही अवशेष पाहायला मिळतात.
वासोटा किल्ला
मारुती मुर्ती वासोटा किल्ला


      गडाकडे जाणारी पायवाट चांगली असून या वाटेने जंगलातून प्रवास करावा लागतो. काही अंतर चालून गेल्यानंतर वाटेत खळखळून वाहणारा ओढा लागतो या ठिकाणी मारुतीची मूर्ती आहे. पाणी वाहते असून पिण्यायोग्य असल्याने पाण्याच्या बाटल्या तेथून भरून घ्याव्या.
      ओढ्या पासूनच पुढे किल्ल्याची खरी चढण सुरू होते. दुतर्फा घनदाट झाडी असल्याने सूर्य नारायणाचे दर्शन दूर होऊन जातात. या जंगलामध्ये सरदार वृक्ष असल्याने जंगलातून चालताना कायम गारवा जाणवतो.
      कोयना अभयारण्यात विविध प्रकारची वृक्षसंपदा पशुपक्षी पाहायला मिळतात. विशेष करून या ठिकाणी रानगवा, अस्वल आणि भेकर यांचे प्रमाण अधिक आहे तसेच कमी-अधिक प्रमाणात बिबट्या किंवा पटेरिया पाहायला मिळतो. गवा आणि अस्वल हे अक्रोड प्राणी असल्याने जास्त गोंधळ न करता व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करावा लागतो. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटणार नाही.
      काही अंतर चालून गेल्यानंतर नागेश्वर  कडे जाणारा फाटा फुटतो. या वाटे नागेश्वर कडे जाता येते जंगलातून प्रवास करून डोंगर माथ्याच्या नाकाडे पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर या ठिकाणी तर गडाचा पायरी मार्ग लागतो. पायऱ्या मधून वर आल्यानंतर गडाचे भग्नावस्थेतील रवेदार आहे या प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करावा लागतो. गडाचा विस्तार सहा ते सात हेक्टर एवढ्या परिसरामध्ये पसरलेला आहे.

वासोट्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

      गडावर प्रवेश करताच डाव्याबाजूला जांभ्या दगडात बांधलेले छोटेसे चांदकाई देवीचे मंदिर व पाण्याचे टाके पाहायला मिळते. टाक्यामध्ये भिंत असल्याने त्याचे दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. या ठिकाणी गडाच्या शेवटच्या टोकावरून समोर दिसणारे शिवसागर जलाशयाचे विहंगम दृश्य व कोयनेचे अभयारण्य पाहताना भान हरपून जाते. 
वासोटा किल्ला
शिवसागर जलाशय आणि कोयना अभयारण्य


      गडाच्या उत्तरेकडे जात असताना वाटेत मारुती मंदिर, वाड्याचे भग्नावशेष, व महादेव मंदिर पाहायला मिळते. उत्तर बाजूच्या दूरवर पसरलेल्या सुळक्याला काळकाई चे ठाणे म्हणतात. याच्या पोटामध्ये गुहा आहे असे म्हणतात. या ठिकाणावरून नागेश्वर सुळक्याचे दर्शन व दूरवर पसरलेल्या डोंगर-दऱ्या पाहताना वेगळाच आनंद मिळतो.
गडाच्या पूर्व बाजूला दिसणाऱ्या ठोसेघर चाळकेवाडी येथील पवनचक्की मन मोहून टाकतात    
      वासोट्याला जाणाऱ्यांनी नागेश्वर ला हमखास जावे. याठिकाणी शिवलिंग असून यावर गोट्याचा तरुण अभिषेक करावा असे बारमाही पानी टपकते. गुहेमध्ये शिव पार्वतीची सुंदर मूर्तीही आहे. तेथे संशोधन कार्यामध्ये बाराव्या व सोळाव्या शतकातील हत्यारे व अवशेष सापडले आहेत.
      

वासोटा किल्ल्याचा इतिहास:

      वासोटा किल्ल्याबद्दल तशी इतिहासामध्ये कमीच नोंद आढळते. वासोटा किल्ल्याच्या नावाबद्दल अशी एक कथा ऐकण्यास मिळते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य या डोंगरावर वाचत होता त्याने या डोंगराला वशिष्ठ हे आपल्या गुरुचे नाव दिले. कालांतराने वशिष्ठ चा अपभ्रंश होऊन वासोटा असे नाव पडले असावे. वास्तविक पाहता या किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स.११७८ ते इ.स.११९३ या कालखंडामध्ये केले.
      वासोटा सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत शिर्के व मोरे या आदिलशाहीतील सरदारांकडे होता. जावळीच्या चंद्रराव मोरे चा इ.स.१६५५ मध्य निर्णायक पराभव करून जावळीचा सारा मुलुख स्वराज्यात सामील करून घेतला त्याच वेळी वासोटा ही स्वराज्यात आला. किल्ल्याचे नाव बदलून व्याघ्रगड असे ठेवले. तेथील गरज आता अभयारण्य उंचच उंच डोंगर रांगा यामुळे हे नाव शोभिवंत वाटते परंतु हे नाव जास्त कुणाच्या परिचयाचे नाही.
      मराठी शाळेच्या कालखंडामध्ये वासोटा किल्ल्याचा मुख्य उपयोग तुरुंग म्हणून करण्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरच्या बंदरावर हल्ला केला त्यावेळी त्या ठिकाणी सापडलेली काही इंग्रज पकडून त्यांना वासोटा केल्यावर बंदी बनवून ठेवले. अशाच प्रकारे इ.स.१६६१ मध्येही काही अन्य इंग्रज अधिकाऱ्यांना वासोट्यावर कैद करून ठेवले होते.इ.स.१६६९ मध्ये या किल्ल्यावर काही संपत्ती सापडली होती.
      पेशवाईच्या काळामध्ये हा किल्ला औंधच्या पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. ताई तेलिणीने किल्ला काबीज करून या किल्ल्यावर वास्तव्य केले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांने सरदार बापू गोखल्यांना वासोटा घेण्यासाठी पाठवले. सात-आठ महिने बापू गोखले वासोटा साठी ताई तेलिणी बरोबर लढत होते. ताई तेलिणीने पेशव्यांच्या सेनेला प्रखर लढा देऊन जेरीस आणले. अखेर बापू गोखले यांनी टेकडीवर तोफा चढवून वासोट्यावर तोफांचा मारा केला. ताई तेलिणी चा यामध्ये पराभव होऊन तिला अखेर सोडावा लागला.
      बाजीराव पेशव्याने छत्रपती प्रतापसिंह महाराज व त्यांच्या परिवारास सातारा मधून आणून वासोट्यावर ठेवले होते. इंग्रज अधिकारी प्रिन्सलर याने १८१८ मध्ये वासोट्यावर चढाई करून वासोटा ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली आणला.


वासोट्याला जायचे कसे:

      वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत घाटमाथ्यावरून बामणोली मार्गे व तळकोकणातून चिपळूण मार्ग.

चिपळूण मार्गे:

      तळ कोकणातील चिपळूण पासून नागेश्वरच्या पश्चिमेकडील पायथ्याला असणार्‍या चोरवणे गावापर्यंत गाडीमार्ग आहे, तिथून पुढे चोरवणे गावातून शिंदेवाडी नागेश्वर रोडने पायी वासोट्याला जाता येते. या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस चालू आहेत. परंतु त्यांचे वेळापत्रक माहिती करून घेणे.

बामनोली मार्गे

     सातारा मधून कास बामनोली मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस असून या बसने बामनोली पर्यंत जाता येते. त्याच प्रमाणे महाबळेश्वर येथून तापोळा मार्ग बामणोली ला जाता येते. बामणोली मधून मेट इंडवली गावापर्यंत लॉन्च जाऊन पुढे चालत वासोट्याला जाता येते. पुणे मुंबई वरून येणाऱ्यां पर्यटकांनी प्रथम सातारा मध्ये येऊन पुढे कास बामनोली मार्गे गडावर जाणे.

वासोटा किल्ल्यावर मुक्काम/कॅम्पिंग:

      कोयना अभयारण्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये वासोटा किल्ला येत असल्याने बामणोली येथे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये परमिशन घेणे बंधनकारक आहे. किल्ल्यावर कॅम्पिंग किंवा मुक्काम करण्यासाठी बंदी असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत किल्ला उतरून खाली ने आवश्यक आहे.
बामणोलीमध्ये शिवसागर जलाशयाच्या काठावर कॅम्पिंग ची व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे रिसॉर्ट व हॉटेल्स ही आहेत.

वासोट्यावर जाताना काय काळजी घ्यावी:

  •   किल्ल्यावर जाताना मुबलक पाणी व स्नॅक्स किंवा फळे बरोबर घेऊन जाणे.
  •  गवा किंवा अस्वले आक्रमक असल्याने सुरक्षित अंतर ठेवावे.
  •   बोट वाल्याने दिलेल्या टाइमिंग मध्ये गड उतरूण खाली येणे.
  •   गड वाटेवर लागणाऱ्या ओढ्यातून पाणी भरून घेणे.
      
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

हरिश्चंद्रगड किल्ला माहिती |Harishchandra gad information in Marathi

हरिश्चंद्रगड Harishchandra gad in Marathi  नाव :                   हरिश्चंद्रगड किल्ला उंची :        ४६०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग :            माळशेज जिल्हा :             अहमदनगर चढाई :              मध्यम सद्यस्थिती :         चांगली हरिश्चंद्रगड किल्ला माहिती | Harishchandragad fort information in Marathi          सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.       ...