कृष्णा नदी माहिती
कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते
हे ही वाचा गोदावरी नदी
सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो. याच परिसरात कृष्णा बरोबर कोयना वेण्णा सावित्री गायत्री या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत.
कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते.
कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडण्यात आली आहे.
कृष्णा महाबळेश्वर मधून खाली उतरून वाई मार्गे माहुली येथे येते,याच ठिकाणी तिला वेण्णा येऊन मिळते. पुढे माहुली पासून ५० किमी अंतरावर असलेल्या कराड मध्ये तिला कोयना मिळते,याला कृष्णा कोयनेचा प्रितीसंगम असेही म्हणतात.कराड पासून पुढे जात असताना तिला सांगली मध्ये पुर्वे कडुन 'येरळा' तर पश्र्चिम बाजूने वारणा येऊन मिळते,तर कुरुंदवाड मध्ये पंचगंगा येऊन मिळते.पंचगंगेच्या संगमावर नरसिंहवाडी हे दत्ताचे जागृत देवस्थान आहे.याच्या नंतर दुधगंगा नदी येऊन मिळते व अखेर महाराष्ट्रातील आपला ३०० किमी चा प्रवास करून कृष्णा कर्णाटक राज्यात प्रवेश करते.
बेळगांव जिल्हातून कृष्णा पुर्व वाहीनी होते विजापूर मध्ये तिला घटप्रभा नदी येऊन मिळते,याच ठिकाणी गोकाक चा प्रसिद्ध धबधबा आहे.पुढे तेलंगणाच्या सिमेवर रायपूर येथे भिमा नदी येऊन मिळते.पुढचा प्रवास करत असताना तुंगभद्रा नदी चा संगम होतो.
यानंतरच्या प्रवासात तिला दिडी, मुसी, पालेरू, मुनेरू, आदी नद्या येऊन मिळतात.विजयवाडा येथून पुढे कृष्णेचे तिनं प्रवाह होऊन त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे.या त्रिभुज प्रदेशात कालवा जोड प्रकल्प राबवून यातून जलवाहतूक केली जाते.शेवटी आंध्रप्रदेशातील राजा महेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
कृष्णा व तिच्या उपनद्यां वरील धरणे.
धोम धरण
वाई शहरातल्या पश्चिम बाजूला धोम गावात कृष्णा नदीवर धरण बांधले असल्याने याला धोम धरण म्हणतात.
यांची पाणी साठवण क्षमता १४ टि एम सी इतकी आहे.या धरणाचा उपयोग पिण्यासाठी व सिंचनासाठी केला जातो.वाई, सातारा,जावळी, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना या धरणाचा फायदा झाला आहे.
कोयना धरण
कोयना या कृष्णेच्या उपनदीवर कोयना धरण आहे हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठे असून याची १०५ टि एम सी इतकी जल साठवण क्षमता आहे.सातारा जिल्ह्यातील या धरणाच्या पाण्याला शिवसागर जलाशय असेही म्हणतात.या धरणाचा उद्देश सिंचन आणि जलविद्युत निर्मिती करणे आहे.जलाशयाच्या बाजुने कोयना अभयारण्य आहे.
अलमट्टी धरण
कर्नाटक मधील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदी वर २००५ साली अलमट्टी धरण बांधले आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता २०० टि एम सी इतकी असली तरी साधारण पने १२४ टि एम सी इतके पाणी साठवले जाते.या धरणाचा नामफलकाने जागतीक किर्तिमान स्थापन केला आहे,कारण नामफलक जगातील सर्वात मोठा फलक आहे याची लांबी ११२.७ मीटर आहे.या धरणामुळे कर्नाटक राज्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.
नागार्जुन सागर धरण
हैद्राबाद पासून १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या नागार्जुन कोंडा येथे हे धरण आहे या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात मोठे जिनाही धरण आहेत स्वतंत्र भारतातील जलविद्युत निर्मिती प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या पहिल्या धरणांपैकी हे एक धरण आहे या धरणाची लांबी सुमारे १ किलोमीटर असून उंची 124 मीटर आहे. या धरणाच्या बाजूला एक छोटा तलाव असून त्यामध्ये पर्यटकांसाठी बोटिंगची सोय केली आहे हे एक सहलीसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. धरणापासून २२ किलोमीटर अंतरावर श्रीशैलम् हे आंध्र प्रदेशातील अभयारण्य आहे.
कृष्णा पाणी वाटप करार
कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये अनेक वाद आहेत हा वाद मिटविण्यासाठी पाणी वाटप करार करण्यात आला आहे त्यानुसार महाराष्ट्राला १६ घ.मी कर्नाटक ला २०घ.मी तर आंध्रप्रदेश ला २३घ.मी पाणी वापरण्याचा हक्क मिळाला आहे
कृष्णा नदीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 27% क्षेत्र महाराष्ट्रात 43% कर्नाटकात तर 29 25% आंध्र प्रदेशात येते.
कृष्णा नदीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे