गोदावरी नदीची माहिती
उगम स्थान : नाशिक त्रंबकेश्वर
एकूण लांबी : १४५६ किमी
महाराष्ट्रातील लांबी: ६६८ किमी
नदी प्रणाली क्षेत्र : ३१३३०१ चौरस किमी
राज्य : महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश
गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे.
गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण करते त्यामुळे तिला जीवनदायिनी असे ही संबोधतात.
हे ही वाचा
गोदावरी नदीचा उगम कोठे होतो
गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. ब्रह्मगिरी डोंगरावर एका झऱ्याच्या रूपामध्ये उगम पावते. पुढे ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी बनते. ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो तिथे गंगा मातेचे छोटेखानी मंदिर व पाण्याचे कुंड आहे. उगम स्थानापर्यंत जाण्यासाठी डोंगरांमध्ये ६९० पायर्या चढून जावे लागते. ज्या झऱ्यातून गोदावरी उगम पावते त्याला गंगाद्वार असेही म्हणतात.गोदावरी नदी पूर्ववाहिनी असून सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम पाऊन दख्खनच्या पठारावर पूर्वेकडे वाहत जाते तर पुढे जाऊन ती दक्षिणवाहिनी होते. दख्खनच्या पठारावर तिचे पात्र अरुंद तर प्रवाह वेगवान असतो. जसजशी दख्खनच्या पठारावर पुढे सरकत जाते तसतसा तिचा वेग मंदावतो व पात्र उथळ वरून होते काही ठिकाणी नदीचे पात्र तीन ते चार किलोमीटर एवढे भरते. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासुन उंची सरासरी उंची ४०० मीटर एवढी आहे. गोदावरी महाराष्ट्रात ६६८ किलोमीटरचा प्रवास करत असताना नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर,गडचिरोली या नऊ जिल्ह्यातून वाहते.
गोदावरी नदी पश्चिम घाटा पासून पुर्व घाटापर्यंत विविधतेने नटलेली आहे.सुरवातीला कमी पावसाचा दुष्काळी भाग तर पुढे सांग बांबूची वने,शेवटी गाळाचा त्रिभुज प्रदेश असे पहायला मिळते.
आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे गोदावरीवर नदीवर बांधलेला २.५ किमी लांबीचा मोठा रेल्वेपूल आहे. जवळच धवलेश्वरम् येथे या नदीवर १८५७ मध्ये बंधारा घातला आहे. त्याला अॅनिकट म्हणतात. तेथूनच गोदावरीचा दक्षिणेकडे प्रवास सुरू होतो व याचं ठिकाणी त्रिभुज प्रदेश सुरू होतो. गोदावरी नदीचे वेगवेगळे नदी प्रवाह तयार होतात त्यात पूर्वेस गौतमी गोदावरी आणि पश्चिमेस वसिष्ठ गोदावरी असे दोन मुख्य प्रवाह असून वैनतेय हा आणखी एक प्रवाह आहे. त्रिभुज प्रदेशात गाळाची चांगल्या प्रतीची माती असल्याने येथे भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गोदावरीच्या विगवेगळ्या प्रवाहांना कालव्यांद्वारे जोडले असून या कालव्यातून जलवाहतूक चालते. शेवटी हे गोदावरीचे प्रवाह यनम्, राझोले आणि नरसपूर यांच्याजवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
गोदावरी नदीचे अध्यात्मिक महत्त्व
गौतम ऋषीं ब्रह्मगिरी पर्वतावर वास्तव्यास असताना त्यांच्या हातून चुकून घडलेल्या गोहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली. या आराधने तून त्यांनी भगवान शंकराकडून त्यांनी गंगेला ब्रह्मगिरी पर्वतावर येण्याची विनंती केली. त्यानुसार गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आल्यावर गायीचा सांभाळ करणारी म्हणून तिचे नाव गोदावरी पडले. म्हणून गोदावरीला दक्षिणगंगा असेही म्हणतात. धार्मिक विधी करण्यासाठी हिंदू लोक देशभरातून गोदातिरी येत असतात. कालसर्पयोग नारायण नागबळी पिंडदान यासारखे अनेक धार्मिक विधी नाशिक येथे गोदावरी तीरावर केले जातात. नाशिक नेवासे पैठण राजमहेंद्री कोटापल्ली असे अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रे गोदावरी नदी काठावर आहेत. नाशिक येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो या वेळी देशभरातून लाखो भाविक गोदावरी मध्ये स्नान करण्यासाठी येत असतात. वनवासात असताना प्रभू श्रीरामांचे वास्तव्य गोदावरी तीरी होते.गोदावरी नदीच्या उपनद्या
गोदावरी नदी आपला १४५६ किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळे पर्यंत तिला जागोजागी डावीकडून व उजवीकडून अनेक नद्या मिळतात.उजवीकडून मिळणाऱ्या नद्या
धारण, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, अंजना, गिरीजा, काबरा, दुधना, तेरणा, गिरणा,
डावीकडून मिळणाऱ्या नद्या
शिवना, काम, आडवा, खेळणा, मन्याड, पुस, अरणा, वाघाडी, खुनी, सर, चुलबंद, कोणारी या नद्या गोदावरी ला येऊन मिळतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे