पोस्ट्स

पर्यटन स्थळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रायगड किल्ला – मराठा स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी

इमेज
  रायगड किल्ला माहिती रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला मराठा स्वराज्याच्या स्थापनेचे प्रतीक मानला जातो. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला आजही इतिहासप्रेमी, पर्यटक आणि शिवभक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. रायगड किल्ला माहिती शोधणाऱ्या वाचकांसाठी हा किल्ला इतिहास, स्थापत्य आणि शौर्य यांचा संगम दर्शवतो. रायगड किल्ल्याचा इतिहास रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी असे होते. इ.स. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव रायगड ठेवले. १६७४ साली याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. यानंतर रायगड किल्ला मराठा साम्राज्याची अधिकृत राजधानी बनला. येथूनच स्वराज्याचा कारभार, लष्करी मोहिमा आणि प्रशासन चालवले जात होते.  हे ही वाचा: रायगड किल्ला माहिती  रायगड किल्ल्याची भौगोलिक रचना रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट उंचीवर असून चारही बाजूंनी नैसर्गिक कडे आणि दऱ्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या ...

केदारनाथ मंदिर माहिती | Kedarnath temple information in Marathi

इमेज
  केदारनाथ मंदिर कुठे आहे  केदारनाथ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले एक प्रमुख धार्मिक तिर्थक्षेत्र आहे.  येथे भगवान शिवाचे मंदिर आहे, जे हिंदू धर्मानुसार चार धामांपैकी एक मानले जाते.  केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यातील हिमालयीन प्रदेशात असलेल्या मंदिरांपैकी सर्वात प्रमुख मानले जाते.  येथे जाण्यासाठी प्रवाशाला प्रथम गौरीकुंड येथे जावे लागते, जे केदारनाथपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे.  गौरीकुंड हे एक पवित्र तलाव आहे जेथे मान्यतेनुसार, भगवान शिवाची पत्नी पार्वतीने ब्रजची राणी गोपींच्या रूपात स्नान केले होते.  इथून पुढे पायी ट्रेकनेच प्रवास केला जातो.  गिर्यारोहणाच्या दृष्टिकोनातून हा ट्रेक अवघड असला तरी हा प्रवास आध्यात्मिक आणि मानसिक ताजेतवाने करणारा अनुभव ठरतो. केदारनाथ मंदिर माहिती   केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन आणि आकर्षक भव्य मंदिर आहे जे विशेषतः उत्तराखंडच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते.  या मंदिरात भगवान शंकराची मूर्ती स्थापित असून धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून या मंदिराला मान्यता प्राप्त झाल...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संपुर्ण माहिती | Tadoba Tiger Reserve information in marathi

इमेज
ताडोबा व्याघ्र प्रकल्प         भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा ताडोबा जंगलात तुमचं स्वागत आहे.  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे सन १९५५ मध्ये ताडोबा उद्यानाची निर्मिती केली असून महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे . अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ११०० चौ किमी एवढे आहे.  महाराष्ट्रातील सर्वात जूने राष्ट्रीय उद्यान असले तरी ताडोबा चा इतिहास अनेक शतके जुना आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प माहिती      ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. भारतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून १५० किमी तर चंद्रपूर पासून ४० किमी अंतरावर आहे. ताडोबा बंगाल टायगर किंवा पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आजमितीस या प्रकल्पात १२० पेक्षा जास्त वाघ असून त्यातील छोटा मटका हा वाघ पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ताडोबा मध्ये आपण वाघाला पाहण्याचा आनंद घेऊ शकता        जंगलातून प्रवास करत असताना किर्र झाडी, निरव शांतता त्यात होणारा ...

गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Goa top 10 tourist places in marathi

इमेज
गोवा पर्यटकांन स्थळ | goa tourist attractions गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून भारतातील मुख्य पर्यटन स्थळ पैकी एक आहे त्यामुळे गोव्याला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण खानपान, सुख सुविधा, असंख्य ऍक्टिव्हिटी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. हनिमून, फॅमिली ट्रिप, मित्रपरिवार बरोबर फिरायला जाण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये गोव्यातील मुख्यतः पर्यटन स्थळे व त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.         गोव्यातील समुद्र किनारे आणि तेथील नाईट लाईफ साठी गोवा पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, कसिनो, क्लब पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर आपण जाणून घेऊया लेखामध्ये गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल गोवा पर्यटन स्थळे गोव्यातील पर्यटन स्थळे | goa tourist places in marathi बागा बिच        बागा बिच हा गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेला समुद्र किनारा आहे. तुम्हाला वेळेचे बंधन असेल तर सरळ तुम्ही बागा बिच ला जावे कारण या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपलब...

लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi

इमेज
लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असून त्याला लोणार सरोवर असे म्हणतात. युरोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये लोणार सरोवराचा समावेश आहे लोणार सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून त्याची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. साधारणपणे अंडाकृती आकाराचे हे सरोवर त्याच्या विविध वैशिष्ट्यामुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत त्यातील काही मंदिर तर चक्क सरोवरामध्ये आहेत. या सरोवरावर बरेच संशोधन केले जात असते व त्याचे शोध निबंध वेळोवेळी प्रकाशित होत असतात. तर आपण लोणार सरोवराची माहिती या लेखांमध्ये लोणार सरोवर बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लोणार सरोवर कुठे आहे         लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर हे लोणार गावामध्ये स्थित आहे. बुलढाणा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे तर, औरंगाबाद शहरापासून याचे अंतर साधारणपणे १५० किलोमीटर एवढे आहे. पुणे शहरापासून याचे अंतर ...

कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi

इमेज
कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi          सातारा पर्यटन स्थळांनी समृद्ध असा जिल्हा असून या ठिकाणी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी एक कास चे पठार रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरलेला असताना जनू स्वर्ग भासतो. फुलांचा बहर येताच पर्यटकांचे पाय आपोआप कासच्या दिशेने वळतात. कास पठारावर दुर्मिळ अशा अनेक वनस्पती असून त्यातील बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावरील आहेत तर काही फक्त या पठारावरच सापडतात त्यामुळे याला २०१२ युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व नवीन वनस्पतींचे संशोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाला की विविध रंगाची व आकारांची रंगीबेरंगी फुले फुलू लागतात व पठारावर १२-१३ चौरस किमीच्या परिसरात रंगबिरंगी फुलांचा गालिचा पाहायला मिळतो, त्यामध्ये कार्वी, मिकी माऊस ऑर्किड सारखी कुरणे पहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच कोयना अभयारण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी गवा, हरिण, ससे, भेकर, बिबट सरपटणारे प्राणीही पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या सात आश्चर्य मध्ये कास पुष्प पठाराचा ...

महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Top 15 tourist attractions in Mahabaleshwar

इमेज
Mahabaleshwar tourist places in Marathi | महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे   महाबळेश्वर पर्यटन या शब्दांमुळे संपूर्ण लेखाचा अंदाज आलाच असेल तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या पर्यटन स्थळा बद्दल माहिती पाहणार आहोत. महाबळेश्वर हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.  महाबळेश्वर हे हिल स्टेशन सह्याद्री पर्वत शिखरावर आहे. येथिल थंड हवामान, विपूल पर्जन्य, पर्यटनाच्या दृष्टीने सुख सुविधा, उच्च दर्जाचे हॉटेल्स यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुंबई पुण्या सारख्या महानगरां पासून काही तासाच्या अंतरावर असल्याने याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर हनिमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध असून नवविवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी येथे येणे पसंत करतात. उंच कडे ,खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर, हवेतील गारवा, खरेदीची उत्तम सोय, स्ट्रॉबेरी, पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते तर जाणून घेऊया भेट देण्यासारखे महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे व त्याची माहिती.  प्रतापगड किल्ला महाबळेश्वर कोठ आहे       महाबळेश्वर ह...

नळदुर्ग किल्ला माहिती | Naladurg fort information in Marathi

इमेज
नळदुर्ग किल्ला माहिती |Naladurg fort information in Marathi  किल्ल्याचे नाव नळदुर्ग  प्रकार            भूईकोट जिल्हा.          उस्मानाबाद जवळचे गाव   नळदुर्ग सद्यस्थिती       चांगली     उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठावर असलेला नळदुर्ग किल्ला भूईकोट प्रकारातील आहे. पुराणकाळातील नळ दमयंती च्या नावावरून या किल्ल्याला नळदृग असे म्हणतात. नळदुर्ग किल्ल्याचे स्थापत्य तत्कालीन स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव करून देते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून दोन ते अडीच किलोमीटरचा परिघामध्ये विस्तारलेला आहे. संवर्धनाच्या कामामुळे किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने अति उंच संपूर्ण तटबंदी आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या तीरावर रणमंडळ हा उप किल्ला असून त्याला बोरी नदीवरील बंधार्‍याने जोडले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर किल्ल्यावर केलेला पाहायला मिळतो, जसे की संरक्षणाच्या दृष्टीने खंदक खणून त्यामध्ये पाणी सोडले आहे बोरी नदी वरी...