मुख्य सामग्रीवर वगळा

लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi

लोणार सरोवर माहिती | Lonar Lake information in Marathi

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असून त्याला लोणार सरोवर असे म्हणतात. युरोस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये लोणार सरोवराचा समावेश आहे लोणार सरोवर बेसाल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर असून त्याची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे. साधारणपणे अंडाकृती आकाराचे हे सरोवर त्याच्या विविध वैशिष्ट्यामुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिर आहेत त्यातील काही मंदिर तर चक्क सरोवरामध्ये आहेत. या सरोवरावर बरेच संशोधन केले जात असते व त्याचे शोध निबंध वेळोवेळी प्रकाशित होत असतात. तर आपण लोणार सरोवराची माहिती या लेखांमध्ये लोणार सरोवर बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.



लोणार सरोवर कुठे आहे

        लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवर हे लोणार गावामध्ये स्थित आहे. बुलढाणा शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे तर, औरंगाबाद शहरापासून याचे अंतर साधारणपणे १५० किलोमीटर एवढे आहे. पुणे शहरापासून याचे अंतर साधारण  ३८० किलोमीटर एवढे भरते तर ४८० किलोमीटर एवढे अंतर मुंबई पासून आहे.

लोणार सरोवराची निर्मिती

    लोणार सरोवर कसे तयार झाले हा प्रश्न कायम पडत असतो तर,  सुरुवातीला याची निर्मिती भूगर्दीय प्रक्रियेमुळे किंवा ज्वालामुखी क्रियामुळे झाली असावी असे मानले जात होते.परंतु त्या ठिकाणी धूमकेतू किंवा उल्का त्या ठिकाणी आदळल्याने  लोणार सरोवराची निर्मिती झाली असून हे एक आघाती विवर आहे हे संशोधनातून ड सिद्ध झाले आहे. सरोवराचा आकार काहीसा अंडाकृती असून उल्का पूर्वेकडून ४० अंश कोनामध्ये येऊन जोरदार पणे आढळली असावी. पूर्वीच्या काही संशोधनातून याची निर्मिती ५२,००० वर्षापूर्वी झाली होती असे मानले जाते व होते. परंतु २०१० सली प्रकाशित झालेल्या का शोधनिबंधात याच्या निर्मितीचा कालखंड अरगॉन केटिंग प्रणाली वापरुन ५,७०,००० वर्षे इतका गणण्यात आला आहे. अमेरिकेतील स्मितसोनियल संस्था, जूयोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, आय आय टी यासारख्या संस्था सरोवरावर बरेच संशोधन करत असतात.

लोणार सरोवराचा इतिहास

      हिंदू प्राचिन ग्रंथामध्ये लोणार सरोवराचा उल्लेख विराज तीर्थ किंवा बैरज तीर्थ असा केलेला आढळतो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू ने लवणासुर नावाच्या राक्षसाला या ठिकाणी ठार मारल्यामुळे या परिसरात लोणार असे म्हणतात. या सरोवराचा उल्लेख भारतीय प्राचीन ग्रंथ जसे की स्कंदपुराण पद्मपुराण इत्यादी ग्रंथामध्ये केलेला आढळतो. लोणार परिसरातील सुरुवातीच्या कालखंडामध्ये देवगिरीचे यादव निजाम मोघल व मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. अधिकारी जे ई अलेक्झांडर यांनी इस १८२३ मध्ये लोणार सरोवर ला भेट दिल्याबद्दल नोंद आहे.


 लोणार सरोवराची वैशिष्ट्ये

    लोणार सरोवर हे बेसाल्ट खडकातील सर्वात मोठे आघाती विवर आहे. विवराचा आकार काहीसा गोलाकृती अंड्याच्या आकारा सारखा आहे. लोणार सरोवराच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरे पाहायला मिळतात. यातील काही मंदिरे तर विवराच्या आत मध्ये आहेत.
सासु सुनेची विहीर एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर असून त्यातील एका विहिरीचे पाणी खारे तर दुसऱ्या विहिरीचे पाणी गोड आहे. लोणार सरोवराचा व्यास १.८ चौरस किलोमीटर तर खोली १३७ मीटर एवढी आहे. सर्व राजे पाणी अतिशय क्षारयुक्त असून त्याचा पीएच १०.२ एवढा आहे.  लोणार सरोवराचे पाणी हिरव्या रंगाचे आहे परंतु  रहस्यमय रित्या गुलाबी रंगाचे झाले आहे. लोणार सर्वांचे पाणी अल्कधर्मी असून खारे आहे. लोणार सरोवराच्या संवर्धन आणि संगोपनासाठी लोणार संरक्षित अभयारण्य ची स्थापना केली आहे. लोणार सरोवराचा  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश आहे. लोणार सरोवराला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश मूल्य आकारले जात नाही. त्याचबरोबर वर्षभर पर्यटकांसाठी खुले असते.

लोणार सरोवरा संमंधीत धोके

     लोणार सरोवर वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे त्याचे संवर्धन व संरक्षण करणे अधिक गरजेचे आहे. आज लोणार सरोवराच्या भोवतीने वाढणारी लोक वस्ती मुळे त्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक हवामान बदलामुळे त्याच्यावर अनेक परिणाम होताना दिसतात. वरील धोके पाहता लोणार अभयारण्याची स्थापना केलेली आहे.


लोणार सरोवर ला भेट देण्याची योग्य वेळ

        लोणार सरोवराला पर्यटक वर्षभरामध्ये केव्हाही भेट देऊ शकतात. परंतु डिसेंबर ते मार्च हा कालखंड योग्य वाटतो. या काळामध्ये वातावरण थंड व अल्हाददायक असते. 

लोणार सरोवर राहण्याची सोय

      लोणार गावामध्ये अनेक हॉटेल्स व निवास व्यवस्था पर्यटकांसाठी आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे रिसॉर्ट ही लोणार मध्ये आहे त्या ठिकाणी पर्यटकांची जेवण नाश्ता मुक्कामाची होऊ शकते.


लोणार सरोवर ला जायचे कसे | how to reach Lonar lake

     लोणार सरोवरा बद्दल आपन वरील प्रमाणे माहिती पाहिली तर लोणार ला कसे जायचे ते पाहू   


      रस्ते मार्गे लोणार सरोवर ला कसे जायचे  | How To Reach Lonar Lake by road in Marathi

 लोणार हे गाव रस्ते मार्गे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांशी जोडले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस लोणार पर्यंत सेवा पुरवतात. त्याचा वापर करून तुम्ही लोणार ला जाऊ शकता. त्याचबरोबर खाजगी वाहनाने औरंगाबाद जालना मार्गे जाऊ शकता.

रेल्वे मार्गे लोणार सरोवर |how to reach Lonar Lake by train in Marathi

       लोणार सरोवर पासून जवळचे रेल्वे स्थानक १४० किलोमीटर अंतरावर औरंगाबाद येथे आहे. औरंगाबाद भारतातील इतर शहरांबरोबर रेल्वे मार्ग जोडले गेलेले आहे. औरंगाबाद पासून पुढचा प्रवास तुम्हाला खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने लोणार सरोवरापर्यंत जावे लागेल.

हवाई मार्गे लोणार सरोवर | how to reach Lonar Lake by flight in Marathi 

        लोणार सरोवरापासून जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औरंगाबाद येथून पुढे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा किंवा खाजगी वाहनाचा वापर करून लोणार पर्यंत प्रवास करावा लागेल ते अंतर साधारण १४० किलोमीटर एवढे आहे.


लोणार सरोवर माहिती या लेखामध्ये आपण लोणार सरोवर कुठे आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. लोणार ला कसे जाऊ शकतो हे पाहिले तरी तुम्हाला लेख कसा वाटला ते आम्हाला जरुर कमेंट बॉक्समध्ये कळवा व काही सुचना असतील तर जरूर कळवा. फॉलो करायला विसरू नका

          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण