कास पठार माहिती | Kaas plateau information in Marathi
सातारा पर्यटन स्थळांनी समृद्ध असा जिल्हा असून या ठिकाणी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत त्यापैकी एक कास चे पठार रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरलेला असताना जनू स्वर्ग भासतो. फुलांचा बहर येताच पर्यटकांचे पाय आपोआप कासच्या दिशेने वळतात. कास पठारावर दुर्मिळ अशा अनेक वनस्पती असून त्यातील बऱ्याचशा नष्ट होण्याच्या मार्गावरील आहेत तर काही फक्त या पठारावरच सापडतात त्यामुळे याला २०१२ युनेस्को जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करून नष्ट होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन करणे व नवीन वनस्पतींचे संशोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा सुरू झाला की विविध रंगाची व आकारांची रंगीबेरंगी फुले फुलू लागतात व पठारावर १२-१३ चौरस किमीच्या परिसरात रंगबिरंगी फुलांचा गालिचा पाहायला मिळतो, त्यामध्ये कार्वी, मिकी माऊस ऑर्किड सारखी कुरणे पहायला मिळतात. रंगीबेरंगी फुलपाखरे तसेच कोयना अभयारण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी गवा, हरिण, ससे, भेकर, बिबट सरपटणारे प्राणीही पहायला मिळतात. महाराष्ट्राच्या सात आश्चर्य मध्ये कास पुष्प पठाराचा समावेश आहे. कास पठाराची माहिती पाहत असताना येथील जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.
कासच्या पठारावर पावसाळा सुरू झाला की असंख्य प्रकारच्या वनस्पती व फुले उमलू लागतात.जैवविविधतेने परिपुर्ण पठारावर अनेक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दूर्मीळ वनस्पती येतात.त्यामुळे कास चर्या पुष्प पठाराला अनन्य साधारण महत्व आहे. फुले बहरण्याचा काळ पावसाळ्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत असतो तरीपण सप्टेंबरच्या मध्यामध्ये सर्वोत्तम वेळ असून या काळामध्ये बहुतेक फुले उमललेली असतात.
कास पठार ऑनलाईन तिकीट बुकिंग |
कास हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने या ठिकाणी पर्यटकांना प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी फी प्रतिव्यक्ती १०० रू एवढी आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीची प्रत प्रिंट आऊट काढून बरोबर घेऊन जाणे अनिवार्य आहे. दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा असून ती फक्त २००० व्यक्ती प्रतिदिन एवढी आहे.
कास पठार कोठे आहे.
कास चे पुष्प पठार सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून पश्चिमेला २४ किमी अंतरावर आहे. सातारा शहरातून यवतेश्वर चा घाट चढून गेल्यावर सात ते आठ किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध कास पुष्प पठार आहे. महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळा पासून तापोळा रोड ने ३८ किलोमीटर अंतरावर आहे. कास चे पठार पुण्यापासून अंतर १३० किमी तर मुंबई पासून २७० किमी एवढे आहे.
कास पठाराचे भौगोलिक स्थान व हवामान
सह्याद्री पर्वतरांगेच्या घाटमाथ्यावर कास पुष्प पठार असून याची समुद्र सपाटी पासून ची उंची १२०० मीटर एवढी आहे. याला स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात
ज्वालामुखी द्वारे निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकापासून बनले असून त्यावरील २५-३० मिली मिटर च्या पातळ आम्लयुक्त मातीचा थर आहे.Kaas plateau चा प्रदेश कोयना अभयारण्यात येत असल्याने येथे वन्यजीवन चक्र सुरळीत आहे.
कास पठार सातारा
कास बद्दल बोलायचे झाले तर याला पर्यटनाचे तिर्थक्षेत्र म्हणावे लागेल. पावसाळ्यात संपुर्ण परिसराचे सौंदर्य स्वित्झर्लंड ला ही फिके पाडेल असे असते. अशा या जैवविविधतेने नसलेल्या कास पठार पर्यटन शास्त्रज्ञ निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात. मानवी हस्तक्षेपामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा धोका असल्याने पर्यटक संख्या नियंत्रित केले आहे व दररोज २००० एवढेच पर्यटक याला भेट देऊ शकताथ. हिरवीगार डोंगर, धबधबे, खोऱ्यातून वाहणारे ठग, दाट धुके, पावसाच्या सरी, सारं काही स्वर्गाहून सुंदर भासते. याच पठारावर पावसाळा सुरू झाला की ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान असंख्य प्रकारची रानफुले फुलू लागतात त्यामध्ये अनेक दुर्मिळ प्रजाती पहायला मिळतात. साधारण पणे १२ चौरस किलोमीटर चर्या परिघात ८५० पेक्षा कमी जास्त प्रमाणात वनस्पती वेली झुडपे आढळतात. त्यामध्ये २८० फुलांच्या प्रजाती आहेत. त्यातील नामशेष होण्याचा धोका असलेल्या दूर्मीळ ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात.या फुलांवर भिरभिरणारी असंख्य रंगीबेरंगी फुलपाखरे पहायला मिळतात. ही फुले हंगामी स्वरुपाची असून नोव्हेंबर पर्यंत सर्व फुले मावळून जातात. उन्हाळ्यामध्ये हेच पठार रूक्ष वाटू लागते.
कास येथील पर्यटन स्थळे | What are the best places to visit in Kaas pathar
कास पठारावर फुलोत्सवा बरोबरच बरीच अशी ठिकाणे आहेत जी पर्यटकांना आकर्षित करू शकतात ती आपन खालील प्रमाणे पाहू
कास तलाव
गर्द हिरव्या झाडीमध्ये डोंगराच्या कुशीत कास चा छोटा पन सुंदर तलाव आहे. हा तलाव कास तलाव या नावानेच ओळखला जातो. कास तलावाचे पाणी सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरले जाते. तलावामध्ये पर्यटक नौकाविहार करू शकतात त्याच बरोबर या ठिकाणी गरमागरम चहा भजी वडापाव चा आस्वाद घेऊ शकतात
वजराई भांबवली धबधबा
कास पठारा पासून तीन किलोमीटर अंतरावरील भारतातील सर्वात उंच धबधबा आहे त्याला वजराई भांबवली धबधबा असे म्हणतात. धबधबा अल्पपरिचित असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ कमी असते. धबधबा तिनं टप्पात वाहत असून त्याचे दृष्य मनमोहक आहे. धबधब्याची भव्यता छातीत धडकी भरवेल अशीच आहे. वजराई धबधब्याच्या सड्यावर ही फुलांचे पठार असून येथे ही फुलांचे सुंदर गालिचे पहायला मिळतात. धबधब्या कडे जाणारी पाऊल वाट जंगलातून असून जंगलामध्ये जळवा अधीक असल्याने शरीर झाकेल अशी कपडे घालावेत.
एकीव धबधबा
कास पठारा शेजारीच एकीव चा धबधबा आहे याला पाबळ असे म्हणतात दुंद मोळेश्वर रोडवरील हा धबधबा छोटा असून पाण्यात भिजण्याचा आनंद घैण्यासाठी योग्य आहे. कास पठारावरील पावसाच्या पाण्यामुळे हा धबधबा तयार झाला आहे. कास ला आलेले पर्यटक या धबधब्या मध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.
चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प
कास पठारापासून जवळच चाळकेवाडी येथे सह्याद्री पवनचक्की प्रकल्प आहे. हा पवनचक्की प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणून परिचित आहे. या पठारावर दूरवर पर्यंत पवनचक्क्यांचे जाळे पाहायला मिळते. कोयना अभयारण्य, पठारावरील दाट धुके, जोरदार वारा पर्यटकांना आकर्षित करत असतो.
कास पठाराला भेट देण्याची योग्य वेळ
पावसाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळे फुले भहरू लागतात हा कालावधी ऑगस्ट ते ऑक्टोबर हा आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी साधारणपणे पठारा वरील सर्व फुले उमललेले असतात त्याचबरोबर वजराई धबधबा एकिव धबधबा ओसंडून वाहत असतो त्यामुळे सप्टेंबर हा महिना कास पुष्प पठाराला भेट देण्याची योग्य वेळ आहे.
काल बद्दल थोडक्यात माहिती
कास येथे पर्यटकांच्या साठी इलेक्ट्रिक सायकलची सोय केली आहे इलेक्ट्रिक सायकलचे भाडे पन्नास रुपये प्रति व्यक्ती तेवढी आहे.
कास येथे राहण्याची सोय नाही त्यासाठी सातारा येथे उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.
नाईट सफारी साठी पिक अप याचे सोय त्याचे भाडे चार हजार एवढे आहे.
कास पुष्प पठाराला जायचे कसे
कास पुष्प पठाराबद्दल आपण संपूर्ण माहिती वरील प्रमाणे पाहिली तरी आपण या पठारला भेट कशी देऊ शकतो हे आपण खालील प्रमाणे पाहू
रस्ते मार्ग
कसला भेट देण्यासाठी येणारे पर्यटकांना प्रथम सातारा येथे यावे लागते. सातारा महाराष्ट्रातील मुख्य शहर असून ते रस्ते मार्गे महाराष्ट्रातील इतर शहरांशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरातून जसे की मुंबई पुणे कोल्हापूर येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सातारपर्यंत धावत असतात. खाजगी वाहनाने येणारे पर्यटन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाने सातारा मार्गे कासला जाऊ शकतात. त्याचबरोबर महाबळेश्वर तापोळा बामणोली मार्गे ही कास ला जाऊ शकतात. सातार मधून खाजगी वाहनाने किंवा एसटी बसने कासला जाऊ शकतो.
वनविभाग व सातारा जिल्हा प्रशासनाने खास पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बस ची सोय पर्यटकांसाठी केले आहे त्याचाही पर्यटक लाभ घेऊ शकतात.
रेल्वे मार्ग
माहुली हे जवळचे रेल्वे स्थानक असून ते सातार पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. माऊली पासून सातारला येण्यासाठी बस किंवा ऑटो रिक्षा उपलब्ध होतात.
हवाई मार्ग
कासला हवाई मार्ग जाण्यासाठी जवळचा हवाई अड्डा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आहे जो कास पासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून पुढे पर्यटक खाजगी वाहनाने किंवा राज्य परिवहन महामंडळाचे बसेस सातारपर्यंत जाऊ शकतात.
Kaas plateau information in Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे जरूर कळवा. कास पुष्प पठाराची माहिती आपन पाहिलीत तर या बद्दल धन्यवाद
आपन आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर काही सुचना असतील तरी जरुर कळवा धन्यवाद
कास पुष्प पठार फोटो
कारवी |
मिकी माऊस |
पंद |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे