ताडोबा व्याघ्र प्रकल्प
भारतातील सर्वात प्रसिद्ध अशा ताडोबा जंगलात तुमचं स्वागत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे सन १९५५ मध्ये ताडोबा उद्यानाची निर्मिती केली असून महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प आहे . अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ११०० चौ किमी एवढे आहे. महाराष्ट्रातील सर्वात जूने राष्ट्रीय उद्यान असले तरी ताडोबा चा इतिहास अनेक शतके जुना आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्प माहिती
ताडोबा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. भारतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून १५० किमी तर चंद्रपूर पासून ४० किमी अंतरावर आहे. ताडोबा बंगाल टायगर किंवा पट्टेरी वाघांसाठी प्रसिद्ध आहे.आजमितीस या प्रकल्पात १२० पेक्षा जास्त वाघ असून त्यातील छोटा मटका हा वाघ पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ताडोबा मध्ये आपण वाघाला पाहण्याचा आनंद घेऊ शकता जंगलातून प्रवास करत असताना किर्र झाडी, निरव शांतता त्यात होणारा पक्ष्यांसाचा किलबिलाट, माकडांचे ओरडणे, हरणांच्या, सांभराच्या कळपांचे अचानक पळणे हा सगळा अनुभव धडकी भरवणारा असतो. कारण कोण जाणे कुठल्या झुडपातून महाराज समोर प्रकट होतील हे काही सांगता येत नाही.
ब्रिटिश काळात राजे महाराजांच्या शिकारीच्या हौसे पाई वाघ व अन्य प्राण्यांचे अस्तीत्व धोक्यात आल्याचे जाणवताच वाघांच्या सौरक्षणाच्या हलचाली सुरू झाल्या त्या अनुषंगाने वाघांच्या शिकारीवर बंदी घातली व वाघांची कातडी नखे विकण्यास ही बंदी घालण्यात आली, त्याच बरोबर वाघांच्या संवर्धनासाठी विशेष व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात केली गेली त्यात मैळघाटच्या जंगलाचा समावेश करण्यात आला.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
ताडोबा या नावाची दंतकथा ही मोठी रोचक आहे अनेक वर्षांपूर्वी या जंगलामध्ये गौंड जातीच्या लोकांची वस्ती होती. या आदिवासी लोकांची उपजीविका या जंगलावर चालत असे याच आदिवासींमध्ये तारू नावाचा धाडसी तरूण होता. अनेक वेळा त्याचा वन्य प्राण्यांशी सामना होई, मोठ्या धैर्याने तो त्यांच्याशी सामना करत असे, एकदा चौथळलेल्या वाघाने हल्ला चढवला व त्यात निकराची झुंज होऊन तारु धारातीर्थी पडला वाघासारख्या शक्तिशाली चा प्राण्या बरोबर लढलेला ताडोबा आदिवासी संस्कृतीमध्ये अमर झाला. गोंड आदिवासींचा तो देवता त्याच्या मृत्यूनंतर येथील तलावासाठी एक मंदिर उभारण्यात आले. या मंदिरावरून या जंगललला ताडोबाचे जंगल असे म्हणतात.ताडोबाच्या जंगलातून वाहणारी अंधारी ही एकमेव नदी आहे. नदीच्या दुतर्फा असणारे राईचे जंगल इतके घनदाट होते की सूर्यप्रकाशाच्या अभावी नदीपात्रात भर दिवसा ही अंधारून आल्यासारखे वाटे त्यामुळे स्थानिकांनी या नदीला अंधारी नाव दिल्याचे म्हणतात
सन 1995 मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी वन्यजीव अभयारण्य एकत्रित करून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे बोलले जाते. याचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग करण्यात आले आहेत.कोअर झोन ६२५ चौ किमी तर बफर झोन ११०० चौ किमी वर पसरलेले भव्य असे समृद्ध जंगल आहे.
वैविध्यपूर्ण अरण्य
ताडोबा हे उष्ण कटिबंधातील पानझडी वनांमध्ये मोडत असून त्यात अनेक प्रकारच्या वृक्षवेली आढळतात साग मोह तेंदू खैर बाबळी लिंब आंबा अर्जुन जांभळ आपटा बेहडा असे नाना प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात परंतु हे जंगल आपल्या घनदाट बांबूच्या बेटामुळे प्रसिद्ध आहे. ताडोबाचे अभयारण्य प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगळा अनुभव देते. गवताची कुरणे, काटेरी झुडपे, बांबूचे बेट ते उंचपुरे मोह, साग असे परिपूर्ण वन म्हणून ही ताडोबा अभयारण्याकडे पाहिले जाते.
तिडोबातील वन्यजीवन.
ताडोबातील मुख्य आकर्षण म्हणजे पट्टेरी वाघ
सद्यस्थितीला जंगलामध्ये 115 पेक्षाही जास्त वाघ आहेत. वाघांची ४० ते ४५ किमी पर्यंत सिमा असते तर वाघिण ११ते १२ किमी पर्यंत आपली सिमा निश्चित करते. युरीन स्प्रे किंवा झाडांवर नखाने खरडून एरिया मार्किंग करून घेतात. वाघां बरोबरच येथे कळपात वावरणारे भारदस्त शरीरयष्टी चे गवे, रांनकुत्री , दचकून धावत सुटणारे निलगाय,चौशिंगा सांबर,चितळ,भेकर,पिसूरी मन मोहून टाकतात. चतूर कोल्हे, बिबट्या तरस अस्वल उदमांजरे मगर, सुसर,घोरपड यासारखे असंख्य प्राणी आढळतात. तिडोबाच्या जंगलात प्राण्या बरोबरीने पक्षांचाही किलबिलाट सुरू असतो, त्यामध्ये गरूड, करकोचे,ससाना, बगळे,रानकोंबडा,भृंगराज,मोर अशा १८० पैक्षा अधीक जातींचे पक्षी जंगल सफारी मध्ये हमखास पाहायला मिळतात.
जंगलामध्ये काही ठिकाणी पक्के डांबरे रस्ते पाहायला मिळतात ते पूर्वी जंगलामध्ये असणाऱ्या गावांच्या रहदारी साठी निर्माण केले होते.
वनविभागाने प्रयत्नपूर्वक कोअर झोन मधील गावांचे स्थलांतर करून त्यांचे बफर झोननच्या बाहेर पुनर्वसन केले आहे. ताडोबात एकूण वीस गेट आहेत कोअरला सहा तर बफरला 14 गेट आहेत. मुख्य प्रवेश द्वार मोहर्ली येथून आहे
ताडोबातील वाघांची संख्या मोजण्याकरता अमेरिकेतील वाईल्ड लाईफ कंदरवेटीव्ह सोसायटीने जागोजागी कॅमेरा ट्रॅपिंग प्रणालीचा वापर केल्याचे पाहायला मिळते, याद्वारे दरवर्षी वाघ व इतर प्राण्यांची गणना केली जाते.
तेल्या व ताडोबा असे दोन मोठे तलाव या जंगलात पाहायला मिळतात. ताडोबा तलाव मध्ये पूर्वी क्रोकोडाइल ब्रिडिंग सेंटर होते त्यामुळे येथील तलावामध्ये मगरीचे प्रमाण अधिक आहे
ताडोबा मध्ये मुक्कामाची व्यवस्था
मोहर्ली आणि कोलारा येथे वन विकास महामंडळाचे निसर्ग पर्यटन संकुल आहे. याशिवाय मोहर्ली येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) पर्यटन संकूलही आहे.त्याशिवाय खाजगी लॉज व रिसॉर्ट या ठिकाणी पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत
आगाऊ बुकिंग साठी खाली लिंक दिलेली आहे
(www.fdcm.nic.in)
(www.maharashtratourism.gov.in)
प्रवेश : मुख्य प्रवेश मोहर्ली येथून आहे. त्याशिवाय कोलारा, झरी आणि पांगडी येथूनही प्रवेश दिला जातो.
ताडोबा सफारी बुकिंग
ताडोबाला जायचे कसे
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी खालील पर्यायांचा तुम्ही वापर करु शकताहवाई मार्ग: डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे ताडोबा पासून साधारण १५५ कि.मी अंतरावर आहे .हे विमानतळ हवाई मार्ग देशातील अन्य शहरांशी जोडलेले आहे. तिथून पुढे रस्ते मार्गे तूम्ही जाऊ शकता
रेल्वे : चंद्रपूर हे जवळचे रेल्वेस्थानक आहे दिलेली चेन्नई रेवे मार्गावर हे स्थानक आहे हे साधारण ताडोबा पासून ४५ कि.मी अंतरावर आहे
रस्ता : ताडोबा हे रस्ते मार्ग महाराष्ट्रातील मुख्य शहरांशी जोडलेले आहे .ताडोबाला जाण्यासाठी तुम्ही राज्य परीवहन बसेस किंवा खाजगी वाहनांचा वापर करू शकता चंद्रपूर- ४५ कि.मी, चिमूर- ३२ कि.मी
पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे
- ताडोबा मध्ये निसर्ग पर्यटन व व्यावसायिकता याचा समतोल साधलेला आपल्याला येथे पाहायला मिळतो.
- ताडोबाच्या जंगलात वन विभागातर्फे पर्यटकांसाठी ओपन जीप व कॅंटर या दोन प्रकारच्या गाड्या उपलब्ध असतात.
- ताडोबा मध्ये विविध प्रकारचे कॅमेरे भाड्याने उपलब्ध होतात. टी-शर्ट टोपी स्कार्फ बूट यांची पर्यटक खरेदी करू शकतात.
- ताडोबा मध्ये प्लास्टिक बॉटल वापरण्यास बंदी असल्याने या ठिकाणी काचेच्या पाण्याच्या बाटल्या भाड्याने मिळतात.
- पर्यटकांच्या सेल्फीच्या वेडापाई ताडोबा मध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे