गोवा पर्यटकांन स्थळ | goa tourist attractions
गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून भारतातील मुख्य पर्यटन स्थळ पैकी एक आहे त्यामुळे गोव्याला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, वैविध्यपूर्ण खानपान, सुख सुविधा, असंख्य ऍक्टिव्हिटी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. हनिमून, फॅमिली ट्रिप, मित्रपरिवार बरोबर फिरायला जाण्यासाठी गोवा हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये गोव्यातील मुख्यतः पर्यटन स्थळे व त्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
गोव्यातील समुद्र किनारे आणि तेथील नाईट लाईफ साठी गोवा पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आहे. गोव्यातील सुंदर समुद्र किनारे, कसिनो, क्लब पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर आपण जाणून घेऊया लेखामध्ये गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल
गोवा पर्यटन स्थळे |
गोव्यातील पर्यटन स्थळे | goa tourist places in marathi
बागा बिच
बागा बिच हा गोव्याला येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेला समुद्र किनारा आहे. तुम्हाला वेळेचे बंधन असेल तर सरळ तुम्ही बागा बिच ला जावे कारण या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत. प्यारा सेलिंग बनाना राईड, नाईट क्लब, हॉर्स रायडिंग, यासारख्या गोष्टींचा पर्यटक आनंद घेऊ शकतात. समुद्र किनाऱ्यावर सायंकाळच्या वेळी बियर चार आस्वाद घेऊ शकता.
दूध सागर धबधबा | Dudhsagar waterfall
गोव्याची राजधानी पणजी पासून 75 किलोमीटर दूर असणारा भारतातील काही खास धबधब्यांपैकी एक आहे. याचे अनेक नयनरम्य दृश्य आपण अनेक चित्रपटामध्ये पाहिले असेलच! दूधा साखरे उंच कड्यावरून खाली वाहणारे पांढरे शुभ्र पाणी पाहताना अक्षरशः रोमहर्षक वाटते. धबधब्यांची उंची 320 मीटर एवढी आहे. उंच कड्यावरून वाहणारे पांढरे शुभ्र पाणी, तुषार उडवत जमिनीवर येताना ओलेचिंब करून जाते. यांच्या सौंदर्याछ भर म्हणजे याच्या मधून जाणारी रेल्वे लाईन म्हणावे लागेल.पर्यटक या ठिकाणी ट्रेकिंग ही करू शकतात.
कलंगुट बिच
चार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला कलंगुट बिच गोव्यातील एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. दुरवर पसरलेला पांढऱ्याशुभ्र वाळूचा उथळ समुद्रात स्नानाचा आनंद घैण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी पॅरासेलिंग वॉटर स्किइंग, डॉल्फिन राईड, चार पर्यटक आनंद घेऊ शकतात.
अंजुना बिच
पणजी पासून २१ किलोमीटर अंतरावर अंजना बीच आहे अंजना बीच उत्तर गोव्यामध्ये येतो.शांत समुद्र किनारा , वाळूचा स्वच्छ सुंदर किनारा सहकुटुंब आनंद लुटण्यासाठी गोव्यातील उत्तम ठिकाण आहे.या ठिकाणी सायंकाळच्या वेळी सुर्यास्ताचा मनमोहक नजारा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पर्यटक खरेदीचा आनंद लुटू शकतात त्यामध्ये हस्तकलेच्या वस्तू, बॅग, मसाले, कपडे यांचा समावेश होतो.
पालोलेम बिच
गोव्यातील प्रसिद्ध बिच मध्ये पालोलेम बिच चा समावेश होतो. ताडाची झाडे, पुढे निळाशार समुद्र सफेद वाळू याला खास बनवतात. झावळयां पासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये बसून दुरवर समुद्राकडे पाहात बसावे हातात एखादे पेय असावे असा अनुभव याच ठिकाणी भेटू शकतो.या ठिकाणी इतकी शांतता असते की दुरपर्यंत लाटांचा आवाज काढीत पडतो.
मंगेशी मंदिर
मंगेशी मंदिर हे गोव्यातील प्रसिद्ध मंदिर आहे. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांचा या मंदिराशी जवळचा संबंध आहे. हे मंदिर भगवान शंकराचे आहे मंदिराच्या परिसरात असलेला सात माळ्यांचा मनोरा देखिल अतिशय सुंदर आहे.
सिंक्वेरियम बिच
उत्तर गोव्यातील बागा बिचच्या बाजूलाच सिंक्वेरियम बिच आहे. हा बिच मौज मस्ती साठी खुप प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी अनेक नाईट क्लब, बार असून संगित क्लब चार मज्जा घेण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता. त्याच बरोबर वॉटर स्किइंग, फिशिंग स्कूबा डायविंग, पॅरासेलिंग, आदिंचा आनंद घेऊ शकता
बेसिलीक ऑफ बोम जीजस चर्च
पणजी पासून दहा किलोमीटर अंतरावर जुन्या गोव्यामध्ये बोंम जीजस बेसिलिक चर्चा आहे. या चर्चेचे बांधकाम १६०५ मध्ये करण्यात आले, यामध्ये फ्रान्सिस जेवियर यांच्या अस्ती असून त्यांचे समाधी स्थळ ही आहे. या चर्चा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईड मध्ये होतो. साधारण साधारण 400 वर्षे जुनी बांधकाम व त्यातील नक्षीकाम आकर्षक आहे.
अगुआडा किल्ला
अगुआडा किल्ला गोव्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात केली गेली होती. याचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण असल्याने, ऐतिहासिक वास्तूंची आवड असणारे पर्यटक याला नक्की भेट देऊ शकतात. या किल्ल्यावर दिल चाहता है पिक्चर चे शूटिंग झाले होते. किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. याचबरोबर फोर्ट चापोरा, पोर्ट रशोल,कारजूएम फोर्ट पाहण्यासारखे आहेत.
गोव्याला भेट देण्याची उत्तम वेळ. Best Time To Visit in Goa in marathi
गोव्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा व उन्हाळा. नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान तुम्ही गोव्याला भेट द्यावी. यावेळी सर्वाधिक पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. गोव्यात जलविषयक क्रियाकलाप करण्यासाठी हा सर्वोत्तम हंगाम आहे.
गोव्यातील नाईट लाईफ
गोव्यातील नाईट लाईफ काही खास आहे. या ठिकाणी सुंदर नाईट क्लब, पब, कसीनो,आहेत त्याच बरोबर समुद्र किनाऱ्यावर सायंकाळच्या वेळी पार्टीज चे आयोजन केले जाते. रात्रीच्या वेळेस समुद्र किनाऱ्यावर बियर घेऊन तासनतास लाटांचा आवाज ऐकत निवांत क्षण घालवू शकता.
गोव्याला जायचे कसे
गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने भारतातील महत्वाचे राज्य आहे. पर्यटक या ठिकाणी येण्यासाठी आपल्या सोयीचा पर्याय निवडू शकतात. तरी आपण गोव्याला भेट कशी देऊ शकतो हे आपण खालील प्रमाणे पाहू
हवाई मार्ग गोवा
जर तुम्हाला विमानाने इथे पोहोचायचे असेल तर दाबोलीम विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे गोव्याची राजधानी पणजीमपासून 29 किमी अंतरावर आहे. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे येतात. हा विमानतळ यूके आणि जर्मनीला गोव्याशी जोडतो.
रेल्वे मार्ग
मडगाव आणि वास्को-द-गामा ही गोव्याची मुख्य रेल्वे स्थानके आहेत आणि इतर शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. भारतातील बहुतांश राज्यांतून येथे येऊ शकतात.
रस्ते मार्ग
गोवा इतर शहरांशी उत्कृष्ट रस्त्यांनी जोडलेले आहे. पणजी मधील कदंब हे मुख्य बसस्थानक असून या ठिकाणाहून दुसऱ्या शहरांशी बस वाहतूक होते. महाराष्ट्रातील मुख्य शहरातून गोव्यासाठी राज्य परीवहन बसेस ची सेवा उपलब्ध आहे.
गोव्यातील पर्यटन स्थळाबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली असून ही माहिती तूम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, गोव्यातील समुद्र किनारे, गोव्याला जायचे कसे हे आपण सदर लेखात पाहिले तरी तुमच्या आणखी काही सुचेना किंवा तक्रारी असतील तर या ही नक्की कळवा!
धन्यवाद 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे