मुख्य सामग्रीवर वगळा

नळदुर्ग किल्ला माहिती | Naladurg fort information in Marathi

नळदुर्ग किल्ला माहिती |Naladurg fort information in Marathi

 किल्ल्याचे नाव नळदुर्ग
 प्रकार            भूईकोट
जिल्हा.          उस्मानाबाद
जवळचे गाव   नळदुर्ग
सद्यस्थिती       चांगली
    उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठावर असलेला नळदुर्ग किल्ला भूईकोट प्रकारातील आहे. पुराणकाळातील नळ दमयंती च्या नावावरून या किल्ल्याला नळदृग असे म्हणतात. नळदुर्ग किल्ल्याचे स्थापत्य तत्कालीन स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव करून देते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून दोन ते अडीच किलोमीटरचा परिघामध्ये विस्तारलेला आहे. संवर्धनाच्या कामामुळे किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने अति उंच संपूर्ण तटबंदी आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या तीरावर रणमंडळ हा उप किल्ला असून त्याला बोरी नदीवरील बंधार्‍याने जोडले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर किल्ल्यावर केलेला पाहायला मिळतो, जसे की संरक्षणाच्या दृष्टीने खंदक खणून त्यामध्ये पाणी सोडले आहे बोरी नदी वरील पाणी महाल व नर मादी धबधबा किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. संरक्षण व टेहळणी च्या दृष्टीने किल्ल्यावर ११४ बुरुज आहेत. नळदुर्ग किल्ला माहिती पाहत असताना पर्यटकांच्या दृष्टीने बोटिंग माहिती फलक, इलेक्ट्रिक कार यासारख्या सुविधा ही आहेत. किल्ला पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती 25 रुपये आकारली जाते तर कॅमेऱ्यासाठी 250 रुपये प्रवेश फी आकारली जाते.
नळदुर्ग किल्ला

 नळदुर्ग  किल्ला 

नळदुर्ग किल्ला कोठे आहे

     नळदृग किल्ला महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात असून नळदुर्ग हे गाव ठिकाण आहे. सोलापूर पासून साधारण पन्नास किलोमीटर तर उस्मानाबाद पासून ४५ किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. बोरी नदीच्या काठावर नळदुर्ग असून मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे.

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास

      केंद्र गड किल्ल्याची निर्मिती कोणी केली हे जरी सांगता येत नसले तरी त्याचा संबंध पुराणातील नलदमयंती शी जोडला गेला आहे. राजा नल याने किल्ला आपल्या मुलासाठी बांधल्याने किल्ल्याला जलदुर्ग असे नाव पडले. नटवर किल्ल्याचा इतिहास पाहिला असता या किल्ल्यावर अनेक राजकारण्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. चौदाव्या शतकाच्या मध्यात नळदुर्ग किल्ला बहामनी सत्तेच्या ताब्यात गेला. या कालखंडामध्ये किल्ल्याची पुनर्बांधणी करून तटबंदी अनेक वास्तू यांची निर्मिती केली. १४८५ मध्ये बहामनी सत्तेच्या विभाजना नंतर तयार झालेल्या विजापूरच्या आदिलशाहीकडे जादू का गेला. आदिलशाही कालखंडामध्ये किल्ल्याचे नाव शहा दुर्गा असे केले परंतु ते जास्त प्रचलित होऊ शकले मध्ये औरंगजेबाने आदिलशाहीचा अस्त करून नळदुर्ग आपल्या ताब्यात घेतला, व पुढे तो निजामाला दिला. निजामाने बराच काळ किल्ला आपल्या ताब्यात ठेवला. १७५८ मध्ये मराठ्यांनी नळदुर्ग किल्ला निजामाकडून जिंकून घेतला परंतु तो जास्त काळ मराठ्यांच्या ताब्यात राहू शकला नाही.१७९९ मध्ये इंग्रज निजामा मध्ये तह होऊन इंग्रजांची कवायती फौज निजामाला ठेवणे बंधनकारक झाले. या फौजेच्या खर्चापायी काही रक्कम ईस्ट इंडिया कंपनीला निजामाने देणे बंधनकारक होते. या कवायती फौजेच्या खर्चापोटी ६४ लाखाचे कर्ज निजामावर झाले होते ती रक्कम न दिल्याने वराड नळदुर्ग व रायचूर प्रांत इंग्रजांना खर्चा पोटी सोडून दिले.१८५७ च्या उठावा वेळी निजामाने इंग्रजांना जी मदत केली होती त्याचा मोबदला म्हणून इंग्रजांनी निजामाला नळदुर्ग व रायचूर हे प्रांत परत दिले. हैदराबाद संस्थान इंग्रजांचे संरक्षित संस्थान असल्याने भारत स्वतंत्र होईपर्यंत नळदुर्ग किल्ला निजामाच्या अख्यत्यारीत होता. पुढे भारत स्वतंत्र नंतर हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणा नंतर नळदुर्ग किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला.
नळदुर्ग किल्ला


नळदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

    नळदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील चांगल्या स्थितीत असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. संवर्धनाच्या कार्यामुळे किल्ल्यावर अनेक वास्तू, तोफा, तलाव, इमारती पर्यटकांना पाहण्यासारखे आहेस. त्याच प्रमाणे बाग-बगीचे प्रदर्शन गॅलरी, नौकाविहार, यामुळेही पर्यटक नळदुर्ग किल्ल्याला भेटी असतात.नळदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे खालील प्रमाणे

तटबंदी

       नळदुर्ग किल्ल्याची तटबंदी विस्तृत व सुस्थितीत आहे. किल्ला एकंदरीत तटबंदीच्या आत मध्ये सुरक्षित असून तटबंदीची साधारण उंची १२ ते १४ फूट एवढी आहे. किल्ल्याची तटबंदी साधारण २ ते२.५ किमी विस्तारामध्ये असलेली पाहायला मिळते. तटबंदीचे बांधकाम काळ्या चिरा दगडात केले असून मजबूत आहे. तटबंदीमध्ये जागोजागी टेहळणी बुरुज, जिने, दरवाजे, देवड्या, झरोके, जंग्या पहायला मिळतात. तटबंदीच्या सुरक्षेसाठी किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक खानून त्यामध्ये बोरी नदीचे पाणी सोडले जात असे. त्या ठिकाणी नैसर्गिक साधन सामग्रीचा योग्यप्रकारे वापर केला पाहायला मिळतो.

टेहळणी बुरुज

    किल्ल्यावरून दूरपर्यंत लक्ष ठेवण्यासाठी व शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुरुजाचा उपयोग होतो. नळदुर्ग किल्ल्यावर असे ११४ टेहळणी बुरुज आहेत त्यातील काही तटबंदीमध्ये तर काही स्वतंत्रपणे बांधण्यात आलेले पाहायला मिळतात. किल्ल्यावरील बुरुजांची नावे बांधणी व उपयोगा वरून पडलेली पाहायला मिळतात. त्यामधील काही पुढील प्रमाणे.

नौबूरूज 

     नौबूरूज टेहळणी बुरूजाची उंची १०५ फूट आहे तर व्यास साधारण 40 फूट एवढा आहे. बुरुजाचा आकार साधारण कमळासारखा आहे. याला नऊ उभे कंगोरे असल्याने नौबुरुज असे म्हणतात. नौबुरुज दोन मजली असून त्यावर जाण्यासाठी प्रशस्त जिना आहे.

उपळी बुरुज

      एखाद्या मनोऱ्या सारखा भासणारा उपळी बुरुज किल्ल्यामध्ये स्वतंत्र पणे उभा आहे. उपळी बुरुज किल्ल्यावरील सर्वात मोठा असून त्याची उंची १५० फूट तर व्यास ६० फूट एवढा आहे. बुरुजावर जाण्यासाठी प्रशस्त पायरी मार्ग आहे. उपळी बुरुजावर दोन तोफा असून त्यांना हत्ती तोफ व मगर तोफ असे म्हणतात. बुरुज दोन मजली असून त्याच्या आत मध्ये प्रशस्त अशी खोली आहे, या खोलीत जाण्यासाठी निमुळता पायरी मार्ग आहे. खोलीमध्ये सुंदर नक्षीकाम थंड हवेसाठी खिडक्या बसण्यासाठी चौथरा आहे. या ठिकाणी राजघराण्यातील व्यक्ती बसण्यासाठी येत असाव्यात.


पाणीमहाल व नर मादी धबधबा

    नळदुर्ग किल्ल्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असा महाल असून तो बोरी नदीवर बांध बांधून त्यामध्ये बनवला आहे. नळदुर्ग किल्ल्यावर जो बांधारा बांधला आहे त्याची भिंत एवढी प्रशस्त आहे की त्यामध्ये एक राजमहाल आहे.  इसवी सन१६१३ मध्ये आदिलशाही सत्तेतील वास्तुकार मोहम्मद इमादीन याने या मालाची निर्मिती केली. काळ्या पाषाणातील संपूर्ण वास्तू म्हणजे स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे. या महालात जाण्यासाठी बंधाऱ्याच्या भिंतीवरुन पायरी मार्ग आहे. महाल दोन मजली असून याच्यात तर घरामध्ये पाण्यावर चालणारी आटा चक्की ची जागा आहे. बंदऱ्या वरून वाढणारे शितल वारे महालाला थंड ठेवतात. महाला मधील खिडक्या, खांब, नक्षीकाम पाहण्याजोगे आहे.
    बोरी नदीवरील या बंधाऱ्याची सरासरी लांबी ५७० फूट एवढी आहे. बंधाऱ्याचे सांडवे वैशिष्ट्यपूर्ण असून ते महालाच्या वेगवेगळ्या बाजूला आहेत. या साडव्यांना नर-मादी धबधबा असे म्हणतात. या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्याचा रंग हिरवा व सफेद असतो. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

मशिद

     नळदुर्ग किल्ल्यामध्ये दोन भव्य दिव्य अशा मशिदी आहेत. त्यातील पहिली मशिद किल्ल्याच्या प्रवेद्वारा जवळ आहे. ही मज्जिद पूर्वाभिमुख असून तिची सध्या पडझड झालेली आहे.
     जामा मशिद ही नळदुर्ग किल्ल्यातील सर्वात मोठी मज्जित असून निजाम कोर्टाच्या जवळ आहे. या मशिदीवर मनोरे व घुमटी आहे. संरक्षण भिंतीच्या आत मध्ये पूर्वाभिमुख असून तिला हिरव्या व पांढ-या रंगात रंगवलेले आहे.

हत्ती तलाव

     नळदुर्ग किल्ल्यामध्ये आयताकृती दगडी बांधकामातील भव्य असा तलाव आहे. तलावाचा उपयोग शहा च्या खाजगी तील हत्तींना अंघोळ घालण्यासाठी केला असे त्यामुळे याला हत्ती तलाव असे म्हणतात. किल्ल्यामध्ये हत्तींना प्रवेश करण्यासाठी हत्ती मार्ग व दुसऱ्या बाजूला पायऱ्या आहेत. सुशोभीकरणाच्या कामामुळे याच्या चौतर्फा सुंदर झाडे मार्ग बाग पाहायला मिळते.

हलमूख दरवाजा

       किल्ल्याच्या तटबंदी मध्ये किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असून त्याला हलमूख दरवाजा असे म्हणतात. किल्ल्याचे हे प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण असून संरक्षणाच्या दृष्टीने याला तटबंदीच्या पोटामध्ये बसवले आहे. तटबंदीतून जाणारी अरुंद वळणावळणाची वाट व तटबंदीच्या भिंतीवरून शत्रु वर हल्ला करण्यासाठी तयार केलेले जंग्या व झरोके दरवाजाला सुरक्षित पुरवतात. हा दरवाजा उंचापुरा असून यामधून अंबारीसह हत्ती जाऊ शकेल एवढी त्याची उंची आहे. लाकडी दरवाजा त्यावर खेडे विशाल भिंत पाहून किल्ल्याच्या भव्यतेचा अंदाज येतो. दरवाज्याच्या आत मध्ये देवड्या, खोली असून समोर परकोट नजरेस पडतो.
       नळदुर्ग किल्लाला दुसरा दरवाजा असून त्याला हत्ती दरवाजा असे म्हणतात. हा दरवाजा जामा मशिदीच्या बाजूला आहे. याची उंची थोडी कमी असून या दरवाज्यातून रंग मंडळाकडे जाणारी वाट आहे.

रंग महाल

    रंग महाल ही वास्तू बारा ईमाम इमारतीच्या बाजूला असून त्यामध्ये अनेक दालने आहेत. शहाच्या करमणुकीसाठी रंग संगीत नृत्य, या इमारती मध्ये आयोजित केले जात असे. याच ठिकाणी खास स्त्रियांच्या निवासाची सोय केली जात असे. रंगमहाल वास्तूमध्ये इब्राहीम आदिलशहा चा विवाह पार पडला होता.

मुन्शीफ कोर्ट इमारत

     नळदुर्ग किल्ल्यामध्ये मुन्शीफ कोर्ट ही भव्य वास्तू आहे. कोर्टाच्या परिसरामध्ये एक विशाल तोफ पाहायला मिळते. तोफेची लांबी सरासरी 12 ते 14 फूट एवढी आहे. इमारतीमध्ये तत्कालीन ब्रिटिश कमिशनर चे कार्यालय होते. इमारतीचे व्यवस्थापन अतिशय उत्तम असून यामध्ये अनेक खोल्या पाहायला मिळतात. ब्रिटिश कालखंडामध्ये मुन्शीफ कोर्ट इमारतीचा उपयोग काराग्रह म्हणून केला जात असे.

बारादरी इमारत

    जामा मशीद तिच्यासमोर सफेद रंगांमध्ये रंगवलेली जी वास्तू आहे तिला बारादरी इमारत असे म्हणतात. इमारतीच्या प्रांगणामध्ये पंधरा फूट लांबीची एक तोफ ठेवण्यात आले आहे. ब्रिटिश अधिकारी कर्नल मिडो येथे वास्तव्यास होते. इमारतीचे बांधकाम आधुनिक पद्धतीचे असून टेरेस वर जाण्यासाठी बाजूने एक प्रशस्त जिना आहे. बारादरी इमारतीच्या छतावरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो.

दरबार हॉल

    राज दरबार हा शहाच्या राजकीय कामकाजासाठी वापरला जात असे. या ठिकाणी अनेक खलबते, जनता दरबार, गुप्त मिटिंग, चालत असत.

रणमंडळ

     रणमंडळ हा नळदुर्ग किल्ल्याचा एक भाग आहे जो बोरी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आहे. रणमंडळ याला आपण उप किल्ला असे म्हणू शकतो. दोन्ही किल्ले बोरी नदीवर बंधारा बांधून जोडले आहेत. याचा उपयोग युद्ध अभ्यास, शस्त्रास्त्रांचा सराव या सगळे कार्यासाठी केला जात असावा. रणमंडळाला संपूर्ण तटबंदी आहे.

हमामखाना

       हमाम खाना ही वास्तु रंगमालाच्या दक्षिण बाजूस असून सद्यस्थितीत तिची पडझड झालेली आहे. हमाम खाण्यामध्ये राजघराण्यातील स्त्रिया स्नान करण्यासाठी येत असत.
       याच बरोबर नळदुर्ग किल्ल्यावर अनेक वस्तू असून त्याही खूप सुंदर व आकर्षक आहेत.

नळदुर्ग किल्लाला जायचे कसे

        नळदुर्ग किल्ला मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर असून या मार्गाद्वारे तो इतर शहरांशी जोडले गेला आहे. नळदुर्ग जाण्यासाठी सोलापूर, तुळजापूर येथून ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस चालू असतात. सोलापूर पासून पन्नास किलोमीटर आंतरावर असणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याला खाजगी वाहनाने जाता येते.
        रेल्वे मार्ग जाणाऱ्या पर्यटकांसाठी सोलापूर हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. सोलापूर मधून टॅक्सीने तुळजापूर ला जाता येते.
        पुणे जवळचे विमानतळ असून पुण्यापासून नळदुर्ग किल्ला साधारण २६० किलोमीटर अंतरावर आहे.

पर्यटकांसाठी काही टिप्स
     नदो किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांना प्रवेश फी द्यावी लागते. तिकीट दर साधारणपणे प्रौढांसाठी प्रतिव्यक्ती २५ रुपये तर लहान मुलांसाठी १० रुपये एवढा आहे.
     कॅमेरा वापरासाठी अधिकचे २५० रुपये शुल्क आकारण्यात येते, त्याच बरोबर प्री-वेडिंग फिल्म मेकिंग सारख्या कार्यक्रमासाठी वेगळी फी आकारण्यात येते.
     किल्ला विस्ताराने मोठा असल्याने पर्यटकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिक वाहनाची व्यवस्था किल्ल्यामध्ये केलेली आहे.
     किल्ल्यावर प्रशस्त पे अँड पार्किंग व्यवस्था आहे.
     बोरी नदीवरील तलावामध्ये पर्यटक नौकाविहार आता आनंद देऊ शकतात.


नळदुर्ग किल्ला माहिती या लेखामध्ये आपण नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास पाहिला त्याच बरोबर नळदुर्ग किल्ल्यावर पाहण्यासारख्या ठिकाणांची माहिती घेतली. मराठी बोली मध्ये आपणाला नळदुर्ग किल्ला कुठे आहे व जायचे कसे याचीही माहिती पाहिजे. आपल्याला लेख कसा वाटला व काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद
     
       
    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण