मुख्य सामग्रीवर वगळा

नाशिक पर्यटन स्थळे | Nashik tourist places in Marathi

नाशिक पर्यटन स्थळे | Nashik tourist places in Marathi

नाशिक महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील जिल्हा असून प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य येथे काही काळ होते. नाशिक शहर पुरातन असून त्याचा उल्लेख रामायणात आढळतो. नाशिक मध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या व पवित्र अश्या गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिक मध्ये अनेक घाट मंदिरे याला अध्यात्मिक शहर बनवतात. दर बारा वर्षांनी नाशिक मध्ये गोदावरी तीरावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रभू श्रीराम सीता व लक्ष्मण यांचे वनवासात असताना काही काळ पंचवटी येथे वास्तव्य होते, या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. नाशिक येथील अंजनेरी पर्वत हनुमानाची माता अंजनी च्या नावावरून आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात देशामध्ये अग्रेसर असून या ठिकाणी वाईन उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत
त्रंबकेश्वर मंदिर
त्रंबकेश्वर मंदिर


नाशिक जिल्हा पर्यटन स्थळे | best tourist places in Nashik in Marathi

सह्याद्री पर्वत रांगेत असल्याने या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पर्यटकांना वेड लावते. त्याचबरोबर नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, धबधबे, विपुल वनसंपदा पर्यटकांना आकर्षित करत असते. आशिया खंडातील पहिले मातीचे धरण नाशिक येथेच आहे. 
आजच्या लेखामध्ये धार्मिक औद्योगिक, नैसर्गिक व ऐतिहासिक अश्या नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहू

१)त्रंबकेश्वर मंदिर

    गोदावरी नदीच्या काठी त्रंबकेश्वर हे धार्मिक तीर्थस्थळ असून नाशिक पासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी काठावर दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्यावेळी लाखो भाविक देश-परदेशातून गोदावरीत स्नान करण्यासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिराची निर्मिती दहाव्या शतकातील असून शिलाहार राजा  झंझ याने केली आहे. मंदिरामध्ये तीन शिवलिंग असून त्यांना ब्रह्मा विष्णू महेश असे ही म्हणतात. त्रंबकेश्वर मंदिराची पुनर्बांधणी पेशवे कालखंडामध्ये नानासाहेब पेशवे यांनी केली त्याच बरोबर त्यांनी घाट बांधले.  मंदिराचा कळस सोन्याचा असून सभामंडप व गर्भगृह प्रशस्त आहेत. मंदिराचे बांधकाम पूर्ण काळ्या पाषाणातील असून यावर सुरेख नक्षीकाम केलेली पाहायला मिळते. नारायण नागबळी, पिंडदान या  विधीसाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक येत असतात. मंदिराच्या परिसरामध्ये गंगासागर हा कुंड आहे. मंदिराच्या चारही बाजूने संरक्षक भिंत असून पूर्वेला मुख्य द्वार आहे. त्रंबकेश्वर ला भाविक वर्षभर दर्शनासाठी येत असतात.

२)काळाराम मंदिर नाशिक माहिती

      नाशिक मधील पंचवटी परिसरामध्ये काळाराम मंदिर आहे. वनवासात असताना प्रभू रामचंद्र यांचे या ठिकाणी वास्तव्य होते.  रामाचे मंदिर दहाव्या शतकातील असून पेशव्यांचे सरदार रंगराव घोडेकर यांनी १७९२ मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली. मंदिर काळ्या पाषाणातील असून तिनं फुट उंचीच्या चौथऱ्यावर पुर्ण बांधकाम आहे.  गर्भग्रह व सभा मंडप प्रशस्त आहेत. मंदिर बांधकामासाठी दगड रामशेज डोंगरावरून आणला आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम सुंदर आहे. मंदिरावरील कळस सोन्याचा आहे. रामाची मूर्ती काळ्या पाषाणातील असल्याने याला काळा राम मंदिर असे म्हणतात. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह मार्च १९३० या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी केला होता.  रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी साजरा होतो.
काळाराम मंदिर
काळाराम मंदिर


२)पंचवटी नाशिक

     नाशिक मधील गोदावरीच्या डाव्या तीरावर काळाराम मंदिराच्या जवळ पाच वटवृक्षाचा समूह असल्याने त्या परिसराला पंचवटी असे म्हणतात. पंचवटीचा परिसर साधारण पाच किलोमीटर अंतरात आहे. पंचवटी परिसरामध्ये अनेक मंदिरे असून काळाराम मंदिर हे प्रसिद्ध मंदिर याच ठिकाणी आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना याच परिसरामध्ये वास्तव्यास होते येथेच त्यांची कुटी उभारण्यात आली होती. हा पूर्ण परिसर अध्यात्मिक असून अनेक देवी-देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. काळा राम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, सुंदरनारायण मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर, मुरलीधर मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नारोशंकर मंदिर, दुतोंड्या मारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर अशी अनेक मंदिरे या ठिकाणी आहेत.

४)रामकुंड नाशिक

     रामकुंड नाशिक पासून दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी तीरावर आहे. पौराणिक कथेनुसार प्रभुरामचंद्र या ठिकाणी वास्तव्यास असताना स्नान याठिकाणी येत असत, त्यामुळे याला रामकुंड असे म्हणतात. जेथे प्रभुरामचंद्र स्नान करत होते त्याच ठिकाणी कुंडाचे बांधकाम १६९६ मध्ये खटावकर यांनी केले. याला आध्यात्मिक महत्त्व असून या ठिकाणी स्नान केल्यास सारे पाप नष्ट होतात अशी धारणा आहे, त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी देशभरातून स्नानासाठी येत असतात. रामकुंड मध्ये अस्थिविसर्जन केल्यास आत्म्यास शांती लाभते. याठिकाणी देशातील अनेक मोठ्या नेत्यांचे अस्तीविसर्जन करण्यात आहेत.

५)पांडवलेणी

       नाशिक पासून साधारण आठ किमी अंतरावर असणाऱ्या  त्रिराशी डोंगरामध्ये पांडवलेणी आहेत.
   नाशिकच्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळां पैकी पांडवलेणी ह्या देखील प्रसिद्ध आहेत. पांडवलेणी समूहामध्ये एकूण २९ लेण्या असून त्या डोंगराच्या पोटामध्ये कोरल्या आहेत. येथील लेण्या साधारण इ स पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत. या लेणी समूहात मध्ये जैन बौद्ध व हिंदू धर्माशी निगडित आहेत. या पुरातन लेण्या व्यापारी व वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधले आहे. लेण्यांमधील गौतम बुद्धांची व बोधिसत्वाची मूर्ती आकर्षक आहे त्याच बरोबर बुद्ध स्तूप, देव-देवतांच्या मूर्ती, भिंतीवरील आकर्षक नक्षीकाम, मोठमोठाले दगडी खांब, प्रेक्षणीय आहे. या लेण्यांमध्ये एक पाली भाषेतील शिलालेख ही पाहायला मिळतो. नाशिक वरून पांडवलेणी पाहण्यासाठी बसेस भेटतात.

६)सीता गुहा

     पंचवटी परिसरामध्ये सीता गुफा नावाचे एक स्थान आहे. पौराणिक कथेनुसार रावणाने सीतेचे याच ठिकाणावरून अपहरण केले होते. रामायण व सीता मातेशी जोडली गेली असल्याने या गुहेला खूप महत्त्व आहे. या गुहे मध्मे राम सीता व लक्ष्मणाची मूर्ती तसेच एक शिवलिंग ही आहे. गुहे पर्यंत अरुंद पायऱ्यांचा भुयारी मार्ग आहे. सीता गुहा काळाराम मंदिराच्या उत्तर बाजूस आहे.

७)सुला वायनरी

      नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष जगप्रसिद्ध आहेत आणि याच द्राक्षापासून उच्च प्रतीची वाईन बनवणारे अनेक उद्योग उभे राहिले आहेत. नाशिक मध्ये सुला वाइन यार्ड आहे जो साधारण १६० एकर मध्ये विस्तारलेला आहे. सुला वायनरी द्राक्षापासून उच्च प्रतीची वाईन बनवते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुला वाइन यार्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाइनचा आस्वाद घेण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. पर्यटक या ठिकाणी वेगवेगळी वाईन टेस्ट करू शकतात. त्याच बरोबर या ठिकाणी सुला वाइन महोत्सव ही आयोजित केला जातो त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात.

८)नाणे संग्रहालय 

        नाणी किंवा त्यासंबंधी माहिती ची आवड असेल तर नाशिकचे नाणी संग्रहालय तुमच्यासाठी खास पर्वणी ठरू शकते. नाशिक मधील हे संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली होती. या संग्रहालयामध्ये भारतातील वेग वेगळ्या कालखंडातील अनेक दुर्मिळ नाणी पाहायला मिळतात. नाणी संग्रहालय मध्ये प्रत्येक नाणे, त्यांचे माहितीपत्रक, वेगवेगळे नाण्यांचे साचे, प्रतिकृती, याद्वारे पण नाण्यांची माहिती घेऊ शकतो. नाशिकला पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी या संग्रहालयाला आवश्य भेट द्यावी.

९)ब्रह्मगिरी पर्वत

      गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी पर्वत नाशिक मधील त्रंबकेश्वर येथे आहे. गोदावरी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एक छोटे कुंड व गंगा मातेचे छोटेखानी मंदिर आहे. ज्या झऱ्यातून गोदावरीचा उगम होतो त्याला गंगाद्वार असेही म्हणतात. भगवान शंकराने जटा आपटल्या मुळे या ठिकाणी गंगा प्रकट झाली अशी आख्यायिका आहे. उगम स्थानापर्यंत जाण्यासाठी डोंगरामध्ये ६९० पायऱ्या चढून जावे लागते. पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग पाहण्यासारखा असतो.

१०)हरिहर गड

    महाराष्ट्रातील अवघड किल्ल्यामधील एक किल्ला म्हणजे हरिहर. ८० अंश कोणातील कातळात कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून अतिप्रचंड आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या छोटेखानी दरवाजा व डोंगराच्या पोटातून जाणारी पायवाट हे सर्व ट्रेकचा विलक्षण आनंद देऊन जाते. किल्ला चढून गेल्यानंतर सभोवतालचा परिसर पाहून थकवा कधी निघून गेला कळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी महादेवाची पिंड गणपतीचे शिल्प पाहायला मिळते. किल्ल्यावरून सभोवताली नजर फिरवत असताना सह्याद्रीचे सौंदर्य डोळे दिपवून टाकते. सुरुवातीला निजामशाहीच्या ताब्यात असनारा किल्ला पुढे मोगलांच्या ताब्यात गेला. मोरोपंत पिंगळे यांनी हरिहर गड स्वराज्यात सामील करून घेतला. हरिहर गड ट्रेक चा थरारक अनुभव घेण्यासाठी एकदा तरी नक्की भेट द्यावी.

११)रामशेज किल्ला

        पंचवटी पासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या
  रामशेज किल्ल्याला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रभू रामचंद्र पंचवटी येथे असताना ते या डोंगरावर विश्रांतीसाठी येत असत त्यावेळी त्यांची येथे शेज होती म्हणून याला रामशेज किल्ला म्हणतात. रामशेज किल्ला घेण्यासाठी आलेल्या मोगल सैन्या विरुद्ध तब्बल सहा वर्ष किल्ला लढता ठेवून मोगलांना जेरीस आणले. या सहा वर्षात मोगलांच्या अनेक सरदारांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुठभर मराठा मावळ्यांनी आपल्या शौर्याने व चिकाटीने मोगलांना टक्कर दिली. रामशेज किल्ला मध्ये रामाचे सुंदर मंदिर मंदिराखाली पाण्याचे बंदिस्त टाके आहे. किल्ल्यावर दरवाजे, चोर दरवाजे, मंदिर पाण्याची टाकी तटबंदी पाहायला मिळतील. किल्ला आटोपशीर असून दोन तासांमध्ये बघून होतो.

१२) मुक्तिधाम मंदिर

             नाशिक येथील मुक्तिधाम मंदिर अतिशय सुंदर व भव्य असून त्याचे निर्माण 1971 मध्ये राजस्थानी संगमरवरी दगडापासून केली आहे. मुक्तिधाम मंदिरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत. मंदिराच्या भिंतीवर भगवद गीतेचे श्लोक कोरलेले आहेत. मंदिराचे सभाग्रह अतिशय प्रशस्त असून त्यातील वातावरण मनाला थंडावा देते. मंदिरावरील नक्षीकाम सुंदर असून पर्यटनाला येणारे पर्यटक नक्की या मंदिरात भेट देऊ शकतात.
             

१३) वणी सप्तशृंगी मंदिर

           नाशिक पासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड आहे. सप्तशृंगी गडावर असणारे सप्तशृंगी देवीचे मंदिर माता सती म्हणजे(पार्वती) ना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम सीता वर लक्ष्मण या ठिकाणी देवीच्या दर्शनाला आले होते. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी माता बांधली जाते. देवीची मूर्ती पाषाणात कोरलेले असून अठरा भुजा असून प्रत्येक हातामध्ये आयुध आहेत. सप्तशृंगी या शब्दाचा अर्थ सात शिखरे असा होतो. देवीचे मंदिर आणि वेढलेले आहे. गडावर पाण्याचे तीन कुंड आहेत. गडावर जाण्यासाठी प्रशस्त पायरी मार्ग आहे तसेच रोपवे ची ही सुविधा आहे. वणी येथे वर्षभर दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात.

१४सोमेश्वर धबधबा नाशिक

     नाशिक पासून चार किलोमीटर अंतरावर गंगापूर रोडवरील सोमेश्वर धबधबा असून त्याला दूध सागर धबधबा असेही म्हणतात. धबधब्याच्या  कडेला एक बालाजीचे सुंदर मंदिर आहे त्याच प्रमाणे सोमेश्वराचे एक प्राचीन मंदिर आहे. धबधबा अतिशय सुंदर असून पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.
           

नाशिक मधील खानपान | best local foods of Nashik in Marathi

     नाशिक मध्ये पर्यटक शाकाहारी,मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. नाशिक ची प्रसिद्ध झणझणीत मिसळ, वडापाव, भजी, इडली सांबर, दाल बाटी, याचा ही पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. नाशिक मध्ये महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती पंजाबी साउथ इंडियन अशी अनेक रेस्टॉरंट पर्यटकांच्या सेवेसाठी आहेत.

नाशिकला भेट देण्याची योग्य वेळ | best time to visit Nashik in Marathi

      नाशिकचे वातावरण अध्यात्मिक असून वर्षभरामध्ये केव्हाही भेट देऊ शकता, परंतु ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम मानला जातो.  तसे पाहिले तर वर्षभर येथील सगळे पर्यटन स्थळे गजबजलेला असतात. परंतु वर्षा सहलीचा आनंद काही वेगळाच असतो पावसाळ्यात पर्यटक नाशिक जिल्ह्यातील अनेक धबधबे व हिरवाईनं नटलेले डोंगर कडे  डोळ्यात साठवू शकतात.
     

नाशिक मध्ये राहण्याची सोय

     सोलो ट्रॅव्हलर्स असो किंवा फॅमिली ट्रॅव्हलर्स प्रत्येकाच्या बजेटमध्ये अनेक मुक्कामासाठी हॉटेल आहेत. बजेट ट्रॅव्हलर साठी अनेक हॉस्टेल्स आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक तीर्थ स्थळावर अल्पदरात भक्तनिवासाची सोय होते.
     

नाशिकला जायचे कसे |how to reach Nashik in Marathi

   नाशिक महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा आसून तो महाराष्ट्रातील व भारतातील अनेक शहरांना रस्ते हवाई रेल्वे मार्गाने जोडला गेलेला आहे खालील प्रमाणे याची माहिती पाहू
   

रस्ते मार्ग नाशिक | how to reach Nashik by road in Marathi

    नाशिक हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून ते रस्ते मार्ग महाराष्ट्रातील इतर शहरांशी जोडले गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १६० हा मुंबई-नाशिक ला जोडला आहे. पुणे ते नाशिक आंतर २००  किमी असून या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या किंवा खाजगी बसने चालतात.
    

रेल्वे मार्ग | how to reach Nashik by train in Marathi 

     नाशिक पासून जवळचे रेल्वे स्थानक पंचवटी पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे, नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून पंचवटी ला जाण्यासाठी खाजगी बसेस किंवा सिक्स सीटर वाहने भेटतात.

हवाईमार्गे | how to reach Nashik by flight in Marathi

     नाशिक मधील ओझर हे विमानतळ नाशिक पासून २० किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर शिर्डी विमानतळ नाशिक पासून ९० किलोमीटर अंतरावर आहे.
वणी सप्तशृंगी देवी मंदिर
सप्तश्रृंगी देवी मंदिर




     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

कृपया नकारार्थी कमेंट टाळावे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण