मुख्य सामग्रीवर वगळा

रामशेज किल्ला माहिती | Ramshej fort in Marathi

रामशेज किल्ला:

          रामशेज किल्ला आपल्याला पौराणीक संदर्भ लाभला आहे तर मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. पौराणिक कथांमध्ये प्रभू श्रीराम वनवासात असताना ते या डोंगरावर विश्रांती साठी येत असत,याच ठिकाणी त्यांची सेज होती म्हणून याला रामशेज असे नाव पडले.स्वरायाचा मावळ्यांनी प्रचंड मोठ्या मोगल सैन्याला झुंज देऊन तब्बल पाच ते सहा वर्ष किल्ला लढवला.आजच्या लेखा मध्ये आपण रामशेज किल्ल्या बद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत.

रामशेज किल्ला माहिती:

किल्ल्याचे नाव: रामशेज
किल्ला उंची : ३२०० फूट
प्रकार :  गिरिदुर्ग 
 जिल्हा : नाशिक
 सद्यस्थिती :चांगली
  चढाई : सोपी
रामशेज किल्ला
रामशेज किल्ला प्रवेशद्वार


रामशेज किल्ला कोठे आहे:

         रामशेज किल्ला नाशिक जिल्ह्यात असून नाशिक पेठ रस्त्यावरील आशेवाडी या गावा लगत आहे.पंचवटी पासून १० किलोमीटर तर नाशिक शहरा पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. रामशेज किल्ला सपाट भूप्रदेशात असून दूरवर कोणताही डोंगर पहायला मिळत नाही. विशाल मैदानी प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी व या मोठ्या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने रामशेज किल्ला महत्त्वाचा समजला जात असे.

रामशेज किल्ल्याचा इतिहास:

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य बुडवण्याच्या मनसुब्याने १६८२ मध्ये दिड लाखाच्या फौजे सह औरंगजेब स्वराज्यावर चालून आला.वाटेवरच रामशेज किल्ला आपल्या ताब्यात असल्याने रामशेज किल्ला जर हातात आला तर या भागावरील पूर्ण नियंत्रण आपल्या हातात येईल या विचाराने औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन याला ४० हजार फौजेनिशी रामशेज किल्ल्याची मोहीम सोपवली. साबदिल्ला वाटले एवढ्या किल्ला घ्यायला कितीसा वेळ लागतो एका दिवसात किल्ला घेऊन मोकळे! 
स्वराज्यातील इतर किल्ल्यांच्या मानाने रामशेज तसा लहानच पण किल्ल्याचा किल्लेदार स्वराज्याच्या मुशीत तयार झालेला व किल्ल्यावरील सहाशे मावळे ही शूर व पराक्रमी होती. किल्ल्यावर बऱ्यापैकी रसद होती त्यामुळे किल्ला कोणत्याही परिस्थितीत पक्का लढता ठेवायचा हे किल्लेदाराने ठरवले होते.

शहाबुद्दीन:

          शहाबुद्दीन च्या सैन्याने रामेशेज वर जोरदार हल्ला केला मोघली सैन्य जोश्या मध्ये किल्ला चढू लागले. मोघली सैन्य गोफणीच्या टप्यात येण्याची वाट तटा वरून मराठी पाहतच होते. गडावरून भिर भिर करत दगड गोटे येऊन मुघल सैन्याला टिपू लागले शहाबुद्दीन ला काय झाले हेच कळले नाही.मराठा सैन्याने पुर्ण ताकतीने हल्ला केला होता. मोघल सैन्याची पुरती धांदल उडाली मिळेल त्या वाटेने शहाबुद्दीन सह सैन्य गडाखाली पळाले. कित्येक सैनिक जायबंदी मारले गेले याचा काही हिशोब नव्हता. शहाबुद्दीनने गडाचा वेढा घातला गडाची नाकेबंदी केली. मराठा सैन्य रात्रीच्या अंधारात वेळी-अवेळी गडावरून खाली उतरून मोगल छावणीवर हल्ला करत व तिथे धान्य तो गोळे दाणागोटा उठून गडावर जातात. 
           शहाबुद्दीन खानाला काय करू काय नको असे होऊन बसले. छावणीमध्ये थोडी तरी हालचाल झाली तरी वरून मराठी जोरदार हल्ला करतो आता मात्र फत्तेखानाच्या जोर ओसरला होता सहाशे मावळ्यांनी ४० हजार मोगली सैन्यावर इतकी जरब बसली होती की किल्ल्यावर हल्ला करायला कोणी धजावत नव्हत.
        शहाबुद्दीन खानास काहीही करू किल्ला काबीज करायचा होता त्यांनी एक योजना आखली किल्ल्याच्या उंचीचा एक लाकडी मचान बांधून त्यावरून तोफांचा मारा गडावर करायलचा. शहाबुद्दीन आपल्या सैन्याला जंगलातून झाडे तोडून आणून ८० तोफा व २०० सैन्य बसेल येवढा मचान (दमदमा) बांधून घेतला. गडावर तोफांचा मारा सुरु केला मारा सुरु केला शहाबुद्दीन ला थोडी उमेद आली त्याने तोफांचा जोर आणखी वाढवला.
         किल्ल्याला मोठे नुकसान होईल याच्या भीतीने मराठा सैन्याने रात्रीच्या वेळी गडाखाली उतरून तो दमदमा व दारू गोवा साठ्याला आग लावली. व गावले लूट घेऊन रात्रीच्या अंधारात गडावर कधी गेले मोघल छावणीला कळलेही नाही. एका दिवसाचा किल्ला घेण्याच्या बाता करणारा साबुद्दिन दोन वर्ष झाले तरी गडाभोवती फिरतो हे पाहून औरंगजेबाने त्याला माघारी बोलवून घेतले.
रामशेज किल्ला
रामशेज किल्ला


 फतेह खान:

            औरंगजेबाने रामशेज ची मोहीम जिगरबाज फत्तेखान व सोपवली. फत्तेखान रामशेज किल्ला फत्ते करेल! याचा पूर्ण विश्वास औरंगजेबाला होता.
  फत्तेखान आपली नव्या दमाची २० हजारांची फौज घेऊन रामशेज वर जोरदार आक्रमण केले.पण मराठे त्यालाही गडापर्यंत पोहचू देत नव्हते. त्यांचे सैन्य गडापाशी आले की बूरुजा वरुन मराठे दगडांचा वर्षाव करीत. मोगली सेना गोफनीच्या टप्पात आली की गोफन बाज टिपून टिपून जायबंदी करत होते.तिरंदाज सपासप भान सोडीत होते. इतका जोर लावून ही फत्तेखानाच्या हाती निराशाच येत होती.
          फत्तेखानाने किल्ल्याच्या पायथ्याशी डेरा टाकला व किल्ल्याची पुर्ण नाकेबंदी केली. मराठा सैन्य ठरलेल्या प्रमाने वेळी अवेळी मोगली सैन्यावर तुटून पडत होते. छावणीत लुटमार करीत व गडावर निघून जात.फत्तेखान किल्ला घेण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून पाहू लागला.
          एका रात्री मोगलांनी गडावर जोरदार तोफांचा मारा सुरु केला.मराठा सैन्याला काहीच कळत नव्हते ते पार गांगरून गेले रात्रीच्या अंधारात गडावर पळापळ सुरू झाली. तोफेचा एकही गोळा तटावर येत नव्हता तरीही हल्ला सुरुच होता समोरुन कोणतीही हालचाल नव्हती,किल्लेदाराला संशय आला त्याने किल्ल्यावरील गस्त वाढवण्याचे आदेश दिले. तो. स्वत्ता तटावरून फिरु लागला.मागच्या बाजूला हालचाल दिसत होती,निवडक मोगल सैन्य रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गड चढून वर येत होतं.तटाच्या अगदी जवळ आले मराठ्यांनी जो हल्ला केला पुढे आलेले सैन्य गारद झाले. मागिल सैन्याला कुठे पळू कुठे लपू झाले.दगडांच्या वर्षावाने किती जायबंदी झाले किती मारले गेले यांची गणती नव्हती.उरलेले सैन्य मात्र छावणी कडे पळत सुटले.फत्तेखानाला कळून चुकले की किल्ला समजा सहजी हाती येणार नाही.
            फत्तेखानाला त्याच्या सल्लागाराने एक कल्पना सुचवली.असा लढून किल्ला हाती येत नाही,दुसऱ्या कुठल्या मार्गाने प्रयत्न करुन बघुया त्या प्रमाने मांत्रीकाला बोलावून जादू टोण्याने गड घेण्याचे ठरले.' मरता क्या न करता ' मांत्रीक बोलला, मी तर भूत पिषाच्य वश करतो हे मराठे काय चिझ! मला फक्त सोन्याचा एक नाग आनून द्या. ठरलेल्या प्रमाने मात्रीकाने सोन्याचा नाग घेतला व छाताडाला लावून भर दुपारी गढ चढू लागला.मोठ्या ऐटीत तो पुढे व त्याच्यामागे मोघल सैन्य असा सारा लवा जमा गडाकडे निघाला.निम्मा गड चढून वर आला आता थोडा राहीला असे म्हणे तो पर्यंत गोफनीतून भिरभिर करत जो दगड आला तो मांत्रीकाच्या छाताडावर पडला,तसा नाग एका बाजूला मांत्रीक दुसऱ्या बाजूला गडावरुन दगडांचा पाऊसच सुरु झाला.मोघलांना पाक सळो की पळो करून सोडले.मात्रीक नाग तिथेच टाकून कधी पळून गेला कळलेच नाही!
           फत्तेखान असंख्य वेळा गडावर आक्रमण करायचा पण मराठे त्याचा प्रत्येक डाव हाणून पाडत होते.
रामशेज किल्ला
दरवाजा


कासम खान:

            औरंगजेबाने आता मात्र फत्तेखानाला पण माघारी बोलावून रामशेज ची मोहीम कासम खानावर सोपावली. कासमखानाला पक्के कळाले होते की गडावर हल्ला करून काही उपयोग होणार नाही.कासमखानाने पुर्ण गडाला वेढा घालून नाकेबंदी केली. रसद कापून टाकायची म्हणजे आपोआपच गडावरील धान्य धुन्य संपताच गढ आपल्या हाती येईल.छत्रपती संभाजी राजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे या सरदारांना आपल्या तुकडी सह रामशेज परीसरात थांबवले होते. मराठा सरदार बाहेरून मोगली सैन्यावर हल्ला करत तर किल्लेदार गडावरून रात्रीच्या वेळी छावणीवर हल्ला करत. अखेर मराठा सैन्याला यश आले त्यांनी रात्रीच्या वेळी कोंडी फोडून रसद गडावर पोहोचवली, तसेच नवर्या दमाचे मावळे ही गडावर दाखल झाले.साडेपाच वर्ष झाले तरी कासम खान व मोगली सेना स्वराज्यातील एवढा छोटा किल्ला जिंकू शकले नाहीत.त्यांच्यापुढे उभे होते ते जिगर बाज किल्लेदार व मराठा सरदार
          छत्रपती संभाजी राजांनी किल्लेदारास बोलावून ढाल तलवार, सोन्याचे कडे व इनाम देऊन सत्कार केला. १६८७ मध्ये मात्र नविन आलेला किल्लेदार फितूर झाला व रामशेज मोगलांच्या हातात गेला.सहा वर्ष जो किल्ला मोघल जिंकू शकले नाहीत तो मात्र फितूरी मुळे मोगलांच्या हाती लागला.
     

रामशेज किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

          रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी एक भली मोठी दगडात बांधलेले कमानी प्रवेशद्वार आहे.प्रवेशद्वार अतिशय सुंदर दिसते.गडावर जाण्यासाठी डोंगरात मळलेली पायवाट आहे.गडाच्या वरील बाजूस कड्याखाली एक गुहा असून गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे.तिथून थोडे वर गेल्यावर सुंदर रामाचे मंदिर असून मंदिरात राम,सिता,लक्ष्मन,व मारुतीची सुंदर मूर्ती आहे.मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे.मंदिराला लागूनच पाण्याचे टाके असून टाकीची वैशिष्ट्य पूर्ण रचना आहे. या टाकीमध्येच गडावर पिण्यायोग्य पाणी आहे. दहा बारा पायऱ्या चढून वर गेल्यानंतर गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार आहे. 
          रामशेज किल्ला अतिशय आटोपशीर असून गडावर फिरण्यासाठी पायवाटा आहे. गडावर काही ठिकाणी तटबंदी दिसून येते. तटबंदीच्या आतील बाजूस खंदक व पायऱ्या आहेत. तटबंदीच्या बाजूने चालत गेले की वाटेत गडाचा वैशिष्ट्य पूर्ण दरवाजा लागतो. दरवाज्या जमिनीखाली असून दगडातच कोरीव पायऱ्या कोरलेल्या आहेत.दोन्ही साईटची भिंती तासून एकसमान केलेली दिसते.दरवाज्याच्या पलीकडे चुण्याचा घाणा व पाच पाण्यांच्या टाक्यांचा समुह दिसतो.टाक्यांच्या पुढे गडावरील देवीचे छोटेखानी मंदिर आहे.मंदिराच्या समोरच्या बाजूला झाडाखाली गणपतीची एक पुरातन मुर्ती पहायला मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूला ही पाण्याच्या तिनं टाक्या आहेत.किल्याच्या दिंडोरी बाजूच्या शेवटच्या टोकाला एक चोर दरवाजा आहे.या चोर दरवाज्याने मराठा सैन्याला रसद पुरवठा होत होता.
            दरवाजाच्या जमीनी खाली असून आत मध्ये दोन कमानी आहेत.चोर दरवाज्या सहज नजरेस पडत नाही.देवीच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला छत्रपतींची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे.गडावर ज्या दरवाज्यातून प्रवेश करतो त्याच्या समोरच एक छोटा कमानी दरवाजा व उतरणारी पायरी वाट आहे. दरवाज्यातून खाली खांब टाके आहे. किल्ल्याच्या पठारावर कीरीव पाण्याचे टाके आहेत रामशेज वर दोन-तीन ठिकाणी पाण्याचे टाके पहायला मिळतात. 
  रामशेज वरुन दुरवर मोकळा प्रदेश त्याच प्रमाणे देहेरगड,भोरगड व त्र्यंबकगड नजरेस पडतात

रामशेज ला जायचे कसे:

            रामशेज किल्ल्याला भेट देण्यासाठी नाशिक पंचवटी शहरात यावे लागते.नाशिक पेठ रस्त्यावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर पोहोचता येते. सार्वजनिक वाहतूक वापरणार असाल तर या रस्तावर बस वाहतूक तसेच खाजगी रिक्षा धावते त्याने ही गडावर जाऊ शकता.

काय काळजी घ्यावी:

  •  किल्ला पाहण्यासाठी वर्षेभरात केव्हाही जाऊ शकता.
  • पावसाळ्यात मात्र येथील सौंदर्य काही औरच असते.
  • गडावर चहा नाष्टाची सोय नाही
  • गड दोन तासांमध्ये पुर्ण पाहून होतो.
  • गडावर देवीच्या मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण