मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri tourist places in Marathi

रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri tourist places in Marathi

        महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असा रत्नागिरी जिल्हा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो.  पूर्वेला उत्तुंग असा सह्याद्री तर पश्चिमेला विशाल अरबी समुद्र याच्यामध्ये वसलेला असल्याने रत्नागिरी पर्यटन स्थळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात. रत्नागिरीला धार्मिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्तीचा वारसा बीज आहे. 
        रत्नागिरी जिल्हाला १६७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून या किणार पट्टीवर अनेक पर्यटन स्थळे पहायला मिळतात. या ठिकाणचे बीच सुंदर व स्वच्छ आहेत.  या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाच्यादृष्टीने scuba diving, बोटिंग, बनाना राईड, horse riding, उंटाची सवारी, व्हॅली क्रॉसिंग यासारख्या अनेक ऍक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये अनेक ऐतिहासिक जलदुर्ग असून त्यांना गौरवशाली इतिहास लाभला आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी स्वरूपानंद, केशवसुत अशा अनेक थोर व्यक्ती रत्नागिरीमध्ये होऊन गेल्या त्यांची स्मारके ही पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. रत्नागिरी मध्ये अनेक पुरातन मंदिरे असून त्यांचे महात्म्य ही मोठे आहे. पूर्वेकडील सह्याद्री परत रांगेतून वाहणारे धबधबे, घनदाट जंगल ट्रेकिंगची आवड असणारे पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.
     रत्नागिरी मुंबईपासून ३४० किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून साधारण ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
रत्नागिरी पर्यटन
मावळतीचा सुर्य गणपतीपुळे

हेही वाचा: नाशिक पर्यटन स्थळे

रत्नागिरीचा इतिहास | Ratnagiri history in Marathi

         रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ला विजापूरच्या आदिलशाही अधिपत्याखाली होता. सिद्धी जोहरच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवरायांनी या भागातील सागरी किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. हा भाग स्वराज्यात सामील करून घेतले नंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने या किल्ल्यांची डागडुजी करून तेथे चौक्या-पहारे बसवले. इंग्रज व पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी या ठिकाणी भक्कम नाविक तळ उभारले. छत्रपती शंभू पुत्र श्रीमंत शाहू महाराजांनी हा प्रदेश मराठा साम्राज्य मध्ये सामील करून घेतला व नंतर पुढे ब्रिटिश सत्ता स्थापन होईपर्यंत रत्नागिरी मराठा साम्राज्य मधेच होते.

रत्नागिरी मधील पर्यटन स्थळे | best tourist places visit in Ratnagiri in Marathi

         आजच्या लेखामध्ये रत्नागिरी मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती पाहू

मांडवी बीच:

         मांडवी बीच रत्नागिरी शहरातील बस स्टॉप पासून साधारण २ किलोमीटर अंतरावर आहे. मांडवी हा रत्नागिरी मधील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. येथील बीच अतिशय स्वच्छ व सुंदर आहे. हा बीज काळ्या वाळूचा असल्याने याला काळासमुद्र असेही म्हणतात. बीच साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतराचा असून काळी वाळू हे मुख्य वैशिष्ट्य आहे. शांत व उथळ समुद्र किनारा असल्याने पर्यटक समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटू शकतात. बीच वर फुटबॉल क्रिकेट रिंग पासिंग असे खेळ खेळू शकतात त्याचबरोबर हॉर्स रायडिंग घोडागाडीचा आनंद लुटू शकतात. या बीच च्या कडेला जेटी ही असून पर्यटक  बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.

रत्नदुर्ग किल्ला | ratnadurga fort information in Marathi

         रत्नागिरी बस स्टॉप पासून साधारण दोन किलोमीटर अरे तो चुकीचा आहे. किल्ल्याचे बांधकाम बाराव्या शतकात झाले असून हा जलदुर्ग प्रकारातील आहे. रत्नदुर्ग लाच भगवती किल्ला असेही म्हणतात. किल्ला 120 एकर मध्ये पसरलेला असून त्याचे कोट व बालेकिल्ला असे दोन भाग आहेत. या किल्ल्यावर सत्तावीस टेहळणी बुरुज आहेत. किल्ला साधारण अर्धवर्तुळाकार असून त्याला साधारण तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेले आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला दीपस्तंभ (Lighthouse) आहे. किल्ल्यावरून फिरत असताना समुद्राची थंड हवा मनाला गारवा देऊन जाते. बुरुजावरुन अथांग समुद्र पाहताना मन सुखावून जाते. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. किल्ल्याला धडकणाऱ्या समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा व त्यांचा आवाज मनाला सुखद अनुभव देतो. किल्ला पर्यटकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुला असतो.

भाटे बीच | Bhati beach

          रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर भाटे बीच आहे. भाटे बीच पांढऱ्या वाळूचा असून त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. या समुद्र किनार्‍यावर सुरू चे वन असून याठिकाणी वनभोजनाचा आनंद घेता येतो. समुद्रकिनारा शांत, उथळ, स्वच्छ असल्याने पर्यटक समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटतात. समुद्रामध्ये बनाना राईड ही करू शकतात. घोडा उंट यांची सवारी करू शकतात. बीचवर अनेक खेळांचे साहित्य भाड्याने मिळत असल्याने पर्यटक खेळांचा आनंद लुटू शकतात, त्याच बरोबर साहसी खेळांची आवड असणारे व्हॅली क्रॉसिंग ची ही सोय आहे. व्हॅली क्रॉसिंग करताना समोर दिसणारा मनमोहक सागरात नजारा, बीचवर बागडणारे पर्यटक पाहताना भेगा तो आनंद भेटतो. मावळतीच्या सूर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक पर्यटक सायंकाळच्या वेळी बीच वर गर्दी करत असतात.
         भाटेच्या चौपाटीवर चाट पाणीपुरी नारळ पाणी वडापाव भेळ याचाही पर्यटक आनंद घेत असतात.

थिबा पॅलेस | Theba palace information in Marathi

         रत्नागिरी शहरातील मुख्य आकर्षण असलेला थिबा पॅलेस ब्रह्मदेश चा थिबा मीन राजा बंदिवासात असताना त्याच्या साठी बांधला. इसवीसन १८८५ मध्ये थिबा राजाला ब्रह्मदेशात माणून रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केले. त्याच्यासाठी 1910 साली भाटे च्या समुद्रकिनाऱ्यावर प्रशस्त असा तीन मजली राजवाडा बांधला. हा भव्य पॅलेस २७ एकर जमिनीवर असून लाल रंगा मध्ये आहे. याचे बांधकाम भारतीय व इटालियन पद्धतीचे आहे. याच्या खिडक्यांवर व दारावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
         वाड्यामध्ये संगमरवरी बांधकाम असून त्यामध्ये राज्याच्या वापराची वस्तू पाहायला मिळतात. दुसऱ्या मजल्यावर चित्र गॅलरी असून त्यामध्ये असंख्य आकर्षक पेंटिंग पाहायला मिळतो. राजवाड्याच्या पश्चिमेकडील बाल्कनी तून अथांग सागराचे नयनरम्य दृश्य दिसते.
         सोमवार सोडून कोणत्या दिवशी पॅलेस पर्यटकांसाठी खुला असतो. रत्नागिरी बस स्टॉप पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असून येथे येण्यासाठी बसस्थानका पासून रिक्षा भेटतात.
रत्नागिरी पर्यटन
थिबा पॅलेस


थिबा पॉइंट:

           थिबा पॅलेस च्या बाजूलाच थिबा पॉईंट असून या ठिकाणावरून सूर्यास्त पाहण्यासाठी सायंकाळच्या वेळी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. ठिबक पॉइंट वरत जिजामाता उद्यान उभारले असून त्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी अनेक मनोरंजक साधने बसवण्यात आले आहेत. या उद्यानातील मनोऱ्यावरून अथांग समुद्र भाटे बीच व राजवाडा बंदराचे मनमोहक दृश्य दिसते. थिबा पॅलेस व थिबा पॉईंट एकाच वेळी पाहून होतात.

राजिवडा बंदर:

           रत्नागिरी शहरापासून जवळच भाट्ये बीच वर राजिवडा बंदर आहे. या बंदरावर नऊ खाण्यासाठी अनेक प्रकारचा बोट उपलब्ध आहेत. याठिकाणी पर्यटक स्पीड बोट छोट्या होडी, बनाना राईड चा आनंद घेऊ शकतात. खाडीमध्ये असंख्य उभ्या असलेल्या बोटी व त्यावरील झेंडे मनमोहक दिसतात.

गेट वे टू रत्नागिरी | Gateway to Ratnagiri

           रत्नागिरी बस स्टॉप पासून २ किलोमीटर अंतरावर मांडवी बीच च्या बाजूला जेटी बांधण्यात आले आहे. जेटीचा पूर्वी उपयोग जलवाहतुकीसाठी केला जात असे, त्या जेटी वर समोरील बाजूस मोठी कमान उभारली असून ही कमान रत्नागिरी चे प्रवेश द्वार किंवा गेट वे टू रत्नागिरी म्हणून ओळखली जाते. कमानी अतिशय सुंदर असून समुद्राकडे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता आहे.जेटी जवळ खडका समुद्र किनारा असून याठिकाणी जोरजोरात समुद्राच्या लाटा आदळत असतात. याठिकाणी पर्यटक खुबा टायपिंग ही करू शकतात.

मार्लेश्वर मंदिर

        सह्याद्रीच्या कुशीमध्ये मार्लेश्वर येथे भगवान शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. मार्लेश्वर मंदिर डोंगर कपारी तील गुहेमध्ये असून याठिकाणी दोन स्वयंभू शिवलिंग आहेत. मल्लिकार्जुन व मार्लेश्वर या नावान दोन्ही पिंडी ओळखल्या जातात. श्रावणामध्ये अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात. मकर संक्रांतीला मार्लेश्वराचा लग्न सोहळा असतो, त्यासाठी खूप भाविक येत असतात. पावसाळ्यात मंदिराच्या मागील बाजूस सह्याद्रीच्या डोंगरा मधून अनेक धबधबे वाहत असतात. डोंगरांमधून खाली येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारा पाहून मन प्रसन्न होते. या धबधब्याला धारेश्वर धबधबा असे म्हणतात. हा धबधबा पुढे बावनदी म्हणून ओळखला जातो.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक:

          पतीत पावन मंदिराच्या आवारात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या व क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती देणारे गाथा पंथाची प्रदर्शनी आहे. या स्मारकामध्ये सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहे सावरकरांची काठी चष्मा लंडन येथून पाठवलेल्या पिस्तुले तांब्या अशा अनेक वस्तू या स्मारकामध्ये ठरत आले आहेत. जन्मठेपेच्या वेळी ज्या बोटीतून समुद्रात उडी घेतली त्याची प्रतिकृती या स्मारकामध्ये पाहायला मिळते. रत्नागिरीतील थोररत्ने यांचा माहितीपट दाखवण्यात आला आहे.

रत्नागिरी येथील मत्स्यालय

          रत्नागिरीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संलग्नित सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे मत्स्यालय व संग्रहालय आहे. हे मत्स्यालय रत्नदुर्ग किल्ल्याच्या जवळच आहे. संग्रहालय मध्ये विविध प्रकारचे सागरी जीव पाहायला मिळतात, जसे की घोडा मासा, ट्रिगर मासा, कोंबडा मासा तारामासा, समुद्र साप, ऑक्टोपस, समुद्री काकडी, समुद्री कासव यासारखे असंख्य सागरी जीव पाहायला मिळतात. संग्रहालयामध्ये चित्र प्रदर्शनी असून त्यामध्ये सागरी जीवांची माहिती देण्यात आली आहे. या संग्रहालयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पंचावन्न फूट लांबीचा व पाच टन वजनाच्या देव माशाचा अतिविशाल सांगाडा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर संग्रहालया मध्ये नाना प्रकारच्या शिंपले, वनस्पती ही पाहायला मिळतात.

लोकमान्य टिळक स्मारक:

          स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
          भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची रत्नागिरी ही जन्मभूमी. रत्नागिरी मधील टिळक आळी आळीतील इंदिरा गोरे यांच्या वाड्यात टिळकांचा जन्म झाला. ब्रिटिश सरकारच्या जुलमी सत्तेविरूद्ध केसरी वृत्तपत्रातून आपले विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. त्यांचा ज्या वाड्यात जन्म झाला ती वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या ठिकाणी टिळक जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोमवार सोडून अन्य दिवशी ही वास्तू पर्यटकांसाठी खुली असते.

निवळी चा धबधबा:

           मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळील बावी नदीवर निवळीचा धबधबा आहे. पावसाळा सुरू होताच घाटमाथ्यावरून प्रचंड प्रमाणात पाणी खाली येते. संगमेश्वर घाटामध्ये आले असता डोंगर कपारीतून पडणारा धबधबा नजरेस पडतो. गर्द झाडीतून वाट काढत टप्प्याटप्प्याने कोसळणारे पाणी पाहताना मन प्रफुल्लित होते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आला आहे. या धबधब्यांमध्ये जलक्रीडेचा आनंद घेता येतो मात्र जास्त पाणी असेल तर धबधब्याखाली जाण्याचा मोह टाळावा. रत्नागिरी ते निवळी हे अंतर १८ किलोमीटर आहे.
हे ही वाचा: ठोसेघर धबधबा

श्री क्षेत्र पावस: Shri Kshetra pawas information in Marathi

       रत्नागिरी पासून १६ किमी अंतरावर स्वामी स्वरूपानंद यांचे जन्मगाव श्री क्षेत्र पावस आहे. स्वामिनी नीतीश सरकार विरुद्ध असहकार आमदार भाग घेतल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवले होते. कारागृहातील अन्य सहकाऱ्यांनी त्यांना स्वामी असे संबोधण्यास सुरुवात केली. स्वामीजी १५ ऑगस्ट १९७५ रोजी पावसामध्ये समाधीस्थ झाले त्याच जागी अनुयायांनी भव्य असे मंदिर उभारले आहे. मंदिर परिसर अतिशय शांत व रमणीय आहे. येथील वातावरणात आध्यात्मिक शांततेची अनुभूती येते. आंबा नारळाच्या बागा विपुल वनराई त्यामधील भक्तनिवास पर्यटकांच्या मनामध्ये एक विशेष जागा निर्माण करते. मंदिर परिसरात स्वामीजींची ग्रंथसंपदा अल्पदरात उपलब्ध होते. या ठिकाणी भक्तनिवासाची सोय आहे.

श्रीक्षेत्र गणपतीपुळे | Shri Kshetra Ganpatipule information in Marathi

       रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे संपूर्ण महाराष्ट्र व भारतातून भाविक व पर्यटक येत असतात. हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर गणपतीचे सुंदर मंदिर स्वच्छ समुद्रकिनारा अथांग सागर पर्यटकांमध्ये आकर्षण निर्माण करते. मंदिर परिसरामध्ये उद्यान, पांढऱ्या वाळूचा बीच, मंदिराच्या पाठीमागे असणारा हिरवागार डोंगर, यामुळे पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. भक्तांसाठी एक किलोमीटरचा प्रदक्षिणामार्ग आहे तो मंदिराच्या पाठीमागील टेकडीला पूर्णपणे वळसा मारून येतो. पर्यटकांच्या सोयीसाठी येथे हॉटेल ची बरीच रेलचेल आहे. अल्पदरात घरगुती निवास व न्याहारी व्यवस्था पाहायला मिळते. मंदिर समितीकडून भक्त निवास निर्माण केले असून या ठिकाणी माफक दरामध्ये रुम्स उपलब्ध होतात. रत्नागिरी पासून २५ किलोमीटर अंतरावर गणपतीपुळे आहे. रत्नागिरी सह महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून बससेवा उपलब्ध आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनारा

         श्रीक्षेत्र गणपती मंदिरासमोरील पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा खास आहे. हा किनारा अतिशय सुंदर, स्वच्छ व शांत आहे. स्पीड बोट चा थरार, बीचवर खेळणे, सैरसपाटा मारणे, जलक्रीडा, समुद्रस्नान, घोडा किंवा उंट हवारी बग्गी राईड चाही आनंद घेऊ शकतात. याठिकाणी अल्पदरात खेळाचे साहित्य भाड्याने मिळते. गणपतीपुळे समुद्रात dolphin दिसतात. मावळतीच्या सुर्याचे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी सायंकाळच्या वेळेस पर्यटक गर्दी करत असतात.

प्राचीन कोकण दालन: 

      गणपतीपुळे गावातील पर्यटकांसाठी प्राचीन कोकणाचे दर्शन घडवण्यासाठी कोकण दालनाची निर्मिती केली आहे. कोकणातील लोकांची संस्कृती खानपान जनजीवन याचा जवळून अनुभव घेण्यासाठी या कोकणाला अवश्य भेट द्यावी. उद्यानात विविध प्रकारच्या औषधी देशी वनस्पती मला मिळतात. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे विक्री दालन असून त्या ठिकाणी पर्यटक खरेदीचा आनंद घेऊ शकतात.या टेकडीच्या वरील भागांमध्ये मनोर असून त्यावरून गणपतीपुळे व समुद्राचे अतिशय सुंदर दर्शन घडते. या कोकण दालनात खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. उकडीचे मोदक आळूची वडी झुणका भाकर भाजणीचे थालीपीठ नाचणीचे पापड कोकम सरबत अशा खाद्यपदार्थांचा पर्यटक आस्वाद घेऊ शकतात.

पूर्णगड किल्ला | purnagad fort information in Marathi

       पूर्णगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील पावस पासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर आहे. किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून २६ एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याची उभारणी अठराव्या शतकात करण्यात आले आहे. किल्ल्याचे बांधकाम जांब्याच्या करण्यात आले आहे. समुद्री व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे. किल्ला समुद्रकिनारी असल्याने किल्ल्याच्या तटावरुन दुरवर समुद्र न्याहाळता येतो. समुद्राचे थंड वारे रोमांच निर्माण करतात.

जयगड किल्ला | jaigad fort information in Marathi

         रत्नागिरी ते जयगड किल्ला शाही नदीच्या खाडीत असून किल्ल्याची निर्मिती आदिलशाहीच्या काळात झाली असावी. जयगड किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याच्या तटावरून समुद्राचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते. किल्ला बालेकिल्ला व कोठे असावी दोन भागात विभागला असून किल्ला आजही मजबूत स्थितीत आहे. किल्ल्याला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून एका बाजूने दरवाजापर्यंत जाणारी वाट आहे. किल्ला जांब्या दगडात बांधला आहे. किल्ल्यावर १२ टेहळणी बुरुज पाहायला मिळतात. गणपतीपुळे ते जयगड अंतर १८ किलोमीटर आहे.

गाव खाडी समुद्रकिनारा: 

            पूर्णगड च्या खाडी पासून पुढे गेल्यावर समुद्राला समांतर असे दाट सुरु चे बंद नजरेस पडते. या बनातून जाताना खाडीतून समुद्राचे दर्शन अप्रतिम असेच होते. समुद्रावरून येणारे थंड वारे सुरुच्या बना तील सावली मनामध्ये गारवा निर्माण करते. गावाकडे समुद्रकिनार्‍यावर वनभोजनाचा आस्वाद घेऊ शकतात. पावस ते गावखडी समुद्रकिनारा अंतर ९ किमी एवढे आहे.
            

आरे वारे समुद्र किनारा:

         रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील आरेवारे गावच्या हद्दीमध्ये आरे वारे समुद्र किनारा आहे. डोंगर टेकडीवरून दिसणारे दूरवर पसरलेले समुद्राचे मनमोहक रूप टिपण्यासाठी पर्यटकांची पावले याठिकाणी आपोआप थांबतात. सुरुच्या बना ने अच्छादलेला हा संपूर्ण परिसर कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आपोआप सरसावतात. या ठिकाणावरून समुद्राचे निळसर रूप दिसत असल्याने याला निळा समुद्र असेही म्हणतात. या किनाऱ्यावर नेहमी खवळलेला समुद्र असतो त्यामुळे समुद्रात जाण्याचे मात्र टाळावे. रत्नागिरी ते आरेवारे अंतर १३ किलोमीटर आहे.

रत्नागिरी तील खाद्य पदार्थ | Best local foods in Marathi

      रत्नागिरी हा 168 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा असल्याने याठिकाणी विविध प्रकारच्या माशांचा आस्वाद पर्यटक घेऊ शकतात. फळांचा राजा हापूस आंबा रत्नागिरीमध्ये उत्पादित होतो.भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्या आंब्याची मागणी असते. दरवर्षी मे महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये आंबा महोत्सव भरवला जातो. आंब्या पासून बनवलेले पदार्थ आमरस कैरीचे पन्हे, मॅंगो शेक, कोकम सरबत भेळपुरी, महाराष्ट्रीयन थाळीचा पर्यटक आस्वाद घेत असतात.
रत्नागिरी पर्यटन
हापूस आंबा



रत्नागिरीला भेट देण्याची उत्तम वेळ | Best time to visit Ratnagiri in Marathi

        रत्नागिरी चे वातावरण वर्षभर प्रसन्न व शांत असल्याने पर्यटक वर्षांमध्ये कोणत्याही वेळी भेट देऊ शकतात.  समुद्रामध्ये जलस्नान करण्यासाठी व आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक उन्हाळ्यामध्ये जाऊ शकतात.

रत्नागिरीला जायचे कशे| How to reach Ratnagiri

      रत्नागिरी ला जाण्यासाठी रस्ते लोहमार्ग यांचा पर्यटक वापर करू शकतात.

रस्ता मार्गे रत्नागिरी ला कसे जावे| How to reach Ratnagiri by road

       रत्नागिरी ला जाण्यासाठी रस्ते मार्ग हा अतिशय उत्तम पर्याय आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी मधून जातो. पुणे सातारा कराड मार्गे रत्नागिरी जाऊ शकतात. कोल्हापूर रस्तामार्गे ही पर्यटक रत्नागिरीला जाऊ शकतो.

ट्रेन ने रत्नागिरी ला कसे जावे |How to reach Ratnagiri by train

         कोकण रेल्वे भारतातील प्रसिद्ध रेल्वे मार्ग पैकी एक आहे. कोकण रेल्वे रत्नागिरीतून जाते हा रेल्वे मार्ग भारतातील प्रमुख शहरांशी जोडले गेल्याने पर्यटक रेल्वेने ही रत्नागिरीला जाऊ शकतात. रत्नागिरी रेल्वे स्थानकाला ISO मानांकन मिळाले असून भारतातील सुंदर रेल्वे स्थानकांमध्ये समावेश होतो.
         



           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण