ठोसेघर धबधबा माहिती.
पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वर्षा सहलीचे वेध लागतात.त्यातच सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला असल्याने याला पर्यटनाचे नंदनवन म्हणून संबोधले जाते.पावसाळ्यात पर्यटक कास पठार, वजराई भांबवली धबधबा, नवजा ठोसेघर ,या ठिकाणी भेटी देत असतात.त्यातील कास पुष्प पठाराला युनिस्को वर्ल्ड हेरीटेज साइटचा दर्जा लाभला असल्याने हे ठिकाण जागतीक स्तरावर पोहोचले आहे.परंतु याला भेट देण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागते.
ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो.पावसाच्या पहील्या सरी बरसताच पर्यटकांचे पाय आपोआप या ठिकाणी ओढले जातात.सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर जवळ जवळ असल्याने आनंद द्विगुणित करतात.
पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे अनेक धबधबे पहायला मिळतात.परंतु पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे छोटा व मोठा धबधबा हे पाहताना समर्थ रामदास स्वामींच्या 'धबाबा आंधळे तोया' या ओळींची अनुभूती येते या दोन धबधब्यांना राम लक्ष्मण धबधबा असे म्हणतात. छोटा धबधबा 20 मीटर उंचीचा आहे तर मोठा 210 मीटर उंच आहे.
धबधब्याचा ठिकाणी पर्यटकांचा सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शक गॅलरी बांधल्याने धबधबा व्यवस्थीत पाहता येतो.वन विभागाच्या वतीने या ठिकाणी सिमेंट पेवर ब्लाॅक चे पादचारी मार्ग, दिशादर्शक फलक,प्रेक्षा गॅलरी व रेलिंग ची कामे केल्याने पर्यटकांच्या सुरक्षेत भर पडली आहे. छोट्या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाता येत असले तरी झालेले अपघात पाहता येथे जाण्यावर बंदी आहे. दरीमध्ये कोसळणारा मोठा धबधबा पाहून काळजात धडकी भरते. या ठिकाणी मुख्य धबधबा व समोरील समोरील डोंगरातून वाहणारे तीन उप धबधबे वाहतांना पाहून मन प्रसन्न होते.
धबधबा पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती पाच रुपये शुल्क आकारले जाते हे शुल्क स्थानिक वनव्यवस्थापन कमिटी मार्फत आकारले जाते. या परिसरामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. तिकीट घराच्या बाजूलाच कोयना अभयारण्यात आढळणाऱ्या दुर्मिळ प्राणी पक्षी साप कीटक वनस्पती यांची माहिती दर्शवणारे छोटेसे संग्रहालय आहे.
ठोसेघर ला जायचे कसे
ठोसेघर ला येण्यासाठी सातारा बस स्थानकातून व राजवाडा येथील बस स्थानकातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सोय आहे या बसेस प्रत्येक तासाला सातारा ते ठोसेघर फेरी मारतात. ट्रेन ने येणाऱ्यांसाठी माहुली हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. परंतु सज्जन गड ठोसेघर व चाळकेवाडी पवनचक्की प्रकल्प एकाच मार्गावरील जवळ जवळची ठिकाणे असल्याने एका दिवसामध्ये या तिनी ठिकाणाला भेटी देऊन आनंद द्विगुणित होऊ शकतो त्यासाठी मात्र खाजगी वाहनाने येथे येण्याचे नियोजन करावे लागेल.
काय काळजी घ्यावी
ठोसेघर हे पावसाळी सहलीचे ठिकाण असल्याने व या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सोबत छत्री किंवा रेनकोट असणे गरजेचे आहे. तीव्र उतारावरून वाहणारे पाणी असल्याने पाण्यात जाणे टाळावे. जेवण व नाष्टा साठी त्या परिसरामध्ये हॉटेल्स आहेत.
खूप च उपयुक्त माहिती आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुंदर प्रकारे माहिती दिल्याबद्दल...
उत्तर द्याहटवाखूपच छान माहित आहे.. धन्यवाद
उत्तर द्याहटवामाहिती छान आहे.
उत्तर द्याहटवाThoseghar waterfalls!
उत्तर द्याहटवाOne can hear the water swishing down at the rocks and getting collected into a divinity pool where children and family relax and play! 🌸
दगडधोंड्यातून खळाळत वाहणाऱ्या आणि निसर्गनिर्मित तरण तलावात साठणाऱ्या पाण्याच्या मंजुळ ध्वनीचा मनमुराद आस्वाद घ्या!!कुटुंबासोबत निवांत क्षण व्यतीत करा!!
#maharashtra #thoseghar #waterfall