सज्जनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे:
समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड किल्ला सातारच्या नैऋत्येस १३ कि.मी. अंतरावर आहे. प्रतापगड पासून सह्याद्री पर्वत रांगेची ऊपरांग शंभू महादेव डोंगररांगा जी पुर्वेकडे जाते त्या पैकी एका रांगेत उरमोडी नदीचा खोऱ्यात किल्ला आहे.
सज्जनगड ची माहिती:
समर्थ रामदास स्वामींच्या सहवासाने या किल्ल्याला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. परळी गावात किल्ला असल्या कारणाने या किल्ल्याला परळीचा किल्ला असेही म्हणतात.
ठोसेघर धबधबा व कास पुष्प पठार याच परीसरात असल्या मुळे पावसाळ्यात या ठिकाणी जास्त असते.समुद्र सपाटी पासून सज्जनगड किल्लाची उंची ३००० फुट इतकी आहे. किल्ला परळी गावात असल्याने या किल्ल्यास परळीचा किल्ला असेही म्हणतात.
समर्थ सृष्टी:
किल्ला पाहण्याची सुरुवात समर्थ सृष्टी पासून, सातार वरून सज्जनगड ला जाताना गजवडी फाटा लागतो.तिथूनच पुढे घाटामध्ये ज्ञानश्री शिक्षण समूहाच्या प्रांगणात समर्थ सृष्टी निर्माण केली आहे.तेथे सुरवातीला विशाल मारूती ची मुर्ति आहे, समर्थ सृष्टी मध्ये समर्थांचा जीवन प्रवास रेखाटला आहे.समर्थ स्थापित आकरा मारुतींची प्रतीकृती, समर्थांचा हस्ताक्षरातील पञ तसेच समर्थांचे व कल्याण स्वामींचे तैलचित्र मन प्रसन्न करते.
किल्ल्यावर काय पाहता येईल:
समर्थ सृष्टी पाहुन घाटमार्गे गडावरील वाहनतळा पर्यंत गाडीने जाता येते. वाहनतळा पासून गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने पुढे गेल्यावर मंडप घळ तिथे समर्थ ऊपासनेला बसत.तिथून माघारी येऊन पायवाटेने पुढे गेल्यावर महादरवाजा पाशी येऊन पोहोचतो,त्या दरवाजाला छञपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे म्हणतात.या महाद्वाराच्या आतील बाजूस द्वारपालांचा देवड्या आहेत. तिथेच बाजूला भिंतींवर लेख लिहिलेला दिसतो.
दरवाजातून पुढे डावीकडे जाणाऱ्या वाटेने गेल्यावर घोटाळे तळे आहे या तळ्यात घोड्यांना पाणी पाजत असतं तळ्याला लागूनच एका ईमारतीचे अवशेष दिसतात व अंगलाईदेवीचे मंदिर आहे या देवीच्या मूर्ती अंगापुरच्या डोहात सापडलेल्या,तसेच गडाच्या तटावरून आजुबाजुचा परीसरात नेहाळता येतो.तिथून माघारी येऊन पुढे गेल्यावर छोटी छोटी दुकाने हॉटेल समर्थ मंडळाची इमारत, श्रीराम मंदिर आणि समर्थांचा मठ आहे.
रामदास स्वामी समाधी सज्जनगड:
समर्थांच्या निर्वाना नंतर छञपती संभाजी महाराजांनी भूयारातील समाधी व मंदिर बांधले.मंदिर परीसरामध्ये अशोकवन ,अक्काबाईचे वृंदावन,वेणूबाईचे वृंदावन व समर्थांचा मठ आहे.मठाचा शेजघरात पितळी गुरांचा पलंग, पितळी हांडे, कुबडी, दंडा सोपा पिकदानी पानांचा डब्बा गुप्ती अशा समर्थांचा नित्य वापरातील वस्तू ठेवल्या आहेत . तिथेच एक मोठा बांधीव तलाव आहे त्या मधील पाणी पिण्यासाठी वापरतात.व दोन प्रसादग्रह आहेत. गडाचा पश्र्चिमेस धाब्याचा मारुती मंदिर आहे गडाचा तटावरून दिसणारे परळी खोरे वरळी धरणं अतिशय सुंदर दिसते.
सज्जनगड किल्ल्याचा इतिहास:
सज्जनगड किल्ल्याची उभारणी अकराव्या शतकात शिलाहार राजा भोज याने केली.या किल्ल्यावरील आश्वालय ऋषींच्या वास्तव्या मुळे आश्वालयगड असे ही म्हणतात. आदिलशाही चा ताब्यात असलेल्या या किल्लावर अफजल खानाचा मुलगा किल्लेदार होता.ई.स.१६७२ मध्ये छञपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतला.महाराजांचा विनंती वरून समर्थ गडावर वास्तव्यास आले . महाराजांनी २०००होन खर्च करून येथे मठ बांधून घेतला.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सज्जनगड असे नाव पडले. पुढे १६ जानेवारी १६८२ मध्ये गडावर रामाच्या मुर्ती बसवल्या व २२ जानेवारी १६८२ ला समर्थांनी देह ठेवला.१६९९ मध्ये सातारच्या किल्ल्याला औरंगजेबाने वेढा दिला त्या वेळी सज्जनगडा वरून रसद पुरवठा केला गेला. सातारच्या किल्ला पडल्या नंतर.ई.स.१७०० मध्ये सज्जनगडास वेढा दिला किल्ला मुघलांच्या ताब्यात जान्या पुर्वी समाधी शिळेमध्ये लपवण्यात आली तर रामाच्या मुर्ती वासोटा किल्ल्यावर नेऊन ठेवण्यात आल्या, औरंगजेबाने या किल्ल्यास नौरसतारा हे नाव दिले. शाहु महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर लगेचच म्हणजे १७०९ मध्ये किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला.व जिजाजी काटकर यांना किल्लेदार नेमले.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.इंग्रजांनी या किल्ल्यावर आपली स्वतंञ सेना नेमली.
सज्जनगड ला जायचे कसे: सज्जनगड ला जाण्यासाठी साताऱ्या मधुन बस सेवा सुरु आहे ती गडावरील वाहन तळावर सोडते .तसेच राजवाडा बस थांब्यावरुन खाजगी वाहनाने सज्जनगडाच्या पायथ्या पर्यंत जाता येते,तिथून पायी चालत गडावर जावे लागते.
सज्जनगड ला जाताना काय काळजी घ्यावी:
सज्जनगड ला जाताना अशी कोणतीही खास काळजी घेण्याची गरज भासणार नाही .
तुम्ही वर्षा तिला कोणत्याही महीन्यात तिथे जाऊ शकता.
गडावर मठामध्ये राहण्याची उत्तम सोय होते. तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात येते त्याचप्रमाणे रोज बारा वाजता गडावर विनामोबदला उत्तम जेवण भेटते.
पावसाळ्यात जर सज्जनगड ला गेला ठोसेघर धबधबा पाहण्याचा आनंद घेता येतो.
जवळची प्रेक्षणीय स्थळे:
ठोसेघर धबधबा,कास पुष्प पठार, अजिंक्यतारा किल्ला, पाटेश्वर शिव मंदिर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे