अजिंक्यतारा किल्ला कोठे आहे:
अजिंक्यतारा हा सातारा जिल्ह्यात असून स्वराज्याची चौथी राजधानीचा मान मिळाला किल्ला पहिला राजगड दुसरा रायगड तिसरा जिंजी तर चौथा अजिंक्यतारा. किल्ल्याची उंची ३०० मीटर असून किल्ला मध्यम आकाराचा आहे, त्यामुळे ट्रेकिंगच्या दृष्टीने सोपा समजला जातो.तो सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. सातारा शहराच्या कोणत्याही भागातून किल्ला सहज नजरेस पडतो विशेषतः लिंबू खिंडीतून किल्ल्यावरील नावाचा बोर्ड लक्ष वेधून घेतो.
अजिंक्यतारा किल्ला माहिती:
सह्याद्रीच्या डोंगर रांगेची बामनोली ही उपरांग जी प्रतापगड पासून ती पुढे सातारा पर्यंत येते तिच्यावर तिच्यावर किल्ला बांधला आहे. या भागात बरेच किल्ले असले तरी ते एकाच डोंगररांगेत येत नसल्याने त्यांना जोडणारी कोणते डोंगरान पाहायला मिळत नाही .
किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये शाहूनगर बसवले मराठ्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली नेली.
अजिंक्यतारा किल्ला फोटो |
पाटेश्वर मंदिर देगाव
अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास
सातारा किल्ला ११९० मध्ये शिलाहार राजा पहिला भोज याने बांधला. बहामनी सत्तेच्या उदयानंतर हा किल्ला बहामनी सत्तेच्या अधिपत्याखाली आला. बाहामनी सत्तेच्या विभाजनानंतर आदिल शाही अंमल सुरु झाला. किश्वरखान या सरदारांने पहिल्या आदिलशहाची बेगम चांदबिबी हिला १५८२ मध्ये निजामशाहीशी संगणमत करत असल्याच्या संशयावरून किल्ल्यात कैद करून ठेवले परंतु किश्वर खानचा पाडाव झाल्याने त्याच वर्षी तिची सुटका झाली. दिलावरखान आदिलशाहीत कट-कारस्थान करत असल्याने त्याला १५९२ या किल्ल्यात कैद करून ठेवले होते. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ जुलै १६७३ रोजी किल्ला स्वराज्यात आणला. त्याच दरम्यान महाराजांना अंगी ज्वर आल्याने या किल्ल्यात दोन महिने मुक्काम करावा लागला याच दरम्यान याठिकाणी रघुनाथ हणमंते त्यांच्याबरोबर कर्नाटक मोहीम व त्याचे नियोजन करण्यात आले.
शंभूराजेंच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने स्वराज्यातील आक्रमण तिव्र केले परंतु छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांनी गडकोटांच्या मदतीने मोघलांना कडवी झुंज दिली.राजाराम महाराजांनी अजिंक्यतारा राजधानीचा किल्ला केला. बिथरलेल्या औरंगजेबाने गडकोट काबीज करण्याची मोहीम हाती घेतली त्याच अनुषंगाने त्याने वसंतगड जिंकून त्याचे नाव 'किली-दे- फतेह' अर्थात यशाची किल्ली असे ठेऊन फौजफाट्या सह सातारा किल्ला घेण्यासाठी चालून आला.
सातारा किल्ला राजधानी चा किल्ला असल्याने शिबंदी,रसद, दारुगोळा,व इतर साधनं सामग्री मोठ्या प्रमाणात होती. इ.स.१६९९ मध्येमोघल सरदार तबियत खान ने मोर्चे बांधणी करून किल्याला वेढा दिला. किल्लेदार प्रयागजी प्रभू नी किल्ला तब्बल साडेचार महिने झुंजत ठेवला.किल्लावर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा होत होता तरीही साडे चार महिने किल्ला तरी किल्ला हाती येत नसल्याने गडाची टेहळणी करून तोफांचा मारा तिव्र केला.
१३एप्रिल १७०० रोजी मंगळाईच्या बुरुजा खाली सुरूंग लावून तो उडवून दिला.तटाची भिंत कोसळल्याने किल्ल्यावरील अनेक लोक कामी आले.या घटनेनंतर प्रयागजी प्रभूंनी मोगलांवर हल्ला करून बरेचसे मोगली सैन्य कापून काढले.
परशुरापंतानी यांनी रहुल्लाखानाच्या मध्यस्तीने मोगलांशी तहाची बोलणी करून २१ एप्रिल १७०० मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मोगलांनी किल्ल्याचे नाव 'आझमतारा' असे केले
१७०६ मध्ये महाराणी ताराबाईंचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव अजिंक्यतारा केले छत्रपती शाहूंनी मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर अजिंक्यतारा काबीज करून त्या ठिकाणी १७०८ मध्ये राज्याभिषेक करून घेतला मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार अजिंक्यतारा किल्ल्या वरून होता.१७१९ मध्ये महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास होत्या तसेच महाराणी ताराबाई १७३१ अखेर पर्यंत अजिंक्यतारा किल्ल्यावरच वास्तव्यास होत्या. सालापासून १८४९ पर्यंत किल्ला सातारच्या राजघराण्याच्या ताब्यात होता.
अजिंक्यतारा किल्ला सातारा |
अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:
गाडी वाटेने गडावर आल्यानंतर पश्चिमेकडील बाजूला महादरवाजा असून त्याचा बूरूज व दार आजही मजबूत आहे.दरवाजाची उंची इतकी आहे की अंबारी सह हात्ती दरवाजातून सहज आत जाईल.आतील बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या असून त्याच्या जोत्यावर वाली सुग्रीव युध्दाचा प्रसंगाचे देखावा कोरलेला आहे, तसेच वलच्या बाजूला नागांचे शिल्प कोरलेले आहे. पायऱ्या चढून गेल्यावर अजून एक दरवाजा आहे त्यातून आत आल्या नंतर महादेवाचे छोटे मंदिर असून त्याच्याच मागच्या बाजूला भव्य मारुतीचे मंदिर ही आहे.मंदीराच्या बाजूने बूरुजावर गेल्यानंतर समोरच सज्जनगड परळीचे खोरे तसेच यवतेश्वर व घाट रस्ता नजरेस पडतो. पावसाळ्यात या ठिकाणावरून दिसणारे नयनरम्य दृश्य पाहण्या सारखे असते.
अजिंक्यतारा किल्ला फोटो |
किल्ल्यावर पाण्याची सात तळी आहेत, त्यामध्ये पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते.गडावर दुरदर्शन व आकाशवाणी ची प्रक्षेपण केंद्र असून त्यांचे मनोरे याच ठिकाणी आहेत .महाराणी ताराबाईंचा राजवाडा तसेच अन्य ऐतिहासिक वास्तूंचे चौथरे तेलातुपाचे रांजन, राजसदर पहायला मिळतात .गडाच्या पुर्वे कडील टोकाला मंगळाई देवीचे मंदिर व त्याच्या अवतीभवती अनेक शिल्पे कोरलेली आढळतात.बाजूलाच अजिंक्यतारा नावाची मोठा फलक लावण्यात आला आहे.या ठिकाणावरून चंदन वंदन किल्ले व जरंडेश्वर चा डोंगर दिसतो.बरूजाच्या कडेने दक्षिण दिशेला गेल्यानंतर तटामध्ये एक दरवाजा दिसतो,दरवाजा प्रशस्त असून मजबूत आहे.येथून चार भिंती कडे मार्ग जातो.
छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये गडाच्या पायथ्याशी नियोज बध्द शहर वसवून पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली जमिनीवर आणली त्यासाठी शहरात मोठ मोठ्या वास्तू निर्माण केल्या.त्यामध्ये अदालत वाडा, राजवाडा, जलमंदिर,तख्ताचा वाडा,अशा वास्तूंचा समावेश होतो.
महादेव मंदिर अजिंक्यतारा सातारा |
अजिंक्यतारा किल्ला पहायला जायचे कसे:
अजिंक्यतारा किल्लावर जाण्यासाठी सातारा शहरांमध्ये यावे लागते चार चाकी गाडीने जायचे असेल तर गोडोली मार्गे पक्का रस्ता आहे रस्ता गडाच्या महादरवाजा पर्यंत जातो.
चालत जाणार असेल तर सातारा बस स्थानकातून समर्थ मंदिर मार्गे जाणाऱ्या बस ने बोगदा या ठिकाणावर उतरून पायवाटेने २० मिनीटात महादरवाजात पोहोचतो.तसेच पोवई नाक्यावरुन चार भिंती मार्गे तसेच अदालत वाड्यापासूनही जाता येते.
रेल्वे मार्गे येणाऱ्यां साठी माहुली हे जवळचे रेल्वेस्थानक आहे येथून राजवाडा ते रेल्वेस्टेशन बस सेवा सुरु आहे.या बस ने राजवाडा येथे उतरून समर्थ मंदिर मार्गे गडावर जाता येते.
काय काळजी घ्यावी:
- किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्याने पाणी बरोबर घेऊन जावे.
- मारुती मंदिरात १५ जणांच्या रहाण्याची सोय होईल .
- गडावर जेवणाची नाष्टा सोय नाही त्यासाठी सातारा शहरात करावी लागेल.
- किल्ल्यावर जाणारा रस्ता अरुंद तिव्र उताराचा व नागमोडी वळणाचा असल्याने वाहणे सावकाश चालवावी.
Chan
उत्तर द्याहटवा