प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्या पैकी एक किल्ला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाचा पश्र्चिमेस २२कि. मी. अंतरावर पार व किनेश्वर च्या मध्ये भोरप्या डोंगरावर आहे. किल्लाची निर्मीती १६५७ ला छञपती शिवाजी महाराजांनी करून घेतल
प्रतापगड किल्लाची माहिती :
पार्किंग पासून काही पायरी चढून गेल्यावर तटबंदी मध्ये लपलेला महादरवाजा लागतो तिथून उजव्या बाजूला टेहळणी बुरुज पहायला जाता येते या बुरुजावर अफझल खानाचे मुंडके पुरले होते. बुरूजावरून समोर अफझल खानाची कबर,तसेच पार हे सुंदर व ऐतिहासिक गाव दिसते या गावांमध्ये श्री राम वरदायिनी देवी मंदिर आहे. टेहळणी बुरूज बघीतल्या नंतर बाले किल्ला कडे जाताना महादरवाजा लागतो, शिवकालीन रिती प्रमाणे दरवाजा सुर्यास्था नंतर बंद केला जातो तर सुर्यास्था बरोबर उघडला जातो. तिथे छोटी छोटी दुकाने थाटली आहेत.
महादरवाज्यातून आत गेल्यावर भक्कम बुरुज पाहून पायरी मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते.मंदिर भव्य व आकर्षक असुन मंदिरातील भवानी मातेची मूर्ती छञपती शिवाजी महाराजांनी नेपाळ मधील गंडकी नदीतील शिळा आणुन घडउण घेतली आहे. मंदिरामध्ये भवानी मातेच्या मुर्ती बरोबरच महाराजांच्या पुजेतील स्फटिकातील शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिर परिसरात तोफा ठेवलेल्या आहेत.मंदीराच्या दक्षिण बाजूस हस्तकला दालन पहायला मिळते. मंदिरापासून पुढे गेल्यावर हणुमानाची मुर्ती दिसते. तिथुनच पुढे बालेकिल्ला चे प्रमाण.प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर केदारेश्वराचे मंदिर दिसते मंदिरातील शिवलिंग भ्रम दिव्य आहे.मंदिराचा बाजुला प्रशस्थ राज सदर आहे. व त्यांच्या मागिल बाजूस राजमाता जिजाऊंचा वाड्याचे अवशेष आहेत. तिथेच बाजूला बागेमध्ये छञपती शिवाजी महाराजांचा अतिभव्य अश्वारूढ पुतळा आहे. तिथेच पश्र्चिमेस तटबंदी वर जाऊन जावळी खोरे विहंगम दृश्य दिसते. तसेच शासकीय विश्रामगृहात, राजघराण्याचा दिंडी दरवाजा आहे,जवळच रेडका बुरुज यशवंत व सुर्य बुरुज आहेत.
प्रतापगडाचा इतिहास:
प्रतापगडाचा इतिहास पाहिला तर १६५६ मध्ये चंद्रराव मोरे चा पराभव करून शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली. रडतुंडी घाट पार घाट यांचा तोंडावर भोरप्या डोंगर दिमाखात उभा पाहुन शिवाजी महाराजांनी या ठिकाणी किल्ला बाधण्याची आज्ञा पिंगळे यांना केली . पिंगळे यांनी आपले कौशल्य पणाला लावून १६५८ साली किल्ला बांधुन पुर्ण केला,या किल्ल्याचा उद्देश जावळी खोरे व कोकणावर लक्ष ठेवणे हा होता
अफजल खानाचा वध:
विजापूर च्या बेगम ने शिवाजीचा बंदोबस्त करावा असे फर्मान सोडले याचा विडा उचलून (मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा) अफजल खान स्वराज्यावर चालून आला तो पंढरपूर शंभु महादेव मलवडी रहीमतपूर मार्ग वाईला दाखल झाला. अफजल खान स्वराज्यत ज्या ज्या मार्गाने आला तिथे त्याने मंदिर पाडने शेतीचे नुकसान करने असा उपद्रव करायला सुरुवात केली त्याचा असा अंदाज होता की या कारवायांना वैतागून शिवाजी महाराज आपल्याला समोरासमोर येतील व आपन त्यांचा सहज पराभव करु परंतु शिवाजी महाराजांच्या मनात अफजल खानाला रोखण्याची वेगळीच योजना आखली होती.शिवाजी महाराजांनी अफझल खानाला गोड बोलून प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी बोलावले. शिवाजी महाराजांना अफझल खानने मिठीत दाबून मारण्याचा प्रयत्न केला परंतु महाराजांनी आपल्या जवळील वाघ नख्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला.
किंल्ला १६५८ ते १८१८ पर्यंत मराठी साम्राज्यात होता नंतर तो ईष्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला व भारतीय स्वातंत्र्य नंतर तो१९४७ साली भारताच्या ताब्यात आला . प्रतापगड किल्ला खाजगी असुन तो छञपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मालकीचा आहे.
प्रतापगड ला जायचे कसे:
प्रतापगड ला दोन मार्गांनी जाता येते वाई महाबळेश्वर मार्गे व महाड पोलादपूर महाबळेश्वर मार्गे . महाबळेश्वर मधून टॅक्सी ने प्रतापगड ला जाता येते. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून महाबळेश्वर लागले ST BUS सुविधा आहे.
प्रतापगड पाहायला जाताना काय काळजी घ्यावी:
प्रतापगड किल्ला तुम्ही वर्षा तिला कोणत्याही ऋतूत महिन्यात पाहु शकता तसेच जेवण नाष्टा करण्यासाठी हॉटेल आहेत जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करनार असाल तर त्याबद्दल माहिती आधीच घ्यावी, किंवा महाबळेश्वर मधून टॅक्सी ने प्रतापगड ला जावे.

जवळची प्रसिद्ध ठिकाणे:
पार महाबळेश्वर, तापोळा, पाचगणी
Khup sundar mahiti You may also like to Watch youtube vlog Explains Pratapgad History & Information in Marathi Also read our Blog article on Pratapgad Fort Information
उत्तर द्याहटवा