मुख्य सामग्रीवर वगळा

शिवनेरी किल्ला माहिती | Shivneri fort information in Marathi

शिवनेरी किल्ला माहिती:

नाव:              शिवनेरी

प्रकार:              गिरिदुर्ग

उंची:               ३५०० फूट

ठिकाण:           जुन्नर

जिल्हा:             पुणे

डोंगररांग:        नाणेघाट 

किल्ल्याची चढाई: मध्यम 

सद्यस्थिती:.        उत्तम

शिवनेरी किल्ला माहिती:
पाळणा


छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ:

        जुन्नर शहरातील शिवनेरी किल्ला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे जन्मस्थळ असलेला किल्ला आहे. या किल्ल्याला मराठी मना मनात विशेष आदराचे स्थान आहे. शिवनेरी हा गिरिदुर्ग प्रकारातील असून त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची ३५०० फोटो एवढे आहे तर पायथ्यापासून ची नऊशे फूट एवढी आहे. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म या किल्ल्यावर झाला असल्याने या ठिकाणी दरवर्षी 19 फेब्रुवारीला शासकीय इतमामात शिवजन्मोत्सव चा कार्यक्रम आयोजित केला जातो.

शिवनेरी किल्ला कुठे आहे:

        पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात असलेला शिवनेरी किल्ला नाणेघाटातून चालणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी निर्माण केला आहे. या वाटेवरील घाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन हडसर शिवनेरी व चावंड किल्ला ही दुर्ग चौकडी ओळखले जाते. या प्रदेशातील डोंगरांमध्ये अनेक प्राचीन लेणी समूह पाहायला मिळतात त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ल्याच्या पोटामध्ये अनेक लेणी आहेत. जुन्नर मधील किल्ले, बौद्ध लेण्या, चैत्यगृह, पाण्याची टाकी, धबधबे, अशी अनेक पर्यटन स्थळ असल्याने जुन्नर ला महाराष्ट्राचा पर्यटन तालुका असे म्हणतात.

        महाराष्ट्रातील काही चांगल्या अवस्थेत असलेल्या किल्ल्यांमध्ये शिवनेरी चा समावेश होतो. या किल्ल्यावर केलेले संवर्धनाचे काम त्याच बरोबर वनविभागाने केलेल देखरेख यामुळे किल्ला अतिशय चांगल्या स्थितीत आहे.

शिवनेरी किल्ला माहिती:
बदामी तळे



शिवनेरी किल्ल्याचा इतिहास:

       जुन्नर हे प्राचीन शहर असून इसवी सन पूर्व काळा पासून महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. शकांची राजधानी असलेल्या या शहरावर शक राजा नहपानाने राज्यकारभार केला.

       शकांचा पाडाव करून सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने जुन्नर व भोवतालचा परिसर आपल्या राज्यात सामावून घेतला. सातवाहन कालखंडामध्ये नाणेघाटा वर आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी अनेक दुर्गांची निर्मिती केली. सातवाहनांनी शिवनेरीवर बांधकाम करून त्याला गडाचे स्वरूप प्राप्त करून दिले.

       सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी लेणी खोदून वाटसरूंच्या निवासाची सोय केली. शिवनेरी किल्ला बरेच काळ सातवाहनांच्या आधिपत्याखाली होता. कालांतराने शिवनेरी ने चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटी ही पाहिल्या.

       ११७० ते १३०० या कालखंडामध्ये यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले याच काळात गडाचे बांधकाम करून किल्ला अधिक मजबूत करून घेतला.

       इ.स.१४४३ मध्ये मलिक- उल- तूजार याने किल्ल्याच्या सेवेत असणाऱ्या स्थानिक महादेव कोळी सरकारचा पराभव करून किल्ला बहामनी राजवटीखाली आणला. बहामनी सल्तनतिच्या विभाजनानंतर शिवनेरी किल्ल्यावर १६४६ मध्ये निजामशाहीची स्थापना केली.

       १५९३ मध्ये इथली राजधानी अहमदनगरला हलविण्यात आली.

       १५६५ मध्ये शिवरायांचे खापर पंजोबा मालोजी व खेळोजी भोसले यांना जुन्नर परगण्याची सुभेदारी देण्यात आली होती.

       जुन्नर प्रांत शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीत असताना त्यांनी आपल्या ५०० सैन्यासोबत गर्भवती जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. या काळामध्ये किल्ल्यावरील शिवाय देवीला नवस बोलला पुत्र झाला तर त्याला तुझे नाव देईन, आणि तो दिवस उजाडला

शके १५५१ शुक्र नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला वार शुक्रवार शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०

      गडावर सिघोजी विश्वासराव हे किल्लेदार होते.  विश्वासराव यांच्या मुलीचा थोरले पुत्र संभाजीराजे यांच्याशी विवाह करण्यात झाला होता  बाल शिवाजी मा जिजाऊ सोबत गडावर दोन वर्ष मुक्कामी होते. १६३२ मध्ये मा जिजाऊ बाल शिवाजी सह गड उतार झाल्या.

      जुन्नर मधील संग्रामात  शिवरायांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांनी अतुलनीय पराक्रम करून किल्ल्या वरील आक्रमण थोपवून धरले.

      इस १६३७ मध्ये किल्ला व जुन्नर चा परिसर मोगलांच्या अंमलाखाली आला.

      इस १६५० मध्ये स्थानिक महादेव कोळी समाजाने किल्ल्यावर आक्रमण केले यावेळी खेमाजी रहातवाण आणि सरनाईक यांनी नेतृत्व केले परंतु मोगली सेनेपुढे यांची ताकत अपुरी पडली व महादेव कोळी यांचा यामध्ये पराभव झाला.

      इस १६७३ साली शिवरायांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला.

     शिव कालखंडामध्ये मराठ्यांनी बरेच वेळा शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो कधी हाती आला नाही. स्वराज्य मध्ये जुन्नर प्रांतातील बरेच किल्ले होते परंतु शिवनेरी मात्र येत नव्हता.

      छत्रपती शाहूंच्या कालखंडामध्ये इ.स. १७१३ मध्ये शाहूंनी शिवनेरी किल्ला जिंकून मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणला.

       माधवराव पेशवे यांचा प्रशासनातील हस्तक्षेप स्थानिकांच्या पचनी पडला नाही त्याच्याविरोधात महादेव कोळी समाजाने किल्ल्यावर बंड पुकारले. कोळी लोक शिवनेरीवर अचानक गडावर हल्ला करत होते, अशाच प्रकारचे बंड जीवधन चावंड हडसर किल्ल्यावरील झाले होते.

       पेशवे कालखंडामध्ये शिवनेरी किल्याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला जात असे त्या अनुषंगाने तुळाजी यांना कैदेत ठेवले होते याची नोंद आढळते.

      १० में १८१८ मध्ये मेजर एन्ड्रीजन ने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला, किल्लेदाराने किल्ला लढवला मात्र त्याचा निभाव लागला नाही त्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला. नंतर किल्ला इस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आला.

शिवनेरी किल्ला माहिती:
शिवजन्मस्थान

हेही वाचा कार्ला लेणी
             थिबा पॅलेस रत्नागिरी


शिवनेरी किल्ला ट्रेक:

        शिवनेरी किल्ला ट्रेक करण्यासाठी साखळीची वाट व सात दरवाज्यांची वाट कशात दोन वाटा आहेत

  1. साखळीची वाट 

       जुन्नर शहरातील छत्रपती शिवरायांचा पुतळा असलेल्या चौकातून डाव्याबाजूला सातशे ते आठशे मीटर चालत गेल्यानंतर एक मंदिर लागते या मंदिराच्या समोरून मळलेली पायवाट गडाच्या कातळ कड्याखाली जाऊन पोहोचते व संरक्षणासाठी साखळीच्या साह्याने हा कडा चढून वर जावे लागते हि पाय वाट तशी जोखमीचे आहे.

सात दरवाज्यांची वाट:

      जुन्नर मधील शिवरायांचा पुतळा असले चौकातून डाव्या बाजूला जाणाऱा रस्ता किल्ल्याच्या पायर्‍या जिथे सुरू होतात तिथ पर्यंत जाऊन पोहोचतो हा पक्का रस्ता जवळ जवळ अर्धाअधिक किल्ल्यापर्यंत आहे. डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच गडाचा पायरी मार्ग सुरु होतो.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे:

     डांबरी रस्त्याने गडाच्या वाहन तळापर्यंत आले की तिथून पुढे बालेकिल्ल्यावर जाणारा प्रशस्त पायरी मार्ग सुरु होतो,पायरी मार्गाच्या डाव्या बाजूला झाडी, रेलिंग,व वनविभागाने लावलेले माहिती फलक दिसतात. रेलिंग चर्या पलिकडे पाण्याचे भलेमोठे टाके लागते या वाटेने गडावर जाताना सात दरवाजे लागतात.

     पहिला दरवाजा महादरवाजा असून दरवाजा प्रशस्त आहे दरवाज्याच्या आतील बाजूला दगडी जिना आहे जो दरवाजाच्या कमानीवर जातो. या दरवाजातून आत गेल्यानंतर दुसरा गणेश दरवाजा लागतो. या दरवाजाच्या कमानीवर सिंहासारखा दिसणाऱ्या प्राण्यांची शिल्पे त्याचबरोबर कुत्रा हत्ती व गरुडाचे शिल्प दिसते. या दरवाज्यातून आत गडाचा तिसरा पिर दरवाजा हा  ढासळलेला असून त्याच्यावर आतील बाजूस जिना पहायला मिळतो.  चौथ्या हत्ती दरवाजातून हात जाताच गडावरील काही वास्तू दिसतात . गडाचा पाचवा शिपाई दरवाजा या दरवाजाला लाकडी द्वार, कडी कोंयंडे व टोचणे आजही दिसून येतात. हा दरवाजा खास असून यावर आतील बाजूस कमानीवर जाण्यासाठी दगडी जिना बांधला आहे.

     या ठिकाणापासून आत डाव्याबाजूला डोंगरात खोदलेली लेणी व पाणी टाकी दिसतात.या टाक्यात बारमाही पाणी असले तरी त्यामधील शेवाळामुळे त्याचा रंग हिरवट दिसते. उजव्या बाजूला जाणाऱ्या पायवाटेने थोड्या अंतरावर शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवाई देवी मंदिराकडे जात असताना वाटेत खडकात खोदलेले खांब टाके असून त्याला जाळी मारून संरक्षित केले आहे. या टाक्यातील पाणी अतिशय मधुर व थंडगार असते. याच्याच पुढे आकर्षक कमानी दरवाजा लागतो या दरवाजातून आत गेल्यानंतर गुहेमध्ये मंदिर आहे सध्याचे मंदिराचे रूप जिर्णोद्धारा नंतरचे आहे. यात शिवाय देवी वरून छत्रपती शिवरायांचे नाव ठेवले गेले होते.

     मंदिरापासून पुढे गेले की काही अंतरावर कतळात खोदलेली बौद्ध लेणी दिसून येतात त्याच भिंतीवर शिला लेखी ही आढळतो. या गुहांच्या पुढे पाण्याची टाके आहेत.

     मंदिर पाहून सरळ  पुढे गेल्यास गडाचा सहावा दरवाजा लागतो हा दरवाजा मेना किंवा फाटक दरवाजा म्हणून ही ओळखला जातो. याच्यापुढे गडाचा शेवटचा सातवा दरवाजा कुलाबकर दरवाजा आहे. या दरवाजांच्या जीर्णोद्धार करून लाकडी दरवाजे बसवले आहेत.

शिवनेरी किल्ला माहिती:
दरवाजा


     सातव्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यानंतर अंबरखाना लागतो. याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे, अंबरखान्याची सद्यस्थितीला पडझड झाली असून लाकडी चौकट मारून आधार दिल्याचे दिसून येते.

      अंबर खाण्याच्या मागील बाजूस  गडाची सुंदर तटबंदी व बुरुज आहे. गडाला नैसर्गिक प्रकारे उभा ताशीव कातळकडा असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. अंबरखान्या पासून समोरच असणारी पायवाट शिवकुंजा कडे जाते या वाटेने जात असताना शिवनेरी वरील प्रसिद्ध गंगा जमुना पाण्याची तळी त्याच प्रमाणे इतरही अनेक पाण्याचे टाके दिसून येतात. गंगा जमुना ही सातवाहनकालीन पाण्याचे टाके आहेत

       शिवकुंजा मध्ये मा जिजाऊ समोर बाल शिवाजींच्या हातात  तलवार घेतलेली पंचधातूची मूर्ती आहे. शिवकुंजा समोरच मोठी कमान व पाण्याचे टाके आहे याला कमानी टाके असे म्हणतात. कमान उंच असल्याने ती सहज दुरून ओळखता येते. याच्या भिंतीवर फारसी भाषेत कोरलेला शिलालेख आढळतो. कमानीच्या पुढे डाव्या बाजूला राजवाड्याची काही औषध दिसून येतात, यामध्ये मुख्यत्वे हमामखाना व दगडी कारंजा दिसून येतो. राजवाड्याच्या पुढे दुमजली शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत म्हणजे शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर पाळणा व शिवरायांचा पुतळा आहे तर वरील मजल्यावर कोरीव काम केलेला सज्जा व कवडसे दिसतात यातून जुन्नर व बाजूचा परिसर दिसतो.

     कडेलोट टोकाकडे जात असताना वाटेत बदामी तळे लागते हे बांधिव  मोठे तळे आहे. याच्यापुढे गडाच्या टोकाला टकमक टोक आहे. याची खोली सुमारे १५०० फूट एवढी असून या ठिकाणाहून अपराध्यांचा कडेलोट केला जात असे.. शिवकुंज यापासून माघारी येताना एक घुमटी असून ही महादेव कोळी किंवा काळी गुमटी म्हणून ही ओळखले जाते. या ठिकाणी पंधराशे महादेव कोळी समाजातील सैन्याचा शिरच्छेद करण्यात आला होता. त्याचप्रमाणे इथे एक दर्गा ही आहे.

     गडावर फिरताना जागोजागी दिशादर्शक फलक, माहिती फलक दिसून येतात त्याचप्रमाणे बागा, उत्तम पायवाटा असून त्यांचा रखरखाव चांगल्याप्रकारे ठेवला जातो. शिवनेरी वरून जुन्नर शहर, जीवधन, चावंड, भैरवगड, हडसर, या किल्ल्यांचे दर्शन होते



शिवनेरी ला कसे जायचे:

          शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याशी असणाऱ्या जुन्नर शहरांमध्ये प्रथम यावे लागते.

पुणे मार्गे:

         पुण्यावरून येण्यासाठी नाशिक फाटा मार्गे चाकण मंचर नारायणगाव मार्गे जुन्नर ला येता येते जुन्नर मधील शिवरायांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूला जाणारी वाट गडावर जाते.

         सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांसाठी पुण्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्नर मार्गे जात असतात त्यामध्ये नाशिक सटाणा आळेफाटा जुन्नर या बसेस चा समावेश होतो.

मुंबई मार्गे:

         मुंबईवरून येणारे पर्यटक माळशेज घाट मार्गे किंवा तळेगाव मार्केट ला येऊ शकतात.

         एसटीने येणारे मुंबई नगर बसने आळेफाटा येथे उतरून जुन्नर ला येऊ शकतात.

 रेल्वे मार्ग:

     मुंबई-पुणे लोहमार्गा वरील खडकी हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

काय काळजी घ्यावी: 

      किल्ला पाहण्यासाठी साधारण चार तास लागतात.

      गडावर पाण्याची बारमाही व्यवस्था आहे.

      शिवकुंज याच्या मागील शेडमध्ये दहा ते बारा जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

      गडावर जेवण व नाश्त्याची सोय नाही ती गडाच्या पायथ्याशी होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

हरिश्चंद्रगड किल्ला माहिती |Harishchandra gad information in Marathi

हरिश्चंद्रगड Harishchandra gad in Marathi  नाव :                   हरिश्चंद्रगड किल्ला उंची :        ४६०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग :            माळशेज जिल्हा :             अहमदनगर चढाई :              मध्यम सद्यस्थिती :         चांगली हरिश्चंद्रगड किल्ला माहिती | Harishchandragad fort information in Marathi          सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.       ...