कार्ला लेणी:
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील कार्ला गावात प्राचीन बौद्ध लेण्या आहेत. हे गाव पुण्यापासून 58 कि.मी.अंतरावर आहे. कार्ला गावच्या डोंगरा मध्ये खडक कापून लेण्यांची निर्माण केली आहेत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत लेण्या आहेत. लोणावळा पासून त्यांचे अंतर १० किमी आहे.
कार्लाला कसे जायचे:
जर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करत असाल तर जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही कार्लाला पोहोचू शकता, जर तुमच्याकडे खासगी वाहन नसेल तर ट्रेन उत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही ट्रेनने जात असाल तर मळवली जवळील रेल्वे स्थानक आहे. स्थानका बाहेरून रिक्षा पकडुन तुम्ही कार्ला ला जाऊ शकता. लोणावळा येथून बसचीही सुविधा आहे. कार पार्किंग पासून काही पायरी चढून गेल्यावर तिकीट घर असून. लेण्या पाहण्यासाठी तिकिट आवश्यक आहे, तिकीट दर भारतीय लोकांसाठी 25 रुपये आणि परदेशी लोकांसाठी 300 रुपये आहेत.
कार्ला लेणी माहीती
सर्व प्रथम आपणास बौद्ध भिक्षूंचे खडकात खोदलेले मठ दिसतात. थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला एकविरा देवीचे मंदिर दिसेल. मंदिराच्या बाजूलाच एक मोठे चैत्यग्रह आहे, त्याची उंची अकरा मीटर रुंदी अकरा मीटर आणि लांबी चाळीस मीटर आहे. लेण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात बैध्द भिक्षूंनी केली असावी. चैत्यग्रहातील काष्टकाम व चिञलेख आकर्षक आहेत. चैत्यग्रह आकर्षक आसुन हॉलच्या खांबावर घोड्यांची शिल्प कोरलेले आहेत तसेच विविध प्रसंगांचे प्रतीकात्मक चित्र पहायला मिळतात.येथे ब्राम्ही लिपीत लेख लिहलेला आहे, तसेच बुध्दांची मुर्ती पहायला मिळते . चैत्यग्रहाचा बाहेरील भिंतींवर स्ञी पुरुषांची भित्ती चिञे आहेत,तसेच बाजूच्या भिंतीकडे तिन हत्तींच्या मूर्ती असुन भिंतींवर वरखाली उत्कृष्ट जाळीदार नक्षी कोरलेली आहे. सिंह स्तंभ इथल्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे, स्तंभाची उंची जास्त आहे व वरील बाजूस सिंहा चे शिल्प कोरलेले आहे.
आपण काय काळजी घ्याल:
वर्ष भरात कधीही येथे येऊ शकता. कार्ला लेण्या पाहण्यासाठी दोन तास पुरेसे आहेत. न्याहारी तसेच मुक्काम करण्यासाठी हॉटेल आहेत. जर आपण सार्वजनिक वाहतूक (ट्रेन) वापरण्याची योजना आखत असाल तर ट्रॅनचे वेळापत्रक पहावे.
जवळपासची ठिकाणे: भाजे लेणी, लोहागड, तुंग किल्ला, तिकोना किल्ला
पुणे ते कार्ला लेणी: 58 कि.मी.
लोणावळा ते कार्ला लेणी: 1० किमी
मुंबई ते कार्ला लेणी: km km कि.मी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे