मराठे शाहीचा इतिहास आणि गडकिल्ले यांचे नाते म्हणजे आई मुला सारखे घट्ट,या किल्ल्यांनी किती मावळ्यांना लढाई आणि गणिमी कावा करायला शिकवले असेल याची गणतीच नसेल.काती लढाया पाहिल्या असतील,किती तोफांचे गोळे पाठीवर घेतले असतील फक्त त्यांनाच माहीत. स्वराज्याचा पाया रचला तोही गडांच्या साक्षीने आणि यांची मुहूर्त मेड रोवली ती म्हणजे छञपती शिवाजी महाराजांनी.
परिचय:
सह्याद्री पर्वत रांगेत अनेक किल्ले उभे आहेत. त्यातील नाणेघाट या व्यापारी मार्गावर घाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन,हडसर, शिवनेरी, आणि चावंड किल्ले परिचयाचे आहेत.चावंड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटी पासून उंची साधारण ३४०० फूट एवढी आहे. कुकड नदी च्या उगम स्थाना पाशी गड असल्याने याला 'कुकडनेर' असेही म्हणतात.
चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे.या किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावात पोहचायला ४०-४५ मिनिटे लागतात.येथे पोहोचवल्या नंतर आपल्याला मोबाईल ही फालतू गोष्ट आहे असे हमखास वाटते कारण या ठिकाणी कोनत्याही मोबाईल सिम कार्ड ला रेंज येत नाही.चावंड गावात किंवा गडाच्या पायथ्याशी वाहने जातात.
चावंड गावातील आश्रमशाळे पासुन मळलेल्या पायवाटेने चालाय सुरुवात केल्यानंतर, समोर दिसणारा ९०अंश कोनातील कातळ कडा धडकी भरेल असा भासत असला तरी Tracking करणे सोपे आहे. साधारण २० मिनीटांचा चाली नंतर गडाच्या पायरी मार्गावर येऊन पोहोचतो.
गड दर्शन:
वनविभाग व शिवाजी ट्रेल या संस्थेने केलेल्या पायरी व रेलींग कामामुळे गड चढणे सोपे झाले आहे या साधारण ३५०-४०० पायऱ्या आहेत. तर काही पायरी खडकात कोरलेल्या आहेत,दिड फूट उंचीच्या एकूण १००-१२५ पायरी आहेत.पायरी मार्गे वर गेल्यानंतर गणेश पट्टी शिल्प असलेल्या दरवाजात येऊन पोहोचतो.दरवाजा उंच पूरा असून कोरीव दगडात यांचे बांधकाम झाले आहे. दरवाजाच्या वरती व बाजूला गणपतीच्या दोन मूर्ती कोरलेल्या आहेत.या दरवाजातून आत गेल्यानंतर जुनाई देवी चे दर्शन होते,याच ठिकाणी आजूबाजूला उध्वस्त वास्तू व त्यांचे अवशेष पहायला मिळतात.
उजव्या बाजूस जानाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पुष्करणी पहायला मिळते.तिच्या भिंतीवर बरेच नक्षीकाम केलेले आहे.तिच्या मधील पाणी खुप खराब असून पिण्या योग्य नाही.आशी मान्यता आहे की आकाशातून येणाऱ्या अति शुद्ध लहरी या पुष्करणी जवळ येकञ येतात . बाजूलाच एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे,या मंदिरात पिंड असून तिची साळूंखी अस्तीत्वात नाही.
उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर गेले असता काही वास्तूंचे अवशेष व एका इमारतीचा चौथरा दिसतो. या ठिकाणी ३००-४०० वर्ष जुनी सौचालर पहावयास मिळतात.या वास्तू पाहून असा निष्कर्ष काढू शकतो की या ठिकाणी पुर्वी नागरी वस्ती असावी.या ठिकाणी दोन फूट व्यासाची दगडी ऊखळ आहे तसेच बाजूला दोन टाक्या आहेत.
बाले किल्लातील चावंडा देवीचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते.या मंदिराचे बांधकाम किंवा जिर्णोद्धार नजीकच्या काळात केला गेला असावा. मंदिर छोटे असून कळस लक्ष वेधक आहे.
पुढे चालत गेल्यावर मोडकळीस आलेले मंदिर व पाण्याचा हात टाक्या दिसतात.या सप्तमातृकांशी संमंधीत यांचा संबंध आहे.याच्या पुढे काही लेणी समूह व दारूगोळा साठवणूक करण्याचे कोठारे पहायला मिळतात.यातील एका कोठारात पाण्याचे दोन हौद निदर्शनास येतात. याच ठिकाणी विस्तीर्ण निर्जन सपाट प्रदेश आहे.आवर युद्ध अभ्यास केला जात असावा.घडाच्या बऱ्याच भागात तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.
गडाच्या तटाखाली भूयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे, हा मार्ग अतीशय लहान असून ३ फूट उंच व ३ फूट रुंद आहे.
चावंड किल्ल्याचा इतिहास:
निजामशाही ची स्थापना करणाऱ्या मलिक अहमद ने सुरवातीला जे किल्ले घेतले त्यामध्ये या किल्ल्याचा समावेश होता.या किल्ल्याचा उपयोग कैदखाना म्हणून केला जात असावा कारण दुसरा बुरहान शहा याने निजामशहा यांचा नातू बहादुर शहा यास या किल्ल्यावर कैद केले होते.
१६३६ मध्ये आदिलशाही व मोगलां पासून निजामशाही चा बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो तह केला त्यात चावंड किल्ला मोगलांकडे गेला.
१६७२ मराठा सैन्याने स्वराज्यात आणला.त्यानंतर छञपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नावं प्रसन्नगड असे केले.
१८१८ मध्ये या किल्ल्यावर आक्रमण करून किल्ल्यावरील वास्तू व पायऱ्या उध्वस्त केल्या.त्यानंतर चर्या कालखंडात हा किल्ला ब्रिटिश सरकारचा अधिपत्याखाली आला.
चावंड किल्ल्यावर जायचे कसे:
चावंड किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यावरून नारायण गाव किंवा जून्नर ला गेला असता तिथून पुढे नाणेघाट ला जानाऱ्या वाटेने गेला की १२ किमी अंतरावर चावंड गावात जाऊ शकता.नाशिक वरून येणारे पर्यटक इगतपुरी किंवा सिन्नर मार्गे येऊ शकतात.सिन्नर मार्गे जून्नर ला येऊन तिथून चावंड ला जाऊ शकता.नाशिक पासून चावंड किल्ल्याचे अंतर साधारण १४५ किमी आहे
मुंबई वरून येणारे पर्यटक मुरबाड घाटघर मार्गे चावंड किल्ला ला भेट देऊ शकतात.मुंबई पासून १२० किमी अंतरावर चावंड किल्ला आहे.
काय काळजी घ्यावी:
किल्ला ला भेट देणाऱ्या पर्यटकांनी सोबत पाणी बाळगावे कारण किल्ल्यावर तलाव भरपूर आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी स्वताचा वाहनाने येणे ऊत्तम. आपल्या बरोबर माहितगार माणूस असेल असावा.
जवळील पाहण्यासारखी ठिकाणे:
नाणेघाट, निमगिरी,मानिकडोह,जिवधन, हडसर
खूप छान
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवा