थिबा पॅलेस रत्नागिरी |
थिबा पॅलेस कुठे आहे:
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील थिबा पॅलेस ब्रह्मदेश आणि रत्नागिरीचे अनोखे नाते सांगतो. रत्नागिरी शहरातील पर्यटन आकर्षण आणि महत्त्वाची वास्तू असलेला हा आलिशान राजवाडा म्हणजे थिबा राजासाठी जणू तुरुंगच भासत असावा. थिबा पॅलेस महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
थिबा मीन राजा कोण होता:
थिबा मीन राजा ब्रह्मदेश च्या राजगादी वर सन १८७८ मध्ये बसला, त्याच वेळी ब्रिटिशांनी ब्रह्मदेश चा काही भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. अशा परिस्थितीत थिबा राजाने ब्रिटिशांच्या राज्यविस्ताराला विरोध करून युद्ध पुकारले या युद्धामध्ये इंग्रजांच्या सैन्यापुढे थिबा राजाचा निभाव लागला नाही. या पराभवानंतर थिबा राजाचे कुटुंबीय चहूबाजूला विखुरले गेले.
इंग्रजांनी पूर्ण ब्रह्म देशावर ताबा मिळवल्या नंतर थिबा राजा पुन्हा उठाव करेल या भीतीने त्याला स्थानबद्ध करून ब्रह्म देशापासून सुमारे ३००० किलोमीटर दूर असलेल्या मद्रास व तेथून कोकणातील रत्नागिरी या ठिकाणी इ.स.१८८५ मध्ये आणून ठेवले. जेमतेम सात वर्ष ब्रह्मदेश वर थिबा मिन राजाला राज्यकर्ता आले. थिबा राजा बरोबर त्याची पत्नी व राजकन्या यांनाही आणले होते.
सुरूवातीची बरीच वर्ष त्याला इतरत्र ठेवल्यानंतर, १९१० मध्ये त्याच्यासाठी रत्नागिरीतील भाट्येच्या समुद्रकिनारी २७ एकर जमीनीवर तत्कालीन एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून तीन मजली प्रशस्त असा राजवाडा बांधला. या राजाला स्व खर्चासाठी इंग्रज सरकारकडून महिना एक लाख पेन्शन मिळत असे परंतु कालांतराने तिही कमी होत गेली. थिबा राजने स्वतः राजवाड्याच्या बांधकामावर लक्ष ठेवून ब्राह्मी शैलीमध्ये राजवाडा बांधून घेतला. यावेळी राजवाड्याचे नक्षीकाम व पॅलेसच्या इटालियन शैलीतील खिडक्या वर विशेष लक्ष दिले.
थिबा राजा आपल्या परिवारासह इ.स.१९११ मध्ये या राजवाड्यात राहण्यासाठी आला. आपल्या स्वतःच्या जन्मभूमी पासून इतक्या दुर आलेला राजा पुन्हा आपल्या मातृभूमीत जाऊ शकला नाही व पंचवीस वर्षाच्या कैदे नंतर ५८ व्या वर्षी १९१९ मध्ये दुर्दैवी मरण पावला.
थिबा पॅलेस:
लाल रंगातील हा प्रशस्त असा राजवाडा नजर खिळवून ठेवतो. राजवाड्यांचे बांधकाम ब्राह्मी शैलीमध्ये असून खिडक्यांचे काम इटालियन शैलीमध्ये पाहायला मिळते. हा राजवाडा तीन मजली असून याच्या गॅलरी मधून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. राजवाड्याच्या छतावर लावलेल्या लाकडी रिप वरील एक समान नक्षीकाम सुंदर दिसते. खिडक्यांना वापरलेल्या रंगीबिरंगी काचा आकर्षक आहेत.
राजवाड्या मध्ये थिबा राजाच्या वापरातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. तसेच तळमजल्यावर अनेक सुंदर मूर्ती ठेवण्यात आले आहेत दुसऱ्या माळ्यावरील चित्र गॅलरी हे खास आकर्षणाचे केंद्र बनते. तसेच अनेक पुरातत्त्व वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. संगमरवरी बांधकामातील नृत्याग्रह खास आहे.
राजवाडा जवळच जिजामाता उद्यान असून तेथून मावळतीच्या सूर्याचा दृश्य पायला मिळते. दूरवर क्षितिजापलीकडे जाणारा सूर्य पाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. या उद्यानातून भाट्ये बीच राजिवडा बंदर भगवती किल्ला ठिकाणी पाहू शकतो.
याठिकाणी समुद्राचे वाहणारे गार गार वारे अंगावर घेत तासन्तास बसून राहावेसे वाटते.
थिबा पॅलेस ला जायचे कसे:
- थिबा पॅलेस रत्नागिरी शहरात असून या ठिकाणी जाण्यासाठी बसस्थानका पासून रिक्षा भेटतात.
- खाजगी गाडीने येणाऱ्यांसाठी शहरातूनच शिवा प्रदेश ला जावे लागते.
- राजवाडा दर सोमवारी पर्यटकांसाठी बंद असतो.
इतका सुंदर राजवाडा पाहून जात असताना मनामध्ये मात्र दुःख होत असते व दुर्दैवी थिबा राजा सतत आठवत राहतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे