पन्हाळा किल्ला माहिती |Panhala fort information in Marathi
किल्ल्याचे नाव :पन्हाळगड
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: सह्याद्री
जिल्हा: कोल्हापूर
ठिकाण: पन्हाळा
किल्ल्याची उंची: ९७० मीटर
सद्यस्थिती: चांगली
पन्हाळा किल्ला म्हटले की आपल्याला सहाजिकच आठवते ती छत्रपती शिवरायांची पन्हाळा मोहीम त्याचबरोबर सिद्धी जोहर ने दिलेला पन्हाळगडाला वेढा हा वेढा फोडून यशस्वीरित्या बाहेर पडलेले शिवराय,त्याच बरोबर वीर शिवा काशीद यांचे बलिदान व महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदल यांचा न भूतो न भविष्यती असा पराक्रम. पन्हाळा किल्ल्याला मराठा इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे. कोल्हापूर संस्थान चा राजधानीचा किल्ला असलेल्या पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. पन्हाळगड महाराष्ट्रातील सध्या घडीला चांगल्या स्थितीत असलेला एकमेव किल्ला आहे. आज आपण अशा या पन्हाळगड किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.
पन्हाळगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ९७७ मीटर एवढी आहे.पन्हाळगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेच्या घाटमाथ्यावर असून भौगोलिक दृष्टया याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. तळकोकणात नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वपूर्ण भूमिका निभावत असे. कोल्हापूरचा सभोवताली पन्हाळा विशाळगड महिपळगड कलिंदीगड ही गडांची चौकटी आहे.
पन्हाळा किल्ला |
पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
पन्हाळगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील निसर्गसंपन्न अश्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. पन्हाळा हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. पन्हाळा ही गिरिस्थान नगरपालिका आहे. कोल्हापूर पासून बावीस किलोमीटर अंतरावरील पन्हाळा हे ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.पन्हाळगड चा इतिहास
पन्हाळगड चा इतिहास पाहताना तो आपल्याला साधारण १२०० वर्ष मागे घेऊन जातो. साधारणपणे इ.स.११७८ मध्ये शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने किल्ल्याचे बांधकाम केले.सुरवातीला किल्ल्याचे नाव पन्नग्नालय असे होते.इ.स.१२०९ पर्यंत किल्ला शिलाहार राजवंशाकडे होता परंतु देवगिरीच्या यादवांनी किल्ल्यावर आक्रमण करून किल्ला जिंकून घेतला व भोज राजाला याच किल्ल्यावर कैद करून ठेवले.खिंडी मध्ये बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदलांच्या सैन्याने शौर्याची परिसीमा केली. हाशम खिंडीत येताच दगडांचा वर्षाव होत होता.दोन्ही हातात दानपट्टा घेऊन बाजीप्रभूं आवेशाने लढत होते एक ही गनीम समोर यायला तयार होत नव्हता. अनेक मावळे मृत्युमुखी पडले. अनेक घाव बसले शरीर रक्तबंबाळ होऊनही असे लढत होते जणू मृत्यूलाही सांगत होते तोफेचा आवाज येई पर्यंत मला वेळ नाही!
१३ जुलै १६६० रोजी सायंकाळी सहा वाजता शिवराय विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफेचा आवाज केला, त्याचवेळी वर्मी घाव लागून पावनखिंड मध्ये एक वादळ शांत झाल. स्वामीनिष्ठेपायी,स्वराज्यापायी बाजीप्रभूं व तीनशे बांदलांनी बलीदान दिले.विर मावळ्यांच्या बलिदानाने घोडखिंड पावनखिंड झाली. पन्हाळगड किल्ला सिद्धी जोहरच्या ताब्यात गेला.
पन्हाळा किल्ला |
पन्हाळा किल्ला कोणी जिंकला
६ मार्च १६७३ मध्ये शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे कोंडाजी फर्जंद व त्यांच्या निवडक ६० मावळ्यांच्या साथीने पन्हाळा किल्ला पुन्हा शिवरायांना मिळवून दिला.मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या झाल्यानंतर कोल्हापूर संस्थाना कडे पन्हाळा किल्ला होता.१७८२ ते १८२७ पर्यंत हा किल्ला कोल्हापूर संस्थान च्या राजधानी चा किल्ला राहिला.
पन्हाळगडावर पाहण्यासारखी ठिकाणे
पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याला सात फूट उंचीची संपूर्ण तटबंदी असल्याने किल्ला अधिक मजबूत आहे. पन्हाळा गडावरील अनेक वास्तू आजही सुस्थितीत असून पर्यटनाच्या दृष्टीने व या किल्ल्याचा इतिहास समजून घेण्यासाठी पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात. किल्ल्यावरील तीन दरवाजा धान्यकोठार अंबरखाना राजवाडा सज्जा कोटी पाण्याचे तलाव टाके पर्यटकांना आकर्षित करतात. त्या वस्तू आपण खालील प्रमाणे पाहू या.तीन दरवाजा
गडावरील तीन दरवाजा हा पश्चिम दिशेला असून अतिशय भव्य दिव्य आहे. त्यावर केलेले बारीक नक्षीकाम, मोठमोठाले खांब, दगडी बांधकामातील चौथरा, उर्दू मधील शिल्प, कमळ फुले, गणेशाची मूर्ती हे सर्व या किल्ल्यावर अनेक राजसत्तांच्या अस्तित्वाची साक्ष देतात. दरवाज्याच्या आतील बाजूस कमानीदार खांबा मध्ये असलेला प्रशस्त व्हरांडा सुंदर आहे. कोंडाजी फर्जंद यांनी आपल्या साठ मावळ्यांसह या दरवाज्यातून प्रवेश करून किल्ला घेतला होता.अंबरखाना
अंबरखाना म्हणजे पूर्वीचा बालेकिल्ला आहे या किल्ल्याच्या भोवती खंडात पाहायला मिळते. अंबरखाना ही तीन वस्तूंचा समूह असून त्यांना गंगा यमुना व सरस्वती अशी नावे होती त्यामध्ये धान्य साठवले जात आहे. पूर्वीच्या काळी ज्वारी नाचणी तांदूळ हे गडावर मुबलक प्रमाणात ठेवण्यासाठी यांचा वापर केला जात असे. धान्य कोठारांमध्ये ३० हजार खंडी एवढे धान्य साठवले जात असे. परंतु वास्तूची एकंदरीत रचना पाहता धान्य कोठारे नसावीत असे वाटते.अंधार बावडी
अंधार बावडी ही गडावरील तीन मजली इमारत असून तिच्या तळमजल्यावर पाण्याची विहीर आहे. त्याची रचना एकंदरीत राज महालासारखी पाहायला मिळतील. विहिरीमध्ये उतरण्यासाठी प्रशस्त अशा पायऱ्या नक्षीदार दरवाजे पाहताना ही विहीर असावी असे क्षणभरी ही वाटत नाही. मधला मजला प्रशस्त असून त्यामध्ये खिडकी वजा चोर दरवाजा आहे तो गडाच्या ताटामध्ये निघतो. आज ही विहीर गडावरील मुख्य प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.सज्जा कोटी
सज्जा कोटी ही भव्य अशी दुमजली इमारत तीन दरवाजाच्या आत मध्ये थोड्या अंतरावर पाहायला मिळते. दगडी कढडा व अंगण वास्तूच्या सौंदर्यामध्ये भर पाडतात. इमारतीच्या तळमजल्यावर भिंतीवर कोरलेला शिलालेख पहायला मिळतो. इब्राहीम आदिलशहा याने इसवी सन १५०० मध्ये बांधले असून याचे बांधकाम विजापुरी शैली मधील आहे. छोट्या खिडक्या, दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिना आहे. इमारतीच्या छतावरील नक्षीकाम, आकर्षक खांब, कमानी खिडक्या व या खिडकीतून येणाऱ्या थंड हवा मनाला गारवा देऊन जाते. छत्रपती शिवराय पन्हाळा गडावर असताना या कोटी चा उपयोग प्रशासकीय कामकाज व गुप्त खलबते करण्यासाठी करत असत. शंभूराजांना पन्हाळा गडावरील कारभार पाण्यासाठी काही काळ या कोटी मध्ये ठेवले होते.राजदिंडी दरवाजा
राजदिंडी दरवाजा गडावरील ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून सिद्धी जौहरने गडावर दिलेल्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवराय या दरवाजातून गड उतार झाले होते. या दरवाजातून जाणारी वाट पुढे विशाळ गडाकडे जाते.राजवाडा
राजवाडा ही गडावरील सुंदर वास्तू असून महाराणी ताराबाईंनी वास्तव्यात असताना इ.स.१७०८-१७०९ मध्ये आपल्यासाठी खास एक राजवाडा बांधून घेतला होता. हा राजवाडा अतिशय भव्यदिव्य असून या वाड्यातील देवघर आकर्षक व सुंदर आहे. आज घडीला या वाड्यामध्ये नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व बॉईज हॉस्टेल आहे.पिछाडी बुरुज किंवा पुसाटी बुरुज
हा बुरुज किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आहे. किल्ल्यावरून सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे.दुतोंडी बुरुज
पन्हाळगडावरील दुतोंडी बुरुज न्यायालया जवळ असून यावर ये जा करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रशस्त अश्या पायऱ्या आहेत. याच्या जवळच आणखी एक बुरुज आहे त्याला दौलत बुरुज असे म्हणतात.धर्म कोटी
संभाजी मंदिराच्या जवळ असणाऱ्या इमारतीला धर्मकोठी असे म्हणतात. सरकारातील जमा झालेले धान्य वस्तू यांचा गरजूंना दानधर्म करण्यासाठी या वास्तूचा वापर होत असे म्हणून याला धर्म कोटी असे म्हणतात.रेडे महाल
गडावरील दगडी बांधकामातील वास्तूचा उपयोग पूर्वीच्या काळी गुरेढोरे मुख्यत्वेकरून रेडे बांधण्यासाठी केला जात असेल.कलावंती महाल
किल्ल्याच्या एका बाजूला नायकिणीचा सज्जा म्हणून ओळखले जाणारऱ्या इमारतीला कलावंतीण असे म्हणतात. बादशहाच्या करमणुकीसाठी राहणाऱ्या नायकिणींचे वास्तव्य असणारी नायकिणीच्या सज्जाची इमारत सुंदर असून तिच्या खिडकीतून थंडगार वारे घेत निवांत बसून राहावे असे वाटते.पराशर गुहा
पन्हाळगडावर पराशर ऋषींचे वास्तव्य होते हे ऋषी ज्या गुहेत राहत होते त्याला पराशर गुहा असे म्हणतात. गुहेचे तोंड छोटे असले तरी आत मध्ये गुहा प्रशस्त आहे. आज मितीला या गुहेला दरवाजा बसवून बंद करण्यात आले आहे.नागझरी
नागझरी हा एक बारमाही पाण्याचा झरा असून या ठिकाणी कुंड पाहायला मिळतो. या कुंडातील पाणी अतिशय थंडगार व चवदार आहे.संभाजी मंदिर
गडावर संभाजीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये उंचपुर्या दोन दिपमाळा, हत्ती शिल्प, दगडी बांधकामातील खांब. चारही बाजूने संरक्षक भिंत असून मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. मंदिराच्या आवारामध्ये पाच ते सहा तोफा ठेवलेल्या पाहायला मिळतात.सोमाळे तलाव
पन्हाळगडावर मोठा तलाव असून त्या सोमा तलाव असे म्हणतात. हा तलाव अतिशय विस्तृत असून त्याच्या चहुबाजूने बसण्यासाठी मस्त कट्टा व झाडे लावलेली आहेत या तलावाच्या काठावर सोमेश्वराचे मंदिर आहे. हा तलाव गडावरील मुख्य प्रेक्षणीय स्थळ आहे.सोमेश्वर मंदिर
सोमाळे तलावाच्या शेजारी सोमेश्वराचे एक छोटेखानी सुंदर मंदिर आहे. या मंदिरात छत्रपती शिवराय पन्हाळगडावर असताना नित्य पूजेसाठी येत असत.बाजी प्रभू देशपांडे पुतळा
बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडी तील पराक्रमाची आठवण म्हणून पन्हाळगडावर सुरूवातीलाच शूर वीर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा बसलेला आहे. बाजीप्रभूंच्या दोन्ही हातात तलवारी असून लढण्याच्या पवित्र्यात रचना पाहायला मिळते. पन्हाळा गड किल्ल्यावर तबक उद्यान, वाघ दरवाजा, किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वीर शिवा काशीद यांचा पुतळा हेही पाहण्यासारखे आहेत. त्याचबरोबर किल्ल्यावरून कोल्हापूरची हिरवीगार ऊस शेती, वाडी रत्नागिरी ज्योतिबा व कोल्हापूरचे दर्शन होते.
पन्हाळा किल्ला पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर मसाई पठारावर मसाई देवीचे मंदिर आहे मंदिर दगडी बांधकामातील असून अतिशय सुंदर आहे. या मंदिरापासून पन्हाळ गडाचे पूर्ण दर्शन होते.
पन्हाळगड ला जायचे कसे
पन्हाळगड ला जाण्यासाठी रस्ते मार्गे सुलभ असून तो गडाच्या दरवाजा पर्यंत जातो. पन्हाळगड ला जाण्यासाठी सर्वप्रथम कोल्हापूरला यावे लागते. कोल्हापूर हे शहर रस्ते, रेल्वे व हवाई मार्गे पूर्ण देशाशी जोडले गेले आहे.मुंबई पुणे वरून येणारे पर्यटक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर ला येऊ शकतात. राज्यातील प्रत्येक शहरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोल्हापूरला येतात. कोल्हापूर मधून एसटी महामंडळाची बस सेवा पन्हाळा साठी चालू आहे, त्याच बरोबर शटल सेवा ही सुरू आहे. कोल्हापूर मध्ये खाजगी ह ही पन्हाळ गडला जाण्यासाठी भेटतात.
काही खास
पन्हाळ्या मध्ये जेवणासाठी उत्तम हॉटेल्स असून त्या ठिकाणी पिठलं भाकरी तसेच कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ यांचा आस्वाद घेऊ शकता.कोल्हापूर एक पर्यटन केंद्र सून पन्हाळा गड बरोबरच रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर राजवाडा संग्रहालय हे पाहू शकता.
गडावर मुबलक पाण्याची सोय आहे.
पन्हाळगड कसा आहे आणि त्याचे इतिहासातील महत्त्वाच्या बरोबर किल्ल्यावरील वास्तू यांची माहिती Panhala fort information in Marathi या लेखामध्ये पाहीली. सदर लेखामध्ये काही बदल सुचवू इच्छित असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता त्याच बरोबर लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.पन्हाळगड किल्ला माहिती मराठी कशी वाटली ते जरूर कळवा. आमचे इतर लेख पाहण्यासाठी आमच्या पेज ला नक्की भेट द्या धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे