मुख्य सामग्रीवर वगळा

राजगड किल्ला माहिती | स्वराज्या ची पहीली राजधानी

राजगड किल्ला माहिती

       राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ते स्वराज्याची सर्वाधिक काळ राजधानी राहिला किल्ला यामुळे राजगड दुर्गराज म्हणून शोभतो. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेला किल्ला शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधणी कलेचा उत्तम उदाहरण म्हणजे राजगड.गडांचा राजा राजांचा गड म्हणून शोभतो,म्हणून राजगड किल्ला माहिती पाहू
राजगड किल्ला माहिती
राजगड किल्ला

     राजगड किल्ला शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने व राजकीय केंद्रबिंदू असल्याने अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे जसे की सर्वाधिक काळ म्हणजे 26 वर्ष राजगडावर स्वराज्याची राजधानी होती या कालखंडामध्ये आखले गेलेले अनेक राजकीय डावपेच असतील मोहिमा किंवा नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड मिळवण्यासाठी आखलेली मोहिम असो अशा अनेक घटना राजगडावर घडल्या
     शिवाजी महाराजांच्या पत्नी व शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर ५ सप्टेंबर १६५६ रोजी झाले.
    शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराजांचा जन्म किल्ल्यावर २४ फेब्रुवारी १६ ७० रोजी झाला.

 राजगड किल्ला कुठे आहे:  

      पुणे जिल्ह्यातील भोर वेल्हे तालुक्याच्या सीमावर्ती भागात राजगड किल्ला आहे. गड दुर्गप्रेमी पर्यटकांना व ट्रेकर्सना आपल्या भव्यतेने आकर्षित करतो. तिन्ही दिशांना दूरवर पसंत केले माच्या आणि मधोमध उभा असलेला उत्तुंग बालेकिल्ला अशी किल्ल्याची रचना आहे किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाच ते सहा किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे.
पद्मावती तलाव


     राजगड किल्ल्यावरून भोवतालचा परिसर पाहताना आपणाला तोरणा, सिंहगड, पुरंदर,वज्रगड, लिंगाणा , प्रतापगड व रायगड हे किल्ले दिसतात. या किल्ल्यावरून पूर्वीच्या काळी सांकेतिक संदेश देण्यासाठी गंजी पेटवून त्याचा धूर केला जात असे व धोक्याचा संदेश या गडावरून त्या गडावर जात असे काळा धूर पांढरा धूर असे सांकेतिक दूर यासाठी तयार केले जात असत.

राजगड किल्ला इतिहास:

     नीरा वेळवंडी नदीच्या खोऱ्यात मुरूंबदेवाच्या डोंगर रांगेत किल्ला असल्याने याला बहामनी राजवटीत मुरुंबदेव असे नाव होते या किल्ल्याचा उपयोग लष्करी ठाणे किंवा चौकी म्हणून केला जात असे, मुरुंबदेव काही काळ निजामशाही व काही काळ आदिलशाही राजवटीच्या अधिपत्याखाली होता.

राजगड किल्ल्याचे बांधकाम:

        मुरुंबदेव तोरणा मावळ प्रांतत राज्य विस्तार करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आहेत हे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ मध्ये तोरणा व  मुरुंबदेव  हे किल्ले आपल्या ताब्यात घेतले तोरणा किल्ल्याचा विस्तार कमी असल्याने महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्यावर भरीव असे बांधकाम करून या किल्ल्यास 'राजगड' असे शोभिवंत नाव दिले.राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. 
रायगड किल्ला माहिती
रायगड किल्ला माहिती


     रायगड चा बालेकिल्ला खूप उंच असून समुद्र सपाटी पासून १४०० मीटर तेवढी किल्ल्याची उंची आहे व किल्लाची चढण खुप अवघड आहे. दुर्गराज राजगड शिवाजी महाराजांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.जस जसा स्वराज्याचा विस्तार होत होता .राजगड प्रशासकीय कामकाजा साठी अपुरा पडु लागला,त्यातच मिर्झा जयसिंह ने थेट मावळ पर्यंत मारलेली धडक. शत्रू थेट राजधानी पर्यंत अगदी सहज येऊ शकतो याची झालेली प्रखर जाणीव.त्या आधी शाहिस्तेखानच्या फौजेनी पुण्यात जवळपास 2 वर्ष मुक्काम केलं होतं.त्यामुळे शञु थेट राजधानी पर्यंत येऊ शकतो याची झालेली जाणिव त्यामानाने रायगड दुर्गम होता उंच होता व बालेकिल्लाचा विस्तार ही फार होता त्यामुळे  स्वराज्याची राजधानी राजगडावरून रायगडावर हालवण्यात आली.
रायगड किल्ला माहिती
राजधानी राजगड


    संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने स्वराज्यातील अनेक किल्ले जिंकून आपल्या ताब्यात घेतले होते त्यामध्ये रायगड, सातारचा किल्ला, सज्जनगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले होते त्यातच ४फेब्रुवारी १७०३ मध्ये औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला इरादतखान याला किल्लेदार नेमून राजगड चे नाव नबिशहागड असे ठेवले नंतरच्या काळात शाहू महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे राजगड किल्ला पुन्हा स्वराज्यात मराठा सैन्याने आणला

     राजगडाची दुर्गबांधणी ची पद्धत त्याची ठेवण चिलखती बुरुज चोर दरवाजा व उत्तुंग बालेकिल्ला यासाठी इतिहासात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो.

 किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

       रायगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी असल्याने या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू व बांधकाम स्थापत्यकला मंदिर राजवाडा सदर गुरुजी तटबंदी यासारखी अनेक किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत:

 राजगड पाली दरवाजा माहिती:

       पाली दरवाज्यातून गडावर येणारा मार्ग पालखुर्द या गावातून येतो हा मार्ग खूप मोठा व व प्रशस्त असा पायरी मार्ग आहे. पाली दरवाजाचे मुख्यद्वार इतके उंच व व भव्य आहे की पाहतच राहावेसे वाटते या दरवाजातून आत आल्यावर आणखी एक प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेते या दरवाजाला भला मोठा बुरुज आहे. दरवाज्याच्यावर आणि बुरुजावर चऱ्या काढलेले आहेत या चाऱ्यामध्ये गोल आकाराचे  झरोकेआहेत दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत या दरवाजातून आत गेल्यानंतर पद्मावती माची वर येऊन पोहोचतो.

 पद्मावती माची: 

‌       राजगडाचे मुख्य आकर्षण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे पद्मावती माची शिव काळामध्ये पद्मावती माचीवर सैन्य तळ व राज निवासाचे ठिकाणही होते या माचीवर पद्मावती देवीचे मंदिर पद्मावती तलाव चोरदरवाजा गुंजवणे दरवाजा राजसदर या वस्तू आहेत तसेच सईबाई राणीसाहेबांची समाधी आहे पद्मावती देवी मंदिराच्या बाजूस एक बांधीव टाके आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे

रामेश्वर मंदिर:

      पद्मावती मंदिराच्या समोरच पूर्वेकडे तोंड करून रामेश्वर मंदिर आहे या मंदिरात शिवलिंग व दक्षिण मुखी मारुतीची मूर्ती आहे

संजीवनी माची: 

      पाली दरवाजाने बालेकिल्ल्याकडे जाताना संजीवनी माचीकडे जाणारी आनंद वाट लागते संजीवनी माची गडाच्या पश्चिम दिशेला असून या माचीवर काही वास्तूंचे चौथरे व अवशेष अजूनही दिसून येतात माची वर पाण्याच्या सोयीसाठी बांधीव मोठे टाके पहायला मिळते. माचीवर बुलंद असा बुरुज आहे चोरवाटेने संजीवनी माचीच्या बाहेरील बुरुजावर जाता येते तोरणा वरुन येणारी वाट संजीवनी माचीवरील अळू दरवाज्यातून राजगडावर येते आळु दरवाजा सद्यस्थितीत ढासळलेल्या अवस्थेत आहे या माचीवर तटबंदीमध्ये शौचालय दिसून येतात पूर्वीच्या काळी तटरक्षकांच्या वापरा देत असावीत तटबंदीच्या शेवटच्या टोकाला उंच असा बुरुज आहे या बुरुजाचा उपयोग सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी व पहारा देण्यासाठी केला जात असे.

सुवेळा माची:

      राजगडाचे आणखी एक मुख्य आकर्षण म्हणजे सुवेळा माची होय सुवेळा माची गडाच्या पूर्व दिशेला आहे पद्मावती माची कडून बालेकिल्ल्याकडे जाताना सुवेळा माचीकडे जाणारी छोटी पायवाट लागते या पायवाटेने चालत पूर्वेकडे गेले असता सुवेळा माची वर येऊन पोहोचतो.

बालेकिल्ला:

     राजगडाचा बालेकिल्ला तिन्ही माच्यांचा मधोमध उंचावर आहे जणूकाही आभाळाला गवसणी घातल्याचा भास होतो. बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय कठीण व अरुंद आहे या अरुंद रस्त्यावरून जाताना मनात धडकी भरते बाली किल्ला चढून वर गेल्यानंतर प्रथम महा दरवाजा लागतो  या दरवाजातून आत गेल्यानंतर जननी माता मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला चंद्रतळे व या तळ्याच्या समोरच बुरुज असून या बुरुजावरून सभोवतालचा परिसर मिळू शकतो उत्तर दिशेला एक ब्रह्मर्षि ऋषींचे मंदिर आहे याबरोबरच बालेकिल्ल्यावर काही वस्तूंचे चौथरे व भग्नावशेष पाहायला मिळतात.
     राजगड पाहताना आपणाला जो आनंद मिळतो तो काही औरच असतो गडावरील वास्तू पाहून व गडाची भव्यता पाहून राजगड खरेच दुर्गराज शोभतो

     हे सुंदर मंदिर बघता|क्षणभर थांबे रवी मावळता|

     दिग्गज आणि अभिषेकला|स्वर गंगेचे गडे|

     उभे हे राजगडाकडे |उभे हे राजगडाकडे|

राजगड ला कसे जावे:


      राजगडला जाण्यासाठी पुण्यावरून दोन तीन मार्गाचा आपण वापर करू शकतो. पुण्यावरून राजगडला जाण्यासाठी दोन मार्गे एसटी जाते

 पुणे- राजगड: पुणे राजगड एसटी बस स्वारगेट वरून पकडून वाजेघर गावांमध्ये उतरून बाबू दा झापा पासून एक तासांमध्ये रेलिंग पर्यंत पोहचू शकतो या वाटेने ३ तासात गुप्तदरवाजा पर्यंत येऊन पोहोचतो.

 पुणे- वेल्हे मार्गे: पुणे वेल्हे एसटी ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन राजगडाचा पाली दरवाजा गाटु शकतो.यासाठी कानदी नदी पार करून यावे लागते.या मार्गाने गड सर करणे सोपे असुन गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग असुन या वाटेने पाली दरवाजात येऊन पोहोचतो.

           पुणे वेल्हे मार्गावरील दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे मार्गासणी या गावी उतरुन साखर मार्ग गुंजवणे गावात जाता येते या वाटेने जावे थोडे जिकीरीचे असुन सोबतीला माहीतगार असणे फायद्याचे ठरते या वाटेने गडावरील गुंजवणे दरवाजात येऊन पोहोचतो.

 आळु दरवाजा: भुतोंडे मार्गे एक वाट आळु दरवाजातून गडावर जाते.तसेच गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजातून सुवेळा माचीवर येते.

काय काळजी घ्यावी:


       गडावर जाताना पाणी भरपूर प्रमाणात बरोबर घ्यावे गड चढत असताना पाण्याची आवश्यकता जाणवते गडावर कोणत्या प्रकारची जेवण व नाश्त्याची सोय नाही वाटेमध्ये लिंबू सरबत मिळू शकते. पद्मावती मंदिरात २०-२२ जणांच्या मुक्कामाची सोय होऊ शकते तसेच पद्मावती माचीवर पर्यटक निवासासाठी खोल्या आहेत याचाही वापर करू शकता मात्र जेवणाची व्यवस्था स्वत तुला करावे लागेल

       स्वारगेट वरून राजगडला जाण्यासाठी दर एक तासाला एसटी बस आहेत या बस पुणे राजगड व पुणे वेल्हे या मार्गावरून लावतात या सेवेचा आपण वापर करू शकता

 सूचना: गड पाहताना आपल्यामुळे गडाचे नुकसान होणार नाही व पर्यावरणाला आपल्यामुळे हानी पोचणार नाही याची काळजी घ्यावी.
रायगड किल्ला माहिती
राजधानी राजगड


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

हरिश्चंद्रगड किल्ला माहिती |Harishchandra gad information in Marathi

हरिश्चंद्रगड Harishchandra gad in Marathi  नाव :                   हरिश्चंद्रगड किल्ला उंची :        ४६०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग :            माळशेज जिल्हा :             अहमदनगर चढाई :              मध्यम सद्यस्थिती :         चांगली हरिश्चंद्रगड किल्ला माहिती | Harishchandragad fort information in Marathi          सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.       ...