मुख्य सामग्रीवर वगळा

तोरणा किल्ला माहिती | torna fort information in Marathi

किल्ल्याचे नाव :   तोरणा/प्रचंडगड
प्रकार: गिरिदुर्ग
जिल्हा: पुणे 
ठिकाण: वेल्हे
किल्ल्याची उंची:  १४०४मीटर
सद्यस्थिती: चांगली

तोरणा किल्ला माहिती | torna fort information in Marathi

नमस्कार मंडळी आज आपण आजच्या लेखामध्ये तोरणा या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा शिवरायांनी याच किल्ल्यावर केला. पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून तोरणा ओळखला जातो. तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा असे पडले. सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्व-पश्चिम अशा पसरलेल्या उप रांगेवर असलेला तोरणा किल्ला पर्यटकांना व ट्रेकर्सना सतत खुणावत असतो. काही हौशी पर्यटक राजगड तोरणा व सिंहगड असा ट्रेक पूर्ण करतात. तोरणा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून त्याची समुद्रसपाटी पासून उंची१४०४ मीटर एवढी आहे. तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे ही म्हणतात. इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस याने लिहून ठेवले आहे की सिंहगड सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचे घरटे आहे. अशा या ऐतिहासिक तोरणा किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत.
तोरणा किल्ला
झुंजार माची



तोरणा किल्ला कुठे आहे

तोरणा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असून वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावा मध्ये आहे. पुण्याच्या नैऋत्य दिशेला साधारण ६० किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वेळवंडी नदीचे खोरे तर उत्तरेला कानदी नदीचे खोरे आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील पूर्व-पश्चिम जाणाऱ्या उप रांगेवर तोरणा व राजगड किल्ले आहेत. याच रांगेवर पुढे मल्हारगड देखील येतो. गडाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खिडी आहेत जसे की पश्चिमेला कानद खिंड पूर्वेला खरीव खिंड आहे.

तोरणा किल्ल्याचा इतिहास

    तोरणा किल्ला कधी व कोणी बांधला हे जरी आज सांगता येत नसले तरी, या किल्ल्याच्या पोटातील लेण्या व प्राचीन मंदिरा वरून हा किल्ला प्राचीन असावा. तोरणा किल्ल्याचा प्रथम उल्लेख बहामनी राजवटीत पाठवतो. इ.स.१४७० ते या कालखंडामध्ये तोरणा किल्ला बहामणी सत्येकडे होता. बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर मलिक अहमद याने निजामशाहीची स्थापना केली, व बरेच किल्ले निजामशाहीच्या अधिपत्याखाली आनले. त्याच वेळी १४८९ मध्ये तोरणा किल्ला निजाम शाही मध्ये आला.
    तोरणा किल्ल्याचा मराठा इतिहासामध्ये शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून उल्लेख आढळतो. छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वर किल्ल्या वरील रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यां सोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
    स्वराज्य निर्मिती करत असताना तोरणा हा पहिला जिंकलेला किल्ला असल्याने त्याला स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणतात.या किल्ल्या पासूनच स्वराज्य निर्मितीचा श्रीगणेशा झाला असल्याने या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.
    किल्ल्यावर  विपुल प्रमाणात असलेल्या तोरणाच्या झाडीमुळे किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. किल्ला स्वराज्यात आल्यानंतर किल्ल्याची पाहणी करत असताना त्याचा विस्तार पाहून शिवराय प्रभावित झाले व किल्ल्याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. किल्ला मजबूत व लढता होण्यासाठी किल्ल्यावर बांधकाम व वास्तूंचा जीर्णोद्धार करण्याचे हाती घेतले, आश्चर्य म्हणजे गडावर बांधकाम करत असताना 22 मोठे हंडे भरून सोने सापडले. ज्या ठिकाणी हे धन सापडले त्याच ठिकाणी तोरनजाई देवीचे मंदिर बांधले. प्रथम तोरणा हा राजधानीचा किल्ला करण्याचा विचार होता परंतु बालेकिल्ल्याचा विस्तार कमी असल्याने प्रशासकीय कामकाज करणे अवघड होते त्यामानाने राजगड विस्ताराने मोठा होता त्यामुळे राजधानी चा मान राजगडाच्या मिळाला.
    छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मोगलांना मराठ्यांनी प्रचंड झुंजवत ठेवले. शेवटी औरंगजेबाने स्वराज्यातील किल्ल्यांवर ताबे घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तोरणा ही मोगलांकडे गेला, पण लगेचच शंकराजी नारायण सचिवांनी लढवून स्वराज्यात सामील करून घेतला. इस १७०४ मध्ये मोगलांनी किल्ला परत जिंकून घेतला परंतु ते जास्त काळ किल्ला आपल्याकडे ठेवू शकले नाहीत. सरनोबत नागोजी कोकाटे व मावळ्यांनी मिळून तोरणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. मोगलांना लढाई करून जिंकता आलेला स्वराज्यातील हा एकमेव किल्ला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिया कंपनीची सत्ता येईपर्यंत किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता.
तोरणा किल्ला
कोकण दरवाजा


तोरणा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

        वेल्हे गावातून गडावर जाण्यासाठी गाडीमार्ग आहे तो गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाहनतळा पर्यंत जातो. वाहन तळापासून मळलेली पायवाट धरावी लागते. या पायवाटेने छोट्या टेकडीवर गेलं तर किल्ल्याची खरी चढाई सुरु होते. डोंगरातून वर गेल्यानंतर किल्ल्याचा पहिला दरवाजा बिनी दरवाजा लागतो. बिनी दारातून आत गेल्यानंतर पायऱ्या व सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले रेलिंग आहेत या वाटेने गडाचा मुख्य दरवाजा लागतो तो म्हणजे कोटीद्वार. हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याची तटबंदीमध्ये अशी रचना केली आहे की शत्रूला जवळ येईपर्यंत दरवाजा दिसणार नाही.
        कोठी दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूला ताटामध्ये लागूनच एक पाण्याचे टाके व देवीचे मंदिर आहे. तटाच्या बाजूने तसेच पुढे चालत गेल्यानंतर किल्ल्याचा हनुमान बुरुज दिसतो. हनुमान बुद्धाच्या थोडे पुढे किल्ल्याचा दुसरा म्हणजेच शिडीचा मार्ग आहे. शिडीचा मार्ग अवघड असून या वाटेने माहीत गार असल्याशिवाय गडावर येणे धोकादायक ठरू शकते. तिथून पुढे थोड्या अंतरावर झुंजार माची आहे. झुंजार माचीवर जाण्यासाठी भुयारी मार्ग असून त्याला गुप्त असे म्हणतात. झुंजार माचीवर पाण्याचे टाके पाहायला मिळतील. झुंजार माचीवर मजबूत असा बुरुज आहे. पुन्हा माघारी येऊन कोठी दरवाजापासून समोरील बाजूस चालत गेल्यानंतर लक्कड खान्याची वास्तु लागते. वास्तूच्या डाव्याबाजूने वरती गेले असता, वाडा व अन्य वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तिथेच पुढे थोड्या अंतरावर मेंगाई देवीचे मंदीर व तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. महादेवाचे मंदिर प्रशस्त असून त्या ठिकाणी trekker's मुक्काम करू शकतात. या मंदिराच्या परिसरामध्ये सतीशिळा व वीरगळ पाहायला मिळतात. जवळच पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांच्या मधून जाणारी वाट पुढे कोकण दरवाजाकडे जाते. कोकण दरवाजा अतिशय भक्कम असून त्यातून खाली आले असता जवळच लागतो तो हत्ती माळ बुरुज. या बुरुजावरून खाली आले असता वाटेत पाण्याची चार टाके आहेत. त्याच्या शेजारी भगत द्वार असून हे देखील अतिशय भक्कम आहे. भगत द्वारा पासूनच एक वाट डोंगराच्या शिरे वरून राजगडाकडे जाते. वंकजाई दरवाजा ही अतिशय उत्तम असून त्याच्या बाजूला दारूखाना आहे. समोरच तो तो बूधला! याच्या नावावरूनच या माचीचे नाव बुधला असे पडले आहे . बुधल्याला या बोलत आहे विशाळा. याच्या जवळच आहेत कापूर लेणी चित्ता दरवाजा. चित्ता दरवाजाच्या बाजूलाच आहे ते घोडे जिंन टाकेद व कापूर टाके.बुधल्याच्या जवळच गंगाजाई मंदिर व रडतोंडी चा बुरुज आहे हे पाहून परत मागे फिरावे लागते.

तोरणा किल्ला पाहायला जायचे कसे|how to reach torna fort in Marathi

 पुण्यातील स्वारगेट बस स्थानकापासून वेल्हे गावापर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस चालू असतात. त्याचबरोबर खाजगी वाहनाने मुंबई पुण्यावरून येणारे पर्यटक पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर आंबवणे मार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत जाऊ शकतात.पुण्यावरून जाणारे पर्यटक सिंहगड रोड खडकवासला धरणाचे बाजूने तोरणा किल्ला पर्यंत जाऊ शकतात.

काय काळजी घ्यावी.

  •   किल्ला पाहायला जाताना बरोबर पाणी व स्नॅक्स जवळ ठेवावे. 
  • वेल्हे गावामध्ये जेवणासाठी उत्तम हॉटेल्स आहेत.
  •  गडावरील महादेवाच्या मंदिरामध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते.
  •  किल्ला पूर्ण पाहण्यासाठी चार तास लागतात.


तोरणा किल्ला तो कसा आहे आणि त्याचे इतिहासातील महत्त्वाच्या बरोबर किल्ल्यावरील वास्तू यांची माहिती torna fort information in Marathi या लेखामध्ये पाहीली. सदर लेखामध्ये काही बदल सुचवू इच्छित असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता त्याच बरोबर लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका. आमचे इतर लेख पाहण्यासाठी आमच्या पेज ला नक्की भेट द्या धन्यवाद
  
        
      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण