जंजिरा किल्ला
नाव मुरुड जंजिरा
प्रकार जलदुर्ग
जिल्हा रायगड
जवळचे गाव: राजापुरी मुरुड
सध्य स्थिती : बरी
Janjira fort information in Marathi
जंजिरा किल्ला म्हणजे सागरी महत्त्व लाभलेला किल्ला! त्याच्या निर्मिती पासूनच अभेद्य अशी बिरुदावली घेऊन आलेला किल्ला. पर्यटकांमध्ये जंजिऱ्या बद्दल कायम आकर्षण पहायला मिळते.चहुबाजूंनी समुद्राचे पाणी आणी एका छोट्या खडकावर भक्कम काळ्या पाषाणात उभारलेला जंजिरा सुमारे चारशे वर्षां पासून दिमाखात उभा आहे. आज आपण याच अजेय अश्या जंजिरा किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.
जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून चहुबाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची ९० मीटर आहे. किल्ला बावीस एकर मध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तटबंदीची उंची ४० फूट आहे. किल्ल्यावर जागोजागी १८ ते १९ टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्यावरील कलाल बांगडी ही तोफ प्रसिद्ध आहे.
जंजिरा किल्ला कुठे आहे:
जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मुरुड नजीक राजापुरी खाडीमध्ये आहे. राजापूरच्या समुद्र किनार्यापासून पाच ते सहा किलोमीटर समुद्रामध्ये आहे. राजापुरी खाडीच्या तोंडावर किल्ला असल्याने याचे धोरणात्मक महत्व अधिक होते.
जंजिरा किल्ला कोणी बांधला:
जंजिरा बेटावर सुरवातीला राम पाटील यांने संरक्षणाच्या दृष्टीने लाकडी मेढेकोट बांधला होता.जंजिरा किल्ल्याचे दगडी बांधकाम कालांतराने निजामशाहीतील सरदार बुरहान खानाने केले आहे.
जंजिरा किल्ल्याचा इतिहास:
राजापुरी काडी पासून पाच ते सहा किलोमीटर आत समुद्रामध्ये निसर्गनिर्मित छोटेसे बेट होते. या बेटावर कोळी लोकांचे वास्तव्य होते. या बेटाला जझिरा असे म्हणत,जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आला असून याचा अर्थ पाण्याने वेढलेले बेट असा होतो.जझिरा या शब्दाचा अपभ्रंश होऊन जंजिरा हे नाव पडले आहे. या बेटावर समुद्री लुटेरे व अरब लोक लुटमार करत. या लुटारू पासून संरक्षण करण्यासाठी कोळी लोकांचा प्रमुख रामा पाटील याने लाकडी ओंडक्यां पासून मेढेकोट तयार केला. कोकण किनारपट्टीवर निजामशाही अम्मल असल्याने त्या साठी निजामशाही खातेदारांची परवानगी घ्यावी लागली. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील ठाणेदाराला जुमानेसा झाला. राम पाटील व मेढेकोटाचा बंदोबस्त करण्यासाठी खातेदाराने पिरमखानावर जबाबदारी सोपवली.
पिरम खान धुर्त व चालाख होता त्याने अनेक वेळा जंजिऱ्या पाशी जाण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु राम पाटील त्याच्या सैन्याला मेठेकोटाच्या जवळही फिरकू देत नव्हता. पिरम खानाने व्यापारी आहे असे भासवून राम पाटला बरोबर स्नेह वाढवला. विश्र्वास संपादन होताच त्यांची जहाजे राजापुरी खाडीमध्ये नांगरू लागली. राम पाटलाला दारुचे काही पिंप भेट दिली. राम पाटील व कोटातील सर्वजन झिंगले असताना गलबता मध्ये लपून बसलेले पिरम खानाचे सैन्य मेढेकोटात घुसून सर्व सैन्याची कत्तल करून मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला.
निजामशाहीत जंजिऱ्याचा मेढेकोट जाताच त्या ठिकाणी बुरानखानाची नेमणूक केली. बुरानखान धोरणी असल्याने त्याने जंजिऱ्यावर भक्कम बांधकाम करण्याची अट फळ मिळवली. २२ एकरा मध्ये प्रशस्त असा जलदुर्ग बांधण्यासाठी घेतला, किल्ला बांधून पूर्ण झाल्यावर इसवी सन १६१७ मध्ये त्याचे नाव जंजिरे मेहरून असे ठेवण्यात आले. सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये सिद्दी अंबर याने बादशहा कडून जंजिरा साठी स्वतंत्र संत प्राप्त करून घेतली. सिद्दी अंबर जंजिर्याचा मूळ पुरुष मानला जातो. जंजिऱ्याच्या सिद्धी मूळचे आफ्रिकेतील असून गुलाम म्हणून आले असले तरी शौर्य व काटक पणामुळे जंजिऱ्याचे राज्यकर्ते झाले. सिद्धी आपल्या शौर्य व पराक्रमने जंजिरा किल्ला अजेय ठेवला. जंजीऱ्यावर सिद्धी नंबर नंतर २० सिद्धींनी जंजिरा संस्थांचा कारभार सांभाळा. सिद्धी मुहम्मदखान या शेवटच्या सिद्दीने भारताच्या स्वातंत्र्य आपत्तीनंतर १९४८ मध्ये जंजिरे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केली.
जंजिरा किल्ल्यावर पाहण्यासारखे:
अरबी समुद्रामध्ये पाच ते सहा किलोमीटर वर जंजिरा किल्ला आहे. किल्ल्यावर जाणारी राजापूर हून छोटे-छोटे होड्या आहेत. किल्ला बुलंद असून काळ्या पाषाणातील चाळीस फूट उंचीची तटबंदी आहे कुठे आहे. किल्ल्याला दोन प्रवेशद्वार असून महादरवाजा किनार्याच्या बाजूला असून जवळ गेल्याशिवाय नजरेस पडत नाही, दुसरा दरवाजा सागराकडे तोंड करून असून याला दर्या दरवाजा किंवा चोर दरवाजा असेही म्हणतात. मुख्य दरवाजावर वाघाच्या पंजात तोंडामध्ये पायात हत्ती पकडले आहेत असे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पाच्या माध्यमातून पिरम खान शत्रूला सांगू इच्छितो की तुम्ही किती बलवान असला तरी तुमची अवस्था या हत्ती वाणी करू!
किल्ल्यावर टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्यावर एकूण असे १९ टेहळणी बुरूज आहेत.तटबंधी वरुन चालण्यासाठी पायवाट व पायऱ्या पहायला मिळतात.तटबंधी मध्ये जागोजागी जंग्या झरोके खिडक्या पहायला मिळतात.किल्यावर अनेक तोफा असल्या तरी कलाल बांगडी ही लांब पल्ल्याची अजस्त्र तोफ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. कलाल बांगडी तोफ लांब पल्ल्याची असून ६किमी मारक क्षमता आहे. तोफ पंचधातू ची असून गरम होत नाही. त्या शिवाय तावरी ही सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण तोफ आहे.
जंजिरा किल्ल्यामध्ये दोन गोड्या पाण्याची तळी आहेत.त्या शिवाय किल्ल्याच्या मध्यभागी वाड्याचे भग्न अवशेष पहायला मिळतात.याला सुरुल खानाचा वाडा असेही म्हणतात. किल्याच्या तटबंदी वरून अरबी सागराचा नजर फिरवेल तिथं पर्यंत नजरेस पडतो.तर किणाऱ्याकडे असणारा पद्मदुर्ग व सामराज गड पाहू शकतो.
जंजिऱ्याला जायचे कसे:
जंजिरा किल्ला मुंबई पासून साधारण १५० किलोमीटर पुण्या पासून १६० किलोमीटर तर कोल्हापूर पासून ३२० किलोमीटर अंतरावर आहे. मुरूड जंजिरा किल्ला पाहायला जाण्यासाठी रस्ते व रेल्वे मार्गे पर्यटक जाऊ शकतात.
मुंबई वरून येणारे पर्यटक
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ असून जंजीऱ्या पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे.हे विमानतळ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमान तळाशी जोडले गेले आहे. विमानतळावरून कॅब बुक करून मुरुड जंजिरा जाऊ शकतो. कॅब चे सर्वसाधारण भाडे ३५०० होते.
रस्ता मार्गे
मुंबई ते मुरूड
मुरुड जंजिरा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ने जोडलेला आहे. मुंबई ठाणे आणि नवी मुंबई येथून राज्य परिवहन महामंडळाच्या नियमितपणे बसेस चालू असतात. बजेट ट्रॅव्हलर साठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्याचबरोबर ओला उबेर यांच्या आउट स्टेशन कॅब बुक करू शकता. स्वतःचे वाहन असल्यास सोयीस्कर आणि उत्तम पर्याय होऊ शकतो.
पुणे ते मुरुड जंजिरा
पुण्यावरून जंजिरा ला जाण्यासाठी दोन रस्ते मार्ग आहेत
१)पुणे मुंबई महामार्ग मार्गे - पुणे मुंबई एक्सप्रेस वे ने - खोपोली - पेन - अलिबाग - काशीद - रेवदंडा मार्गे- मुरुड ला पोहोचू शकता
हा मार्ग प्रवासा साठी उत्तम आहे. रस्त्याची अवस्था खूप चांगली आहे.अंतराने थोडा लांब मार्ग असला तरी आरामदायी प्रवासा साठी योग्य आहे. हा मार्ग साधारण १७० किलोमीटर चा आहे.
पुणे मुंबई हायवे मार्गे - पुणे मुंबई एक्सप्रेस वे मार्गे - खोपोली - पेण - मुंबई गोवा महामार्ग मार्गे - रोहा घोसला रोड मार्गे मुरूड ला पोहोचू शकता. हा एक पर्याय होऊ शकतो.
मार्ग २) पुणे - पौड रोड मुळशी मार्गे मुरूड ला पोहोचू शकता. हा मार्ग कमी अंतराचा असला तरी संपूर्ण घाट रस्ता व वाकडी तिकडी वळणे असलेला आहे. परिणामी
प्रवासाला नक्कीच बराच वेळ लागेल. निसर्गाचा आनंद घेत प्रवास होऊ शकतो. हा मार्ग साधारण १५८ किलोमीटर चा आहे.
रेल्वे मार्गे
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा हे रेल्वे स्टेशन जवळचे रेल्वे स्टेशन आहे. कोकण रेल्वे च्या नियमितपणे रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतात. रोहा हे देशातील इतर रेल्वे स्थानकांशी जोडले गेले आहे. रोह्या तून मुरुडला जाण्यासाठी टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.
जंजिऱ्या बद्दल थोडक्यात
जंजिरा किल्ला अजेय असला तरी तो सध्या काळा बरोबर हारताना दिसतोय. त्याच्या खचलेल्या भिंती पाहून तो एकांतात उभा असल्याचा भास होतो.
हे खरच आहे का
उत्तर द्याहटवा