परिचय
महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत त्यातील काही हजार वर्ष जुने आहेत काळाच्या ओघात अनेक किल्ल्याची पडझड झाल्याने कोणता किल्ला सर्वात प्रथम बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधला गेल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रत आढळतो.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला सह्याद्री पर्वतरांगाच्या दोन उपरांगा पूर्वेकडे जातात त्यातील भोलेश्वर डोंगररांगेत मल्हार गडाची बांधणी केली आहे यात रांगेत वज्रगड पुरंदर व सिंहगड येतात र दुसर्या रांगेत तोरणा व राजगड हे किल्ले येतात.
हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश पुणे सासवड रोड वरील दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी तोफ गोळे बनवण्याचा कारखाना यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या गडाच्या पायथ्याशी असणारे सोनोरी या गावात सरदार पानसे यांचे वास्तव्य होते या ठिकाणी त्यांचा वाडाही आहे या सोनोरी गावावरून गडास सोनोरी गड असेही म्हणतात.
किल्ल्यावर काय पहावे
मल्हार गड अन्य किल्ल्यांच्या तुलनेत कमी उंचीचा व आटोपशीर केला आहे या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची तीन हजार 166 फूट एवढी आहे किल्ला त्रिकोणी आकारात असून बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे.
किल्ल्याच्या चारी बाजूने 14 15 फूट उंचीची तटबंदी आहे परंतु तिची बऱ्याच प्रमाणात पडझड झाली आहे. किल्ल्याला पूर्व-पश्चिम समान अंतरावर दोन मुख्य दरवाजे आहेत यातील पूर्वेकडील दरवाजा महादरवाजा आहे तर पश्चिमेकडिल दरवाजा चोरदरवाजा आहे. महादरवाजा उंच व बांधीव आहे दरवाज्याच्या आत मध्ये पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत बाजूनेच आपण टेहळणी बुरुजावर जाऊ शकतो यातील महादरवाजातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला थोड्या अंतरावर वाड्याचे अवशेष व बांधीव दगडातील विहीर पाहायला मिळते बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पश्चिमेकडे गेल्यास एक पाण्याचे टाके व त्याच्या पुढे एक बांधीव विहीर पाहायला मिळते. दोन्ही विहिरीमध्ये पाणी नसते तर चौकोनी तळ्यामध्ये पावसात पाणी असते त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. थोडे पुढे गेल्यानंतर गडाचा दुसरा दरवाजा नजरेस पडतो झेंडे वाडी गावातून येणारी वाट याच दरवाजातून गडावर येते. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. इथून खालच्या बाजूला छोटा नैसर्गिक बोगदा पाहायला मिळतो.
गडाच्या तटबंदीच्या बाजूने फिरत असताना बालेकिल्ल्यातील दोन मंदिरे सतत लक्ष खेचत असतात. बालेकिल्ल्याचे बुरुज सहा-सात फूट उंच आहेत. बालेकिल्ल्यात महादेवाचे व खंडोबाचे मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरा मध्ये एक पिंड आहे. खंडोबाच्या मंदिरा बद्दल आख्यायिका अशी आहे की किल्ल्याचे बांधकाम करताना जमिनीतून रक्त येऊ लागले त्यामुळे पानसे यांनी जेजुरी जेजुरीच्या खंडेराया ला साकडे घातले की किल्ला पूर्ण होऊ दे त्यामध्ये तुझे मंदिर बांधीन. मंदिराच्या बाजूला राज्य सदरचा चौथरा पहायला मिळतो.
मल्हार गडाचा इतिहास
किल्ल्याच्या निर्मितीनंत१७७१ मध्ये थोरले माधवराव पेशवे गडावर येऊन गेल्याचे कागदपत्र मधून आढळते. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व त्यांचे सहकारी याच किल्ल्यावरून इंग्रज सरकारविरुद्ध गनिमी काव्याने बंड करत होते. पुढे फितुरी होऊन इंग्रजांना याची माहिती होतं इंग्रजांनी या किल्ल्यावर आक्रमण केले त्यामध्ये फडके यांचे अनेक सहकारी धारातीर्थी पडले परंतु फडके या हल्ल्यातून सुखरूप बाहेर पडण्यास यशस्वी झाले.
कसे कसे
या किल्ल्याला भेट देण्यासाठी मुख्य दोन रस्ते आहेत
१ पुणे सासवड मार्गावर दिवे घाट चढून वर गेल्यानंतर झेंडेवाडी गावचा फाटा लागतो या फाट्यावर दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यावर झेंडेवाडी गाव लागते या गावातूनच डोंगरामधील खिंडीकडे जावे लागते या खिंडीमधून मल्हारगड समोर दिसतो.
सासवड मार्गे येणार असेल तर सासवड मार्गे सोनोरी गावात यावे लागते या गावातून गड नजरेस पडतो. सोनोरी सासवड मार्गावर एसटी बसची सोय आहे. दिवसातून तीन वेळा बस या गावात येते.
सरदार पानसे यांचा वाडा
या किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी सोनोली गावातील सरदार पानसे यांचा सहभाग असणारा भव्य चिरेबंदी वाडा नक्की पहावा टोलेजंग आहे या वाड्यात गजानन मंदिर व लक्ष्मीनारायण मंदिर आहे तसेच पानसे यांची समाधी व तुळशीवृंदावन आहे. गावात अतिशय देखणे मुरलीधर मंदिर ही पाहण्यासारखे आहे काळ्या पाषाणात कोरलेली अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते पर्यटकांनी काय काळजी घ्यावी.
पर्यटकांनी काय काळजी घ्यावी
गडावर कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे सोबत पाणी द्यावे नाश्ता व जेवणाची व्यवस्था गडाखालील हॉटेलमध्ये होऊ शकते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर एसटी बस चे वेळापत्रक पहावे. गड लहान असल्याने ट्रेकिंग च्या दृष्टीने सोपा आहे.किल्लावरील मंदीरात पाच सहा जणांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते.
Khup chan
उत्तर द्याहटवा