संग्रामदुर्ग|चाकणचा किल्ला
किल्ल्याचे नाव: संग्राम दुर्ग/चाकणचा किल्ला
प्रकार: भुईकोट
जवळचे गाव: चाकण
जिल्हा: महाराष्ट्र
सद्यस्थिती: वाईट
चाकणचा किल्ला माहिती
पुणे-नाशिक रोड वरील चाकण मधील संग्राम दुर्ग म्हणजेच चाकणचा किल्ला फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्या सहाशे मावळ्यांचा पराक्रमाचे जणू प्रतीकच.
शिव इतिहासामध्ये फिरंगोजी बाबांच्या अतुलनीय पराक्रमामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शत्रुशी दोन हात करणारा संग्राम दुर्ग आज मात्र अतिक्रमण व काळापुढे हार मनताना दिसत आहे.
चाकणचा किल्ला पुणे जिल्ह्यात येत असून तो भूईकोट प्रकारातील आहे. प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारे चाकण हे ठाणे होते त्याचा मुख्य उपयोग मावळ व नेरां वर नजर ठेवण्यासाठी होत असे.
चाकण किल्ल्याचा इतिहास|संग्राम दुर्ग इतिहास:
चाकण किल्ल्याचा इतिहास पहात असताना हा किल्ला कोणी बांधला हे जरी सांगता येत नसले तरी बाराव्या शतकामध्ये याची निर्मिती झाली असावी. सुरवातीच्या काळामध्ये संग्राम दुर्ग देवगिरीच्या यादवांच्या कडे होता.
अल्लाउद्दीन खिलजी यादवांचा पाडाव केला व कोकण व दख्खन कडे आपला मोर्चा वळवला त्यावेळी त्याने या किल्ल्यावर आपले ठाणे केले होते. दौलताबादचा सुभेदार अमीर शहा याने छ. शिवरायांचे खापर पंजोबा मालोजी व खेळोजी भोसले यांना चाकण परगण्याची सुभेदारी दिली होती त्यावेळी हा किल्ला त्यांच्याकडे आला. नंतर च्या कालखंडामध्ये शहाजीराजांना पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर या किल्ल्या बरोबर आसपासचा प्रदेश त्यांच्या अंमलाखाली आला, त्यावेळी किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते.
शिवरायांच्या काळामध्ये फिरंगोजी बाबा स्वराज्यात आले व त्यांच्या बरोबर संग्राम दुर्ग! महाराजांनी संग्राम दुर्ग ची किल्लेदारी फिरंगोजी बाबां कडेच ठेवली.
इ.स.१६६० मध्ये विजापूरचा सरदार सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला त्या वेड्या मध्ये छत्रपती शिवराय पन्हाळगडावर अडकून पडले होते. अशा कठीण प्रसंगी स्वराज्यावर शाहिस्तेखान रूपी मोठे संकट येऊन पडले. शाहिस्तेखान आपल्या बड्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला त्याने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला व पुण्यातील लाल महालावर आपला तळ ठोकला. त्याची नजर जवळच असणाऱ्या संग्रामदुर्ग किल्ल्यावर गेली त्याने मोगल सरदार असणाऱ्या रायबाघण हीला वाटाघाटी करून किल्ला घेण्यासाठी चाकणच्या किल्ल्यावर पाठवले होते परंतु फिरंगोजी बाबांनी तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे खानाने वीस हजार फौजेनिशी आपला मोर्चा संग्राम दुर्ग कडे वळवला किल्ल्यावर मुरब्बी फिरंगोजी बाबा व 700 मावळे होते.
पावसाळा तोंडावर आल्याने आधीच किल्ल्यामध्ये अन्नधान्याची पुष्कळ व्यवस्था करून ठेवली होती.
२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाने किल्ल्याला वेडा दिला, किल्ला पाहून त्याला वाटले दोन दिवसात किल्ला आपल्या ताब्यात येईल पण हा त्याचा भ्रम होता. हा गढीवजा किल्ला मराठ्यांनी झुंजता ठेवला, रात्री-अपरात्री किल्ल्यातून बाहेर येऊन मराठे मोगली सैन्यावर हाल्ले करत गडामध्ये सुरक्षीत निघून जात. मोघल सैन्याची पाक दाणादाण उडवून दिली होती. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी बाहेरील बाजूस खंदक व त्यामध्ये पाणी असल्याने मोगलांना किल्ल्याजवळ येत नव्हते,अशातच पावसाळा सुरू झाला व तोफही निकामी झाल्या.
दोन दिवसात किल्ल्या जिंकण्याची भाषा करणारा खान दीड महिना झाला तरी किल्ला हाती येत नाही पाहून रडकुंडीला आला होता. मराठे रात्री येऊन छावणीवर हल्ला करतायत आपल्या सैन्याला तटा पर्यंत जाता येत नाही तोफा चालत नाहीत अशा परिस्थितीत काय करू काय नको असे होऊन बसले. त्याचवेळी त्यांनी एक शक्कल लढवली व खंदक खानून तटाच्या खाली सुरुंग पेरणीची आपल्या सैन्याला आज्ञा केली. खंदक खानला गेला व वाता पेटविण्यात आल्या त्याच बरोबर ईशान्येकडील बुरुज आकाशात भिरकावला गेला तटावर असणारे मावळे कामी आले. अशाही परिस्थितीत फिरंगोजी बाबा लढत होते.
मराठ्यानी हर हर महादेव करत पडलेल्या तटा पाशी मोर्चा बांधला बरेच लोक कामी आले. संख्याबळ कमी असल्याने होणारे सैन्याचे नुकसान पाहून फिरंगोजी बाबाने पांढरे निशाण दाखवले अखेर १६ ऑगस्ट १६६० मराठ्यांनी संग्रामदुर्ग सोडला. मोघली सैन्याने तब्बल ५६ दिवसांनी संग्रामदुर्ग जिंकला व त्यावर हिरवा निशान फडफडायला लागला.
संग्राम दुर्ग वर पाहाण्यासारखी ठिकाणे:
संग्राम दुर्ग हा भुईकोट प्रकारातील किल्ला असून साधारणपणे पूर्व-पश्चिम असा आहे कालौघात या किल्ल्याची बरीच पडझड झाली आहे. या किल्ल्यामध्ये जास्त काही औषध फायदा मिळत नाहीत परंतु पूर्व व दक्षिण बाजूची तटबंदी काही प्रमाणात आजही तग धरुन उभी आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असले तरी सध्या पश्चिम कधी बाजूने गडामधे प्रवेश होतो. गडामध्ये प्रवेश केल्यानंतर बाजूला दामोदर विष्णू मंदिर पाहायला मिळते मंदिराच्या आत मध्ये दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या आहेत. गडाच्या मधोमध एक ध्वज व चौथरा बांधून त्यावर तोफ ठेवलेली दिसते. त्याच प्रेमाने उत्खनना मध्ये काही खांबांचे अवशेष ही आढळून आलेले दिसतात.तोफेच्या पश्चिम बाजूला मज्जित असून या ठिकाणचे मंदिर व मज्जित अलीकडच्या काळात बांधले असावे असे वाटते. इथून पुढे दक्षिण बाजूला असणाऱ्या तटबंदीवर जाण्यासाठी रस्ता आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून आजूबाजूचा संपूर्ण परिसर दृष्टीक्षेपात येतो. सिमेंट वापरून तटबंदीची डागडुजी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. गडाची तटबंदी तशी उंच असून दगड विटा मधील बांधकाम केले आहे दोन तीन टेहळणी बुरुज व बंदुकांचा मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या नजरेस पडतात.
तटावरुन खाली उतरुन मुख्य दरवाज्याकडे गेले असता बाहेरील बाजूस तटाला लागूनच खदक व उंचपुरी तटबंदी पहायला मिळते. त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा अंदाज येऊ शकतो. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवडी पायला मिळते. त्याचप्रमाणे काही कोरीव शिल्पे ही पाहायला मिळतात. या किल्ल्याला अतिक्रमणाने वेढले असून चाकण ग्रामपंचायतीचा चक्रपाणि मंदिराकडे जाणारा मार्ग किल्ल्या मधूनच केला आहे. किल्ल्या बरोबरच चक्रपाणि मंदिर ही पहावे मंदिर तलाव बगीचा व परिसर अतिशय सुंदर आहे.
संग्राम दुर्ग ला जायचे कसे
पुण्यावरून येणाऱ्या लोकांनी पुणे नाशिक हायवे ने चाकणच्या मेंन चौकातून उजवीकडे वळावे. तिथून आत गेल्यावर बाजारपेठही पुढे गेले की हाकेच्या अंतरावर किल्ला आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणार असाल तर पुण्यातून नारायणगाव जुन्नर ला जाणाऱ्या बस नाही चाकण मध्ये उतरून चालत पाच मिनिटात किल्ल्यावर जाता येते.
मुंबई वरून येणारा लोकांनी तळेगाव चाकण मार्गे संग्राम दुर्ग ला जाता येते. तळेगाव हे जवळचे रेल्वे स्टेशन असून स्टेशनच्या बाहेरूनच चाकण ला जाण्यासाठी एसटी किंवा खाजगी वाहने मिळतात.
काय काळजी घ्यावी
- चाकणचा किल्ला बाजारपेठ असल्याने याठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज भासत नाही.
- किल्ला साधारण 20 ते 30 मिनिटात पाहून होतो.
- चाकणचा किल्ला पाहायला येणाऱ्यांनी जवळ असणारे चक्रपाणि मंदिर ही पहावे.
- जेवण मुक्काम कष्टाची सोय चाकणमध्ये होऊ होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे