मुख्य सामग्रीवर वगळा

चंदन वंदन किल्ला माहिती

 चंदन वंदन गड किल्ला माहिती:

   चंदन-वंदन हे किल्ले सातारा जिल्ह्यातील वाई व कोरेगाव सीमेवर आहेत हे दोन्ही किल्ले गिरिदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ३८०० फूट एवढी आहे.या किल्लांची चढाई मध्यम स्वरूपाचे असून ट्रेकिंगच्या दृष्टीने दोन्ही किल्ले सोपे समजतात.

चंदन वंदन गड
वंदन गड किल्ला प्रवेशद्वार


      वंदन गड हा चंदनगड पेक्षा उंच असून याचे पाच टप्प्यांमध्ये विभाजन होते तर वंदन गडचे तीन टप्प्यांमध्ये. महाराष्ट्रा मध्ये जे शेजारी शेजारी किल्ले आहेत त्यांच्यामध्ये या दोन्ही किल्ल्यांचा समावेश होतो.
      गिरिदुर्ग बांधत असताना शेजारी कोणती ही टेकडी किंवा पर्वत नसावा असा प्रघात आहे, कारण यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर शेजारी पर्वत असेल तर त्याला फोडून नष्ट करावे किंवा टेकडीवर बांधकाम करून ती जागा सुरक्षित करून घ्यावी जेणेकरून मुळ किल्ल्याला यापासून कोणताही धोका उद्भवणार नाही. पर्वतावरील दुर्ग जोड्या महाराष्ट्रात पुरंदर-वज्रगड लोहगड विसापूर राजमाची श्रीवर्धन आदी ठिकाणी आपल्याला दिसून येतात.

चंदन वंदन गड  कुठे आहे:

       चंदन वंदन किल्ले सातारा पासुन २४ किलोमीटर अंतरावर कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर आहेत. सह्याद्री पर्वतरांगेची महादेव डोंगरा ही उपरांग प्रतापगड पासून सुरू होऊन कोरेगाव तालुका मध्ये जाते, तिच्यावर हे दोन्ही किल्ले बांधले आहेत. चंदन गड कोरेगाव तालुक्यात तर वंदन गड वाई तालुक्यात मोडतो. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदन गड वाई तालुक्यातील किकली गावांमध्ये मोडतो. या किल्ल्यामुळे कृष्णा व वासना नदीचे खोरे दुभागले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना पाचवड भुईंज गावाच्या दरम्यान महामार्गाच्या उजव्या बाजूला असलेले हे किल्ले सहज लक्ष वेधून घेतात. किल्ल्यांची असलेली उंची व सपाट माथा यामुळे हे किल्ले सहजच ओळखता येतात. किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा पुणे रोड वरील भुईंज तर सातारा लोणंद मार्गावरील अंबवडे गावातून जाता येते.

चंदन वंदन गड किल्ल्यांचा इतिहास

         शिलाहार राजा भोज दुसरा याने इ.स.११९२-११९३ मध्ये चंदन वंदन गडाचे बांधकाम केले. नवीन मिळालेल्या कागदपत्रा वरून छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.१६४२ मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अफजलखानाच्या वधानंतर सातारा पासुन पन्हाळा पर्यंत सारा प्रदेश स्वराज्यात सामील करून घेतला त्याच दरम्यान सातारचा किल्ला हाती आल्यानंतर या दोन्ही गडावर आक्रमण करून हे दोन्ही गट इन कोण यांची पूर्वीची नावे शूरगड व संग्राम गड ही बदलून त्याजागी चंदन वंदन अशी ठेवली.
चंदन वंदन गड
धान्य कोठार चंदन वंदन गड


         इसवी सन १६७३ च्या सुमारास सातारा प्रांत जिंकला आणि त्यामध्ये असणारे सारे किल्ले जसे की सज्जनगड कल्याणगड अजिंक्यतारा यांच्याबरोबर चंद्र वंदनीय नाही स्वराज्यात आणले.
         इ.स.१६८६ मध्ये संभाजी महाराजांच्या काळात मोगल सरदार अमानतुल्ला खान याने चंदन वंदन वर हल्ला चढवला या हल्ल्यात २५ गोडी २० बंदुका २ निशाणे १ नगार यांची लूट सापडली. याव्यतिरिक्त त्याला मोठा असा विजय मिळवता आला नाही. छत्रपती शंभूराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांनी औरंगजेबास जोरदार टक्कर दिली. त्यामुळे चौताळलेल्या औरंगजेबाने १६९९ मध्ये किल्ले काबीज करण्याची मोहीम सुरू केली, या मोहिमेमध्ये सर्वप्रथम वसंत गड काबीज करून त्याने सातारा प्रांतातील अनेक किल्ले काबीज केले त्याच दरम्यान चंदन वंदन किल्लेही मोगलांनी काबीज केले असावेत.
         इ.स.१७०७ मध्ये छत्रपती शाहू मोगलांच्या कैदेतून सुटल्यानंतर पहिले सातारचा किल्ला काबीज केला व त्याच वर्षी चंदन वंदन किल्ले जिंकून त्याच्यावर फौजफाटा नेमला.
         इ.स.१७५२ मध्ये ताराबाई वर लक्ष ठेवण्यासाठी दादोपंत यांची बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्यावर नेमणूक केली.
         इ.स.१८१८ सालापर्यंत हे दोन्ही किल्ले मराठा समाजात होते. तिसऱ्या अंगलो मराठा युद्धानंतर हे दोन्ही किल्ले ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेले.

चंदन वंदन गडावर पाहण्यासारखी ठिकाणे:
    चंदन वंदन गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात या ऐतिहासिक वास्तू मुळे किल्ल्याचे असणारे महत्त्व सहज लक्षात येते.

चंदन गडावर पाण्यासारख्या ठिकाणे:

       चंदन गडावर प्रवेश करतानाच सुरवातीला एक भग्नावस्थेतील प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात.

महादेव मंदिर:

       चंदन गडावर पंचरंगी शिवलिंग असलेले महादेव मंदिर व त्याच्यासमोरच नंदी पाहायला मिळतो. मंदिराच्या बाजूला भव्य असे वटवृक्ष आहे या वटवृक्षाच्या जमिनी बाजूला घेर दहा फूट एवढा प्रशस्त आहे.

दगडी मिनार:

      गडावर प्रवेश करत असणार मंदिराच्या वरील बाजूस राजा भोजने दगड रचून उभे केलेले दोन मिनार पाहायला मिळतात.  दगड एवढे मोठे आहेत की हे मिनार कसे तयार केले असेल याचा प्रश्न पडतो.

दारुगोळा कोठार:

      गडाच्या निवृत्ती बाजू कडील टोकास एक दगडी बांधकामात कोठार पाहायला मिळते.
      गडाच्या वायव्य बाजूला बुरुज व समाधी दिसते तिच्यावर शिवलिंग व मारुतीची प्रतिमा कोरलेली असते.
      गडाच्या पठारावर एक बांधीव विहीर असून तिच्यामध्ये मार्च महिन्यापर्यंत पाणी शिल्लक असते.

वंदना गडावर पाहण्यासारखी ठिकाणे:

महादरवाजा:

      दोन्ही किल्ल्याच्या मधील खिंडीतून वंदन गडाकडे जात असताना पहिला दरवाजा लागतो. दरवाजात खूप प्रशस्त असून याची निर्मिती मराठा शैलीमध्ये केली आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस गणपतीची मूर्ती व चौकटीत बाजूला फुलांचे नक्षीकाम केलेले दिसते. दरवाजाच्या आतील बाजूस प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजाच्या उजव्या बाजूची पडझड झालेली पाहायला मिळते.

दुसरा दरवाजा:

     किल्ल्याचा दुसरा दरवाजा उंच व प्रशस्त असून बांधकाम दरवाजाची भव्यता सहज जाणवते. परंतु त्याच्या आतील बाजूस पडझड झाली असल्याने दरवाज्यातून आत जाता येत नाही.

इमारत:

     दुसऱ्या बाजूलाच एक भव्य अशी वास्तु  पाहायला मिळते त्या वास्तूमध्ये छोट्या छोट्या खोल्या पाहायला मिळतात.

चुन्याचा घाणा:

     गडावर फिरत असताना पठारावर एक पुण्याचा घाना पाहायला मिळतो परंतु त्याचे चाक सध्या अस्तित्वात नाही.

दर्गा;

     या किल्ल्यावर अनेक इस्लामिक राज्य तरत्यांनी शासन केले असल्याने अनेक इस्लामिक वास्तू पाहायला मिळतात त्यामध्ये दोन दर्गे व कमान पाहायला मिळते. दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस छोटी कमान व तलाव पाहायल मिळतो.

बालेकिल्ला:

    गडावर एक टेकडी असून तिच्यावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर बुरुज व इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. बालेकिल्ल्या वरून आकाश निरभ्र असेल तर जरंडेश्वर डोंगर, कल्याण गड, भवानी डोंगर महाबळेश्वर पर्यंतचा प्रदेश सातारा शहर सहज पाहू शकतो.

तलाव:

     गडावर जागोजागी पायऱ्या असलेली छोटी-मोठी अशी चार तलाव पाहायला मिळतात.
चंदन वंदन गड
चंदन वंदन किल्ला


चंदन-वंदन ला जायचे कसे:

   पुणे किंवा सातारा वरून एसटीने प्रवास करणारे पुणे सातारा मार्गावरील भुईंज गावामध्ये उतरून खाजगी वाहनाने किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकतात.
स्वतःच्या वाहनाने जाणार असतील तर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग वरील भुईंज किंवा पाचवड गावापासून डावीकडे असणाऱ्या कारखाना किकली बेलमाची मार्ग गडाचा पायथ्या पर्यंत जाऊ शकतात.
सातारा लोणंद रोडवर असणाऱ्या आंबवडे गावातून डाव्या बाजूला वळून आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बनवडी गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

रेल्वे मार्ग:

  मुंबई पुण्याहून रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांसाठी वाठार स्टेशन हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.

काय काळजी घ्यावी:

  •     किल्ल्यावर कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्याने जाताना सोबत पाणी घेऊन जावे.
  •     सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर गाड्यांचे नियोजन पाहावे.
  •     गडावर कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ मिळत नाहीत.
  •     गडावरील दर्ग्यामध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
  •     दोन्ही किल्ले एका दिवसामध्ये सहज पाहून होऊ शकतात.
चंदन वंदन गड
चंदन वंदन गड दर्गा


  
    
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण