लोहगड किल्ल्याची माहिती:
ऐतिहासिक व निसर्ग संपन्न अशा पवन मावळात पवना धरणाच्या जलाशयाच्या सानिध्यात लोहगड किल्ला असून पुणे मुंबई महामार्गा लगत.मळवली रेल्वे स्टेशन पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. लोहगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात आहे
लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे पवन मावळातील महत्त्वाचे किल्ले.यातील लोहगड किल्ला प्रशस्थ, मजबूत आणि भक्कम आहे. लोखंडा सारखा कणखर असल्या मुळे लोहगड हे नाव शोभते .बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी लोहगडावर होती.हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांमुळे यांची चढन सोपी आहे.समुद्र सपाटी पासून गडाची साधारण उंची ३००० फुट आहे.पुणे आणि मुंबई पासून जवळ असल्यामुळे या किल्ल्यावर दुर्गप्रेमी आणि पर्यटकांचा राबता वर्षभर पहायला मिळतो.
किल्ल्यावर काय पहावे:
गडावर जाण्यासाठी वाहन तळा पासून उत्तम पायऱ्या आहेत.सत्तर ऐंशी पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा पहीला दरवाजा लागतो याला गणेशदरवाजा असे म्हणतात. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणपती च्या दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस दगडात कोरलेला शिलालेख आहे.येथेच उजव्या बाजूला बुरजा खाली सावळे कुटुंबाचा नरबळी दिला होता.त्या बदल्यात त्यांचा कुटुंबाला लोहगड वाडी ची पाटीलकी देण्यात आली होती. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच चार पाच तोफा दिसतात तसेच साठवणूक करण्याची बांधीव जागा दिसते व बांधीव टेहळणी बुरूज आहे. बाजूचा दिंडी दरवाजातून टेहळणी बुरुजावर जाता येते.या बुरुजावर चोरदरवाजा व सैन्याचा वापरासाठी सौचालय आहे. तटबंदी वरुन पवनेचा जलाशय मन प्रसन्न करतो. पाय-या तून चालत वर गेल्यावर गडाचा दुसरा दरवाजा लागतो याला महादरवाजा असे म्हणतात. या दरवाज्यातून आपन गडाच्या दुसऱ्या तटबंदी वर जाऊ शकतो.येथून दिसनारे पहील्या तटबंदीचे आखीव रेखीव दृश्य मन प्रफुल्लित करते.पुन्हा पायरी मार्गाने चालत गेल्यावर धान्याचे कोठार दिसते. याचा वापर धान्य साठविण्यासाठी केला जात असे.
तिसरा दरवाजा
पायऱ्यां तुन वर गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो याला नारायण दरवाजा असे म्हणतात.हा दरवाजा नाना साहेब पेशव्यांनी बांधून घेतला होता.या दरवाजाचा जवळच गडाचा मुख्य दरवाजा आहे.याला हनुमान दरवाजा असे म्हणतात हा किल्ल्याचा सर्वात जुना दरवाजा आहे.
बालेकिल्ला
दरवाज्यातून आत गेल्यावर गडाचा मुख्य भाग सुरू होतो. समोरच राजा राणी चे मंदिर (दर्गा)आहे. बाजूलाच सभागृहाचे अवशेष आहेत.किल्लावर अनेक पाणयाचे टाके आहेत.त्यातील फक्त एकाच टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे.समोर चालत जाताना लांबसर कडा दिसतो त्याला विंचू कडा असे म्हणतात.विंचवाच्या शेपटी प्रेमाने म्हनून विंचू कडा! विंचू कड्याकडे जाणारा मार्ग निमुळता व घसरट असल्याने येथे लोखंडी कंपाऊंड मारले आहे.या कड्याची लांबी साधारण पंधराशे मीटर लांब व तिस मीटर रुंद आहे.या कड्याचा दोन्ही बाजूला बांधीव तटबंदी केली आहे विंचू काट्याच्या शेवटच्या टोकाला सौरक्षणासाठी दुहेरी तटबंदी व दिंडी दरवाजा आहे.
किल्लावर पिरबाबांचा दर्गा आहे.तिथून पुढे शेरे बावडी (पाण्याचे टाके) आहे.पुढे जात राहिले की समोरच लेणी किंवा गुफा आहेत.त्यांना लक्ष्मी कोठी म्हणतात.ही गुफा मोठी आहे आत गेल्यावर सभामंडप व बावीस खोल्या आणि तळघर आहे.पुढे अष्टकोनी तलाव आणि महादेवाचे मंदिर लागते. मंदिरामध्ये समोरच हनुमानाचे ही मंदिर आहे.
लोहगड किल्ल्याचा इतिहास:
लोहगड किल्ला कधी बांधला याचा काळ जरी सांगता येत नसले तरी, गडावर खोदलेली गुहा आणि बेडसे लेण्या या जा काळातील आहेत त्यांचा आधी हा गड बांधला असावा.या गडाने सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव आदिलशाही,मोगल मराठा अशा अनेक राजवटी पाहिल्या.
१४८९ मलीक अहमद ने निजामशाही ची स्थापना केली आणि सुरवातीला जे किल्ले जिंकले त्यामध्ये लोहगड किल्ला ही होता. १६३० मध्ये किल्ल्या आदिलशाही तर आला.
१६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी सरदार बाबाजी महादेव यांना कल्याण भिवंडी ची मोहीम सोपविली तेव्हा कल्याण भिवंडी पासून रायरीपर्यंतचा प्रदेश स्वराज्यात आला त्यावेळी कलावंतीण दुर्ग व विसापूर लोहगड हे किल्ले ही स्वराज्यात आले. १६६५ मध्ये मुगल सरदार राजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदर तहात जे तेविस किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले.त्यात लोहगड ही होता.पुढे १६७० मध्ये तह मोडून मराठ्यांनी लोहगड पुन्हा जिंकून घेतला.नेताजी पालकरांनी सुरत लुटेत आणलेली संपत्ती लोहगडावर ठेवली होती.
शाहु महाराज छत्रपती झाल्यानंतर १७१३ मध्ये किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला.नंतर किल्ला पेशव्यांकडे गेला.१७७० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी धोंडोपंत नित्सुरे यांच्यावर किल्ल्याची जबाबदारी टाकली.१७८९ मध्ये नानासाहेबांनी किल्ल्यावर बांधकाम करुन किल्ला आणखी मजबूत करुन घेतला.त्याच बरोबर किल्ल्यावर सोळा काणी तलाव बांधला. १८१८ साली जनरल प्राॅथर लोहगड जिंकण्यासाठी आला सुरवातीला लोहगड झुंजत होता परंतु इंग्रजांनी विसापूर जिंकताच दुसऱ्या दिवशी मराठे गड उतार झाले व लोहगड ही पडला,व लोहगड ब्रिटीश अधिपत्या खाली आला.
लोहगड ला जायचे कसे:
लोहगड ला जाण्यासाठी एसटी बस सेवा नाही परंतु तुम्ही जर सार्वजनिक वाहतूक वापरून जाणार असाल तर पुणे मुंबई लोहमार्गा वरील मळवली रेल्वेस्थानका वर उतरून एक्सप्रेस हायवे पारकरुन भाजे गावातून वाट लोहगड वाडी दिड तास चालत गायमुख खिंडीत पोहोचतो . खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट लोहगड लागले जाते तर डावीकडे जाणारी वाट विसापूर किल्ल्याकडे जाते.
पुण्यातून जर कार किंवा दुचाकी ने येणार असाल तर पौड कोळवण तिकोना पेठ पवना धरणाच्या बाजूने लोहगड ला जाते तसेच पुणे मुंबई जुन्या महामार्गावरुन कामशेत पवनानगर रोड ने काळे काॅलनी मार्ग लोहगड ला जाता येते. तसेच पुणे मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्या वरून डावीकडे वळून मळवली भाजे मार्गे लोहगड ला जाता येते.
मुंबई वरून येणार असाल लोणावळ्यातून ट्रेन ने मळवली रेल्वेस्थानका उतरुन लोहगड लागले जाता येते. तसेच लोणावळ्यात खाजगी वाहन भाड्याणे मिळते. तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने येणार असाल तर कार्ला फाट्यावरून मळवली मार्गे लोहगड ला जाता येते.
काय काळजी घ्यावी:
लोहगड ला वर्षभरात केंव्हाही जाऊ शकता. सार्वजणीक वाहतूक वापरणार असाल तर वैळापञक माहिती करून घ्यावे. गडावर जेवणाची किंवा नाष्ट्याची सोय नाही. पायथ्याशी जेवणाची किंवा नाष्टा सोय आहे. गडावर पाण्याची सोय आहे.
जवळची प्रेक्षणीय स्थळे:
तिकोना किल्ला, विसापूर, तुंग, बेडसे लेणी, कार्ला लेणी
Very good
उत्तर द्याहटवा