इर्शाळगड पावसाळा किंवा हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधीक असते कारण ही तसेच आहे निसर्गाची मनसोक्त उधळण हिरव्यागार डोंगर रांगा दाट धुके,पावसाच्या सरी आणी गडावरून दिसणारे नयनरम्य दृश्य असै वातावरण वर्षभराची धावपळ आजूबाजूचा गोंगाटा या पासून मुक्ततः मिळते व नविन उर्जा प्राप्त होते.
इर्शाळगड मुंबई पुणे लोहमार्गावर पनवेल पासून साधारण २०किमी अंतरावर असलेला किल्ला महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळात जे केले निर्माण झाले त्या काळातील किल्ला नक्की असावा. उंची ३७०० फूट असून गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्यावर वेगळ्या ठिकाणी खडकात खोदून निर्माण केलेल्या चार पाण्याची टाकी आहेत तसेच गुहा पाहायला मिळतात परंतु गुहेपर्यंत जाणे जिकरीचे काम आहे याव्यतिरिक्त किल्ल्यावर पाण्यासारख्या वास्तू किंवा अवशेष आढळत नाहीत किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या वरील भागात असलेले निसर्गनिर्मित नेढ होय सर्वसाधारणपणे सात ते आठ फूट चंद्रकृती आकाराचे हे नेढ आहे. नेढ आर पार असून यामधून व्यक्ती पलीकडे सहज जाऊ शकते. याठिकाणी येण्यासाठी छोटासा उभा कडा चढून यावे लागते हा कडण्यासाठी दोन छोट्या शिड्या व दोरखंडाची व्यवस्था करण्यात आली आहे परंतु हा कळताना अपघाताची शक्यता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
irshalgad fort |
पनवेल लोणावळा मार्गावरील चौक गावातून मोरबे धरणाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या मानवली चौकातून गडाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यास गडाच्या पायथ्याशी असणार्या गावामध्ये जेवण नाश्त्याची सोय होते याच ठिकाणी वाहन पार्क करावे लागते. समोर आपल्याला एक छोटी टेकडी व त्याच्या पलीकडे उंच असा दिसतो पायवाटेने गेल्यानंतर सुरुवातीला एक टेकडी लागते त्या टेकडीवर गेल्यानंतर बाजूला असणारा मोरबे धरणाचा जलाशय अतिशय सुंदर दिसतो आणि हे दृश्य सुरुवातीलाच आलेला थकवा दूर करण्यासाठी पुरेसे आहे.
इर्शाळगड |
पायवाटेने जात असताना कधी सपाटी तर कधी चढण असा रस्ता गडाच्या मध्यावर असणाऱ्या इर्शाळवाडी मध्ये येऊन पोहोचतो.३०ते४० कौलारू घरांची ही वाडी आहे. याठिकाणी घरगुती पद्धतीचे जेवण व नाश्त्याची सोय होते तसेच लिंबू सरबत ही मिळू शकते. पूर्व आणि पश्चिम दिशेने गडावर जाण्यासाठी वाट आहेत पूर्वेकडील वाट अतिशय अवघड असल्याने पश्चिमेकडील वाटेने त्यामानाने थोडे सोपे आहे. या वाडीतून गडा कडे जात असताना वाटेमध्ये इसाळ देवीचे छोटे मंदिर लागते.वाटेत छोटे छोटे पाण्याचे प्रवाह घनदाट झाडी लागते. इथून पुढे छोटी चढण चढून गेल्यानंतर गडाच्या वरील टप्प्यावर येऊन पोहोचतो या ठिकाणावरून गडाच्या सुळक्याची भव्यता नजरेस पडते या दिशेने पुढे गेल्यानंतर उत्तरेकडील वाटेने जाणारा मार्ग निवडावा लागतो हा रस्ता अतिशय अरुंद असून एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंच कडा आहे काही अंतर चालून गेल्यानंतर कडून जाण्यासाठी गडाच्या वरच्या भागात जाण्यासाठी शिडी व दोर थंडा ची व्यवस्था केलेली पाहायला मिळते या ठिकाणावरून वर जात असताना खडकात खोदलेले पाण्याची टाकी पाहायला मिळतात व एका देवीचे मंदिर पाहायला मिळते. वर चढून गेल्यानंतर नेढ्या पर्यंत जाऊन पोहोचतो. येथुन वर गेल्यानंतर गडाच्या वरच्या भागात मध्ये येऊन पोहोचतो. याठिकाणी गडाचा मुख्य सुळका आहे. सुळक्या वर जाणे अतिशय अवघड असल्याने या ठिकाणी जायचा कुणीही प्रयत्न करू नये. सुळक्याच्या एकाबाजूला पाण्याचे टाके आहे र दुसर्या बाजूला पाच सहा माणसे बसतील एवढी सपाट जागा आहे या ठिकाणी बसून समोरचा परिसर व्यवस्थित पाहता येतो आकाश स्वच्छ व निरभ्र असेल तर गडावरुन राजमाची, ढाग, तुंग, माणिक गड, कर्नाळा, प्रबळगड, हे गड पाहू शकतो तसेच माथेरान व पनवेल हे ही पाहू शकतो.
इतिहास:
इरशाळगड किल्ल्याचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख आढळत नसला तरी. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सरदार बाबाजी महादेव यांना कल्याण ची मोहीम सोपवली होती त्यामुळे मी कल्याण भिवंडी पासून रायरी पर्यंतचा सारा मुलुख स्वराज्यात आला त्यामध्ये इरशाळगड साई समावेश असावा. सरनोबत नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगाच्या पायथ्याची असलेल्या चौक या गावात झाला. प्रथम आंग्ल मराठा युद्ध वेळी येथील गडांच्या मदतीने मराठा सैन्याने ब्रिटिशांच्या मुंबई कंपनीचा पराभव केला व त्यांना मुंबई पुरतेच मर्यादित ठेवले.
इर्शाळगड चा सुळका |
कसे जावे:
इरशाळगड ला जाण्यासाठी पनवेल वरून लोकल ट्रेन ने चौक गावामध्ये उतरून गडावर जाता येते तसेच एसटी बसेस ही थांबतात पनवेल पासून खाजगी वाहनांची सोय होऊ शकते
पुण्यावरून येणाऱ्यांसाठी लोणावळा खोपोली खालापूर मार्गे चौक या गावातून किल्ल्यावर जाता येते लोणावळ्यावरून लोकल ट्रेन चौक रेल्वे स्टेशन ला उतरून इर्शाळशळ गडावर जाता येते.
कडा |
काय काळजी घ्यावी:
किल्ल्याची चढाई अतिशय कठीण व निसरडा असल्याने चांगल्या प्रतीचे ट्रेकिंगचे बूट व हातामध्ये सपोर्टसाठी काठी असणे आवश्यक आहे. व आपण आपली स्वतः विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
आपल्याबरोबर मुबलक प्रमाणात पाणी असणे आवश्यक आहे किल्ला चढताना त्याच्या अत्यंत आवश्यकता जाणवते.
किल्ल्याच्या पायथ्याशी जेवण व नाश्त्याची घरगुती पद्धतीची सोय होऊ शकते.
किल्ल्याच्या सुळक्यावर चढण्याचा प्रयत्न करू नये याच ठिकाणी अपघाताची जास्त शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे