मुख्य सामग्रीवर वगळा

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

जिवधन  किल्ला 

नाव: जिवधन
उंची: ३७५०फूट
प्रकार: गिरीदुर्ग
ठिकाण: नाणेघाट
जिल्हा: पुणे
सद्य स्थिती: चांगली
चढाई: अवघड
जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू.
Jivdhan-fort
जिवधन किल्ला


जिवधन किल्ला माहिती:

       कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले बांधले. जिवधन किल्ला आपल्या भौगोलिक स्थान व ऐतिहासिक महत्त्व त्याला आकर्षणाचे केंद्रबिंदू बनवतात. जिवधन किल्ला इतिहासाची आवड असणारे, निसर्गाचा आनंद घेऊ इच्छिणारे, ट्रेकिंग करणारे, स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करणारे अशा सगळ्यांना भरभरून प्रेम देतो. 

जिवधन किल्ला कुठे आहे:

        जिवधन किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर च्या निसर्ग संपन्न प्रदेशातील घाटघर जवळ आहे. नाणेघाटाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने याला घाटाचा पहारेकरी म्हणून ओळखला जाते. कोकण व देशाच्या सिमेवर किल्ला आहे.
Jivdhan-fort
वानर लिंगी सुळका


जिवधन किल्ल्याचा इतिहास:

        इसवी सन पूर्व काळापासून कोकण व देशावरील व्यापार नाणेघाटातून चालत असे. व्यापाराच्या दृष्टीने या घाटाची निर्मिती करण्यात आली होती. जुन्नर ही शकांची राजधानी होती.शकराजा नहपानाचे या ठिकाणच्या संपूर्ण प्रदेशावर वर्चस्व होते.त्याच्या काळातच नाणेघाट मार्गे चालणाऱ्या व्यापार भरभराटीस आला.सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शंकांचा पाडाव करून त्यांचे या ठिकाणचे प्रस्त संपवून जून्नर व परीसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.नाणेघाट या व्यापारी मार्गावर फार मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असल्याने,या मार्गावर नियंत्रण प्रस्तापीत करणे फार महत्त्वाचे होते.सातवाहन राजांनी सर्वप्रथम व्यापारावर नियंत्रण मिळवणे व संरक्षण करण्यासाठी घाटमाथ्यावर दुर्गांची निर्मिती केली.त्यापैकी जिवधन,चावंड, हडसर, शिवनेरी ही दुर्गचौकडी नाणेघाटाचे संरक्षण करू लागली.त्यामुळे चारही किल्ले नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून म्हणून ओळखले जातात.
सातवाहन सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी या वाटेवर वाटसरुंच्या मुक्कामा साठी डोंगरांमध्ये मध्ये अनेक लेणी व पाण्याची टाकी निर्माण केली.
        जिवन वर सातवाहन बरोबरच काही काळ चालुक्य व राष्ट्रकूटांची राजसत्ता देखील होती.इ.स. ११७० ते१३०० मध्ये यादवांनी जुन्नर परीसरावर वर्चस्व प्रस्थापित केले त्या वेळी जिवधन ही यादव सत्तेच्या अमलात गेला असावा.
        इ.स. १४८५ मध्ये बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर निजामशाही स्थापना करणाऱ्या मलिक अहमद ने उत्तर कोकण व पुणे प्रांतातील अनेक किल्ले व प्रदेश निजामशाहीत सामील करून घेतले.त्यामध्ये इ.स. १४८८ जिवधन बरोबर मावळातील बरेच किल्ले निजामशाहीत सामील करून घेतले होते.इ.स.१५९५ मध्ये जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्या कडे होता.
        इ.स. १६६३ मध्ये मोगल व आदिलशहा एकत्र येऊन निजामशाही वर जोरदार आक्रमण केले.त्यावेळी निजामशहाचा एक वंशज मुर्तुजा याला जिवधन वर कैद करून ठेवले होते.शहाजी राजांनी मुर्तुजा ला जिवधन वरून सोडवून पेनगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून घोषीत केले व स्वता वजीर बनले.शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्याची या बहाण्याने स्वतंत्र राज्य निर्मिताचा जो प्रयत्न केला, तो काही सफल झाला नाही.मोघली फौजे पुढे निभाव न लागल्याने शहाजी राजांना मोगलांशी तह करून जिवधन बरोबर अन्य किल्ले मोगलांना द्यावे लागले.
        शिव कालखंडा मध्ये या किल्ल्याचा इतिहास झाकोळला गेला असल्याने यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
        इ.स. १८१८ मध्ये झालेल्या तिसऱ्या ॳॅग्लो मराठा युध्दा वेळी जिवधन गडावरील धान्य कोठाराला मोठ्या प्रमाणात आग लागली व किल्ला इष्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.जिवधन किल्ला ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांनी पुन्हा हल्ला करु नये म्हणून,सर्व प्रथम किल्ल्याच्या पायऱ्या व इतर वास्तू सुरुंग लावून उध्वस्त केल्या.

जिवधन किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:

       जिवधन किल्ल्या पाहण्यासारखा असला तरी त्याचा संपूर्ण प्रवासच रोमांचक व थरारक अनुभव देणा आहे. जिवधन किल्ला वैशिष्ट्य पूर्ण आहे.नाणेघाटचा परीसर , पावसाळ्यात वाहणारा उल्टा धबधबा कातळात खोदलेल्या पायऱ्या, खोल दरी, गर्द झाडी, घनदाट जंगल व भोवतालचा नयनरम्य परिसर मनमोहक आहे.
       जिवधन किल्ल्यावर दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत.नाणेघाट च्या बाजूने जानारी वाट गडाच्या कल्याण दरवाजातून किंवा कोकण दरवाजातून गडावर जाते. घाटघर मार्गे गडावर जाणारी वाट जून्नर दरवाजातून गडावर जाते.
       गडावरील दोन्ही दरवाजातून गडावर प्रवेश करण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्यांचा मार्ग आहे.त्यातील बऱ्याचश्या पायऱ्या उध्वस्त केल्या असल्याने रॉक क्ला्यबिंग करूनच वर जावे लागते.
       नाणेघाट चढून पठारावर आल्यानंतर जिवधन किल्ल्याचा उभा ताशीव कडा व वानर लिंगी सुळक्या मुळे किल्ला सहज ओळखता येतो.पठारावरून गडाकडे चालत जात असताना  उजव्या बाजूला खोल दरी व पावसाळ्यात वाहणारा उल्टा धबधबा नजरेस पडतो. या धबधब्याचे पाणी वाऱ्या मुळे खाली न पडता परत पठारावर उल्टे येत असल्याने याला उल्टा धबधबा असे म्हणतात. पठाराच्या खाली खोल दरी व दुरवर घनदाट जंगल नजरेस पडते. धबधब्याच्या डाव्या बाजूला जंगलातून पायवाट गडाच्या पायथ्याशी कड्या खाली पोहोचते.या वाटेत किर्र झाडी असल्याने दिवसाही सुर्याची किरणे जमिनीवर पडत नाहीत.कड्याच्या सुरवातीला कातळात कोरलेल्या ३०ते३५ पायऱ्या नजरेस पडतात, या पायऱ्या सुस्थितीत असून त्यांची कातळातील घडवन वैशिष्ट्यपूर्ण आहे.
       या कातळ कड्या खालून एक वाट वानर लिंगी सुळक्या कडे जाते. वानर लिंगी सुळका व गडाच्या कड्या मधून एक छोटीशी अरुंद वाट जाते. या घळीतून जाणाऱ्या वाटेवर गुहा पहायला मिळते.गुहा दोन दालनाची असून आत मध्ये खोली बनवलेली पहायला मिळते.
       वानर लिंगी सुळक्या कडून पुन्हा मुळ वाटेवर आल्यानंतर काही पातऱ्या चढून गेल्यानंतर जागो जागोजागी सुरूंग पेरण्याच्या खुणा पाहायला मिळतात.सुरूंगाची दारु भरुन पायऱ्या उडवून दिल्याने जागोजागी वाटेत  पायऱ्यांचे दगड पडलेले दिसतात.
       गडाच्या ६०ते ७० पायऱ्या चढून गेल्यावर खडकात खोदलेल्या खोबण्यांचा उपयोग करून वर चढून जावे लागते. हा टप्पा अतिशय अवघड असून या ठिकाणी सुथक्षेच्या दृष्टीने दोरखंड लावून वर जाणे फायद्याचे ठरते. वरील भागात अजून एक पायरी मार्ग सुरु होतो हा मार्ग चिंचोळ्या जागेतून असून गडाच्या तटबंदी पर्यंत जातो.
       जिवधन किल्ल्याचा दरवाजा गोमुखी बांधणीचा असून सुरक्षेच्या दृष्टीने तो तटबंदीच्या आतील बाजूस काटकोनात निर्माण केला आहे.शत्रुला सहजा सहजी जवळ आल्या शिवाय दरवाज्या  नजरेस पडणार नाही अशी याची रचना पहायला मिळते.दरवाज्याच्या सुरक्षेसाठी डाव्या बाजूला बुरुज आहे.
       जिवधन चा दरवाज्या व डाव्या बाजूची तटबंदी अखंड कातळात तासून निर्माण केली आहे.दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे याला कुठेही सांधा किंवा जोड पहायला मिळत नाही.दरवाज्याच्या कमानीवर मध्यभागी कलश तर दोन्ही बाजूला सुर्य व चंद्राचे शिल्प कोरलेले आहे. दरवाजाच्या सुरक्षेसाठी तटावरती आक्रमक जंग्या व झरोके ठेवलेले आहेत.दरवाज्याच्या आतील बाजूस सुरुंग लावून दरवाज्यातील मार्ग बुजवला होता. त्यांचे मोठाले दगड आजही वाटेत पहायला मिळतात.दरवाज्यातून आतमध्ये काही पायऱ्या चढून गेल्यावर गड माध्यावर पोहोचतो.
       जिवधन किल्ल्या माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागला आहे.बालेकिल्ला म्हणजे गडाच्या मध्यावर असणारी टेकडी वजा उंचवटा आहे. जिवधन किल्ला ६५ एकर परीसरामध्ये असून साधारण आयताकार उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. दरवाज्यातून आत आल्या नंतर उजवीकडे जाणारी वाट वानर लिंगी सुळक्या कडे जाते.
       बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत दोन ठिकाणी पाण्याची टाकी पहायला मिळतात.यातील वरील भागात पाच टाक्यांचा समुह असून यातील दोन मोठी तर तिनं लहान टाकी आहेत.टाक्यां पासून खाली उतरून माचीवर गेले असता वाड्याचा चौथरा व काही बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात.बाजूलाच गडाच्या शेवटच्या टोकाला वानर लिंगी सुळका आहे. वानर लिंगी सुळका जिवधन च्या कड्या पासून वेगळा असून साधारण ४०० फूट एवढी त्यांची उंची आहे.
       बालेकिल्या वरूनच समोर वाट जून्नर दरवाजाच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूला दगडी रचून उभारलेल्या चौथऱ्यावर गडदेवता  जीवाईदेवीची मुर्ती आहे.या देवीच्या नावावरून या गडाला जिवधन असे नाव दिले आहे. देवीच्या चौथऱ्याच्या मागिल बाजूस दोन समाध्या व तलाव आहे जून्नर दरवाजाच्या डाव्या बाजूला दगडात बांधकाम केलेली वास्तू नजरेस पडते,ही वास्तू म्हणजे लेणी होय.
       वास्तूचे प्रवेशद्वार अतीशय लहान असले तरी आत मध्ये वास्तू अतिशय भव्य दिसते. कोठाराच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी चे शिल्प कोरलेले आहे. वास्तू एका मागे एक अशी तीन दालनात विभागली असून सुरवातीच्या दोन दालनांच्या छतावर कमळांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. बाजुच्या खांबावर शेष नागांचे शिल्प आहे. दालनातील खोलीला कमानीदार दरवाजा  सुबक खिडक्या बनवलेल्या आहेत.  वास्तूमध्ये पुर्ण अंधार असून विजेरी शिवाय आतील काही दिसत नाही.एकंदरीत हे धान्य कोठार असून १८१८ मध्ये लागलेल्या आगीत धान्य साठा जळाला होता त्याची राख आजही या ठिकाणी पहायला मिळते.
       कोठारा पासून उजव्या बाजूला जून्नर दरवाजा कडे जात असताना वाटेत अनेक बांधकामांचे अवशेष आहेत. अवशेषांमध्ये सदर व किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा व अवशेष दिसतात.
       गडावर जागोजागी बुरुज व तटबंदी चे बांधकाम पहायला मिळते. जुन्नर दरवाज्याच्या बाजुला ही तटबंदीचे बांधकाम आहे. जुन्नर दरवाजा पुर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजाच्या बाजूला खडकात खोदलेली खांबटाकी आहेत. जुन्नर दरवाज्या पासून काही अंतरावर पहारेकऱ्यांच्या खडकात खोदलेल्या खोल्या आहेत. जुन्नर दरवाजाचा पायरी मार्ग ही ब्रिटीशांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केला होता. या ठिकाणी वनविभागाने सुरक्षेसाठी जागोजागी लोखंडी रेलिंग लावलेले आहेत.
       गडाच्या माचीवरून गडाला पुर्ण प्रदक्षिणा मारता येते.माचीवर जागोजागी पाण्याची टाकी, तटबंदी,शिबंदीची घरे,आहेत.एका मोठ्या पाण्याच्या टाकीवर महिषासुरमर्दिनी ची मुर्ती कोरलेली आहे.नानेघाटच्या बाजूला तटबंदीवर पहारेकऱ्यांच्या चौक्या आहेत.
       जिवधन किल्ल्या वरुन कोकणातील बराचसा प्रदेश पहाता येतो. गडावरून वानर लिंगी सुळका,सिध्दगड, शिवनेरी, हडसर,चावंड, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट पहाता येतो. 
       

जिवधन ला जायचे कसे:

       पुण्यावरून जिवधन ला जाण्यासाठी पुणे,चाकण, मंचर नारायणगाव, जुन्नर मार्गे घाटघर ला जाता येते.जर स्वताच्या वाहनाने जिवधन ला जाणार असाल तर गडाच्या पायथ्याशी गाडी जाते.सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार असाल तर रा.प.महामंडळाची बस जुन्नर घाटघर मार्गावर धावते.
       मुंबई वरुन जिवधन ला येणाऱ्यांसाठी कल्यान अहमदनगर रोडवरील मुरबाड माळशेज घाटाच्या पुढे खुबी फाट्यावरून जिवधन च्या पायथ्या पर्यंत गाडीने जाता येते.त्याच प्रमाणे नाणेघाट चढून जिवधन किल्ला जवळ करता येतो,यासाठी टोकवडे गावच्या पुढे उजव्या हाताला नाणेघाट कडे जाणारा फाटा फुटतो या वाटेने नाणेघाटा पर्यंत जानारा रस्ता आहे.

काय काळजी घ्यावी:

  •   जिवधन किल्ल्या पाहण्यासारखी दोन तीन तास लागतात.
  •   गडाच्या पायथ्याशी जेवणाची सोय आहे.
  •    गडावर कोठारात मुक्कामाची सोय होऊ शकते.    पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या होतात.
  •    जिवधन किल्ला व नाणेघाट दोन्ही एका दिवसात पाहून  होतात.      
        
        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल्यावर उभ्या कड्यापाशी येऊन पोहोचतो. हा कडा चढण्यासाठी

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत पासून १४ कि.मी. अंतरावर आहे.पवना धरण

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची समस्य

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये नदीचे पात्र कोरडे पडते. गोदावरी नदीवर जागोजागी बांध बांधून पाणी अडवण्यात आले आहे. गोदावरीच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी पिण्यासाठी औद्योगीकीरणा साठी होतो. गोदावरी नदी ने गंगे खालोखाल क्षेत्र व्यापले असून या भागातील पाण्याची गरज पूर्ण