राजगड किल्ला माहिती राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ते स्वराज्याची सर्वाधिक काळ राजधानी राहिला किल्ला यामुळे राजगड दुर्गराज म्हणून शोभतो. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेला किल्ला शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधणी कलेचा उत्तम उदाहरण म्हणजे राजगड.गडांचा राजा राजांचा गड म्हणून शोभतो,म्हणून राजगड किल्ला माहिती पाहू राजगड किल्ला राजगड किल्ला शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने व राजकीय केंद्रबिंदू असल्याने अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे जसे की सर्वाधिक काळ म्हणजे 26 वर्ष राजगडावर स्वराज्याची राजधानी होती या कालखंडामध्ये आखले गेलेले अनेक राजकीय डावपेच असतील मोहिमा किंवा नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड मिळवण्यासाठी आखलेली मोहिम असो अशा अनेक घटना राजगडावर घडल्या शिवाजी महाराजांच्या पत्नी व शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर ५ सप्टेंबर १६५६ रोजी झाले. शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराजांचा जन्म किल्ल्यावर २४ फेब्रुवारी १६ ७० रोजी झाला. राजगड क...