शिंदे छत्री:
पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. ज्या पुण्याच्या ऐतिहासिक व संस्कृती श्रीमंतीचे दर्शन घडवतात. त्यातीलच एक म्हणजे शिंदे छत्री.पुण्या जवळील वानवडी येथे १८ वरच्या शतकातील मराठा साम्राज्या तील मुसद्दी सरदार महादजी शिंदे यांचे समाधी स्थळ आहे, यालाच शिंदे छत्री म्हणतात.
महादजी शिंदे:
पानिपत चर्या लढाई नंतर मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देऊन गतवैभव प्राप्त करून देण्यात महादजी शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता.पानिपता नंतर अवघ्या दहा वर्षांत म्हणजेच १७७१ मध्ये दिल्लीवर पुन्हा भगवा फडकवून उत्तरेत मराठ्यांचा दबदबा निर्माण करण्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान होते.इंग्रज मराठा प्रथम युध्दात ब्रिटिशांना तह करण्यास त्यांनीच भाग पाडले.
१३ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे झाला.वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर शिंदे यांनी शंकराचे मंदिर बांधले होते.याच मंदीराच्या परिसरा मध्ये महादजी शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मारक बांधण्यात आले आहे.समादीच्या बाजूला शिवलिंग व मुखवटा ठेवण्यात आला आहे.
शिंदे छत्री वानवडी:
शिंदे छत्री चर्या बाहेरील बाजूस मारूतीचे मंदिर आहे.या मारुतीच्या मंदिराची स्थापना माधवराव सिंधिया यांनी केली आहे.मुख्य प्रवेशद्वारात तिकीट काउंटर असून प्रतीव्यक्ती १०रूपये प्रवेश फी आकारली जाते. दरवाज्यातून आत गेल्या नंतर महादेव मंदिर व महादजी शिंदे यांची समाधी दोन वास्तू पहायला मिळतात.
महादेव मंदिराचा गर्भग्रह व सभामंडप प्रशस्त आहे.सभामंडपाचा जिर्णोद्धार ग्वाल्हेर चे राजे माधवराव सिंधिया यांनी इ.स.१९१३ मध्ये केला.महादेव मंदीराच्या गर्भग्रहात शिवलिंग व महादजी शिंदे यांचा पुर्णोकृती पुतळा आहे, तसेच भिंतीवर सुरेख राधाकृष्णांची चित्रे रेखाटली आहेत.
मंदिराचा सभामंडप म्हणजे राजस्थानी स्थापत्य शास्त्राचा अदभूत नमुना आहे.त्याची कलाकुसर बघण्यासारखी आहे.कोरीव कमानी, रेखीव नक्षीकाम, खिडक्यां वर केलेले कोरीव काम,मंदीराच्या पायऱ्या,
सभामंडपात असणारे काचेचे झुंबर,लक्ष वेधून घेतात.
सभामंडपाच्या खांबावर सिंधिया राजघराण्याची वंशावळ देण्यात आली आहे. सभामंडपाच्या पाठिमागे विठ्ठल रुक्मिणी यांचे छोटेखानी मंदिर आहे तर पुर्ण परीसर चारी बाजूंनी तटबंदी बांधून संरक्षीत केले आहे.
शिंदे छत्रीला कुठे आहे:
शिंदे छत्री पुण्याजवळील वानवडी येथे आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पुण्यातील सर्व ठिकाणावरून पी एम पी एल च्या बस ने जाता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे