२६ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर "वारकरी संतपरंपरा" दिसणार.
महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरा' व भक्तीशक्ती संगम यावर आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलना मध्ये पहायला मिळेल.
महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी,याच संतपरंपरेने समाज सुधारणेची अनेक कामे केली या मध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज, संत नामदेव, बहीणाबाई, चोखामेळा गाडगेबाबा, यांनी आपल्या लेखनी आणि कृतीतून जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता या बद्दल आवाज उठवला, पुरोगामी महाराष्ट्र जो आज आपण पाहतो तो याच संतांच्या समाज सुधारणेच्या कायद्यामुळे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समाजाला गुलामगिरी तून मुक्त केले व रयतेचे राज्य निर्माण केले.कष्टकरी व शेतकरी सुखी व्हावा यासाठी जे स्वराज्य निर्माण केले.
याच धर्तीवर या वर्षी राजपथावर संतपरंपरेचे भक्ती शक्तीचे दर्शन घडवणारा चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फूट उंचीची आसनस्थ प्रसन्न मूर्ती मुर्तीच्या समोर पाटावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व समई खास आकर्षण आहे.
चित्ररथाच्या मध्यभागी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित 'भक्ती आणि शक्ती'चा संदेश देणारी भव्य अशा मुर्ती आहेत.
चित्ररथाच्या मागिल बाजूस वारकरी व शेतकऱ्यांचा देव श्री विठ्ठल कठेवर हात ठेऊन विटेवरी उभा आहे.अशा स्वरुपात विठूराया ची भव्य दिव्य अशी मुर्ती आहे. चित्ररथाच्या मागिल बाजूस संतवाणी ग्रंथाची प्रतीकृती उभारण्यात आली असून यांच्यावर पसायदान लिहलेले पहायला मिळते.
रथाच्या दोन्ही बाजूला वारकरी पंढरपूर च्या वारीला ठिठूरायाच्या जयघोषात चाललेत असा पहायला मिळते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे