धर्मवीर गड बहाद्दुर गड:
भीमा नदीच्या उत्तर तीरावर असलेला बहाद्दुर गड किल्ला हा भुईकोट प्रकारातील आहे या किल्ल्याला बहाद्दुर असे म्हणत असले तरी याचे कागदपत्रे नाव पांडे पेडगावचा किल्ला आहे बहाद्दूर गड /धर्मवीरगड हे या किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या बलिदानामुळे या किल्ल्याचे २००८ मध्ये नामकरण धर्मवीरगड असे करण्यात आले हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या गावांमध्ये भीमा नदीच्या उत्तर तीरावर आहे.
धर्मवीर गड |
धर्मवीर गड किल्ला माहिती
धर्मवीरगड किल्ल्याचा आकार आयताकृती असून भीमा न बहाद्दूर गड /धर्मवीरगड नदीला समांतर असून११० एकर विस्तार असलेल्या किल्ल्यात सध्या गाव वसलेले आहे किल्ल्याच्या आसपासचा परिसर भीमा नदीच्या प्रवाहामुळे अतिशय सुंदर दिसत असून पाहातच राहावे असे वाटते
स्थलदुर्ग प्रकारातील या किल्ल्याला तिन प्रवेशद्वार आहेत परंतु महामार्गाच्या बाजूकडील दरवाजा त्याच्या भव्यतेमुळे मुख्य प्रवेश द्वार असावा असे वाटते या गावात प्रवेश करताना वेशीवरील स्वागत कमान आपल्या स्वागताला उभे असल्याचा भास होतो किल्ल्यामध्ये अनेक मंदिरे व वास्तू असून त्यातील काही भग्नावस्थेत आहेत तरीही पाण्यासारखे नक्कीच आहेत. या किल्ल्याची तटबंदी शेवटची घटका मोजत असून अतिशय दुरावस्था असलेल्या स्थितीत उभे आहे. तटबंदीच्या बाजूने बरीच काटेरी झाडेझुडपे उगवले आहेत याकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज भासते.
नदीच्या बाजूला तटबंदी शेजारी असलेली दुमजली इमारत अतिशय देखणी असून पाहण्यासारखी आहे या इमारतीच्या खिडक्यांमधून भीमा नदीचे पात्र व त्याचा प्रवाह मनमोहक दिसतो किल्ल्यामध्ये नक्षीकाम केलेली दोन प्राचीन मंदिरे आहेत त्यातील लक्ष्मीनारायण मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत असून मंदिराचा अलंकृत नक्षीकाम केलेल्या स्तंभांनी सजलेला आहे मंदिराच्या बाहेरील भिंतीवर सुबक नक्षीकाम पाहायला मिळते मंदिराच्या बाहेर असलेली मूर्ती खुप सुंदर आहे त्याचप्रमाणे किल्ल्यामध्ये इतरही मंदिरे व वास्तू आहेत यामध्ये चालुक्य शैलीतील मंदिरे हत्ती मोटा राज दरबार वेशी तटबंदी मारूती ची मुर्ती विरगळी, लक्ष्मीचे मंदिर अशा वास्तू पहायला मिळतात ज्या ठिकाणी छत्रपती शंभुराजेंनी बलिदान दिले त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटासा स्तंभ बसवण्यात आला आहे.किल्ला पाहण्यासाठी तिनं तासांचा वेळ पूरेसा आहे.
इतिहास:
किल्ल्याचे बांधकाम देवगिरीच्या यादवांच्या काळात म्हणजे साधारण १३ व्या शतकात झाले या किल्ल्याचे सुरुवातीचे नाव पांडे पेडगावचा किल्ला असे होते किल्ला बाबाजी भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या अधिकार क्षेत्रात होता. त्यानंतरच्या काळात किल्ला निजामशाहीच्या अधिपत्याखाली आला पुढे कालांतराने मोगलांकडे किल्ला गेल्यावर औरंगाबादचा दूध भाऊ बहादूरखान कोकालकश याला या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमण्यात आले व त्याच्यावर दक्षिणेची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली तो स्वतःला दक्षिणेचा शहंशाह समजत असे त्याच्या कालखंडामध्ये या किल्ल्याला बहादूर गड असे नाव देण्यात आले असावे.
प्रवेशद्वार धर्मवीर गड |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकात जी संपत्ती खर्ची पडली ती भरून काढण्याची संधी महाराज शोधत होते आणि ती संधी सत्ता बहादूरखानाने महाराजांना दिली पांडे पेडगावच्या किल्ल्यामध्ये एक कोटी शाही खजाना व जातिवंत दोनशे अरबी घोडे दिल्लीला औरंगजेबाकडे पाठविण्यासाठी गोळा करून ठेवले होते त्याची सर्व माहिती गोळा करून गुप्तहेरांनी राजगडावर शिवाजी महाराजांच्या समोर मांडली.
महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना ही मोहीम करण्याची सूचना केली त्यावेळी गडावर नऊ हजारांचे सैन्य होते त्या सैन्याला घेऊन सरसेनापती लागलीच भाहाद्दुगडाच्या मोहम्मद निघाले. बहादूर गडावर त्यावेळी 35 हजारांचे मोघली सैन्य असल्याने समोरासमोरील लढाई करणे शक्य नव्हते त्यामुळे गनिमीकाव्याने कमीत कमी हानी होता ही मोहीम करण्याचे योजले त्यासाठी सैन्याच्या दोन तुकड्या तयार केल्या यातील एका तुकडी मध्ये ७००० सैन्य तर दुसऱ्या तुकडी मध्ये २००० सैन्य अशी विभागणी करून गडावर ७००० सैन्याच्या तुकडीने गडावर आता खाल्ला करून गडावर गोंधळ माजवला त्यासाठी तयार होतात मराठा सैन्याने माघार घेऊन पहायला सुरुवात केली हे पाहून खानाच्या सैन्याला चेव सुटला तो मराठा सैन्याचा पाठलाग करू लागला चार-पाच मौल गेल्यावर खान माघारी वळला हे पाहताच पुन्हा मराठा सैन्य खानावर चालून आले आता मात्र खान वैताग व मराठा सैन्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही असे ठरवून तो मराठा सैन्यावर चाल करून आला तो जवळ येताच मराठी सैन्याने पुन्हा माघार घेऊन पोळा सुरुवात केली.
बहादूरखान मराठा सैन्याचा पाठलाग करत करत जवळजवळ बारा मैल पाठलाग केल्यावर मावळे वेगवेगळ्या दिशेला पांगले आता मात्र मराठा सैन्य पळवून लावल्याने बहादूरखान जाम खुश झाला तो युद्ध जिंकल्याच्या अविर्भावात भाहाद्दूर गडाकडे निघाला ज्यावेळी तो बहादूर गडावर आला तेव्हा तो समोरील दृश्य पाहून पार चक्रावून गेला कारण मराठा सैन्याने गडापासून त्याला दूर घेऊन गेल्यावर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या 2000 मावळ्यांनिशी गडावर हल्ला केला त्यावेळी गडामध्ये पहारेकरी नोकर मंडळी आणि बाजारबुणगे उरले होते मग मराठ्यांनी त्यांच्यावर ताबा मिळवून गडावरील एक कोटीचा खजिना मौल्यवान वस्तू गडामध्ये असलेल्या दोनशे अरबी घोड्यावर लादून दुसऱ्या मार्गाने राजगडाकडे प्रस्थान केले ज्या अतिरिक्त वस्तू जिन्नस होते त्यांना पेटवून त्यांची ओळख करून टाकली हे जेव्हा बहादूरखानाने पाहिले तेव्हा त्याची खजिनाही गेला आणि ज्योती केले अशी अवस्था बहादूरखानाच्या झाली.
धर्मवीर गड |
छत्रपती संभाजी महाराज बलिदान:
बहाद्दुर गडावरील दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे संभाजी राजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना पेडगावला आणण्यात आले आणि याच गडावर उंटावर बसून त्यांची धिंड काढण्यात आली त्यावेळी औरंगजेब या ठिकाणी आला होता नंतर महाराजांना औरंगाबाद समोर हजर करण्यात आले. एवढ्या होऊनही महाराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता उलट आपल्याबरोबर बंदी असलेल्या कवी कलशांना यावर काही काव्य सुचते का असे विचारले त्यावर कवी कलश यांनी
यावंन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग|
लहू लसतं सिंधूर सम खूब खेल्यो रणरंग|
जो रवी छवी देखतही होत बदरंग|
त्यो तव तेज निहारके तखत त्येजे अवरंग|
या काव्यातून परिस्थिती चे वर्णन केले.शंभूराजेंचा नाना प्रकारे छळ करून औरंगजेब स्वराज्य, मौल्यवान खजिना,व धर्मपरिवर्तन करण्यात प्रवृत्त करत होता.परंतू शंभूराजे त्याच्या कोणत्याही मागणीला होकार देत नव्हते. त्यामुळे औरंगजेबाने वेगवेगळ्या प्रकारे छळ करण्यास सुरुवात केली परंतु जितका औरंगजेब छळ करत होता तितकेच शंभुराजे कणखर व दृढ निश्चयी होते उलटे ते बादशहाकडे आपल्या निडर करड्या भेदक नजरेने औरंगजेबाकडे रोखून पहात असत हे सहन न झाल्याने त्यांचे डोळे काढण्याचा आदेश देण्यात आला. औरंगाबाद अतिशय क्रूर होता त्याने शंभूराजे व कवी कलश यांचा अतोनात छळ केला त्यांचे पायाचे अंगठे तोडले केस उपटले जीप छाटली एवढी होतोना छळ करू नये त्याचे समाधान झाले नाही शंभूराजांना बेळगाव वरून भीमा इंद्रायणीच्या संगमावर वढूला नेऊन दोघांचीही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हत्या केली व त्यांच्या देहाचे तुकडे करून इतरत्र टाकण्यात आले. या परिसरातील लोकांनी वढू बुद्रुक येथे दोघांच्याही शरीराचे तुकडे गोळा करून अंत्यविधी केला वडु बुद्रुकला ( तुळापूर) ज्या ठिकाणी शंभूराजांनी धर्मासाठी बलिदान दिले त्या ठिकाणी समाधी आहे.
कसे जावे:
अहमदनगर मधून बस ने श्रीगोंदा या ठिकाणी येऊन पेडगावला जाता येते पुण्यावरून ही श्रीगोंदा व पेडगाव असा रस्ते प्रवास करता येतो.तर दुसरा मार्ग म्हणजे पुणे दौंड मार्ग देऊळगाव व पुढे पेडगावला जावे तेथून पुढे नावेने नदी पार करून किल्ला पर्यंत जाता येते.
काय काळजी घ्यावी:
किल्ला कोणत्याही ऋतु मध्ये पहायला जाऊ शकता.जेवण नाष्टा साठी हॉटेल सुविधा आहे.
माहिती अतिशय उपयुक्त आहे वाकरण सुधारणा करून घावी
उत्तर द्याहटवा