जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi
भारत विविध योजना व कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतीतील उत्पादन वाढले परंतु उत्पन्नाची शाश्वती कमी झाले, पर्यायाने शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करणे परवडेनासे झाले. बाजारपेठेची मागणी व शेतीमालाचा पुरवठा याचा समन्वय केल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते. पर्यायाने आधुनिक शेती करून फळबाग, ड्रॅगन फ्रुट, चंदन शेती, औषधी वनस्पती, व जिरेनियम अशा पिकांची लागवड आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेती मधून भरघोस उत्पन्न मिळू शकते. आज आपण अशाच जिरेनियम लागवड बद्दल माहिती पाहणार आहोत.
Geranium |
हे ही वाचा : ड्रॅगन फ्रुट शेती
जिरेनियम तेलाचा उपयोग |Geranium oil
सुगंधित जिरेनियम तेल उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक असल्याने या उद्योगांमध्ये जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो थोडक्यात तेलापासून अनेक सुगंधित पदार्थ जसे की टॅल्कम पावडर शाम्पू अगरबत्ती साबण फेस वॉश क्रीम अशा वस्तू बनवले जातात
जेरेनियम अनेक खाद्यपदार्थ अल्कोहोलिक आणि सॉफ्ट ड्रिंक मध्ये नॅचरल फ्लेवर म्हणून ही वापरतात.
जिरेनियमचा पारंपरिक आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. जसे की रक्तस्त्राव जखमा अल्सर आणि त्वचा विकार यांच्या उपचारासाठी वापर केला जातो.
जिरेनियम शेतीची पार्श्वभूमी
जिरेनियम चे उगमस्थान दक्षिण आफ्रिका मादागास्कर इजिप्त मोरोक्को हे सांगितले जाते. सतराव्या शतकात ही वनस्पती इटली स्पेन व फ्रान्स मध्ये पोहोचली व तिथून पुढे तिचा इतरत्र प्रसार आला
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच नागरिकांनी जिरेनियम भारतात आणले. जिरेनियम दक्षिण भारतीय हवामानाशी मिळतेजुळते असल्याने त्याची लागवड करण्यात आली. जिरेनियम च्या विविध ७०० प्रतीक असून त्यातील फक्त १० तांबडी व पांढरी फुले येणाऱ्या प्रजाती तेल उत्पादनासाठी वापरल्या जातात
जिरेनियम शेतीची गरज
भारतामध्ये कॉस्मेटिक व सौंदर्यप्रसाधनांची खूप मोठी बाजारपेठ आहे. या उद्योगांसाठी जिरेनियम तेलाची फार मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे भारत दरवर्षी १५० टन जिरेनियम तेल आयात करतो त्यामानाने भारतामध्ये केवळ सहा टन तेलाचे उत्पादन होते. जागतिक बाजारपेठेत जिरेनियम केला ची गरज सहाशे टन एवढी आहे ती चीन दक्षिण आफ्रिका मोरॉक्को हे देश पूर्ण करतात. भारतामध्ये गरज आयात व उत्पादन यांचा विचार केला असता भारतीय शेतकऱ्यांना यामध्ये खूप मोठ्या संधी आहेत.
जिरेनियम शेतीसाठी हवामान व मृदा
जिरेनियम शेती साठी दक्षिण भारतीय हवामान उत्तम असून या हवामानात मिळणाऱ्या तेलाची गुणवत्ता सर्वोत्तम आहे.
भारतातील महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात व उत्तर प्रदेशचा मैदानी भाग या राज्यांमध्ये जिरेनियम शेती केली जाते.
जिरेनियम पिकासाठी निचरा होणारी काळी चिकन माती जमीन लागते. महाराष्ट्रातील हवामान व मृदा जिरेनियम शेती साठी उत्तम असून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जिरेनियम लागवड करता येते. जास्त पावसाच्या प्रदेशात मध्ये पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात रोपाच्या खालच्या फांद्या जमिनीला लागून कुजण्याची याची दाट शक्यता असते.
जिरेनियम लागवडीचे तंत्र | geranium farming in Maharashtra
जिरेनियम पिक बहुवार्षिक असल्याने शेतीची चांगल्या प्रकारे मशागत करावी लागते. शेतामध्ये योग्य प्रमाणात शेणखत मिसळून द्यावे. नांगरट करून पाळ्या द्याव्यात, त्यानंतर चार फुटांवर सरी सोडून किंवा वापा करून चार बाय दीड फुटावर रोपांची लागवड करावी. मल्चिंग पेपर टाकल्यास शेतामध्ये अतिरिक्त तन वाढणार नाही. रोपांची लागवड करताना डीएपी सारखी फर्स्ट स्टेज खते वापरली तरी चालतात. एका एकरामध्ये जिरेनियम ची सात ते आठ हजार रोपे लागतात. साधारणपणे पाच ते सहा रुपये प्रमाणे जिरेनियम ची रोपे भेटतात मागणी व पुरवठा नुसार त्यांचे दर कमी अधिक होऊ शकतात. लागवडीसाठी सरासरी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो.
एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन ते चार वर्षे उत्पन्न देते. लागवडीनंतर तीन ते चार महिन्यात तीन फुटापर्यंत रोपांची वाढ होऊन त्याला फुले येऊ लागली की ते छाटणीसाठी तयार होतात. चटणी करत असताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेणेकरून रोप फुटवा लगेच धरेल. पहिला तोडा चार महिन्यानंतर निघतो त्यानंतर चे तोडे अडीच ते तीन महिन्यांमध्ये तयार होतात. वर्षाला सर्वसाधारणपणे चार तोडे भेटतात. एकरी 10 ते 12 टन जिरेनियम भेटते त्यापासून एका टनाला एक लिटर याप्रमाणे बारा लिटर तेल भेटते. तेलाचा सरासरी बाजार भाव १२५०० प्रति लिटर एवढा आहे.
जिरेनियम शेतीचे फायदे
जिरेनियम शेती ला सुगंधी शेती असे ही म्हणतात.
जिरेनियम च्या रोपावर कोणत्याही प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे या पिकावर कीटकनाशके व औषध फवारणीचा खर्च 80 टक्क्यांपर्यंत कमी होतो.त्या पिकाला कोणते जनावर खात नसल्याने अतिरिक्त संरक्षणाची गरज भासत नाही. या पिकातून पारंपरिक पिकांपेक्षा दुप्पट नफा मिळतो. या पिकामध्ये आंतरपीक घेता येते. हे एक नगदी पीक असून पैसा खेळता राहतो. याच्या तेलाला बाजारांमध्ये भरपूर मागणी असल्याने दरही चांगला भेटतो. जिरेनियम पासून तेल निर्मिती, रोपांची निर्मिती व शिल्लक राहिलेल्या पाल्यापासून खत तयार करू शकतो. दुष्काळी भागात जिथे पाण्याची कमतरता आहे तिथेही शेतकरी जिरेनियम शेती करू करतात.
Geranium farming |
जिरेनियम शेतीसाठी सरकारी योजना
जिरेनियम पिकासाठी कोणतीही सरकारी योजना नसली तरी जिरेनियम प्रक्रिया उद्योगासाठी सरकारी अनुदान योजना आहे.प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी 25 ते 30 टक्के अनुदान दिले जाते. महिलांना या योजनेमार्फत तीस टक्के तर पुरुषांना 25 टक्के अनुदान दिले जाते. याबाबतची संपूर्ण माहिती जवळच्या जिल्हा कृषी विभागात मिळते.
जिरेनियम पिकाचे विक्री व्यवस्थापन
भारतातील शेतकरी कोणतेही पीक आपल्या शेतामध्ये पीक करण्यासाठी सक्षम आहेत परंतु त्यांचे विक्री व्यवस्थापन करण्यास कुठेतरी कमी पडत असतात. बहुतांश शेतकरी जिरेनियम शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये करतात. असा पिकवलेला मल ते डायरेक्ट कंपनीला विकतात. कंपनी शेतकऱ्यालाह रोपांच्या उपलब्ध ते पासून तेल काढणी पर्यंत मदत करतात. ज्या शेतकऱ्यांकडे तीन डिस्टिलेशन ची सोय नाही असे शेतकरी जिरेनियम चा काढलेला माल पाच ते सहा हजार प्रति टन या दराने विकतात.
जिरेनियम शेती बद्दल थोडक्यात
- जिरेनियम शेती करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसाचे लागवडीपूर्वी प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून त्यांना बाजारपेठ व तत्सम कंपन्यांचा पत्ता मिळू शकतो.
- जिरेनियम शेती साठी सेंद्रिय खतांचा वापर करावा जेणेकरून तेलाची गुणवत्ता वाढेल.
- आपल्या विभागातील कृषी विद्यापीठातील औषधी आणि सुगंधी वनस्पती विभाग कृषी विज्ञान केंद्र या मध्ये जिरेनियम शेती बद्दल सविस्तर माहिती मिळते.
- शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाकडून जिरेनियम तेल काढण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते.
सदर लेखामध्येप्रशिक्षण संस्था बद्दल माहिती पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू ज्यांना प्रशिक्षण संस्थेबद्दल माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावे
धन्यवाद
जय जवान जय किसान
प्रक्षिशन पाहिजे
उत्तर द्याहटवा