Dragon fruit farming in Marathi
ड्रॅगन फ्रुट दिसायला सुंदर तितकेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. निवडुंगाशी साधर्म्य असलेले ड्रॅगन फ्रुट उष्ण कटिबंधीय प्रदेशातील फळ आहे. याला बाजारपेठेत चांगली मागणी असून त्याचा सरासरी बाजारभाव २०० ते ३०० रुपये प्रति किलो इतका आहे. यांची भारतीय बाजारपेठेतील मागणीच्या मानाने लागवड नगण्य आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती व सल्ला घेऊन याची लागवड केली असता भरघोस उत्पन्न मिळू शकते.
लाल रंगातील ड्रॅगन फळ |
ड्रॅगन फ्रुट चे उगमस्थान उष्णकटिबंधीय भागातील असून प्रामुख्याने मेक्सिको व दक्षिण अमेरिका येथे आढळते. सध्या ड्रॅगन फ्रुट चे संपूर्ण जगभरामध्ये उत्पादन घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने थायलंड तैवान चीन फिलिपिन्स श्रीलंका इस्राईल या देशांमध्ये व्यावसायिक लागवड केली जाते.
ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती
भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट ची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या पिकाच्या लागवडी वर शेतकऱ्यां कडून भर दिला जात आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जात आहे. ड्रॅगन फळाच्या मागणीच्या मानाने उत्पादन अत्यल्प असल्याने याच्या लागवडीसाठी खूप वाव आहे. ड्रॅगन फ्रुट हे बहुवार्षिक पीक असल्याने लागवडीनंतर पंधरा ते वीस वर्ष फळ देते. भारतातील सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात याची लागवड फायदेशीर ठरू शकते.
ड्रॅगन फ्रुट मुख्यत्वेकरून खाण्यासाठी वापरले जाते. त्याच बरोबर बाय प्रॉडक्ट ही बनवले जातात, जसे की आईस्क्रीम जेली वाइन फळांचा रस चॉकलेट्स सारख्या प्रक्रिया उद्योगांमध्ये याचा उपयोग केला जातो.
हे ही वाचा : जिरेनियम शेती
ड्रॅगन फ्रुट चे आरोग्यदायी फायदे.
ड्रॅगन फ्रुट आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असून त्याचे खालील आश्चर्यकारक फायदे आहेत.
१) ड्रॅगन फ्रुट पांढऱ्या पेशी वाढवण्यास मदत करते.
२) हे फळ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
३) हे फळ सांधे दुखी कंबर दुखी मध्ये गुणकारी ठरते.
४) हे फळ प्रोटिन्स व फायबरचा चांगला स्त्रोत आहे.
५) हे फळ जीवनसत्वे आणि खनिजे यांनी युक्त आहे.
६) हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यात मदत करते.
७) हे फळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
८) वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रुट चे प्रकार
ड्रॅगन फ्रुट दिसायला आकर्षक असून त्याच्या अंतर व बाह्य रंगावरून त्याचे प्रकार ठरतात. त्याचे प्रमुख तीन प्रकार असून ते खालील प्रमाणे आहेत
१) लाल रंगाची साल व पांडुरंगाचा गर
२ लाल रंगाचे चालू लाल रंगाचा गर
३) पिवळ्या रंगाचे स्थान व पांढऱ्या रंगाचा गर
भारतामध्ये यातील लाल रंगाची साल व पांढरा रंगाचा गर असणाऱ्या फळाला अधिक मागणी आहे व त्याला बाजारभावही चांगला मिळतो.
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी आवश्यक हवामान
हे फळ उष्ण कटिबंधीय फळझाड असून याच्या लागवडीसाठी उष्ण कटिबंधीय प्रदेश सर्वोत्तम आहे. हे फार कमी पाऊस व अधिक तापमानात टिकून राहते. याच्या वाढीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशातही याची लागवड केली जाते. व्यावसायिक शेती करत असताना मात्र जास्त सूर्यप्रकाशात फळांना सावली देणे गरजेचे होते नाहीतर फळावर काळे डाग पडतात.
ड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी जमीन
ड्रॅगन फळाच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकन मातीची जमीन आवश्यक असते. वालुकामय हलकी जमीन व सेंद्रिय पदार्थांची मात्रा जास्त असणारी जमीन ड्रॅगन फ्रुटच्या लागवड साठी योग्य आहे. ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ५.५ ते ७ पीएच ची माती सर्वोत्तम आहे.
ड्रॅगन फ्रुट लागवडीचे तंत्र
ड्रॅगन फ्रुट ची व्यवसायिक लागवड करत असताना जमिनीची निवड करणे, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, रोपांची निवड देखभाल फवारणी छाटणी विक्री व्यवस्थापन आणि लागवडीचा खर्च या गोष्टी अवगत असणे आवश्यक असते.
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी जमीन तयार करणे
ड्रॅगन ताजा लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून योग्य पाळ्या देणे. लागवडीची पूर्वतयारी म्हणून शेणखत किंवा कंपोस्ट खते योग्य प्रमाणात जमिनीत मिसळून घ्यावे. योग्य अंतराचे वाफे तयार करून घ्यावेत.
ड्रॅगन फ्रुट लागवडी ची पद्धत
ड्रॅगन फ्रुट लागवडीचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे.
बियाण्यांपासून.
बियांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड केली जाते या पद्धतीमध्ये बियाण्यापासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म समान नसतात. या पद्धतीमध्ये वेळही जास्त लागतो. त्यामुळे ही पद्धत व्यवसायिक शेतीमध्ये वापरले जात नाही.
कटिंग्स पासून
या पद्धतीमध्ये उत्तम फळ झाडाच्या २५ सेंटीमीटर फांद्या छाटून त्या द्वारे रोपे तयार केली जातात. त्यामुळे उत्तम मातृ वृक्षाचे गुणधर्म या रोपांमध्ये येतात. ही पद्धती बहुतेक शेतकरी लागवड करताना वापरतात. या पद्धतीमध्ये रोपे तयार करण्यासाठी छोट्या पिशवीमध्ये वाळू माती व शेणखत यांचे मिश्रण भरून त्यामध्ये कापलेली वीस सेंटीमीटर लांबी चे कटिंग लावली जातात. या तयार केलेल्या पिशव्या सावली मध्ये ठेवून त्यांना योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये ही कटिंग मुळ्या धरण्यास सुरुवात करतात. त्यानंतर ती लागवडीसाठी तयार होतात.
ड्रॅगन फळाची लागवड कशी करावी.
ड्रॅगन फळाची लागवड करत असताना जमिनीची पत, पाण्याचे नियोजन, याच्यावर दोन रोपां मधील अंतर निश्चित करावे. सर्वसाधारणपणे दोन झाडांमधील अंतर ३ मीटर × ३ मीटर ठेवावे. हे अंतर कमी जास्त होऊ शकते. तीन मीटर चे माप टाकून २ फूट × २ फूट आकारमानाचे खड्डे खानून घ्यावेत. खड्ड्यामध्ये पाच ते सहा फूट उंचीचे सिमेंट पोल सिमेंट काँक्रिट घालून पक्के बसून घ्यावेत. खांबाच्या वरील भागात रिंग बसवण्यासाठी थ्रेडिंग असलेला रॉड सवावा. एका एकरामध्ये सर्वसाधारण पणे असे सिमेंटचे ४५०खांब बसतात. एका एकरामध्ये १७०० ड्रॅगन फळाची रोपे बसतात.
रोपांची लागवड
लागवडीसाठी केलेल्या खंडांमध्ये चार रोपांसाठी 15 किलो शेणखत व १०० ग्रॅम डीएपी एकसारखे करून टाकून घ्यावे. थोडी वाळू व पालापाचोळा टाकावा व बाकी खड्डा भरून घ्यावा. खांबाचे चारी बाजूने योग्य अंतरावर चा रोपे लावून घ्यावे जेणेकरून नवीन फुटवा खांबाला बांधता येईल. जस असे फोटो फुटतील तसे ते सुतळीच्या साह्याने हलक्या हाताने खांबाला बांधून घ्यावे. आडवे वाढणारे किंवा जमिनीकडे झुटलेले फुटवे कटरच्या किंवा खात्री च्या साह्याने छाटून घ्यावेत. वरती वाढत जाणारे फुटवे खांबाच्या टोकाला जोडलेल्या प्लेट मधून वर काढावे. फुटवे प्लेट मधून वर गेल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात परंतु योग्य फुटव्यांना वाढू द्यावे. जेणेकरून अधिक प्रमाणात फळ धारणा होईल. रोगट व अनावश्यक फांद्यांची छाटणी करावी व बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
पाण्याचे नियोजन
या पिकाला पाण्याची आवश्यकता अत्यल्प आहे. हिवाळ्यामध्ये नियमितपणे थोड्या थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. गरगरीत भिजवन करू नये. पूर्ण वाढ झालेल्या बागेमध्ये एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा ताण द्यावा त्यामुळे फुलधारणा अधिक प्रमाणावर होते. या पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन चा वापर करावा व त्यामधून विद्राव्य खतांचा डोस द्यावा.
खतांचे व किटकनाशक नियोजन
फळांची दर्जेदार वाढ होण्यासाठी या पिकाला सेंद्रिय खते अधिक प्रमाणात द्यावीत. पहिल्या वर्षी आठ ते दहा किलो सेंद्रिय खते टाकावीत व यांचे प्रमाण दरवर्षी वाढवत न्यावे. पहिल्या वर्षी पोटॅश सुपर फास्फेट व युरिया ४०:९०:७० ग्रॅम/झाड याप्रमाणे द्यावी. योग्य वाढ झालेल्या झाडांना दरवर्षी १५ ते २० किलो शेणखत द्यावे. ठिबकद्वारे विद्राव्य खते,सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. ड्रॅगन फळाच्या झाडाला कोणत्याही प्रकारच्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत नाही. छाटणीनंतर बुरशीनाशक फवारावे.
फळधारणा
ड्रॅगन फळाच्या लागवडीनंतर १८ ते २४ महिन्याच्या कालावधीमध्ये फुले भहरू लागतात. फुले मोठी व पांढऱ्या रंगाचे असतात ती सायंकाळच्या वेळी उमलतात. पावसाळा सुरू झाला की फुले उमलण्यास सुरुवात होते. जून पासून नोव्हेंबर पर्यंत फुले उमलली येता काळ असतो. सुरुवातीला फळांचा रंग हिरवा असतो फळांचा रंग बदलल्यानंतर काढण्याची वेळ योग्य असते. फळे हाताने गोल फिरून किंवा विळ्याने कापून घ्यावीत. एक झाड प्रतिवर्षी पंचवीस ते तीस किलो होय देते. सरासरी वार्षिक प्रति एकरी ड्रॅगन फ्रुटचे ५ ते ६ टन अपेक्षित असते .
फळांचा हंगाम संपल्यानंतर छाटणी करून बुरशी नाशक फवारावे, व खतांचा डोस द्यावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे