कोरीगड किल्ला माहिती | korigad fort information in Marathi in Marathi

कोरीगड किल्ला

महाराष्ट्रात असे काही थोडे किल्ले आहेत ज्यांना तटबंधी पहायला मिळते.त्यामध्ये वर्धनगड किल्ला, विसापूर किल्ला,यांना संपूर्ण तटबंदी असून तशाच प्रकारचा एक किल्ला म्हणजे कोरीगड! कोरीगड किल्ल्याला संपूर्ण ताशीव कडा व त्याच्या आकारामुळे व स्थानामुळे वेगळा ठरतो‌ त्यामुळे आज आपन कोरीगड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नाव          कोरीगड/कोराईगड
उंची          ३१०० फूट
प्रकार        गिरीदुर्ग
ठिकाण     पेठ शहापूर,मावळ
जिल्हा      पुणे
स्थिती       चांगली
चढाई        सोपी
कोरीगड किल्ला
गणेश दरवाजा


कोरीगड किल्ला कुठे आहे:

        कोरीगड किल्ला पुणे जिल्ह्यातील बारा मावळ प्रांता पैकी 'कोर बारस' मावळात आहे.मुळशी धरणाच्या पश्चिमेला व पवना धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत लोणावळा डोंगररांगेत कोरीगड किल्ला आहे.लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सवाष्णी घाट माथ्यावर कोरीगड आहे. लोणावळ्या पासून दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे.

कोरीगड किल्ल्याचा इतिहास:

        कोरीगड किल्ल्याचा इतिहासात तसा फारच कमी उल्लेख आढळतो.किल्लाच्या पोटात असणाऱ्या लेण्यां, कोरीव गुहा व पाण्याच्यां टाक्यां वरून तो अतिप्राचीन असावा. मावळातील अन्य किल्ले व डोंगरातील लेण्या प्रमाने येथेही लेण्या असल्याने त्याचा संबंध अन्य लेण्यां बरोबर दुसऱ्या शतकात जोडला जाऊ शकतो.
        या किल्ल्यावर सुरवातीच्या काळात महादेव कोळी समाजाचे वर्चस्व होते.बहामनी सत्तेच्या विभाजनानंतर १४व्या शतकाच्या मध्यात कोरीगड निजामशाही राजवटी खाली आला.
        १६५७ मध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या आरंभीच्या काळात मावळातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर बरोबर कोरीगड ही स्वराज्यात सामील करून घेतला.शंभूराजेंच्या मृत्यू नंतर तो मोगलांच्या ताब्यात गेला होता. इ.स.१७०० मध्ये पुन्हा मराठ्यांनी त्याला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले.त्यानंर बराच काळ कोरीगड मराठा साम्राज्यात होता.
        मार्च १८१८ इष्ट इंडिया कंपनीचा कर्नल प्रॉथर ने कोरीगड वर आक्रमण केले, किल्लेदाराने किल्ला मोठ्या हिमतीने लढवला.प्राथर ची सेना किल्ल्यावर जोरदार हल्ला करत त्याला किल्लेदार जशास तसे उत्तर देत होता. प्रॉथर चर्या हाती किल्ला लागत नव्हता आणि अचानक एक नको ती घटना घडली. तोफेचा गोळा येऊन गडावरील दारूगोळा कोठारा वर पडला. मोठा स्फोट होऊन दारू गोळा नष्ट झाला त्याच बरोबर मोठी जिवीत हानी झाली.किल्ला लढवणे शक्य नसल्याने शेवटी मराठ्यांनी शरणागती पत्करली व किल्ला इष्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला.
कोरीगड किल्ला
गणपती मुर्ती


कोरीगड वर पाहण्यासारखी ठिकाणे:

         पेठ शहापूर गावातून गडावर जाण्यासाठी मळलेली पायवाट धरावी लागते, उजव्या बाजूला कोरीगड चा अखंड ताशीव कडा जनू एखाद्या भिंती सारखा दिसतो. जंगलातून पायवाटेने काही मिनीटांच्या अंतरावर गडावर जाणारा पायरी मार्ग सुरु होतो. पायरी मार्ग प्रशस्त असून सुरक्षेसाठी जागोजागी रेलिंग लावलेले आहेत.रस्ता दाट झाडीतून जात असल्याने दिवसा सुर्य ही दुर्लभ दुर्लभ होऊन जातो.
         पायऱ्या चढून थोडे वर गेल्यावर दोन गुहा लागतात या अतिशय आखीवरेखीव व मोठ्या आहेत.त्यांचा वरच गणेश गुहा असून गुहेमध्ये गणपती ची मुर्ती व पिण्याच्या टाकल्या आहेत.यातील पाणी अतिशय थंडगार व मधूर आहे.पुढे थोड्या चालीच्या अंतरावर गडाचा मुख्य दरवाजा 'गणेश दरवाजा' लागतो. दरवाजा ची कमान मोठी असून त्यामध्ये आत्ता नवीन लाकडी दरवाजा बसवला आहे. दरवाजाच्या बाजूची तटबंदी उंचपुरी असून नजीकच्या काळात तिची डागडुजी केलेली आढळते. दरवाजाच्या आतील बाजूस हारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत.
       दरवाजाच्या आतील पायरी मार्ग डावीकडे काटकोनात वळतो गडाच्या दुसऱ्या दरवाजातून गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश होताच गडाचे  उत्तर-दक्षिण पसलेले विस्तृत पठार नजरेस पडते. समोरच महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे मंदिरामध्ये शिवपिंड आहे. मंदिराच्या प्रांगणात चार तोफा ठेवलेला आढळतात. मंदिराच्या पाठीमागे गडावरील दोन विशाल तळी आहेत. तळयापासून पुढे गेले असता वाटेत दोन गुहा लागतात या गुहेमध्ये शंक चक्र गदा धारी विष्णूची मूर्ती आहे. 
     गडाच्या उत्तर टोकावर ध्वज खांब आहे. संपूर्ण गडाला तटबंदी असून तिची लांबी साधारण दोन किलोमीटर भरते. तटबंदीमध्ये जागोजागी बुरुज देवड्या जंग्या तसेच सोच खूप पाहायला मिळतात. तटबंदीवरून चालण्यासाठी मार्गही आहे. गडावर काही ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या दक्षिण बाजूस गड देवता कोराई देवीचे मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार केला असून मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे कोराडी देवी ची मूर्ती चतुर्भुज प्रकारातील अजून शस्त्रसज्ज आहे. गडाच्या दक्षिण बुरुजावर गडावरील सर्वात मोठी तोफ लक्ष्मी तोफ ठेवली आहे. अंबवने बाजूने येणारी गडावरील वाढ चोर दरवाजातून गडावर येते, ही वाट अतिशय खडतर असून घनदाट जंगलातून आहे. वाटेत एक पाण्याचे टाके ही आहे.
  कोरीगड गडावरून कोकणातील बराचसा प्रदेश नागफणीचे टोक, तुंग किल्ला,तिकोना, माथेरान, घनगड किल्ले दिसतात. पावसात पायऱ्यातून वाहनारे पाणी पर्यटकांना आकर्षित करत असते.
कोरीगड किल्ला
कोराई देवीचे मंदिर


कोरीगड ला जायचे कसे:

        कोरीगड ला जाण्यासाठी पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग वरील लोणावळा येथून दक्षिणेकडील कुरवंडे घुसळखांब मार्गे पेठ शहापूर ला येऊ शकतात.
        सार्वजनिक वाहतूक वापरणार असाल तर मुंबई पुण्यावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने किंवा रेल्वेने लोणावळ्यात उतरून लोणावळा मधून बांबुर्डी ला जाणारी बस भेटते. ही बस पेठ शहापूर मार्गे जाते पेठ शहापूर मध्ये उठून अर्ध्याएक तासांमध्ये गडावर पोहोचू शकतात.
        पुण्यावरून येणारे पर्यटक पिरंगुट पौडमार्गे ही कोरीगड ला जाऊ शकतात. हा मार्ग मुळशी धरणाच्या बाजूने ॲम्बी व्हॅली मार्ग कोरिगड ला जातो.
        लोणावळा हे जवळचे रेल्वे स्थानक आहे.
कोरीगड किल्ला
लक्ष्मी तोफ


काय काळजी घ्यावी:

  •     गडावर पाण्याची सोय नाही त्यामुळे बरोबर पाणी असावे.
  •     गडावर जेवण नाश्त्याची सोय नाही.
  •     कोराई देवीच्या मंदिरात व महादेव मंदिरात मुक्कामाची सोय होऊ शकते.
  •     सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करणार असाल तर त्याचे वेळापत्रक माहीत करून घ्यावे.
         
         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort