पोस्ट्स

महाबळेश्वर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे | Top 15 tourist attractions in Mahabaleshwar

इमेज
Mahabaleshwar tourist places in Marathi | महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे   महाबळेश्वर पर्यटन या शब्दांमुळे संपूर्ण लेखाचा अंदाज आलाच असेल तर आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अश्या पर्यटन स्थळा बद्दल माहिती पाहणार आहोत. महाबळेश्वर हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.  महाबळेश्वर हे हिल स्टेशन सह्याद्री पर्वत शिखरावर आहे. येथिल थंड हवामान, विपूल पर्जन्य, पर्यटनाच्या दृष्टीने सुख सुविधा, उच्च दर्जाचे हॉटेल्स यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मुंबई पुण्या सारख्या महानगरां पासून काही तासाच्या अंतरावर असल्याने याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. महाबळेश्वर हनिमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध असून नवविवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जिवनाची सुरुवात करण्यासाठी येथे येणे पसंत करतात. उंच कडे ,खोल दऱ्या, हिरवेगार डोंगर, हवेतील गारवा, खरेदीची उत्तम सोय, स्ट्रॉबेरी, पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते तर जाणून घेऊया भेट देण्यासारखे महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळे व त्याची माहिती.  प्रतापगड किल्ला महाबळेश्वर कोठ आहे       महाबळेश्वर ह...

नळदुर्ग किल्ला माहिती | Naladurg fort information in Marathi

इमेज
नळदुर्ग किल्ला माहिती |Naladurg fort information in Marathi  किल्ल्याचे नाव नळदुर्ग  प्रकार            भूईकोट जिल्हा.          उस्मानाबाद जवळचे गाव   नळदुर्ग सद्यस्थिती       चांगली     उस्मानाबाद जिल्ह्यातील बोरी नदीच्या काठावर असलेला नळदुर्ग किल्ला भूईकोट प्रकारातील आहे. पुराणकाळातील नळ दमयंती च्या नावावरून या किल्ल्याला नळदृग असे म्हणतात. नळदुर्ग किल्ल्याचे स्थापत्य तत्कालीन स्थापत्यशास्त्र किती प्रगत होते याची जाणीव करून देते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून दोन ते अडीच किलोमीटरचा परिघामध्ये विस्तारलेला आहे. संवर्धनाच्या कामामुळे किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. किल्ल्याला संरक्षणाच्या दृष्टीने अति उंच संपूर्ण तटबंदी आहे. बोरी नदीच्या दुसऱ्या तीरावर रणमंडळ हा उप किल्ला असून त्याला बोरी नदीवरील बंधार्‍याने जोडले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर किल्ल्यावर केलेला पाहायला मिळतो, जसे की संरक्षणाच्या दृष्टीने खंदक खणून त्यामध्ये पाणी सोडले आहे बोरी नदी वरी...

नाशिक पर्यटन स्थळे | Nashik tourist places in Marathi

इमेज
नाशिक पर्यटन स्थळे | Nashik tourist places in Marathi नाशिक महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील जिल्हा असून प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य येथे काही काळ होते. नाशिक शहर पुरातन असून त्याचा उल्लेख रामायणात आढळतो. नाशिक मध्ये दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या व पवित्र अश्या गोदावरी नदीचा उगम होतो. नाशिक मध्ये अनेक घाट मंदिरे याला अध्यात्मिक शहर बनवतात. दर बारा वर्षांनी नाशिक मध्ये गोदावरी तीरावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो. प्रभू श्रीराम सीता व लक्ष्मण यांचे वनवासात असताना काही काळ पंचवटी येथे वास्तव्य होते, या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. नाशिक येथील अंजनेरी पर्वत हनुमानाची माता अंजनी च्या नावावरून आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनात देशामध्ये अग्रेसर असून या ठिकाणी वाईन उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत त्रंबकेश्वर मंदिर नाशिक जिल्हा पर्यटन स्थळे | best tourist places in Nashik in Marathi सह्याद्री पर्वत रांगेत असल्याने या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पर्यटकांना वेड लावते. त्याचबरोबर नाशिक मध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले, धबधबे, विपुल वनसंपदा पर्यटकांना आकर्षित करत असते. आशिया खंडातील पहिले मातीचे धरण नाशिक येथेच आहे. ...

तोरणा किल्ला माहिती | torna fort information in Marathi

इमेज
किल्ल्याचे नाव :   तोरणा/प्रचंडगड प्रकार: गिरिदुर्ग जिल्हा: पुणे  ठिकाण: वेल्हे किल्ल्याची उंची:  १४०४मीटर सद्यस्थिती: चांगली तोरणा किल्ला माहिती | torna fort information in Marathi नमस्कार मंडळी आज आपण आजच्या लेखामध्ये तोरणा या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा शिवरायांनी याच किल्ल्यावर केला. पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून तोरणा ओळखला जातो. तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा असे पडले. सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्व-पश्चिम अशा पसरलेल्या उप रांगेवर असलेला तोरणा किल्ला पर्यटकांना व ट्रेकर्सना सतत खुणावत असतो. काही हौशी पर्यटक राजगड  तोरणा व सिंहगड असा ट्रेक पूर्ण करतात. तोरणा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून त्याची समुद्रसपाटी पासून उंची१४०४ मीटर एवढी आहे. तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असे ही म्हणतात. इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस याने लिहून ठेवले आहे की सिंहगड सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचे घरटे आहे. अशा या ऐतिहासिक तोरणा किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत. झुंजार माची तोरणा किल्ला कुठे आहे तोरणा किल्ला महार...

बारा मोटेची विहीर माहिती

इमेज
बारा मोटेची विहीर सातारा |bara motachi vihir information in Marathi साताऱ्यातील प्रसिद्ध बारा मोटेची विहीर त्यामध्ये असणाऱ्या महाला साठी प्रसिद्ध आहे. सातारा शहरा पासून 16 किलोमीटर तर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा पासून पूर्वेस चार किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी च्या काठावर शेरी लिंब या गावामध्ये बारा मोटेची विहीर आहे . कमानी दरवाजा          विहिरीचे बांधकाम छत्रपती संभाजी राजांचे पुत्र थोरले शाहू महाराजांच्या काळात झाले. संपूर्ण विहिरीचे बांधकाम काळ्या ताशीव चिरा दगडांमध्ये करण्यात आले असून संपूर्ण बांधकाम चूण्यात केले आहे.  सन १७१९ ते १७२५ या कालखंडात  श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले.  विहिरीची सर्वसाधारणपणे खोली ११० फूट व्यास ५० फूट एवढा आहे विहिरीचा आकार शिवलिंगा प्रमाणे असून  मुख्य विहीर व उपविहीर अशा दोन विहिरी आहेत. मुख्य विहीर अष्टकोनी आकाराची असून उप विहीर आयताकृती आहे. मुख्य विहीर भरल्या  नंतर उपविहरीत पाणी येते. विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिनशे वर्षात कधीही आटली नाही.    विहिरीचे वैशिष्ट्य म्हण...

म्युच्युअल फंड म्हणजे काय | mutual fund information in Marathi

इमेज
म्युच्युअल फंड म्हणजे काय आपण टीव्हीवर नेहमी mutual fund sahi hai ही जाहिरात पाहतो. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तो सही कसा काय आहे.       आपण कमवलेला पैसा बऱ्याच ठिकाणी गुंतवून संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. सोने, फिक्स डिपॉझिट, जमीन, शेअर बाजार यामध्ये आपण पैसे गुंतवत असतो. असाच एक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे mutual fund याला मराठीमध्ये सामायिक निधी असे म्हणतात.       कमीत कमी धोका पत्करून आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी mutual fund हा चांगला पर्याय आहे. शेअर बाजाराचे अत्यल्प ज्ञान किंवा वेळेचा अभाव असलेले लोक म्युच्युअल फंड पर्याय म्हणून पाहतात.       म्युच्युअल फंडातील पैसा share market, Bonds, government securities मध्ये गुंतवला जातो.       म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज घडीला अनेक मोबाईल ॲप्स आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन च्या मदतीने पैसे गुंतवणे अधिक सोपे आहे. तर म्युच्युअल फंड मराठी या लेखामध्ये त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ . तर चला मग mutual fund Marathi मध्ये माहिती पाहू. Mutual f...

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala fort information in Marathi

इमेज
पन्हाळा किल्ला माहिती |Panhala fort information in Marathi किल्ल्याचे नाव :पन्हाळगड किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: सह्याद्री जिल्हा: कोल्हापूर ठिकाण: पन्हाळा किल्ल्याची उंची: ९७० मीटर सद्यस्थिती: चांगली        पन्हाळा किल्ला म्हटले की आपल्याला सहाजिकच आठवते ती छत्रपती शिवरायांची पन्हाळा मोहीम त्याचबरोबर सिद्धी जोहर ने दिलेला पन्हाळगडाला वेढा हा वेढा फोडून यशस्वीरित्या बाहेर पडलेले शिवराय,त्याच  बरोबर वीर शिवा काशीद यांचे बलिदान व महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे व सरदार बांदल यांचा न भूतो न भविष्यती असा पराक्रम. पन्हाळा किल्ल्याला मराठा इतिहासामध्ये मानाचे स्थान आहे. कोल्हापूर संस्थान चा राजधानीचा किल्ला असलेल्या पन्हाळगड महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. पन्हाळगड महाराष्ट्रातील सध्या घडीला चांगल्या स्थितीत असलेला एकमेव किल्ला आहे. आज आपण अशा या पन्हाळगड किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.        पन्हाळगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून याची समुद्रसपाटीपासूनची उंची ९७७ मीटर एवढी आहे.पन्हाळगड किल्ला सह्या...