म्युच्युअल फंड म्हणजे काय
आपण टीव्हीवर नेहमी mutual fund sahi hai ही जाहिरात पाहतो. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि तो सही कसा काय आहे.
आपण कमवलेला पैसा बऱ्याच ठिकाणी गुंतवून संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. सोने, फिक्स डिपॉझिट, जमीन, शेअर बाजार यामध्ये आपण पैसे गुंतवत असतो. असाच एक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे mutual fund याला मराठीमध्ये सामायिक निधी असे म्हणतात.
कमीत कमी धोका पत्करून आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी mutual fund हा चांगला पर्याय आहे. शेअर बाजाराचे अत्यल्प ज्ञान किंवा वेळेचा अभाव असलेले लोक म्युच्युअल फंड पर्याय म्हणून पाहतात.
म्युच्युअल फंडातील पैसा share market, Bonds, government securities मध्ये गुंतवला जातो.
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज घडीला अनेक मोबाईल ॲप्स आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन च्या मदतीने पैसे गुंतवणे अधिक सोपे आहे. तर म्युच्युअल फंड मराठी या लेखामध्ये त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ . तर चला मग mutual fund Marathi मध्ये माहिती पाहू.
Mutual fund information in Marathi |म्युच्युअल फंड माहिती मराठी
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पर्याय आहे जो संपत्ती निर्माण करणे नियमित उत्पन्न मिळवणे व आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे त्याच बरोबर कर बचत करणे ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जोखमीच्या आधारावर गुंतवणूक करत असतो. Mutual fund नियंत्रित करण्यासाठी एक फंड मॅनेजर असतो जो आपला पैसा योग्य ठिकाणी,योग्य वेळी, योग्य तेवढ्या प्रमाणात लावून गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल हे पाहत असतो. त्या मोबदल्यात फंड हाऊस काही प्रमाणात चार्जेस आकारते. म्युच्युअल फंडांमध्ये आपण कमीत कमी शंभर रुपये पासून ही गुंतवणूक सुरु करु शकतो. म्युच्युअल फंड मध्ये index fund, tax saving fund, midcap fund, equity fund balanced fund यासारख्या आणि स्कीम मध्ये आपल्या उद्दिष्टांच्या आधारावर पाहिजे तो फंड निवडू शकतो. म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक करून आपण कंपाऊंडीग चा फायदा उठवू शकतो.
हेही वाचा शेअर मार्केट माहिती
Types of mutual funds in Marathi |म्युच्युअल फंड प्रकार
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट, रिस्क व भांडवल यांचा विचार करून फंडाचे प्रकार बघितले तर ते प्रामुख्याने asset (मालमत्ता) व (संरचना) structure या दोन भागांमध्ये विभागू शकतो
A) मालमत्ता (Asset) आधारावर म्युचल फंड
याप्रकारे म्युच्युअल फंडा मधील गुंतवणूक अनेक प्रकारच्या संपत्तीमध्ये केली जाते. मालमत्ता आधारावरील म्युच्युअल फंड खालील प्रमाणे
१) डेट फंड |debt fund
डेप्ट फंड ही अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला गुंतवणुकीवर फिक्स परतावा देत असते. या फंडातील गुंतवणूक गव्हर्मेंट बॉन्ड, कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल यासारख्या स्कीम मध्ये केली जाते. रिस्क घेऊ न शकणारे गुंतवणूकदार डेप्ट फंडामध्ये गुंतवणूक करत असतात. हा फंड फिक्स डिपॉझिट चा पर्याय म्हणून पुढे येत आहे.
२) गिल्ट फंड
गिल्ट फंड मधील पैसा government securities मध्ये निवेश केला जातो. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसा गुंतल्यामुळे या फंडाच्या नुकसानीचा धोका कमी असतो. यातील गुंतवणुकीवर फिक्स परतावा मिळत असतो.
३)लिक्विड फंड |liquid fund
लिक्वीड फंड नावाप्रमाणेच तरल असतो त्यामध्ये गुंतवणूकदाराला विशेष मुभा दिली जाते. गुंतवणूकदार केव्हाही गुंतवणूक करू शकतो किंवा गुंतवलेला पैसा केव्हाही काढून घेऊ शकतो. Liquid fund मध्ये मिळणारा परतावा अन्य खंडाच्या मानाने कमी असतो. लिक्विड खंडामध्ये गुंतवणूकदार दोन किंवा तीन दिवसासाठी ही गुंतवणूक करू शकतो. लिक्विड फंड हा एफडी ला चांगला पर्याय आहे.
४)इक्विटी फंड |equity fund
इक्विटी फंड म्युच्युअल फंडातील सर्वाधिक प्रचलित थंड असून लोक यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. equity fund तील गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये केली जाते. या फंडामधून मिळणारा परतावा अन्य फंडाच्या मानाने अधिक आहे. थोडक्यात high risk high profit प्रमाणे यामध्ये रिस्क ही जास्त आहे. इक्विटी फंड large capital fund, Mid capital fund, small capital fund,व multicap fund यामध्ये विभागला आहे. ते खाली आपण सविस्तर पाहून
४.१)लार्ज कॅप फंड |large cap fund in Marathi
लार्ज कॅप म्युचुअल फंड या स्कीम मधील पैसा शेअर बाजारातील मोठे मार्केट कॅपिटल असणाऱ्य कंपनीमध्ये गुंतवला जातो. लार्ज कॅप खंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. मोठे मार्केट कॅपिटल असनाऱ्या कंपन्याची पूर्ण ग्रोथ झालेली असते.यातून मिळणारे उत्पन्न कमी परंतु सातत्यपूर्ण असते
४.२) मिडकॅप फंड | midcap fund in Marathi
मिडकॅप फंडा म्हणजे शेअर बाजारातील अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते ज्यांचे भांडवल कमी नाही व जास्त ही नाही.कंपनीने व्यवसाय मध्ये जम बसवलेला असतो परंतु व्यवसाय मोठा होत असतो. मिड कॅप फंडामधून मिळणारा परतावा वाढतो त्याचप्रमाणे रिस्क ही वाढते.
४.३) स्मॉल कॅप फंड |small cap fund in Marathi
स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील छोट्या कंपनीमध्ये केली जाते. स्मॉल कॅप असणाऱ्या कंपन्यांना वाढीसाठी अधिक स्कोप असतो. त्यामुळे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक मोठा परतावा देऊ शकते परंतु नुकसानीचा ही धोका अधिक असतो. थोडक्यात काय तर जास्त धोका जास्त नफा
४.४) मल्टी कॅप फंड
स्टॉक एक्सचेंज मधील लहान मोठ्या मध्यम भाग भांडवल असणारे कंपनीमध्ये विभागून मल्टी कॅप फंडाद्वारे गुंतवणूक केली जाते. या फंडातील गुंतवणूक बॅलन्स गुंतवणूक म्हणून प्रचलित आहे. या फंडातील गुंतवणूक करताना नुकसानीचा धोका कमी होऊन जातो.
५)हायब्रीड म्युच्युअल फंड
हायब्रीड म्युच्युअल फंड गुंतवणूक करत असताना फंड मॅनेजर काही सरकारी योजना व शेअर बाजारातील काही चांगल्या कंपन्या यामध्ये गुंतवणूक करत असतो. हायब्रीड म्युच्युअल फंडातील गुंतवणूकी मुळे रिस्क कमी होते. रिस्क आणि परताव्याचा पूर्ण बॅलन्स साधला जातो म्हणून याला बॅलन्स म्युचुअल फंड असे ही म्हणतात.
B) संरचना (structure) आधारावर
संरचना आधार नुसार म्युच्युअल फंडाचे प्रकार खालील प्रमाणे
१)Open ended fund | ओपन एंडेड फंड
Open inter fund मधील गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदाराला काही सवलती दिलेल्या असतात. जसे की फंडामध्ये गुंतवणूक केव्हाही करू शकतो किंवा केलेली गुंतवणूक केव्हाही काढण्याचा त्याला पूर्ण अधिकार असतो. त्याच प्रमाणे फंडाचे ठराविक युनिट्स ही विकू शकतो.
२) क्लोज एंडेड फंड | close ended fund
क्लोज एंडेड फंडा मध्ये गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदाराला ठरवून दिलेल्या कालावधीच्या आधी फंड किंवा ठराविक यूनिट्स विकता येत नाहीत. याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.
३) सेक्टर म्युचुअल फंड
सेक्टर म्युचुअल फंडा मधील गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदार आपल्या आवडीच्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करू शकतो, जसे की इन्फ्रास्ट्रक्चर, फार्म, इंजीनियरिंग, बँकिंग, फुड यासारख्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा भेटते.
४)इंडेक्स फंड
इंडेक्स फंडातील गुंतवणूक सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या इंटेक्स मध्ये केली जाते. इंडेक्स फंडातील गुंतवणूक चांगला परतावा देते. मागील काही वर्षात इंडेक्स फंडातून १३ ते १५ टक्के परतावा भेटला आहे. इंडेक्स फंड इक्विटी फंडाच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे त्यामुळे पहिल्यांदा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे इंडेक्स फंडाचा विचार करू शकतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करावी. आपल्याला किती काळासाठी गुंतवणूक करायची आहे व आपण किती रिस्क घेऊ शकतो हे पहावे.
आपल्या गरजेनुसार फंडाची निवड करावी. त्यामध्ये एक रकमी (LUMP SUM) किंवा (SIP) SYSTEMATIC INVESTMENT PLAN यापैकी एकाची निवड करावी.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ब्रोकर मार्फत किंवा म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट इन्वेस्टमेंट करू शकता.
आज घडीला मोबाईल ॲप्स इन्व्हेस्टमेंट साठी चांगला पर्याय म्हणून पुढे आले आहेत. ॲप्स च्या माध्यमातून गुंतवणूक करणे अतिशय सोपे असून पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक असेल तर काही मिनिटात गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंडाचे फायदे
म्युच्युअल फंडातील गुंतवणुक बँक एफ डी पेक्षा अधिक रिटर्न्स देते तर शेअर बाजारातील नुकसानीचा धोका कमी करते. तर जाणून घेऊया खालील प्रमाणे शेअर बाजाराचे फायदे
कमीत कमी गुंतवणूक
म्युचुअल फंडा मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेचे आवश्यकता नसते. सर्वसामान्य गुंतवणूकदार मात्र शंभर रुपयापासून गुंतवणूक सुरु करु शकतात. म्युचल फंड मध्ये दोन प्रकारे गुंतवणूक केली जाते. एक रकमी गुंतवणुक (lump sum) करू शकतात किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम(SIP) भरू शकतात.
गुंतवणूक करणे सोपे
म्युच्युअल फंडा मध्ये गुंतवणूक करणे करणे अगदी सोपे असते. मोबाईल फोन मध्ये काही एप्लीकेशन आपल्याला गुंतवणूक करण्यास मदत करतात. पॅन कार्ड आधार कार्ड व बँक पासबुक या कागदपत्रांची पूर्तता करून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो.
गरजेनुसार फंड
आपल्या गरजे नुसार वेगवेगळ्या कॅटेगरी चे फंड आपल्याला गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देतात. गोल्ड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड फंड, फिक्स डिपॉझिट साठी डेट फंड, रियल इस्टेट साठी इन्फ्रा फंड, यासारखे पर्याय आपल्याला भेटतात.
गुंतवणुकीचे नियोजन
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे नियोजन फंड हाऊसेस करतात त्यासाठी तज्ञ फंड मॅनेजरची व्यक्त केले असते. त्यामुळे गुंतवणुकी संबंधी जास्त विचार करण्याची गरज पडत आहे. फंड मॅनेजर गुंतवणूक कुठे कधी व किती लावायची याचे पूर्ण नियोजन करून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा विचार करत असतो.
म्युच्युअल फंड म्हणजे काय या लेखामध्ये आपण त्याची सविस्तर माहिती पाहिजे त्यामध्ये म्युच्युअल फंडाचे प्रकार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी हे आपण पाहिले त्याच बरोबर म्युच्युअल फंडाचे फायदे काय आहेत ते जाणून घेतले लेख कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये कळवावे धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे