मुख्य सामग्रीवर वगळा

Share market information in Marathi | शेअर मार्केट मराठी

 शेअर मार्केट मराठी

  शेअर मार्केट बद्दल प्रत्येकाने काही ना काही ऐकले असेल त्यात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी असतील. शेअर मार्केट म्हटल की बहुतांशी लोक नकारार्थी होत सट्टा किंवा जुगाराशी संबंध जोडून टाकतात. भारतामध्ये केवळ ४% लोक शेयर मार्केट मध्ये invest करतात तर अमेरिकेत हेच प्रमानं ५०% आहे.  शेअर मार्केट मराठी मध्ये आज आपण तो नक्की सट्टा आहे का समजून-उमजून केलेली गुंतवणूक? हे पाहणार आहोत.

शेअर मार्केट मराठी
शेअर मार्केट 


Share market information in Marathi

    प्रत्येकाला आयुष्यात पैसा हवा असतो. पैसेवाला रुबाब काही वेगळाच असतो,मग कोणी नोकरी करून तर कोणी व्यवसाय करुन पैसा कमावतो. कष्टानं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करून योग्य परतावा मिळावा अशी अपेक्षा असते. मग ती गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. जसे की  fix deposit,  debt fund,  real estate, gold, mutual fund  यापासून मिळणारा परतावा महागाईच्या मानाने अत्यल्प मिळतो. गुंतवणुकी मधून संपत्ती निर्माण होत नाही. . Share market information in Marathi मध्ये दोन प्रकारे इन्वेस्टमेंट केली जाते, पहिली mutual fund व दूसरी डायरेक्ट शेअर खरेदी करणे.


शेअर मार्केटमध्ये भविष्याची वाटचाल ओळखून योग्य शेअरची खरेदी करण्याचे टेक्निक जमले तोच आपली संपत्ती निर्माण करू शकतो. 


शेअर मार्केट म्हणजे काय? त्यात पैसा कसा गुंतवावा? सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे. शेअर बाजार चालतो कसा. आपण कशाप्रकारे यामध्ये गुंतवणूक करू शकतो अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे आज आपण शेअर मार्केट या लेखामध्ये पाहणार आहोत.

फ्री मध्ये demat account open करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.                

GROWW


What is share market in Marathi |शेअर बाजार माहिती मराठी

 शेअर बाजार किंवा शेअर मार्केट म्हणजे शेअर्स च्या खरेदी-विक्रीसाठी असलेली जागा होय. शेअर्स म्हणजे हिस्सा किंवा भाग व मार्केट म्हणजे खरेदी-विक्रीसाठी असलेली जागा. थोडक्यात शेअर मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री केली जाते असे ठिकाण.

   शेअर खरेदी करणे म्हणजे त्या कंपनीचे आपण गुंतलेल्या भांडवलाच्या प्रमाणात भागीदार होणे असा होतो. कंपनी फायद्यात तर आपण फायद्यात कंपनी तोट्यात तर आपण तोट्यात! याचा सरळ अर्थ असा होतो.म्हणून शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्या अगोदर त्याची प्राथमिक माहिती जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

   शेअर मार्केटमधील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना थर्ड पार्टी व्यवहार असे म्हणतात. खरेदी-विक्रीचे व्यवहार स्टॉक एक्सचेंज मधील दलाला मार्फत चालतात. दलाल स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात ते आपले कमिशन काढून खरेदी विक्री व्यवहार करत असतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार सरळ स्टॉक एक्सचेंज मधून व्यवहार करू शकत नाही what is Share market information in Marathi मध्ये  शेयर मार्केट हे संपत्ती निर्माण करण्याचे उत्तम साधन आहे. 


भारतीय शेअर मार्केट चा इतिहास

आखे शेअर मार्केट सुरुवात मुंबई मध्ये कुठे १८५० वडाच्या झाडाखाली आली होती. त्यावेळी कापसाचा लिलाव केला जात असे. पुढे जाऊन १८७६ मध्ये नेटिव्ह स्टॉक ब्रोकर असोसिएशन म्हणून केली गेली तीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE नावारूपाला आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. 1992 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज ची NSE स्थापना करण्यात आली. NSE आणि BSE भारतातील महत्वाचे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत.


शेअर्स म्हणजे काय?

   शेअर्स म्हणजे हिस्सा जो कंपनी आपले भांडवल उभे करण्यासाठी विकत असते. जी व्यक्ती तो हिस्सा किंवा शेअर विकत घेते ती व्यक्ती त्या कंपनीमध्ये आपल्या त्या हिश्याच्या प्रमाणात भागीदार बनते. कंपनीचे भविष्य तेच शेअर्स धारकाचे ही भविष्य! शेअर खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते आपण सुरुवातीला ५०० रुपयांपासून ही शेअरची खरेदी करू शकतो.

Share market information in Marathi
Bull


कंपनी आपले शेअर्स का विकते.

     उद्योगधंदे व व्यापार वृद्धीसाठी कंपन्या शेअर मार्केटमध्ये येत असतात. कंपनी किंवा उद्योजक आपला व्यवसाय वाढीसाठी विविध योजना आखत असतात. या योजनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. उद्योजक आपल्या कल्पना लोकांना सांगून आपल्या व्यवसायामध्ये भांडवल गुंतवणूक करण्याची विनंती करतो. ज्या व्यक्तीला या कल्पना पटतात, त्या व्यक्ती अशा उद्योगांमध्ये आपले भांडवल लावून कंपनीचा भागीदार बनत असते. 


शेअर मार्केट मधील गुंतवणूक सुरक्षित आहे का?

 सिक्युरिटी कॉन्टॅक्ट एग्रीमेंट ऍक्ट १९५६ नुसार कंपनी व गुंतवणूकदारांचे हक्क व कर्तव्य सांगितली आहेत

  शेअर बाजारातील धांदल रोखून गुंतवणूक दारांचे हित जोपासण्या साठी भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (SEBI) ची स्थापना करण्यात आली आहे. कंपनी डीस्ट होण्यासाठी सेबीची परवानगी घ्यावी लागते.


शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी

    शेअर बाजार मध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्यासाठी किंवा ट्रेडिंग करण्यासाठी येत असते. गुंतवणूक आणि ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट असणे अनिवार्य आहे.


डिमॅट अकाउंट काय असते

  शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनी शेअर धारकाला सर्टिफिकेट देत असे. सर्टिफिकेट खराब होणे,गहाळ होणे, या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते सर्टिफिकेट पेपर लेस करून डी मटेरियलाईज् करून डिजिटल स्वरूपात करण्यात आले. याला शॉर्टफॉर्ममध्ये डिमॅट असे म्हणतात. खरेदी केलेले शेअर्स डिमॅट अकाउंट मध्ये ठेवले जातात.

शेअर खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट व ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. ट्रेडिंग अकाउंट असल्याशिवाय आपण शेअरची खरेदी विक्री करू शकत नाही.


डिमॅट अकाउंट कसे काढावे: 

     डिमॅट अकाउंट काढण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार डिमॅट अकाउंट काढत असतो.

     शेअर मार्केट बद्दल अनुभव नसेल तर ब्रोकर ची मदत घेऊन डिमॅट अकाउंट काढणे फायद्याचे ठरते. ब्रोकर आपल्याला वेळच्या वेळी माहिती व सल्ला देऊ शकतो. त्याच्या बदल्यात तो काही चार्जेस आकारणी करतो.

      बँकांमध्ये डिमॅट अकाउंट काढण्याची सोय उपलब्ध असते.

      सध्या सर्वात प्रचलित पर्याय म्हणजे Online discount brokers मार्फत डिमॅट अकाउंट काढणे. Zerodha upstock Angelone groww सारखे discount broker नाममात्र शुल्क आकारून झटपट अकाउंट काढून देतात.  डिमॅट अकाउंट काढण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट आवश्यकता असते.


सेन्सेक्स आणि निफ्टी काय दर्शवतात

 बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स सेन्सेक्स असून त्यामध्ये ३० कंपनी आहेत तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स निफ्टी त्यामध्ये ५० कंपनी आहेत.

   सेन्सेक्स ५० अंकांनी पडला निफ्टी तीस अंकांनी वधारला आपण नेहमी ऐकत असतो. दोन्ही इंटेक्स दिवसभरातील बाजारातील चढ-उतार दर्शविण्याचे काम करत असतात.

   शेअर मार्केटमध्ये पाच हजार कंपन्या लिस्टेड आहेत. या प्रत्येक कंपनीचा डाटा चेक करणे शक्य होणार नाही, अशावेळी मार्केटचा अंदाज येण्यासाठी लिस्टेड कंपनी मधील काही कंपन्या मिळून सेन्सेक्स आणि निफ्टि बनवला आहे. हा सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातील बाजाराचे अवलोकन करत असते

 

  Share trading in Marathi | शेअर ट्रेडिंग म्हणजे काय

  नफ्याच्या उद्देशाने वस्तूंची खरेदी विक्री केली जाते त्याला व्यापार किंवा ट्रेडिंग होतात. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून योग्यवेळी व योग्य किमतीला विकण्याच्या पूर्ण प्रक्रियेला शेअर ट्रेडिंग कसे बनतात.

  खरेदी केलेले शेअर्स आपल्याजवळ किती काळ राहणार आहेत याच्यावर ट्रेडिंग चे प्रकार पडतात.


इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय

   इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार एका दिवसात पूर्ण करणे होय. या प्रकारांमध्ये शेअर घेतल्यापासून बाजार बंद होण्या आधी विकणे बंधनकारक असते. शेअर बाजार सकाळी ९:१५ सुरू झाल्यापासून सायंकाळी बाजार बंद होण्याच्या आधी ३:३० वाजेपर्यंत आपला खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करावा लागतो म्हणून याला intraday trading कसे म्हणतात.


ऑप्शन ट्रेडिंग

   ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेडर ठराविक काळासाठी खरेदी केलेले शेअर आपल्या जवळ ठेवून योग्य भाव वाढल्यानंतर ते स्टॉक विकून टाकतो हा काळ काही दिवस आठवडे किंवा महिन्यात असू शकतो.


शेअर्स चे प्रकार 

शेअर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते खालील प्रमाणे

इक्विटी शेअर्स

     इक्विटी शेअर्स ला कंपनी असेही म्हणतात. मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आपले काही शेअर्स जारी करते तेव्हा त्याला इक्विटी शेअर्स असे म्हणतात. शेअर मार्केटमध्ये बहुतांशी लोक इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.


प्रेफरन्स शेअर्स

      प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शअर्स मध्ये काही मूलभूत फरक आहेत. कंपनी बोर्डाने रेफरन्स शेअर होल्डर धारकांसाठी काही नियम व अटी घालून केलेल्या असतात. शेअर होल्डर बोर्ड मीटिंग मध्ये आपले मत मांडू शकत नाहीत व कोणत्याही प्रकारे मतदान करू शकत नाही. प्रेफरन्स शेअर होल्डर धारकांना कंपनीने ठेवलेल्या सर्व बेनिफिट्स मिळत असतात.


डी व्ही आर शेअर्स

     डी व्ही आर शेअर्स म्हणजे differential voting rights! DVR शेअर होल्डर धारकांना बोर्ड मीटिंग मध्ये मतदानाचा अधिकार दिला गेला आहे परंतु त्याला काही मर्यादा आहेत. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर व बोर्ड ऑफ मीटिंग जेव्हा ठरवेल तेव्हाच DVR शेअर होल्डर धारक मतदान करू शकतो.


बोनस शेअर्स

    कंपनी प्रमोटर्स आपल्या भागधारकांना कंपनीच्या नफ्यातील हिस्सा न देता तो कंपनीच्या वृद्धीसाठी वापरून त्याबदल्यात भागधारकांना बोनस म्हणून शेअर्स दिले जातात.

Dividend म्हणजे काय | Dividend meaning in Marathi

     कंपनी आपल्या आर्थिक वर्षात जेवढा नफा मिळवते तो नफा भाग धारकांना वाटला जातो त्यालाच dividend असे म्हणतात. डिविडेंड प्रती शेअर चर्या प्रमाणात दिला जातो. कंपनी आपल्या शेअर धारकाला वेगवेगळ्या प्रकारे लाभांश देऊ शकते जसे की रोख लाभांश, शेअर्स च्या स्वरूपात लाभांश, मालमत्तेच्या स्वरुपात, विशेष लाभांश

शेअर मार्केट टिप्स

 योग्य शेअरची निवड करणे

    स्टॉक एक्सचेंज मध्ये ५००० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. यातील कोणती कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगलं नफा देऊ शकते याचा अनुमान लावणे फार महत्वाचे असते एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी निवडताना कंपनीचा व्यवसाय कर्ज नफा देनी P/E Ratio भविष्यातील धोरणे प्रमोटर्स यांची माहिती असणे आवश्यक असते. एकाच कंपनीचे शेअर खरेदी न करता  आपल्या पोर्टफोलिओ मध्ये पाच ते दहा कंपन्यांचे शेअर ठेवावे.


दीर्घकालीन गुंतवणूक

   शेअर मार्केट मध्ये नवीन लोकांना नेहमी long term investment करण्याचा सल्ला दिला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराचे सखोल ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. शेअर बाजारात shortterm मध्ये नेहमी चढ-उतार होत असतात, अशावेळी गांगरून न जाता आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून योग्य दिशेने गुंतवणूक करावे


अवास्तव अपेक्षा ठेवू नये

  झटपट श्रीमंत होण्याच्या उद्दीष्टाने अनेक जण शेअर मार्केटमध्ये येत असतात. शेअर मार्केट म्हणजे २१ दिन में पैसा डबल अशी स्कीम नाही. शेअर मार्केट मधून अन्य गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळतो. योग्य गुंतवणुकीतून वार्षिक १५ ते १८ टक्के परताव्याची अपेक्षा करावी परंतु अवास्तव अपेक्षा करू नये.


भावनांवर नियंत्रण ठेवावे

    शेअर बाजार मध्ये आपल्या मेहनतीचा पैसा लागत असल्याने समजून-उमजून गुंतवणूक करावी. एखाद्या व्यक्तीने सांगितले म्हणून घाई घाईत शेअरची खरेदी करू नये. चढत्या भावाचा फायदा घेण्यासाठी केलेली गुंतवणूक धोक्याचे ठरू शकते. एखाद्या कंपनीचे शेअर्स कमी किमतीत मिळतायंत म्हणून घेऊ नये.


शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी काही प्रसिद्ध वेबसाईट

Moneycontrol

CNBC awaaz

Economic Times

Zee business







  

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

नाव :- रायरेश्वर किल्ला  उंची :- १३३७ मीटर किल्ल्याच्या प्रकार :- गिरीदुर्ग  डोंगररांग :- महादेव डोंगर  चढाईची श्रेणी :- सोपी  ठिकाण :- रायरेश्वर तालुका :- भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत  सध्याची स्थिती :- व्यवस्थीत शिवलिंग रायरेश्वर किल्ला माहिती     रायरेश्वराचे पठार भोर पासून पश्चिमेला साधारण तीस किलोमीटर अंतरावर आहे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात घनदाट झाडी सह्याद्री पर्वतरांग, खोल दऱ्या तर घाट रस्ता यामुळे हा परिसर विशेष वाटतो. हा संपूर्ण परिसर आडवळणी असल्याने थोडा दुर्गमच वाटतो. रायरेश्वरचा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील असून भोर तालुक्याच्या पश्चिमेला ३० किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्याला मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह या ठिकाणी असणाऱ्या पांडवकालीन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शिडीमार्ग  रायरेश्वर चे पठार कुठे आहे       पायथ्या पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून गेल...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort

 बारा मावळ:      महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत.असाच एक प्रदेश म्हणजे बारा मावळ प्रांत,या बारा मावळातील पवन मावळ म्हणजे निसर्गाची मनसोक्त उधळण, हिरवेगार डोंगर, दऱ्या, खळाळून वाहणारे पाणी, धबधबे,या मूळे पर्यटकांची पावल आपसूकच हिकडे वळतात. हेही वाचा प्रतापगढ किल्ला तिकोना किल्ल्याची माहिती:       पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा ञिकोनी आकारामुळे सहज ओळखता येतो. किल्लाचा ञिकोनी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. या किल्ल्याला वितंडगड हे ही नावं असले तरी ते जास्त कुणाच्या परीचयाचे नाही. तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील किल्ला असून पुण्यापासून ६१ किलो मीटर  तर मुंबई पासून १२१ किलो मीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटी पासून किल्लाची उंची साधारण ३४८० फूट आहे .किल्लाची चढन मध्यम स्वरुपाची आहे.तिकोना गड    पुणे जिल्ह्यात असून  पुणे मुंब...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

हरिश्चंद्रगड किल्ला माहिती |Harishchandra gad information in Marathi

हरिश्चंद्रगड Harishchandra gad in Marathi  नाव :                   हरिश्चंद्रगड किल्ला उंची :        ४६०० फूट किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग :            माळशेज जिल्हा :             अहमदनगर चढाई :              मध्यम सद्यस्थिती :         चांगली हरिश्चंद्रगड किल्ला माहिती | Harishchandragad fort information in Marathi          सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड किल्ला आहे. सह्याद्रीतील काही अतिउंच शिखरे यात प्रदेशात येतात. हरिश्चंद्र तारामती आणि रोहिदास अशा तीन शिखरांचा मिळून हरिश्चंद्रगड किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४६७० फूट केवढे आहे. ऐतिहासिक नैसर्गिक अध्यात्मिक व मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो. हरिश्चंद्रगड जितका सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त त्याचा प्रवास रोमांचक आहे.       ...