पोस्ट्स

ड्रॅगन फ्रुट शेती |Dragon fruit farming in Marathi

इमेज
Dragon fruit farming in Marathi ड्रॅगन फ्रुट दिसायला सुंदर तितकेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. निवडुंगाशी साधर्म्य असलेले ड्रॅगन फ्रुट उष्ण कटिबंधीय प्रदेशातील फळ आहे. याला बाजारपेठेत चांगली मागणी असून त्याचा सरासरी बाजारभाव २०० ते ३०० रुपये प्रति किलो इतका आहे. यांची भारतीय बाजारपेठेतील मागणीच्या मानाने लागवड नगण्य आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती व सल्ला घेऊन याची लागवड केली असता भरघोस उत्पन्न मिळू शकते. लाल रंगातील ड्रॅगन फळ ड्रॅगन फ्रुट चे उगमस्थान उष्णकटिबंधीय भागातील असून प्रामुख्याने मेक्सिको व दक्षिण अमेरिका येथे आढळते. सध्या ड्रॅगन फ्रुट चे संपूर्ण जगभरामध्ये उत्पादन घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने थायलंड तैवान चीन फिलिपिन्स श्रीलंका इस्राईल या देशांमध्ये व्यावसायिक लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट ची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या पिकाच्या लागवडी वर शेतकऱ्यां कडून भर दिला जात आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जात आहे. ड्रॅगन फळाच्या मागणीच्या मानाने उत्पादन अत्यल्प असल्याने याच्या लागवडीसा...

जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi

इमेज
  जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi भारत विविध योजना व कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतीतील उत्पादन वाढले परंतु उत्पन्नाची शाश्वती कमी झाले, पर्यायाने शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करणे परवडेनासे झाले. बाजारपेठेची मागणी व शेतीमालाचा पुरवठा याचा समन्वय केल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते. पर्यायाने आधुनिक शेती करून फळबाग, ड्रॅगन फ्रुट, चंदन शेती , औषधी वनस्पती, व जिरेनियम अशा पिकांची लागवड आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेती मधून भरघोस उत्पन्न मिळू शकते. आज आपण अशाच जिरेनियम लागवड बद्दल माहिती पाहणार आहोत.   Geranium हे ही वाचा : ड्रॅगन फ्रुट शेती                 चंदन लागवड माहिती जिरेनियम तेलाचा उपयोग |Geranium oil           सुगंधित जिरेनियम तेल उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक असल्याने या उद्योगांमध्ये जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो थोडक्यात तेलापासून अनेक सुगंधित पदार्...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

जंजिरा किल्ला माहिती

इमेज
जंजिरा किल्ला  नाव मुरुड जंजिरा प्रकार जलदुर्ग जिल्हा रायगड जवळचे गाव: राजापुरी मुरुड सध्य स्थिती : बरी Janjira fort information in Marathi      जंजिरा किल्ला म्हणजे सागरी महत्त्व लाभलेला किल्ला! त्याच्या निर्मिती पासूनच अभेद्य अशी बिरुदावली घेऊन आलेला किल्ला. पर्यटकांमध्ये जंजिऱ्या बद्दल कायम आकर्षण पहायला मिळते.चहुबाजूंनी समुद्राचे पाणी आणी एका छोट्या खडकावर भक्कम काळ्या पाषाणात  उभारलेला जंजिरा सुमारे चारशे वर्षां पासून दिमाखात उभा आहे. आज आपण याच अजेय अश्या जंजिरा किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.      जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून चहुबाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची ९० मीटर आहे. किल्ला बावीस एकर मध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तटबंदीची उंची ४० फूट आहे. किल्ल्यावर जागोजागी १८ ते १९ टेहळणी बुरुज आहेत. किल्ल्यावरील कलाल बांगडी ही तोफ प्रसिद्ध आहे. जंजिरा किल्ला कुठे आहे:         जंजिरा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मुरुड नजीक राजापुरी खाडीमध्ये आहे. राजापूरच...

जिवधन किल्ला माहिती | jivdhan fort information in Marathi

इमेज
जिवधन  किल्ला  नाव: जिवधन उंची: ३७५०फूट प्रकार: गिरीदुर्ग ठिकाण: नाणेघाट जिल्हा: पुणे सद्य स्थिती: चांगली चढाई: अवघड जिवधन किल्ला चोहोबाजूंनी ताशीव कड्यांचा असून किल्ला चढाईच्या दृष्टीने अवघड आहे.जिवधन गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून त्याची समुद्र सपाटी पासून ची उंची ३७५० फूट एवढी आहे.किल्लावर चढाई साठी कातळात कोरलेल्या पायऱ्या तर काही ठिकाणी खोबण्या आहेत. किल्ल्याच्या खाली पठारावर रिव्हर्स वॉटर फॉल आहे.  किल्लाला लागूनच असलेला  वानर लिंगी सुळका चारशे फूट उंच असून तो दुरून टोकदार सुई सारखा भासतो.तर चला मग आजच्या लेखामध्ये जिवधन किल्याची माहीत पाहू. जिवधन किल्ला जिवधन किल्ला माहिती:        कोकण व देशावरील व्यापारी मार्गाला जोडणाऱ्या नाणेघाटात जिवधन किल्ला आहे.तो घाटाचा पहारेकरी म्हणून देखील ओळखला जातो.इ.स.पुर्व काळापासून नाणेघाटा तून चालणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षण व नियंत्रणाच्या दृष्टीने चावंड ,हडसर, शिवनेरी,जिवधन किल्ल्यांची निर्मिती सातवाहन कालखंडामध्ये केली . सातवाहन राजांनी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून सह्याद्री पर्वत रांगेत अनेक वैशिष्ट्...

कोरीगड किल्ला माहिती | korigad fort information in Marathi in Marathi

इमेज
कोरीगड किल्ला महाराष्ट्रात असे काही थोडे किल्ले आहेत ज्यांना तटबंधी पहायला मिळते.त्यामध्ये वर्धनगड किल्ला, विसापूर किल्ला,यांना संपूर्ण तटबंदी असून तशाच प्रकारचा एक किल्ला म्हणजे कोरीगड! कोरीगड किल्ल्याला संपूर्ण ताशीव कडा व त्याच्या आकारामुळे व स्थानामुळे वेगळा ठरतो‌ त्यामुळे आज आपन कोरीगड बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नाव          कोरीगड/कोराईगड उंची          ३१०० फूट प्रकार        गिरीदुर्ग ठिकाण     पेठ शहापूर,मावळ जिल्हा      पुणे स्थिती       चांगली चढाई        सोपी गणेश दरवाजा कोरीगड किल्ला कुठे आहे:         कोरीगड किल्ला पुणे जिल्ह्यातील बारा मावळ प्रांता पैकी ' कोर बारस ' मावळात आहे.मुळशी धरणाच्या पश्चिमेला व पवना धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत लोणावळा डोंगररांगेत कोरीगड किल्ला आहे.लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सवाष्णी घाट माथ्यावर कोरीगड आहे. लोणावळ्या पासून दक्षिणेस पंचवीस किलोमीटर अंतराव...

रामशेज किल्ला माहिती | Ramshej fort in Marathi

इमेज
रामशेज किल्ला:           रामशेज किल्ला आपल्याला पौराणीक संदर्भ लाभला आहे तर मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. पौराणिक कथांमध्ये प्रभू श्रीराम वनवासात असताना ते या डोंगरावर विश्रांती साठी येत असत,याच ठिकाणी त्यांची सेज होती म्हणून याला रामशेज असे नाव पडले.स्वरायाचा  मावळ्यांनी प्रचंड मोठ्या मोगल सैन्याला झुंज देऊन तब्बल पाच ते सहा वर्ष किल्ला लढवला.आजच्या लेखा मध्ये आपण रामशेज किल्ल्या बद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत. रामशेज किल्ला माहिती: किल्ल्याचे नाव: रामशेज किल्ला उंची : ३२०० फूट प्रकार :  गिरिदुर्ग   जिल्हा : नाशिक  सद्यस्थिती :चांगली   चढाई : सोपी रामशेज किल्ला प्रवेशद्वार रामशेज किल्ला कोठे आहे:          रामशेज किल्ला नाशिक जिल्ह्यात असून नाशिक पेठ रस्त्यावरील आशेवाडी या गावा लगत आहे.पंचवटी पासून १० किलोमीटर तर नाशिक शहरा पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. रामशेज किल्ला सपाट भूप्रदेशात असून दूरवर कोणताही डोंगर पहायला मिळत नाही. विशाल...