पोस्ट्स

इर्शाळगड किल्ला | Irshalgad fort information in Marathi

इमेज
       इर्शाळगड पावसाळा किंवा हिवाळ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधीक असते कारण ही तसेच आहे निसर्गाची मनसोक्त उधळण हिरव्यागार डोंगर रांगा दाट धुके,पावसाच्या सरी आणी गडावरून दिसणारे नयनरम्य दृश्य असै वातावरण वर्षभराची धावपळ आजूबाजूचा  गोंगाटा या पासून मुक्ततः मिळते व नविन उर्जा प्राप्त होते.     इर्शाळगड मुंबई पुणे लोहमार्गावर पनवेल पासून साधारण २०किमी अंतरावर असलेला किल्ला महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळात जे केले निर्माण झाले त्या काळातील किल्ला नक्की असावा. उंची ३७०० फूट असून गिरीदुर्ग प्रकारातील या किल्ल्या वर वेगळ्या ठिकाणी खडकात खोदून निर्माण केलेल्या चार पाण्याची टाकी आहेत तसेच गुहा पाहायला मिळतात परंतु गुहेपर्यंत जाणे जिकरीचे काम आहे याव्यतिरिक्त किल्ल्यावर पाण्यासारख्या वास्तू किंवा अवशेष आढळत नाहीत किल्ल्यावरील मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या वरील भागात असलेले निसर्गनिर्मित नेढ होय सर्वसाधारणपणे सात ते आठ फूट चंद्रकृती आकाराचे हे नेढ आहे. नेढ आर पार असून यामधून व्यक्ती पलीकडे सहज जाऊ शकते. याठिकाणी येण्यासाठी छोटासा उभा कडा चढून यावे ला...

परतीचा पाऊस शेतकरयांचा जिवाशी

 आज ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात आणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाने ग्रामिन जनजीवन विस्कळित करून टाकले आहे.शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला सोयाबिन, कापूस, तुर, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत सरकार ने द्यावी अशी मागणी आज शेतकरी करत आहेत.आज भात काढणी ची असतील किंवा सोयाबिन कापूस तुर यांचा काढणी ची कामे चालू आहेत त्यातच पाऊस आपली उपस्थिती रोज दाखवून देत असल्याने शेतकऱ्यांना पीक काढावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाटेश्वर मंदिर सातारा | Pateshwar Shiva Temple

इमेज
 पाटेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले पाटेश्वर गाव खडकाच्या गुहेत आणि भगवान शंकराचा नावाने ओळखले जाते.  पाटेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा-कोल्हापूर राज्य महामार्गावर आहे.  पाटेश्वरात भगवान शिव आणि इतर देवतांच्या आठ विशाल दगडी गुहा आहेत.  हे ठिकाण अद्वितीय आहे कारण त्यात 1200 पेक्षा जास्त शिवलिंग आहेत.  त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे महा शिव लिंग, ज्यावर नाजूक आणि सुंदर कोरीव कामं आहेत. मंदिराकडे जाताना सुरवातीला छोटे गणपती मंदिर आहे तर त्याचा पुढे गेल्यावर कोरीव दगडात बांधलेली पुष्करणी पहायला मिळते त्यात कमळाची फुले लक्ष वेधून घेतात.    देखभाल दुरुस्तीमुळे बहुतेक मंदिरे मोडकळीस आली आहेत.  तरीही, स्थान आध्यात्मिक आणि शांत वातावरणामुळे बरेच पर्यटक आकर्षित करते.  पाटेश्वर प्रत्यक्षात एका टेकडीवर आहे ज्यामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पती आहेत.  या टेकडीवर करवी, जामुन, बन्या, सागवान, सोनकी आणि मलबार डेल्फिनिअम यासह विविध प्रकारची झाडे आणि फुले आढळतात.  शिवमंदिर  पाटेश्वर येथील एक प्रमुख आकर्षण ...

ठोसेघर धबधबा | Thoseghar waterfall information in Marathi

इमेज
 ठोसेघर धबधबा माहिती.          पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वर्षा सहलीचे वेध लागतात.त्यातच सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला असल्याने याला पर्यटनाचे नंदनवन म्हणून संबोधले जाते.पावसाळ्यात पर्यटक कास पठार, वजराई भांबवली धबधबा, नवजा ठोसेघर ,या ठिकाणी भेटी देत असतात.त्यातील कास पुष्प पठाराला युनिस्को वर्ल्ड हेरीटेज साइटचा दर्जा लाभला असल्याने हे ठिकाण जागतीक स्तरावर पोहोचले आहे.परंतु याला भेट देण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागते.          ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील प्रमुख व परिचीत म्हणून गनला जातो.पावसाच्या पहील्या सरी बरसताच पर्यटकांचे पाय आपोआप या ठिकाणी ओढले जातात. सज्जनगड आणि ठोसेघर एकाच मार्गावर जवळ जवळ असल्याने आनंद द्विगुणित करतात.          ठोसेघर धबधबा सातारा जिल्ह्यात असून सातारा शहरा पासून २४ किमी अंतरावर असलेल्या ठोसेघर गावानजिक उगम पावणाऱ्या तारळी नदीवर आहे.या ठिकाणी पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा अदभुत सोहळा पाहण्याचे भाग्य लाभते.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेत,...

चावंड किल्ला माहिती

इमेज
        मराठे शाहीचा इतिहास आणि गडकिल्ले यांचे नाते म्हणजे आई मुला सारखे घट्ट,या किल्ल्यांनी किती मावळ्यांना लढाई आणि गणिमी कावा करायला शिकवले असेल याची गणतीच नसेल.काती लढाया पाहिल्या असतील,किती तोफांचे गोळे पाठीवर घेतले असतील फक्त त्यांनाच माहीत.  स्वराज्याचा पाया रचला तोही गडांच्या साक्षीने आणि यांची मुहूर्त मेड रोवली ती म्हणजे छञपती शिवाजी महाराजांनी. परिचय:        सह्याद्री पर्वत रांगेत अनेक किल्ले उभे आहेत. त्यातील नाणेघाट या व्यापारी मार्गावर घाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन,हडसर, शिवनेरी, आणि चावंड किल्ले परिचयाचे आहेत.       चावंड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून याची समुद्र सपाटी पासून उंची साधारण ३४०० फूट एवढी आहे. कुकड नदी च्या उगम स्थाना पाशी गड असल्याने याला 'कुकडनेर' असेही म्हणतात.        चावंड किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर पासून १५-१६ किलोमीटर अंतरावर आहे.या किल्लाच्या पायथ्याशी असलेल्या चावंड गावात पोहचायला ४०-४५ मिनिटे लागतात.येथे पोहोचवल्या नंतर आपल्याला मोबा...

मल्हारगड किल्ला माहीती

इमेज
परिचय     महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत त्यातील काही हजार वर्ष जुने आहेत काळाच्या ओघात अनेक किल्ल्याची पडझड  झाल्याने कोणता किल्ला सर्वात प्रथम बांधला हे जरी सांगता येत नसले तरी मल्हारगड हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधला गेल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रत आढळतो.  मल्हार गडाची निर्मिती पेशव्यांचे सरदार पानसे यांनी इसवी सन सतराशे सत्तावन ते सतराशे साठ या काळामध्ये केली या किल्ल्याची निर्मिती महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांच्या तुलनेत अलीकडील असल्याने याला तरुणगड असेही म्हणतात.  पुणे जिल्ह्याच्या दक्षिण बाजूला सह्याद्री पर्वतरांगाच्या  दोन उपरांगा पूर्वेकडे जातात त्यातील भोलेश्वर डोंगररांगेत मल्हार गडाची बांधणी केली आहे यात रांगेत वज्रगड पुरंदर व सिंहगड येतात र दुसर्‍या रांगेत तोरणा व राजगड हे किल्ले येतात.  हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश पुणे सासवड रोड वरील दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी किंवा टेहळणी करण्यासाठी तोफ गोळे बनवण्याचा कारखाना यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या गडाच्या पायथ्याशी असणारे सोनोरी या गावात सरदार पानसे यांचे वास्तव्...

सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात फिरता येतील अशी पर्यटनस्थळे/ Tourist places in Satara that can be visited in the rainy season

इमेज
          पावसाळ्यात वातावरण अतिशय प्रसन्न आणि अल्हाददायक असते.सभोवताली हिरवेगार डोंगर,नदी नाल्यातील खळखळाट, पाण्यामुळे तयार झालेले धबधबे, आपणाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात अशा वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे म्हणजे जणू काही पर्वणीच.      सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. जसे की नवजा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे तर मान खटाव हे तालुके अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून परिचित आहेत. सातारा जिल्ह्या तसे पर्यटकांसाठी नंदनवन म्हणून परिचित आहे. पावसाळ्यातील पर्यटकांचे आकर्षण बनण्याचे कारण सातच्या पश्चिमेला असलेली सह्याद्री पर्वतरांग याठिकाणी उंच उंच डोंगर नद्यांची उगमस्थाने कड्यावरून वाहणारे उंचच्या उंच धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात तर चला मग या पावसाळ्यात फिरता येतील अशा सातारा जिल्ह्यातील ठिकाणांची सैर करू आणि पाहू तुम्ही कोणत्या ठिकाणाला भेट देतात. १ ठोसेघर धबधबा         ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे या...