सातारा जिल्ह्यातील पावसाळ्यात फिरता येतील अशी पर्यटनस्थळे/ Tourist places in Satara that can be visited in the rainy season
पावसाळ्यात वातावरण अतिशय प्रसन्न आणि अल्हाददायक असते.सभोवताली हिरवेगार डोंगर,नदी नाल्यातील खळखळाट, पाण्यामुळे तयार झालेले धबधबे, आपणाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात अशा वातावरणात कुटुंबासोबत किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे म्हणजे जणू काही पर्वणीच.
सातारा जिल्हा नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. जसे की नवजा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे तर मान खटाव हे तालुके अवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून परिचित आहेत. सातारा जिल्ह्या तसे पर्यटकांसाठी नंदनवन म्हणून परिचित आहे. पावसाळ्यातील पर्यटकांचे आकर्षण बनण्याचे कारण सातच्या पश्चिमेला असलेली सह्याद्री पर्वतरांग याठिकाणी उंच उंच डोंगर नद्यांची उगमस्थाने कड्यावरून वाहणारे उंचच्या उंच धबधबे पर्यटकांना विशेष आकर्षित करतात तर चला मग या पावसाळ्यात फिरता येतील अशा सातारा जिल्ह्यातील ठिकाणांची सैर करू आणि पाहू तुम्ही कोणत्या ठिकाणाला भेट देतात.
१ ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे याठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची वर्दळ लक्षणीय असते. हे ठिकाण सातारा शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. लहान व मोठा असे दोन धबधबे आहेत त्यांना राम-लक्ष्मण धबधबा असे म्हणतात. उरमोडी नदीचा उगम याच ठिकाणी होतो छोट्या धबधब्याची उंची 40 मीटर असून मोठा धबधबा दोनशे दहा मीटर उंचआहे. धबधबा पाहण्यासाठी प्रशासनाने प्लॅटफॉर्मची व्यवस्था केली आहे तसेच सुरक्षितता कंपाऊंड बांधले आहे. येथे झालेले पूर्वीचे अपघात पाहता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. येथे जेवण नाश्त्याची सोय आहे. येथील वातावरण मन प्रफुल्लीत करते.
ठोसेघर येथे आल्यानंतर तुम्ही सज्जनगड व चाळकेवाडी येथे जाऊ शकता.
२ वाजराई भांबवली धबधबा
भारतातील काही उंच धबधब्यांमध्ये वजराई धबधब्याची गणती होते हा धबधबा सातारा पासुन सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे. कास पठारा पासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे. कास बामनोली रोडवरील तांबे फाट्यापासून पाय वाटेने धबधब्याकडे चालत जावे लागते, हा प्रदेश कोयना अभयारण्याच्या बफर झोन मध्ये येत असल्याने जंगल व जंगली श्वापदे भरपूर प्रमाणात आहेत जंगल इतके घनदाट आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पडत नाही. याठिकाणी विविध प्रकारची झाडे व पशुपक्षी पाहायला मिळतात. 'जाळू' जास्त प्रमाणात असल्याने काळजी घ्यावी लागते. हा धबधबा अतिशय उंच असून तीन टप्प्यांमध्ये जमिनीवर पडतो.
याठिकाणी येऊन तुम्ही कास पठार कास तलाव व बामनोली ला बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
३ एकिव धबधबा
एक धबधबा कास रोड वरील पारंबो फाट्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा एकिव गावात असल्यामुळे याला एकिव असे म्हणतात. कास पठारावरील पडणारे पावसाचे पाणी या ठिकाणाहून वाहते धबधबा लहान असून कुटुंबातील व्यक्ती सोबत मनसोक्त भेटण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. धबधबा अतिशय सुरक्षित असून आपण आपल्या कुटुंबासोबत येथे नक्की भेट देऊ शकता कास पुष्प पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी हा धबधबा हमखास पहावा असा आहे.
४ धारेश्वर
धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण पासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी डोंगरामध्ये खोदलेल्या लेण्या आहेत या लेण्यांमध्ये महादेवाचे व प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे तसेच एक मठ व भक्तांसाठी निर्माण केले खोल्या आहेत. हा डोंगर अर्धवर्तुळाकार असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतो. येथे महादेवाची मोठी पिंड व नक्षीकाम केलेल्या शिळा आहेत येथे पावसाचे प्रमाण जास्त असल्याने डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे मन प्रसन्न करून टाकतात तुम्ही लेण्यांमध्ये बसून समोर पडणारे धबधब्याचे पाणी निहाळू शकता. येथील घनदाट जंगल तांबडी माती मनाला प्रफुल्लित करते
येथे येणाऱ्यांनी रुद्रेश्वर मंदिर व लेण्या तसेच दातेगड ही पाहू शकता.
५ ओझर्डे धबधबा
ओझर्डे धबधबा सातारा जिल्ह्यातील कोयनानगर कोयना धरण येथे आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात. कोयना धरणाच्या बाजूने नवजा कडे जाताना अनेक लहान-मोठे धबधबे लागतात. ओझर्डे धबधबा 800 फुटावरून कोसळतो. हा धबधबा पाहण्यासाठी शुल्क आकारण्यात येतो. हा प्रदेश कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने येथे सुरक्षितेचे उपाय करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी येऊन आपण कोयना धरणाचा शिवसागर जलाशय पाहू शकता तसेच पंडित जवाहलाल नेहरू उद्यानही पाहू शकता.
वर्षा सहलीला जाताना आपली व आपल्या परी जनांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते
पावसाळ्यात रस्त्याचा रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी जपून चालवावी.
छत्री व रेनकोट कायम बरोबर ठेवणे आवश्यक आहे.
निसरड्या जागेवर व वाहत्या पाण्यामध्ये जाणे टाळावे.
तर मग केव्हा जाताय आपण वर्षा सहलीला.
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवामहत्त्वपूर्ण माहिती.. आम्ही नक्की जाणार
उत्तर द्याहटवा