वजराई धबधबा माहिती:
वजराई धबधबा सातारा जिल्ह्यातील भांबवली गावात आहे. या गावातील वजराई देवीच्या नावावरून याला वजराई धबधबा असे म्हणतात.हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा असून यांची उंची साधारण ५६० मिटर म्हणजे १८४० फुट आहे.हा धबधबा बारमाही असून हे उरमोडी नदीचा उगमाचे ठिकाण आहे.
कास पुष्प पठारा पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असल्याने येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. भांबवली हा सह्याद्रीतील ४४ डोंगरांचा परीसर असुन उंच डोंगर खोल दऱ्या मन प्रसन्न करतात.
भांबवली च्या जंगलात अनेक जंगली प्राणी पक्षी त्यामध्ये रानगवा रानडुक्कर साळींदर भेकर क्वचीत अस्वल आणि बिबट्या मोर लांडोर तितर लाहुरी हे सहज पहायला मिळतात.येथील जंगलात अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत, जंगल इतके घनदाट की सुर्य प्रकाश ही जमीनीवर पडत नाही.
जळव
येथील जंगलात जळव भरपुर प्रमाणात आहेत. जळव मानहानीचा शरीराला चिकटुन रक्त शोषतात.जळवांचा शारिरीक उपचारासाठी उपयोग केला जातो. स्थानिक लोक जळला शरिराला चिकटू नये म्हणून झाडपाल्याचा रस शरीराला चोळतात.
वजराई धबधबा
भांबवली गावातून जंगलातील पायवाटेने दरी उतरून खाली धबधब्याकडे जावे लागते.धबधब्याकडे तसे अवघडच पण पायथ्याशी जाऊन धबधबा पाहणे म्हणजे स्वर्ग पाहील्याचा अनुभव आल्या शिवाय राहत नाही. धबधब्याची उंची इतकी की कितीही मान वर केली तरी धबधब्याचं टोक दिसत नाही. वरून खाली तिन टप्प्यात पाणी पडते. पहिल्या टप्पाची उंची बाकीच्या दोन टप्पा पेक्षा जास्त आहे.
फेसाळते पाणी, अंगावर उडणारे पाणी , आजूबाचे हिरवेगार उंच डोंगर काळी वेळ हे सर्व पाहून भान हरपून जाते.
भांबवली ला जायचे कसे:
सातारा वरून भांडवली ला जाण्यासाठी सातारा बसस्थानकातून बामणोली किंवा तेटली या एस टी तून तांबी येथे उतरुन पायी विस मिनटात भांबवली ला जाता येते.जर स्वताच्या गाडी ने जाणार असाल तर सातार मधून पोवईनाका अदालतवाडा, बोगदा, यवतेश्वर, कास मार्गे जाता येते.
महाबळेश्वर मार्गे ही भांडवली ला जाता येत परंतु स्वताचा वाहनाने महाबळेश्वर तापोळा बामणोली मार्गे भांडवली ला जाता येते. सार्वजनिक वाहतूकीची कोणतीही सोय नाही.
काय काळजी घ्यावी:
भांबवली चर्या जंगलात जळवा असल्यामुळे शरीर पुर्ण झाकेल अशी कपडे घालावी. पायात शुज घालावे कारण जळवा पायाला जास्त चिकटतात. जंगली प्राण्यांचा धोका असल्याने काळोख दाटायचा आत धबधबा पाहुण माघारी फिरावे.कास तलावा पाशी जेवण नाष्टाची उत्तम सोय आहे.
जवळची प्रेक्षणीय स्थळे
कास पुष्प पठार, यवतेश्वर, ठोसेघर,सज्जनगड, तापोळा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
कृपया नकारार्थी कमेंट टाळावे